विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अमर विचार

विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अमर विचार

दि. 5/4/2023 विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अमर विचार डॉ. बाबासाहेबांचे अमर, सत्य, विज्ञानयुक्त, तत्त्व, सिद्धांत, समता, मानवतावादी हजारोंनी अमर बोधवचने आहेत. एकापेक्षा एक सरस विचारणीय, चिंतनीय, प्रत्येकांनी आपआपल्या मेंदू संग्रह करून ठेवण्यासारखी बोधवचने आहेत. अन्यायित बहुजन, वंचित, गुलामीच्या बंधनात हजारो वर्षांपासून बांधल्या गेलेल्या बहुजन समुहाला गुलामीच्या बंधनाला तडातड तोडून मृत गुलामांना अमृत पाजून जिवंत करणारी ही बोधवचने आहेत, जागे करणारी व शत्रुंशी संघर्ष करून गुलामीतून, बंधनातून मुक्त करणारी ही अमृत बोधवचने आहेत. अशा या वचनांपैकी, ‘शिका, संघटीत व्हा व हक्क अधिकारासाठी संघर्ष करा.’ माझा जय जयकार करण्यापेक्षा माझे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शत्रुंशी सामना करा. जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की, आपल्याला शासनकर्ती जमात बनायची आहे. मोक्याच्या जागेवर आपली माणसे पाठवा. अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. आपल्या कायम शत्रुंची ओळख करून त्याचा सामना करा. शत्रुंपासून दूर राहा, शत्रुंवर बहिष्कार टाका. सिंहासारखे स्वाभिमानी जीवन जगा. शिक्षणरूपी शेरणीचे दूध प्या. गुलामीचेू लाचार मृतवत जीवन जगू नका. शेळीसारखे शंभर दिवस जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा. अशा अनेक बोधवचनांपैकी, ‘जो समाज आपल्या पूर्वजांचा स्वाभिमानी, बहादुर पराक्रमी अमर इतिहास विसरतो, तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही, असा मुर्दा समाज दुसर्‍या शासनकर्त्याचा गुलाम बनतो.’ असे अविस्मरणीय बोल, बोधवचन, अमृत वचन सांगितलेले आहे. आजचा संपूर्ण बहुजन वंचित समूह विशेषत: भटका व गोर बंजारा (सिंधू संस्कृतीकालीन पणी) बलुतेदार आलुतेदार हा सिंधू संस्कृतीचा निर्माता असल्याचे डॉ. पु. श्री. सदार, डॉ. नवल वियोगी, डॉ. फुलझेले, डॉ. प्रताप चाटसे व इतर अनेक इतिहासकारांनी त्यांच्या इतिहास ग्रंथात नमूद केले आहे. हा समूह सिंधू संस्कृतीचा निर्माताच नव्हे तर तो या क्षेत्राचा प्रथम निवासी, मालक व राजा होता. इ.स. पूर्व 2000 च्या दरम्यान बाहेरुन आलेल्या विदेशी आर्य व मुलनिवासी आजचे बहुजन यांच्यामध्ये शेकडो वर्षे साधन-संपत्ती व स्त्रियांसाठी लढाया झाल्या व मुळनिवासी यांची इ.पू. 1700-1600 च्या दरम्यान हार झाली व आर्य ब्राह्मण या देशाचे राजे महाराजे झाले. ते आजपर्यंत मूळनिवासी बहुजनांवर राज्य करीत आहेत. मूळनिवासींची हार होण्यापूर्वी अनेक वर्षे विदेशी आर्य ब्राह्मण मूळनिवासींचे गुलाम, आश्रित व भिक्षुक होते. पण आज ते बहुजनांवर राज्य करीत असून बहुजनांची पण गुलामीकडे वाटचाल चालु आहे. सिंधू संस्कृतीकालीन बहुजन राजे व महाराजांनी षडयंत्रकारी आर्य ब्राह्मणांनी त्या काळात त्यांच्या गोर्‍या विषकन्या (अप्सरा) पुरविल्या. बहुजन राजे महाराजांना भोग विलासात गुंतवून त्यांचे व्याही बनून, विश्‍वास संपादन करून नंतर विश्‍वासघात करून राजा महाराजांची हत्या करून त्यांनी भारतीयांवर व प्रशासनावर कब्जा केला. इ.स.पूर्व 1600 पासून ते तथागत सिद्धार्थ बुद्धांच्या शासन स्थापनेपर्यंत त्यांनी त्यांना मन मानेल तसे राज्य केले. पण तथागताच्या शासन काळात ते सिद्धार्थ बुद्धाला शरण गेले. परंतु बुद्धानुयायी राजा बृहद्रथची हत्या करून प्रतिक्रांतीद्वारे आर्यांनी पुन्हा इ.स.पूर्व 185 मध्ये भारतीय सत्तेवर ताबा मिळविला व ते भारत देशाचे पुन्हा शासनकर्ते बनले. इ.स. सुरू होण्याच्या आधी व नंतर पुन्हा भारतात विदेशी शक कुशान लोकांनी प्रवेश केला. पोर्तुगीज, अरब, मुगल, मुसलीम, हुण, फ्रान्सीस, फ्रेंच, डच व ब्रिटिश लोकांनी प्रवेश केला. युरेशियन मध्य एशियन आर्य ब्राह्मणांनी या सर्वांशी मिलीभगत करून शासन प्रशासनामध्ये वाटेकरी बनून ब्रिटिश भारत देश सोडेपर्यंत राज्य केले व ब्रिटिश भारत सोडताच ब्राह्मणी मंत्रिमंडळ बनवून पूर्ण भारतावर कब्जा केला. या आर्य ब्राह्मणांनी भारतीय बहुजन वंचितांची दिशाभूल करून विश्‍वरत्न डॉ. आंबेडकर लिखित कायदा अमलात येऊ नये म्हणून अनेक पक्ष व संघटनांची निर्मिती केली. या पक्ष व संघटनांमध्ये आर्य ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली व भारतीय कायद्याची म्हणजे संविधानावर अंमलबजावणी न करता मनुच्या कायद्याची अंमलबजावणी करून बहुजन वंचितांना शिक्षण, सत्ता, संपत्ती व जीवनावश्यक साधनांपासून वंचित ठेवून आज देशात भांडवलशाही आणि हुकुमशाही निर्माण केली असून मनमानी कारभार चालविलेला आहे. इसवीसन पूर्व जसे त्यांनी बहुजनांना अप्सरांचा पुरवठा करून धोकेबाजी केली होती, तशी धोकेबाजी 1947 नंतर त्यांनी ब्राह्मण कन्या बहुजन व मुसलीमांच्या घरात घुसवून हेरगीरी करायला लावून लोकशाही नष्ट करून हुकुमशाही बहुजनांवर लादली असून बहुजनांना वेठबिगार बनवून वापरण्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. आज रोजी 4 ते 5 टक्के आर्य ब्राह्मण व बनिया, गुजराती, राजपूत, ठाकूर वगैरे समुहांनी 85 ते 90% बहुजनांना वेठीस धरले असून पुरुषार्थहीन, नपुंसक बहुजन प्रतिनिधी त्यांच्यासमोर कुत्र्याप्रमाणे शेपूट हलवित आहेत, ही एक शोकांतिका आहे. या शोकांतिकेचे प्रमुख कारण दर्जेदार सर्व क्षेत्रातील शिक्षण, सत्ता, संपत्ती, साधने यापासून बहुजनांना दीर्घकाळापासून वंचित ठेवणे तर आहेत, पण याच बरोबर काल्पनिक निरर्थक देवी-देवता, मन मानेल तसे धार्मिक ग्रंथ, कर्मकांडाची निर्मिती करून या कर्मकांडात बहुजनांना गुंतवून त्यांना मानसिक, बौद्धिक गुलाम बनवून त्यांचे शोषण चालु आहे. बहुजनांना धर्मांध देव, दैवांध, कर्मकांडांध बनवून त्यांचा मौल्यवान वेळ, धन व बळ वाया घालून त्यांची इतर क्षेत्रांतील प्रगती रोखण्याचे कारस्थान या परोपजीवी आर्य ब्राह्मणांनी केलेले आहे. उत्तम शेती, मध्यम व कनिष्ठ चाकरी असा भ्रम आणि अप प्रचार पसरवून या कावेबाज आयतखाऊ आर्य ब्राह्मणांनी 85-90% बहुजन वंचितांचे शिक्षण, सत्ता, सेवाक्षेत्र आणि संपत्ती, संरक्षण, सुख साधने हडप केले असून आयत्या बिळावरचे नागोबा होऊन बसले आहेत. मधला गौतम बुद्धांचा व सम्राट अशोक राजाचा काळ वगळता सिंधू संस्कृतीच्या पतनापासून आजपर्यंत आर्य ब्राह्मणांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून सर्व बहुजन वंचितांचे शोषण आणि वापर चालविलेला आहे. बहुजन वंचितांमध्ये फुट पाडून भांडणे लावून सत्तेवर कायम राहणे हा त्यांचा मुलमंत्र आहे. पण आा बहुजन वंचित वर्ग संघटित होत असल्याचे कळताच त्यांनी सत्तेत कायम राहण्यासाठी खोटे निवडणूक यंत (इव्हीएम) मशीनचा शोध लावून सत्तेत राहण्याचा मंत्र शोधून काढला असून साम, दाम, दंड, भेद नीतीचा व हुकुमशाहीचा प्रयोग करून बहुजनांना फसविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. पण आता बहुजन वंचित समूह पूर्णपणे जागृत झाला असून जन आंदोलन करून शत्रुला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात आहे. आता या जनआंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व बहुजन वंचित समुहांच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्यची अनिवार्यता आहे. जर लोकप्रतिनिधी पुढाकार शासेक वर्गाचा विरोध करून किंवा शासन प्रक्रियेतून बाहेर पडत नसेल, विरोध करीत नसेल तर जनतेने या लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानावर मोर्चे काढून त्यांना मोर्चात सहभागी करून घेण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी जर शासक वर्गाला भीत असेल किंवा शासक वर्गाला समर्थन देत असेल तर जनतेने या शासक समर्थक लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण या बहुजन प्रतिनिधींना बहुजनांचा खरा पराक्रमी व समतावादी इतिहास माहीत नसल्यामुळे ते आर्य ब्राह्मणांचे समर्थक बनून आपल्याच स्वबांधवांना मनुवाद्याचे गुलाम बनविण्यास सहकार्य करीत आहेत. तेव्हा यांना सुद्धा जागे करण्याचे महत्त्वाचे काम बहुजन जनतेलाच करावे लागणार आहे. 2024 च्या निवडणुकीच्या आधी लोकप्रतिनिधींवर दबाव आणून जागृत करण्याची आवश्यककता आहे. नसता इव्हीएम मशीन व हुकुमशाही लादली गेल्यास भविष्यात काय होइृल हे आज तरी सांगता येणे शक्य नाही. करिता वर्तमान सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी व इव्हीएम मशीन रद्द करण्यासाठी, संयुक्त संघर्षाची व मनुवादी प्रस्थापितांवर बहिष्कार टाकण्याची नितांत गरज आहे. मनुवादीचे, प्रस्थापितांचे, पक्ष, संघटना, साहित्य, धर्मग्रंथ, धर्मगुरु, धर्मक्षेत्र, देव-देवी व धार्मिक कर्मकांडांवर सुद्धा बहिष्कार टाकण्याची अनिवार्यता आहे. कारण गेल्या पाच हजार वर्षांपासून मनुवादी, जातीवादी, धर्मवादी, वर्णवादी, भांडवलवादी, शोषणवादी, परोपजीवींच्या व्यवहार व स्वभाव गुणात कोणताच बदल झालेला नाही व होण्याची शक्यता नाही. उलट कट्टरपणात वाढ होत आहे, तेव्हा त्यांच्यावर बहिष्कार टाकणे हाच एक उपाय आहे. इसवीसन सुरू होण्यापूर्वीपासून हा मनुवादी समूह परोपजीवी, शोषक, अमानवी, अनुत्पादक असूनही स्वत:ला आर्य, वैदिक, श्रेष्ठवादी मानत आला असून खोट्या संकल्पना रुजवून त्या माध्यमाने बहुजनांचे शोषण व स्वकियांचे विना कष्ट पोषण कसे करता येईल. बहुजनांना कसे लुटता येईल, बहुजनांची प्रगती, श्रीमंती कशी रोखता येईल, यात ते तरबेज आहेत. प्राचीन वेद ग्रंथात व अवेस्ता ग्रंथात बहुुजनांविषयी ज्या संकल्पना आहेत, त्या सर्व शब्द संकल्पना, व्याख्या, अर्थ त्यांनी त्यांच्या नंतरच्या पुराण, गीता, भागवत, श्रुती, स्मृती, उपनिषद, वेदांत, रामायण, महाभारत, धर्मसुत्रे, ब्राह्मण ग्रंथ सर्वांमध्ये बदलल्या असून बहुजनांना शुद्रत्व व आर्य ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. मुळ वेद ग्रंथात शेतकरी, कामगार वर्ग हा सर्व श्रेष्ठ मानला गेलेला आहे. दानव, दैत्याचा अर्थ दाता, दानशुर आहे. राक्षस चा अर्थ रक्षक आहे. असुरचा अर्थ प्राणदायक, शक्तीवान आहे. देवाचा अर्थ राजा आहे. राजा हाच दंड व पुरस्कार देणारा आहे. राजा हा सर्व शाश्‍वत काल्पनिक, कृत्रिम देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आजपर्यंतचे सर्व देव राजे महाराजेच होते. राजा हाच सर्वज्ञाता, सर्वव्यापक, सर्वज्ञ आणि संकटमोचक असतो. मूर्ती व मंदिरातील देव हा लबाडाचा, परोपजीवीचा व पोटभरुचा, व्यापारीचा असतो. 33 कोटी देव-दैवी व आजचे मंदिरातील देव जर खरे असते, तर भारत विदेशींचा हजारो वर्षे गुलाम बनून राहिला नसता. देशाला स्वातंत्र्य सर्व बहुजन, आदिवासी व स्वातंत्र्याकरीता संघर्ष करणार्‍या महापुरुषांनी मिळवून दिले आहे. देव व दानव, सुर व असुराची संकल्पना ही ब्राह्मणांची असून ती 100 टक्के खोटी आहे. देव म्हणजे बहुजन व दानव, दुष्ट म्हणजे ब्राह्मण, अभिजन वर्ग अशी माझी धारणा आहे. देव-दानवाची लढाई, सुर असुराची लढाई म्हणजे बहुजन ब्राह्मणांची खरी लढाई झालेली असावी असे मला वाटते. कवि केशवसुतांनी सांगितले आहे की, देव व दानव ही संकल्पना मानव निर्मित आहे. सृष्टीचा निर्माता कोण्या ब्रम्हाद्वारे नव्हे तर सर्व प्रकारच्या नर-मादीद्वारे व पंचतत्त्वाच्या संयोगाने झाले आहे. हे सर्व सत्य मुळ वेदामध्ये होते. पण परोपजीवी ब्राह्मण वर्गांनी वेदाच्या सर्व मुळ संकल्पना बदलून त्यांच्या हिताचे सर्व वेदग्रंथ व इतर साहित्य सुद्धा लिहिले. वस्तुत: भारताचे संपूर्ण मानव साहित्य, इतिहास, भूगोल, वेद, पुराण हे खरे नसून, त्यांना आर्यांनी त्यांच्या हिताच्या दृष्टीने विकृत, खोटे रूप दिलेले आहे. भारताचे संपूर्ण साहित्य व इतिहास बहुजनांना पुन्हा खर्‍या स्वरुपात तयार करण्याची गरज आहे असे मला वाटते. खरा इतिहास लिहून काढल्याशिवाय बहुजन वंचितांसाठी सन्मानाचे दिवस येणार नाही व भारत देश सुद्धा समृद्ध आणि वैभवशाली तसेच विश्‍व मार्गदर्शक बनू शकणार नाही असे माझे प्रामाणिक विचार आहे. जय भारत - जय संविधान गहरा चिंतन

G H Rathod

162 Blog posts

Comments