बहुजनांनी भाजपची साथ सोडावी.

बहुजनांनी भाजपची साथ सोडावी.

दि. 26/5/2023 बहुजनांनी भाजपची साथ सोडावी. 1) भाजप हा आर.एस.एस. ची संतती आहे. 2) आर.एस.एस. व भाजप या ब्राह्मणी संघटना आहेत. 3) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व त्यांच्या सर्व संघटना या जातीवादी, धर्मवादी, विषमतावादी, मनु व मनुस्मृती समर्थक, वर्णवादी, घटनाविरोधी, आरक्षण विरोधी, धर्मनिरपेक्षता विरोधी, अल्पसंख्यांक विरोधी, शेतकरी-कामगार विरोधी, न्यायविरोधी, महिलाविरोधी, देव, दैव, कर्मकांड मुहूर्तवादी, ज्योतिष्यवादी, दानदक्षिणावादी, मंदिर तीर्थक्षेत्रवादी, श्रेष्ठ-कनिष्इवादी, वर्चस्ववादी, एकजातीय, एकपक्षीय, भांडवलवादी, हुकुमशाहीवादी, घुसखोरवादी, विषकन्यावादी, फसवेवादी, धोकेबाजवादी, विदेशी लोकांच्या संघटना व बहुजनांच्या शत्रू संघटना आहेत. बहुजनांमध्ये अज्ञान, अंधश्रद्धा पसरविणे, फुट पाडणे, भांडणे लावणे व सत्तेवर राहून जातीचे कल्याण करणे हीच त्यांची नीती आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या हजारो शाखा, उपशाखा व भाजप या वेगळ्या संघटना आणि पक्ष असले तरी त्यांचे विचार व उद्देश, नीती एकच आहे. ही नीती, हे धोरण म्हणजे सर्व बहुजनांना सर्व क्षेत्रांत दुर्बल बनवून त्यांचा गुलाम म्हणून वापर करणे व त्यांच्यावर सत्ता गाजविणे या सर्व ब्राह्मण विदेशी ब्राह्मण संघटनांना साथ देणार्‍या बनिया (जैन) गुजराती, राजपूत वगैरे संपूर्ण समूह देखील याच विचारांचा असून सर्व बहुजनांना मूर्ख बनवून ते भारतावर राज्य करीत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी हेच लोक बहुजनांवर अन्याय अत्याचार व शोषण करीत होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील देशाच्या घटनेत मागास बहुजनांच्या, वंचितांच्या विकास व कल्याणासाठी, न्याय देण्यासाठी अनेक तरतुदी, योजना, सवलती असताना आजपर्यंतचे सर्वच शासनकर्ते यांचा फायदा बहुजन वंचितांना न मिळू देता स्वत:च्या जातीसाठी करीत आहेत. सर्व बहुजन, वंचितांना केवळ वापरण्याचेच डावपेच खेळत आहेत. लोकशाहीची ओळख न होऊ देता वंचित बहुजनांना अज्ञानी व अंधश्रद्ध ठेवून त्यांच्यात प्रभावी आणि सत्ता, अधिकार संपन्न नेतृत्व तयार होणार नाही, याची काळजी 75 वर्षांपासून घेत आहे. स्थानिक संस्थेपासून तर केंद्राच्या राज्यापर्यंत सर्व प्रमुख स्थानांवर व पदावर या प्रस्थापित वर्गांनी कब्जा केला असून बहुजन वंचितांनी सत्तेवर येऊच नाही, याची पुरेपूर काळजी घेत आहे. देशाच्या संपूर्ण साधनसामुग्रीची व मलिदाची लूट करून हा वर्ग आता बहुजन वंचितांवर गुलामी व हुकुमशाही लादण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळेला सर्व बहुजनांनी व वंचितांनी, त्यांच्या नेत्यांनी, संघटनांनी, संघटित होऊन प्रस्थापितांवर बहिष्कार टाकून सर्व बहुजन वंचितांची सत्ता स्थापन करण्याची आज मोठी गरज आहे व घटना संरक्षणाची अनिवार्यता आहे, याची सर्वांनी जाणीव ठेवून प्रस्थापितांचा मुकाबला करावा. यासाठी सर्व बहुजनांनी गाव, तांडा, वाड्या पालवर एकत्रित जमून यापुढे प्रस्थापितांना मतदान करणार नाही, केवळ बहुजन वंचित लायक नेत्यांना उभे करून त्यांनाच निवडून आणण्याची जाहीर व सामूहिक प्रतिज्ञा करावी असे नम्र आवाहन आहे. यासाठी समाजातील व संघटनेतील सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व समाजसुधारकांनी पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती! आपला सर्वांचा हितचिंतक, एक कार्यकर्ता. जय भारत - जय संविधान

G H Rathod

162 Blog posts

Comments