दि.31/1/2023
कष्टकर्यांनो, आयतखाऊपासून सावध राहा.
कष्टकरी, निर्माता, उत्पादक समुहाने परोपजीवी, आयतखाऊ, शोषक, लुटारू, दलाल, भोंदू, अन्यायी, अत्याचारी, निर्दय, कू्रर लोकांपासून सतत सावध राहून या समुहांपासून बचाव करण्याची भूमिका घेणे अति आवश्यक आहे. कारण जगात दोन प्रकारचे लोक आहेत- एक बहुसंख्य कष्टकरी वर्ग व दुसरा अल्पसंख्य कष्ट न करणारा. परंतु कष्टकर्यांच्या कष्टाचे शोषण करून घाम न गाळता अति आरामाचे भोगवादी जीवन जगणारा, सत्ता, संपत्ती, सुख साधने यावर ताबा बसवून कष्टकर्यांना गुलाम बनवून वापरणारा वर्ग. कष्टकरी वर्गात सर्व शेतकरी, मजूर, पशुपालक, कारागीर आणि सफाई, खोदकाम, मातीकाम, बांधकाम, वाहतूक, हमाली करणारे लोक येतात. वरील सर्व कामे अपवाद वगळता अनुसूचित जाती जमाती, इतर मागास, आदिवासी, भटके, गुन्हेगार, खानाबदोष म्हणजे पोटासाठी भटकणारे लोक करतात. हा बहुजन वर्ग मानला जातो. दुसरा अपवाद वगळता, कष्ट न करणारा वर्ग विशेषत: ब्राह्मण, बनिया, गुजराती, ठाकूर, राजपूत, सिंधी, बहुरी, पारसी समाज आहे. हा समाज सवर्ण प्रस्थापित, भांडवलदार, अभिजन व श्रेष्ठ, श्रीमंत मानला जातो. बहुजन जी कष्टाची, धोक्याची, सफाईची, कमी पगाराची, तोट्याची, घाम गाळण्याची, मरण्याची कामे करतो. यापैकी एकही काम सवर्ण, प्रस्थापित वर्ग करीत नाही व आरामाने भोगवादी जीवन जगत आलेला आहे.
बहुजन समाजाच्या कष्टाच्या बळावरच बहुजनांना, अडाणी, निरक्षर, भोळे, अंधश्रद्ध ठेवून, बहुजनांनी निर्माण केलेल्या वस्तू अत्यंत स्वस्त घेऊन, चौपट दराने विकून, वापरून, सवर्ण वर्ग सुखाने जगत आहे. एवढेच नव्हे तर कारखाना निर्मित वस्तू हा प्रस्थापित वर्ग अनेक पटीने महाग विकून बहुजनांचे शोषण करीत आहे, जे अमानवीय, विषमतामूलक, असंविधानिक आहे. परंतु या सवर्ण समाजाने सत्ता, संपत्ती, साधनांवर कब्जा करून समाज व देशद्रोहाचे काम चालविलेले आहे व बहुजनांना समान संधी, दर्जा पासून वंचित ठेवून बहुजनांचे शोषण हे अनैतिक व घटनाबाह्य कृत्य आहे. भारतावर इसवीसनपूर्व 2000 ते इसवीसन 1947 पर्यंत अनेक देशी व विदेशी शासनकर्त्यांनी भारतावर राज्य केले. बहुजन शासनकर्ते वगळून इतर आर्य ब्राह्मणांसह सर्वांनी भारतीय बहुजनांचे, वंचितांचे शोषणाशिवाय काहीच नाही केले.
विदेशी राजाच्या गुलामीतून मुक्त होण्याबरोबरच विदेशी युरोपियन आर्य ब्राह्मण शासनकर्त्यांच्या गुलामीतून प्रथम मुक्त होण्यासाठी भारतीय बहुजन समाजसुधारक, समाजसेवक, क्रांतिकारी, संतजन प्रयत्न करीत होते. कारण आर्य ब्राह्मणांनी मनुस्मृती नावाच्या धर्म ग्रंथाद्वारे भारतीय बहुजन, वंचितांना सांस्कृतिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक छळ करून सर्वच बहुुजन वंचितांचे जीवन पशुपेक्षाही भयानक केले होते. म्हणून या परोपजीवी, शोषक, लुटारू, अश्रमी सवर्ण, प्रस्थापित, भांडवलदार, जात, देव, धर्मांध वर्गाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी प्रथम क्रांतिवीर तथागत सिद्धार्थ गौतम पासून मा. कांशीराम, व्ही.पी. सिंग पर्यंत अनेक बहुजन हितचिंतकांनी मरणांत लढा दिलेला आहे. या लढवय्यांमध्ये बसवेश्वर, रोहिदास, कबीर, नानक, लाखा बंजारा, संत नामदेव, तुकाराम, उमाजी नायक, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, गोविंद गोर, मोतीलाल तेजावत, नारायण गुरू, पेरीयार, ललई सिंह, कर्पुरी ठाकूर, छ. शिवाजी, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर, कांशीराम अशा हजारो नेत्यांनी, संतांनी, समाजसुधारकांनी संघर्ष, त्याग, बलिदान केले आहे. यांच्या प्रयत्नातूनच बहुजन वंचितांना न्याय मिळावा व सवर्णांच्या गुलामीतून मुक्तता व्हावी म्हणून संघर्षाद्वारे 1947 ला स्वातंत्र्य मिळविले गेले होते. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वश्रेष्ठ घटना तयार करून घटनेच्या उद्देशिकाद्वारे, मार्गदर्शक तत्त्वाआधारे वंचितांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी व्यवस्था केली होती. परंतु 1947 ला ब्रिटिशांद्वारे सत्ता आर्य ब्राह्मणांच्या हाती दिली गेल्यामुळे भारतीय संविधान हे निरर्थक ठरले असून आर्य ब्राह्मण पुन्हा मनुस्मृती धर्मग्रंथाचा कायदा वंचितांवर लादण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. घटनेचे कलम 14 ते 35, वर अंमलबजावणी न करता बहुजनांना मनुस्मृती ग्रंथानुसार निरक्षर, अडाणी, बेकार, अधिकारहीन बनवून पुन्हा गुलाम बनविण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे. अशात बहुजन, वंचित वर्ग सुद्धा जागृत, संघटीत बनून सत्ता प्राप्तीच्या प्रयत्नात असल्यामुळे सत्ता बहुजनांकडे जाऊ नये म्हणून अनैतिक मार्गांचा अवलंब करून इव्हीएम यंत्राद्वारे व विधायक खरेदीद्वारे सत्ता कायम ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.
अशा परिस्थितीत सर्व बहुजनांनी संघटितपणे इव्हीएम मशीन रद्द करण्यासाठी लढा उभारण्याची मोठी गरज आहे. तसेच पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची तरतूद सुद्धा आवश्यक आहे. या शिवाय अत्यंत महत्त्वाचे म्हणजे बहुजन वंचितांनी, वंचित बहुजनांचाच लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची संघटितपणे प्रतिज्ञा करण्याची गरज आहे.
वंचित, बहुजन प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी सर्व बहुजनांनी तन, मन, धनाने मदत, प्रचार-प्रसार केल्याशिवाय वंचितचा विधायक निवडून येणे शक्य नाही. कारण वंचित विधायक हा कायमचा गरीब असल्यामुळे धनाच्या बळावर तो सवर्णांची बरोबरी करू शकणार नाही. म्हणून वंचित लोकप्रतिनिधीला सर्वोतोपरी मदत आवश्यक आहे. विना खर्च प्रतिनिधी निवडून आणणे हे वंचितांचे परम कर्तव्य व गरज आहे.
बहुजनांचे सामर्थ्य कळून येण्यासाठी ओबीसी वर्गाची जनगणना अनिवार्य आहे. जनगणनेसाठी ओबीसींनी संघटितपणे लढा उभारण्याची त्वरीत गरज आहे. शासन जनगणना करीत नसेल तर विद्यमान लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करावा. त्यांना राजीनामे देण्यास भाग पाडावे व त्यांना निर्वाचन क्षेत्रात प्रवेश मिळू देऊ नये.
प्रस्थापित वर्गांनी घराणेशाही निर्माण केली असून अमर्याद धन व संपत्ती जमा केलेली आहे. कष्ट न करता जनतेच्या पैशाच्या बळावर भोगवादी जीवन जगत आहे. जनतेच्या धनाचा गैरवापर करीत असून काळे धन विदेशात लपवित असून सत्ता न मिळाल्यास विदेशात पळून जाण्याची तयारी करीत आहे.
तेव्हा आता या देश व बहुजनद्रोही सवर्ण समाजाला धडा देण्याची शेवटची वेळ आलेली आहे. बहुजनांनी एकी ठेवली तरच धडा देेणे शक्य आहे. अन्यथा बहुजन अखंडपणे गुलामीचे जीवन जगतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
प्रा. ग. ह. राठोड