बहुजनांना धार्मिक गुलामीची जाणीव केव्हा होईल?

बहुजनांना धार्मिक गुलामीची जाणीव केव्हा होईल?

दि. 28/3/2023 बहुजनांना धार्मिक गुलामीची जाणीव केव्हा होईल? सर्व बहुजन बंधू-भगिनींनो, धार्मिक गुलामीचा त्याग करा, कारण आपण सर्व बहुजन आर्यपूर्व भारताचे निवासी, भारताचे राजे आणि मालक होतो. नंतरच्या काळात भारतात आलेल्या आर्यांबरोबर झालेल्या लढाईत आपली हार झाल्यामुळे आपण संरक्षणार्थ देशाच्या विभिन्न क्षेत्रांत स्थिरावलो. पोटासाठी आपण सतत भटकत राहिल्यामुळे सत्ताधारी लोक आपणांस आदिवासी, भटके, गुन्हेगार, मागासलेले समजू लागले. आर्य भारतात येण्यापूर्वी आपण सर्व बहुजन एक समृद्ध जीवन जगत होतो. नागरी संस्कृती विकसित केलेली होती. पशुपालन, शिल्पकारी, शेती, व्यापार, संरक्षण, स्वास्थ्य, पाणी, रस्ते, अन्नधान्य, वस्त्रे, कुटीर उद्योग, जलसिंचन या सर्व क्षेत्रांत आपण प्रगतीच्या शिखरावर होतो. आर्यपूर्व काळात सर्व बहुजन देवी-देवता, मंदिर-तीर्थक्षेत्रे, ज्योतिष-भाग्य, जात-धर्म, धार्मिक कर्मकांड, शोषण, यज्ञयाग, मुहूर्त, ग्रहपीडा वगैरें पासून मुक्त होते. सर्व समुज कष्ट करून समाजवादी जीवन जगत होते. परंतु परोपजीवी कष्ट न करणार्‍या आर्य ब्राह्मणांनी त्यांची सत्ता स्थापन करून विनाकष्ट जगण्यासाठी देव-देवी, दैव, मंदिर, तीर्थक्षेत्र, यज्ञयाग, जाती धर्माची निर्मिती केली. दान-दक्षिणाचे कर्मकांड, धार्मिक विधी, श्रेष्ठ-कनिष्ठपणा म्हणजे वर्ण व्यवस्था निर्माण करून ते आज बहुजनांचे शोषण करून विनाकष्ट, सुखाचे जीवन जगत आहेत. देव, धर्म,जाती, धर्मग्रंथ, धार्मिक कर्मकांड, मंदिर, क्षेत्र हे त्यांचे बसून खाण्याचे साधन असल्यामुळे ते वरील सर्व साधनांचे उदारीकरण करून बहुजनांचे शोषण करीत आहेत. सर्व बहुजन हे धर्मविहीन धर्मनिरपेक्ष, जातीविहीन, प्रकृति, पूर्वज, पशु, वृक्षवल्ली, पंचतत्त्व वंदक होते. पुजारी नव्हते. आजचे सर्व धर्म मनुवादी ब्राह्मण, वैदिक, सनातन, हिंदू, मुसलीम, शीख, इसाई, पारसी वगैरे कोणताच धर्म बहुजनांचा नव्हता व आजही नाही. बहुजनांचा प्राकृतिक म्हणजे प्रकृति, पूर्वज, पशु-डोंगर, नद्या, वृक्षवल्ली, पंचतत्त्व आणि मानवी समतेचा म्हणजेच माणुसकीचा धर्म, व्यवहार, जीवनशैली आहे. मूर्तीपूजा म्हणजे जड वस्तुऐवजी चेतन, जिवंत जीवाला वंदन करणारा, मानणारा, सेवा करणारा, माणुसकीची वागणूक देणारा आणि जड वस्तुंचा सदुपयोग करणारा बहुजन समाज आहे. आर्य भारतात आल्यापासून जडमूर्तीपूजा करणे, जातीच्या, वर्णव्यवस्था व देवा-धमाृच्या नावाने भेदभाव, पक्षपात करणे, अन्याय अत्याचार, विषमतेची वागणूक देणे हे अमानवी रोग लागलेले आहे. आर्यपूर्व बहुजन समाजात जाती, धर्म, वेगवेगळे देवी-देवता, भाग्य, अवतार, यज्ञयाग, स्त्री-पुरुष, भेदभाव, मूर्तीपूजा, प्राणप्रतिष्ठा, मुहूर्त, भविष्य, वर्ग, गण, कुंडली, धर्मग्रंथ, धर्मगुरु, धर्मक्षेत्र, मंत्र-तंत्र, वर्णव्यवस्था, तीर्थयात्रा या संकल्पना नव्हत्या. बहुजन समाज हा श्रम, उद्योग, व्यापार, शेती, कला, गृहोद्योग, पशुपालक प्रधान व समतावादी समाज होता. श्रम, समता, मानवता हाच त्यांचा जीवनक्रम, जीवनशैली, आयतखाऊ व बहुजनांना राबवून घेणारा, बहुजनांचे शोषण करणारा, बहुजनांना कानाखाली ठेवणारा, स्वत:ला देव, श्रेष्ठ मानणारा. बहुजनांना राक्षस, दैत्य, दानव, निर्बुद्ध, बैल, गुलाम मानणारा, कष्टाची कोणतीही कामे न करणारा, देशाच्या सर्व साधन-संपत्तीचा मन मानेल तसा उपयोग करणारा, लोकशाही तत्त्वाला न मानणारा व हुकुमशाही राबविणारा समाज भारतात आल्यापासून तर आजपर्यंत आहे. त्यांच्याबरोबर बनिया, गुजराती, राजपुत, ठाकूर, पारसी, बहुरी इसाई हा समाजदेखील याच प्रवृत्तीचा दिसून येतो. जगात कोठेही लोकशाही हीच शासन पद्धती न्यायपूर्ण आहे. भारतात लोकशाही 1947 पासून आहे. परंतु वरील परोपजीवी, श्रेष्ठतावादी लोकशाहीवर अंमल न करता हुकुमशाही म्हणजे ब्राह्मणशाही (मनुशाही) वर अंमल करीत असल्यामुळे बहुजन गुलामीचे जीवन जगत आहेत. देशात लोकशाही हवी असेल तर सर्व बहुजनांनी संघटीत होऊन सत्ता हाती घेणे अनिवार्य आहे. नसता आर्य ब्राह्मणांची गुलामी बहुजनांच्या हिश्श्याला अटळ समजावी. जय भारत - जय संविधान प्रा. ग.ह. राठोड, अध्यक्ष - अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघ, भारत.

G H Rathod

162 Blog posts

Comments