हिंदू गोर बंजारा, लबाना, नायकडा, कुंभ मेळापासून तयार होणारे शुंभ बगैर जाणे, छाणे, आर.एस.एसेर मानेवाळे करता खास लेख

हिंदू गोर बंजारा, लबाना, नायकडा, कुंभ मेळापासून तयार होणारे शुंभ बगैर जाणे, छाणे, आर.एस.एसेर मानेवाळे करता खास लेख

दि. 30/12/2022 हिंदू गोर बंजारा, लबाना, नायकडा, कुंभ मेळापासून तयार होणारे शुंभ बगैर जाणे, छाणे, आर.एस.एसेर मानेवाळे करता खास लेख 1) गोर बंजारा समाजाचा विनाशकाल निश्‍चित. 2) गोर बंजारा समाजाची गुलामी अटळ, अखंड. 3) गोर बंजारा समाजाचा स्वयंघात, विनाश काळ. 4) गोर बंजारा समाजाची विपरीत बुद्धी. 5) गोर समाजाच्या सुधारकांनी केला गोरख धंदा सुरु. 6) गोर बंजारा समाजाच्या गुरुजनांनी गोर समाज विकला. 7) गोर बंजारा गुरुंनी धरली गुखडीची वाट. 8) गोर बंजारा समाज फसला शत्रु आर.एस.एस. च्या जाळ्यात. 9) गोर बंजारा समाजातील पाळीव आर.एस.एस. च्या तीतरांनी गोर समाजाचा केला घात. 10) गोर बंजारा समाजाचे गुरू व सुधारक बनले कुर्‍हाडीचे दांडे. 11) गोर बंजारा समाजातील काही लोकांनी गोरधाटीशी केली गद्दारी. 12) सिंधू संस्कृतीचा निर्माता, मालक, राजा, प्रबुद्ध गोर बंजारा, भारताचा शिल्पकार, मानवी श्रेष्ठ संस्कृतीचा निर्माता, विश्‍व प्रसिद्ध व्यापारी बनला अविचारी. 13) प्रकृती, पूर्वज, पाळीव जीव, वृक्षवल्ली, वंदक गोर बंजारा बनला मूर्तीपूजक. बहिरी ससान्यांनी केली गोर बंजारा समाजाची शिकार. 14) लोभी गुरू व लालची चेले यांनी गोर बंजारांना दगडी नावेत बसविण्याची केली पूर्ण तयारी. 15) गोर बंजारा कुंभमेळ्याने गोरधाटीचा उज्जवल इतिहास नष्ट होणार. 16) आर.एस.एस. गोरधाटी व हिंदू गोर बंजारांना उद्ध्वस्त करणार. 17) हिंदू गोर बंजारा बनल्यावर आदिवासी गोर बंजारांची ओळख आणि सर्व संवैधानिक हक्क, अधिकार, सवलती, जल, जंगल, जमिनीवरील अखंड मालकी व आरक्षण नष्ट होणार. 18) गोर बंजारा हिंदू बनल्यावर मेंढ्यामागील कुत्र्यासारखे हाल होणार. 19) गोर बंजारा समाज हिंदू बनल्यावर आदिवासी बांधव दुरावणार. 20) गोर बंजारा हिंदू बनल्यावर संकट काळात बौद्ध व आदिवासी बंधूंचे सहकार्य बंद होणार. 21) गोर बंजारा समाज हिंदू बनल्यास त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व धोक्यात येणार. 22) आदिवासींमध्ये फुट पाडा व राज्य करा ही आर.एस.एस. ची दुष्ट आणि विकृत सामंतवादी, भांडवली, घराणेशाहीची नीती सामान्य गोर बंजारा समाजाने समजून घेण्याची काळाची गरज आहे. 23) आर.एस.एस.ने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील समान प्रतिनिधित्वासाठी कोणते विशेष कार्य केले याचा गोर बंजारा समाजाने गांभिर्याने विचार करावा. 24) गोर बंजारा समाजाचा धार्मिक तीर्थक्षेत्र विकासाने कल्याण होण्याऐवजी धार्मिक गुलामी, मानसिक, बौद्धिक गुलामी वाढून भटशाही व भगतभोपे, बुवा, बाबा, महाराजशाही फोफावून शोषण वाढेल. अंधश्रद्धा, अज्ञान, बेकारी व असंघटितपणा वाढेल, याचा सुद्धा समाजाने विचार करावा. 25) गोर बंजारा समाजाचा विकास अद्यावत दर्जेदार आधुनिक तांत्रिक शिक्षण यासाठी तांडा परिसरात शाळा, कॉलेज, वस्तीगृह, अभ्यासिका, वाचनालय, रोजगार, नोकर्‍या, रस्ते, प्रकाश, पाणी, स्वास्थ्य, राजकारणात संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व, व्यसन, अंधश्रद्धा, गरिबी निर्मुलन, संघटन, सहकार्य, उद्योग, व्यापारवाढ, कर्जपुरवठा, जोडधंदे वगैरे योजनांचीच गरज आहे. समाज मूर्तीपूजक नसून प्रकृतीपूर्वज वंदक असल्यामुळे त्यांना देवाधर्माच्या मार्गाने नेणे ही समाजाची फसवणूक व दिशाभूलीचा प्रकार आहे. 26) गोर बंजारा समाज हा प्राचीन काळापासून धर्मनिरपेक्ष (धर्मविहीन) धाटी जीवनशैलीप्रधान असून त्यांचा कोणत्याही धर्म, पंथ, जाती, वर्ण, देवी-देवतांशी संबंध नाही. लोकतंत्रीय मातृसत्ताक समाजव्यवस्था गोर बंजारांची प्राचीन काळापासून आहे. हिंदूकरण, मुस्लिमीकरण, इसाईकरण, सिखीकरण वगैरे तर त्यांचे परिस्थितीसापेक्ष, राजासापेक्ष, संस्कारसापेक्ष लाचारीचे धर्मांतरण आहे. धम्म हे धर्म नसून ते एक समतावादी मानवी तत्त्वज्ञान, विचारधारा आहे. यामध्ये निरर्थक धार्मिक कर्मकांड, शोषण, फसवणूक दिसून येत नाही व बौद्धांशिवाय म्हणजे अनुसूचित जातींशिवाय तिकडे जाणार्‍यांची संख्या नगण्य आहे. पण बहुसंख्य लोक आकर्षित होत आहे ही या विचारधारेची जमा बाजू आहे. 27) भारत देशात धर्माला स्वातंत्र्य असले तरी देश धर्म, जात निरपेक्ष घोषित करण्यात आलेला असून भारताचे संविधान हे सुद्धा धर्मनिरपेक्ष आहे. देशाचा कारभार संविधानानुसार चालत असून धर्म व जातीबाबत वाद घालणे हे निरर्थक व नादानपणाचे लक्षण आहे. धर्म ही वैयक्तिक बाब असून व्यक्तीला धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण धर्माच्या नावाने दुसर्‍या समाजाचे व देशाचे नुकसान करता येणार नाही याचे बंधन आहे, याची जाण प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. 28) देशाच्या घटनेत सवर्ण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, भटका, अल्पसंख्य समाज अशी विभागणी केली आहे. 29) देशाच्या घटनेत सवर्ण, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, भटका व अल्पसंख्य या सर्वांच्या अधिकाराबाबत स्पष्टपणे नोंद आहे. या नोंदीमागे सर्वांना न्याय मिळावा व सर्वांचा समान विकास व्हावा ही प्रामाणिक भावना घटनाकाराची होती व आजही आहे. पण आज देशावर सत्ता बहुसंख्य सवर्णांची असल्यामुळे सवर्णांनी इतर समाज समुहाचे सर्वाधिक अधिकार हिसकावून घेतले असून संविधान अंमलबजावणीकडे दूर्लक्ष करून संविधान नष्ट करून हुकुमशाही वृत्तीने देश ताब्यात घेऊन देश विक्रीला व सत्ता साधने जमा करायला सुरुवात केली आहे. हिंदूधर्म, हिंदुत्व, हिंदुराष्ट्राच्या नावाने सवर्ण समाज इतर समाजांना गुलाम बनवून वापरण्याच्या प्रयत्नात आहे. आदिवासींना हिंदू बनविणे आणि इतर मागास-भटक्याची जनगणना करून त्यांना संविधानानुसार अधिकार न देणे ही सवर्ण समाजाची सर्वात मोठी गद्दारी व धोकेबाजी आज दिसून येत आहे. असे असतांनाही सर्व मागासांनी सवर्णांवर बहिष्कार टाकून मागासाची सत्ता स्थापन करण्याऐवजी सवर्णांचे समर्थन करून नादानपणे स्वयंघात करून घेत आहे, ही एक शोकांतिका आहे. याला विनाशकाले विपरित बुद्धी मानावे लागेल. 30) घटनेच्या 340, 341, 342, 366, 244 च्या अनुसूचित 5 व 6 नुसार इतर मागास, अनुसूचित जाती, जमातींना जे अधिकार देण्यात आले आहे, या अधिकारांपैकी 80% अधिकारांचा उपभोग सवर्ण समाज घेत आहे. तरी मागास स्वहक्कांसाठी संघटितपणे संघर्ष न करता लाळघोटेपणा, चमचेगिरी करून शत्रु, स्वार्थी, लुटारू, शोषक सवर्ण समाजाचे समर्थन करून गुलामीत आनंद मानीत आहे, याला काय म्हणावे? 31) सवर्णांच्या असहनीय पक्षपाताला कंटाळून अनेक मागास जे स्वत:ला हिंदू मानीत होते, ते आता हिंदू धर्माचा जाहीरपणे त्याग करून स्वतंत्र धर्माची मागणी करीत आहे. यामुळे हिंदुत्ववादी (मनुवादी) घाबरला असून हिंदुंची संख्या कमी पडू नये व त्याचा परिणाम मतदानावर होऊ नये, म्हणून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून आदिवासी भटक्याचे हिंदुकरण करण्यास सपाटा लावलेला आहे. महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्यात गोदरी येथे तर मध्यप्रदेशमध्ये बंतूल जिल्ह्यास्थळी हिंदू कुंभमेळ्याद्वारे हिंदूकरण करण्यामागे सवर्णांचे (मनुवादींचे) दोन उद्देश आहेत. हिंदूकरण करून हिंदुंची संख्या, उत्पादक कर्मकांड वाढविणे व मागासांना, आदिवासींना घटनेच्या कलम 366 व कलम 244 अनुसूचि 5 व 6 मधून वगळून जल, जंगल, जमिनींवर कब्जा करणे. 32) आर.एस.एस. प्रणित भाजप 2014 ला सत्तेवर आल्यापासून नोटा बंद, शिक्षण बंद, नोकर्‍या बंद, उद्योगधंदे बंद, आरक्षण बंद, बढती बंद, भरती बंद असे अनेक प्रकार सर्वांना माहीत आहेच. देशाच्या साधनसंपत्तीची, देशाच्या सीमाविक्रीच्या व इतर अनेक विक्रीच्या घटना देखील माहीत आहे. आता देशाची विक्रीची साधने संपत आल्यामुळे सरकारने मोर्चा आदिवासींच्या संविधानप्रदत्त मालकीच्या जल, जंगल व जमिनीकडे वळविला आहे. आदिवासी कायद्यानुसार आदिवासींच्या जल, जंगल व जमिनीच्या मालकीवर कोणालाही आक्रमण व ताबा करता येत नाही. पण आदिवासींच्या जल स्थळांचा, जंगली संपत्तीचा व शेत जमिनीचा, त्याच प्रमाणे जमिनीच्या गर्भात पडून असलेल्या खनीज संपत्तीकडे म्हणजे सोने, चांदी, हिरे, मोती, गॅस, पेट्रोल, डिझेल, युरेनियम, लोखंड, तांबे, पितळ यांच्याकडे मनुवादीचे लक्ष लागलेले आहे पण आदिवासी कायद्याप्रमाणे ही साधनसंपत्ती ताब्यात घेता येत नसल्यामुळे मनुवादींनी आदिवासींना वनवासी, सागरपुत्र, हिंदुधर्मीय वगैरे नावाने संबोधून आदिवासींची खुन (प्रतिके) मिटविण्यासाठी हिंदुकरणाची मोहिम राबविली जात आहे. आदिवासी ऐवजी हिंदू बनवून जल, जंगल, जमीन हिसकावून त्यांना स्थलांतरीत करून त्यांचा नाश करण्याचा डाव भाजपने रचला आहे. पण गैरहिंदू व आदिवासींना त्यांचे हे कपट कारस्थान समजत नसल्यामुळे व काही अमिषाला बळी पडून हिंदुत्वाकडे वळत आहे. पण त्यांचे हे अज्ञान, अमिषे, धनलालसा त्यांना व त्यांच्या भावी पिढ्यांना कायम गुलाम बनवून ठेवणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा विनाश होणार आहे. या करिता कोणत्याही मोहाला व अमिषाला बळी न पडता आदिवासी भटक्यांनी शोषितांनी हिंदुत्वापासून कायम दूर राहावे ही हात जोडून विनंती आहे. वरील लेखानिमित्ताने संत कबीराचा दोहा तंतोतंत लागू पडतो. दोहा :- गुरू लोभी, शिष्य लालची, दोनो चढ़े पत्थरकी नाव । गुरू-शिष्य दोनो डूबे; लेके सबको साथ । जय भारत - जय संविधान गहरा - विचारधारा

G H Rathod

162 Blog posts

Comments