दि. 23/1/2023
मानवी जीवनाची वास्तविकता
बंधु भगिनींनो,
मानव जीवनाची वास्तविकता म्हणजे या विश्वाची जगाची, अस्तित्वाची वास्तविकता आहे. हे विश्व, जग आणि जीव कोणी निर्माण केले हे फार मोठे गूढ आहे. विश्वाची, जगाची, जीवाची निर्मिती कोणा एका देवाने ब्रम्हाने केली हे सर्व थोतांड, भूलभुलैया आहे. कारण जगाची, विश्वाची निर्मिती. निर्मिती हे प्राकृतिक पाच तत्त्वांनी व जीवाची निर्मिती ही नरनारीच्या संयोगाने झालेली दिसून येते. जगाच्या, विश्वाच्या निर्मितीमध्ये पंचतत्त्व आणि नरनारीचा संयोग याशिवाय देव, धर्म, जाती, देवदर्शन, पूजा, तीर्थक्षेत्र, मंदिर, मूर्ती या सर्व घटकांचे योगदान शून्य आहे. हे सर्व घटक केवळ शाब्दीक, छळवादी, कृत्रिम व निरर्थक दिसून येतात. कारण या पृथ्वीतलावर कोणताही जीव आईवडील म्हणजे जन्मदाता पालक, योग्य वळण अर्थात शिक्षण, प्रेम, सहकार्य, कष्ट (कर्म) आणि नियमबद्धतेशिवाय जगूच शकत नाही. ज्या जीवाचे पालक आहे वळण अर्थात शिक्षण, सहकार्य, संघटन, कष्ट, करण्याची बुद्धी आहे व तो विशेष सामाजिक नियमाने वागतो. अशा जीवाला कृत्रिम निरर्थक देव, धर्म, जाती, मूर्तीपूजा, क्षेत्रदर्शन वगैरेची जीवनात गरज पडत नाही. वरील पाचही घटकांची बहादूर, शिक्षित व कष्टकरी जीवाला किंचितही गरज नाही. वरील पाचही घटकांची म्हणजे देव, धर्म, जात, मूर्तीपूजा, देवदर्शनाची निर्मिती ही नामर्द, पुरुषार्थहीन, आळशी, परोपजीवी, अश्रमजीवी समुहांनी केलेली असून यामुळे विश्वाचे जगाचे, कष्टकरी जीवाचे अमर्याद नुकसान झाले असून या अश्रमी समुहामुळे विश्वात विषमता, अन्याय, अत्याचार, दु:ख, शोषण, गुलामीची निर्मिती झाली असून विश्वाच्या, जीवाच्या सर्जनाला, कल्याण व प्रगतीला प्रचंड बाधा निर्माण झाली आहे.
विश्वाची निर्मिती, जीवाच्या निर्मितीला केवळ पंचतत्त्व आणि आईवडील असून या सुंदर विश्वाचे निर्माते देखील तेच आहेत. आज दिसणारे हे सुंदर विश्व, जीव निर्माता नरनारी अर्थात आईवडील, सहायक पंचतत्त्व, शेतकरी, मजूर, शिक्षक, संशोधक, वैद्यक, सीमा संरक्षक, बलिदानी जवान, पाळीव उपयुक्त पशु हेच आहेत. इतर कोणत्याही कृत्रिम घटकांचे व कृत्रिम घटक निर्मात्याचे कवडीचे देखील योगदान हे विश्व निर्मितीमध्ये नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून या पृथ्वी तलावरून देव, जात, धर्म, मूर्तीपूजा, क्षेत्रदर्शन घटकांचा व हे घटक निर्मात्यांना हटविल्याशिवाय किंवा त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय या विश्वाचे व मानव समुहांचे कल्याण होते. सुखी, समृद्ध होणे, सुंदर होणे कधीही शक्य नाही, हे आजच्या सर्व विचारवंतांनी, जबाबदार समुहांनी व शासक वर्गांनी समजून घेण्याची नितांत अनिवार्यता आहे.
वरील पाच मानव घातक घटक निर्माते मनुवादी, हे गेल्या पाच हजार वर्षांपासून बहुजन मुळनिवासींचे शोषण करीत असून 2014 नंतर या मनुवादींनी भारत देश हिंदू (ब्राह्मणदेश) बनविण्याचा दृढ निश्चय केला असून ईव्हीएम निवडणूक यंत्राचा दुरोपयोग करून अनैतिकरित्या सत्तेला चिटकून बसलेले आहे. एवढेच नव्हे तर शासनाच्या प्रत्येक क्षेत्रावर, अंगावर मनुवाद्यांना बसवून बहुजनांचा छळ करीत आहे. ईव्हीएम यंत्र हिंदू-मुसलीम वाद, नोटबंदी, खाजगीकरण, लैटरल व कॉलेजियन न्यायधिश नेमणूक, सवर्ण आरक्षण, निवडणूक आयोग, नियोजन आयोग, शिक्षण आयोग व इतर अनेक आयोगांमध्ये मनमानी व गोंधळ निर्माण करून साम दाम दंड भेदाने आज निर्लज्जपणे सत्तेवर काबीज असून आर.एस.एस. च्या धोरणाने बहुजनांना शिक्षण, सेवा, साधनहीन बनवून देशावर हुकुमशाही लादण्याच्या प्रयत्नात आहे. बहुजन म्हणजे अनुसूचित जाती-जमाती, भटके, विमुक्त, इतर मागास वर्ग हे सर्व सिंधू संस्कृतीकालीन श्रमसंस्कृतीप्रधान व प्रकृतीवंदक असताना निधर्मी असताना, देशाचे संविधान सुद्धा निधर्मी असताना हुकुमशाहीवृत्तीने देशाला हिंदू (ब्राह्मण) राष्ट्र बनविण्याचा हट्टवादीपणा दिसून येत आहे. काही मागासवर्गीयांना त्यांचा पुरुषार्थी इतिहास व त्याचे शत्रुमित्र माहीत नसल्यामुळे ते मनुवादी शत्रुंनाच सहकार्य समर्थन करीत आहे. बहुसंख्य बहुजन समाज हा निरक्षर असल्यामुळे तसेच खर्या लोकशाहीचे सुद्धा ओळख नसल्यामुळे व जागृतीचा अभाव या सगळ्या अभावामुळे आजचा बहुजन समाज बहुसंख्य असूनही अल्पसंख्य मनुवादीची गुलामी करीत आहे. ईश्वर, धर्म, जाती, मूर्तीपूजा, क्षेत्रदर्शनमुक्त हेच खरे बहुजनांचे वास्तव जीवन असून ईश्वर, धर्म, जात, मूर्तीपूजा, क्षेत्रदर्शन हे परोपजीवी अश्रमी मनुवादीचे पुरुषार्थहीन जीवन असून या संस्कृतीचे समर्थन न करणे यातच बहुजनांचे कल्याण आहे; हे सत्य बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे सर्व स्वातंत्र्यसैनिक बहुजन, अस्पृश्य, बहिष्कृत, मागास, वंचित, पीडितांना न्याय, हक्क, अधिकार, शिक्षण, रोजगार मिळवून देणारे सर्व नेते समाजसुधारक, संत, महंत हेच वस्तुत: बहुजनांचे वंचितांचे दैव, ईश्वर, दाता आहेत. या लोकांनी, महापुरुषांनीच सर्व बहुजनांना मनुवादी, मोगल, मुसलीम, विदेशी आक्रमक, पेशवाई या सर्वांच्या गुलामीतून मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून ते सर्व आपले देव आहेत. गुलामीत जखडून ठेवणारे मनुवादीचे कृत्रिम नकली 33 कोटी देव हे बहुजनांचे कधीच देव नव्हते व होऊ शकत नाही. मानव निर्मित मंदिर व तीर्थक्षेत्रांतील मुर्त्या या कोणाचेच देव-देवी असू शकत नाही. कारण ते मानव निर्मित असून निर्जीव असतात व पोट भरण्यासाठी, कमाईसाठी धर्मभोळ्या लोकांना लुटण्यासाठी बनविलेल्या असतात. मानव समाजाला न्याय मिळविण्यासाइी ज्या महामानवांनी त्याग, बलिदान केलेला असतो त्यांच्या विचार कार्यावर अमल करणे व त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना नमन, वंदन करणे हीच त्यांची खरी भक्तीसेवा असते. पूजा, प्रार्थना, आरती, अभिषेक इतर कर्मकांडे हे निर्जीव प्रतिमांसमोर निरर्थक व पोरखेळ समजावे. स्मृती, आठवणी जिवंत राहाव्यात म्हणून महामानवांना वंदन करणे व त्यांच्या मार्गाने चालणे एवढेच पुरेसे आहे. इतर कर्मकांड मनुवादी, पुजारी व परोपजीवी, स्वार्थी, भोंदू लोकांचा, संत, महंतांचा धंदा असतो. विचार व कर्म वगळून इतर धार्मिक कर्मकांड हे निरर्थक समजावे. कर्मकांड करण्यापेक्षा महामानवांचेच विचार आचरणात आणणे व त्यांनी दर्शविलेली, केलेली अथवा अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे हे करोडोपट श्रेष्ठ आहेत.
मनुवादीची देव-दानवाची संकल्पना ही शंभर टक्के खोटी असून त्यांनी स्वत:ला देव व सर्व बहुजनांना दानव, राक्षस, असूर संबोधले आहे. खालील सुभाषितांवर थोडा विचार करा.
1) देवाधिनं जगत सर्व, मंत्राधिनं देवतं।
ते मंत्रा ब्राह्मणाधिनं, ब्राह्मणो मम देवतं।
अर्थ - हे संपूर्ण विश्व देवाच्या आधिन (ताब्यात) आहे. म्हणजे ब्राह्मणांच्या आधिन आहे. देव (ब्राह्मण हे मंत्राच्या आधिन आहेत. परंतु मंत्र हे ब्राह्मणांच्या आधिन आहे. म्हणून सर्वांनी ब्राह्मणालाच देव मानून ब्राह्मणांची पूजा, वंदना, मान सन्मान करावा.
2) ब्राह्मणांची दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा। गोराज्य, वाणिज्य, कृषि याहून भिक्षा श्रेष्ठ।
अर्थ - ब्राह्मणांचा हक्क भिक्षेवर आहे. भिक्षा मागणे हे पशुपालन, व्यापार व शेती करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून ब्राह्मणांनी काहीही न करता भिक्षा मागून व दानदक्षिणा घेऊन विनाकष्ट बसून आरामाने भोगवादी जीवन जगावे.
वरील केवळ दोन श्लोकांवरून विनाकष्ट जीवन जगण्यासाठी मनुवादी लांडग्यांनी कसे खोटे पौराणिक शास्त्र निर्माण केलेले आहे, हे सहज समजण्यासारखे आहे.
तात्पर्य, देव, धर्म, जाती, मूर्तीपूजा, क्षेत्रदर्शन या सर्व खोट्या व स्वार्थी संकल्पना असून देव, धर्म, जाती, मूर्तीपूजा व क्षेत्रदर्शनमुक्त भारताचे संविधान हेच सर्व भारतीयांचे प्राणतत्त्व आहे, हे समजून संविधानाचे रक्षण करून सर्व बहुजनांचे व देशाचे संरक्षण करावे असे नम्र आवाहन आहे. कारण जे स्वातंत्र्य बहुजनांना 33 कोटी देवांनी, मंदिर, तीर्थक्षेत्रांनी, मजीद, चर्च, विहार, गुरुद्वारा वगैरेनी, देवतांनी मिळवून दिले नाही ते स्वातंत्र्य बहुजनांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वांना मिळवून दिले आहे.
तेव्हा सर्व स्वातंत्र्यसैनिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान हेच आपल्या स्वातंत्र्याचे, गुलामी मुक्तीचे शिल्पकार, संरक्षक, पालक, मायबाप आहेत. म्हणून हे सर्वचे सर्व आपले देव-देवी आहेत. त्यांच्या मार्गाने, विचाराने, वाटचाल करून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणे व देश व देशाची जनता सुखी, समृद्ध बनविणे हेच आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे व हेच मानवी जीवनाचे वास्तव आहे.
जय भारत - जय संविधान
प्रा. ग. ह. राठोड