अज्ञानी लोकु विचार

‘कहु तो माँ मरी जाय, ना कहु तो बाप कुता खायी जाय’ यी हिंदी बोलीर केणावट घणच अर्थपूर्ण छ.

‘कहु तो माँ मरी जाय, ना कहु तो बाप कुता खायी जाय’ यी हिंदी बोलीर केणावट घणच अर्थपूर्ण छ. गोर बोलीम यी केणावट कुछू, तो बी पाप अन न कुछु तोबी पाप, किंवा आंघ वावडी अन लार आड असो अर्थ निकळछ. आज जगेम अति पौष्टीक दुध न पिता अमर्याद दारु पियेवाळेर संख्या अमर्याद छ. येच प्रकारेती सत्य बोलेवाळेरो द्वेष करेवाळेर संख्या घणी अन असात्य बोलेवाळेर समर्थन अन स्तुती करेवाळेर संख्या अमर्याद छ. खरे देखे तो यी एक शोकांतिका छ, पण सत्य वात बी छ. ‘थोथा चना बाजे घणा’ ये केणावटे प्रमाण अज्ञानी लोक सत्य असत्यर विचान न करता हम घणेच हुशार छा, समजन निरर्थक पकपक करछ. परिपूर्ण अभ्यास न रेहेरे कारण अन खोल चिंतन न रेहेरे कारण हमार विचारच खरे छ, असे भ्रमेम ये लोेक अटके हुये छ. करणच धरम, धम्म, धाटी, परंपरा, रुढी, प्रथा, रितीरिवाज असे विषयेपर ये उथळ पण विश्‍वासेती चर्चा, लिखान कररेछ. पण अपणी चर्चा कतरी विसंगत, असत्य, बुध्दीहीन, घातक, द्वेषयुक्त छ. ये बाबतेम असे लोक चूक नयी विचार करेनी। सत्य अन सत्यवादीरो द्वेष करन वो हमेशा सत्य सत्यवादीती घणम रेतानी सौतारो अन समाजेरो घात करछ. उदा: कबीर, रा. शाहु, म. फुले, डॉ. आंबेडकरेन येच लोक मानछ. ओनुरो सम्मान करछ. कारण ओनुर विचारधारा अन हेतु समान छ. डॉ. बाबासाहेब, बुध्द, कबीर, म. फुलेन गुरु मानतोतो. रा. शाहु, म. फुले, छ. शिवाजी ये कबीर, नामदेव, तुकाराम या संतांना गुरु मानत होते. कबीर, नामदेव, तुकाराम हे बुध्दांना गुरु मानत होते. डॉ. आंबेडकरांनी बुध्द धम्म स्वीकारला व धम्म तत्त्वज्ञानावर भारतीय घटना बनविली. ही घटना सर्व भारतीयांनी स्वीकारली आणि या घटनेवर भारताचा राज्यकारभार चालत आहे. बुध्द तत्त्वज्ञानावर धम्म तत्त्वज्ञानावर डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली घटना बहुजनांना मान्य आहे. घटनेचा सर्व भारतीय फायदा घेत आहे. ही घटना सर्व बहुजनांना अमृत स्वरुप ठरलेली आहे, हे त्रिकाल सत्य आहे. असे असतांना काही लोक बुध्दाचा, बुध्द धम्माचा, व डॉ. आंबेडकरांचा द्वेष का करतात? धर्म, धम्म, धाटी, रीतिरिवाज, रुढी, प्रथा, परंपरा यातील योग्य फरक समजून न घेता, सर्वांचा सविस्तर, सुक्ष्म अभ्यास न करता गोंधळ निर्माण करणे योग्य नाही. धर्म हा कर्मकांड प्रधान, अपरिवर्तनीय व मनुवाद्यांना पोषक व बहुजनांचा शोषक आहे. धर्मामुळे बहुजनांचे जीवन पशुतुल्य व गुलामीचे बनले असून मनुवाद्यांचे जीवन विनाकष्टाचे भोगवादी बनलेले आहे. धर्मामुळे अनेक जाती, पंथ, संप्रदाय, देव, मंदिर क्षेत्र निर्माण झालेले असून बहुजनांवर अनंत अन्याय, अत्याचार वाढले असुन निरक्षरता, अनारोग्य, बेकारी, बेरोजगारी, कुपोषण, उपासमार, खुनखराबी, जाळपोळ, बहिष्कार अशा अमर्याद अमानवी घटना संपुर्ण देशात घडत आहे. याउलट धम्मामुळे गांवाच्या बाहेर राहणारा अस्पृश्य समाज, निरक्षर समाज शिक्षित बनून, कर्मकांडमुक्त बनून, देशाचा वर्ग एक, वर्ग दोनचा अधिकारी बनून आपल्या हक्क, अधिकारासाठी संघर्ष करण्यास सक्षम झालेला आहे. हे सर्व धम्मामुळे घडले आहे. मात्र धर्मांतर्गत राहून अद्यापही त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे. कारण धर्म ही एक दुर्गंधी असुन धम्म ही एक मानवी जीवनशैली आहे, दुर्गंध नाही. धाटी ही कालसापेक्ष परिवर्तनीय व प्रगतीकडे नेणारी व्यवस्था असुन रुढी, प्रथा, रीतिरिवाज परंपरांचा समावेश यात करणे योग्य नाही. कारण या पारंपारिक असतात. घातक असतात. अज्ञानातून वाढतात. परंतु धाटीचा उगम हा विचारपूर्वक सामाजिक प्रगतीच्या विचाराने झालेला आहे. उदा. वयात आल्याशिवाय, लग्न नको. कन्येच्या बापाला खर्चात संरक्षण देणे. विवाहपूर्व नवरदेवास धष्टपुष्ट बनविणे. अनाथांचा समावेश समाजात करुन घेणे. सुनेने सासु सासर्‍याची निष्ठेने सेवा करणे. ब्राह्मणी कर्मकांड न करणे. नायक पंचायत निर्माण करणे. पूर्वजांना वंदन करणे, सन्मान देणे, वृध्दांची सेवा करणे. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी देणे. मूर्तीपूजा न करणे, निसर्गतत्वांना वंदन करणे. पाळीव पशुचा सन्मान करणे व संरक्षण देणे. थोडक्यात स्थाई प्रगतीकडे, सुधाराकडे मानवता, समतावादाकडे नेणारे नियम, शिष्टाचार हे धाटी क्षेत्रात येतात. गोर समाजात वरील नियम प्राचीन काळापासून होते. परंतु वेगवेगळ्या धर्माच्या संपर्कात आल्यामुळे धाटीने प्रक्षिप्त रुप धारण केले असुन त्याचे धर्मीकरण होत आहे. प्रथा, परंपरा, रुढी, रीतिरिवाज हे ठराविक काळात संसर्गामुळे निर्माण होतात आणि नष्ट देखील होतात. धाटी मात्र दिर्घकाळ टिकतात. परंतु आजच्या विज्ञान काळात व धकाधकीच्या काळात त्यांनी सुध्दा कालसापेक्षतेचे स्वरुप धारण केलेले आहे. पण प्राचीन धाटीचे महत्व मात्र मोलाचे आजही आहे. नैतिक व व्यावहारिकदृष्ट्या धाटी व धम्मामध्ये साम्य दिसून येते. पण सर्वच धर्मांशी धाटीची फारकत जाणवते. धाटीमुळे गोर समाज आजही एकसंघ आहे. पण धर्मामुळे फुट, द्वेष व विभागणी दृष्टीस येत आहे. धम्म जर अमानवी असता तर तो परदेशात पसरला नसता व धम्म धारकांची संख्या दिडशे कोटीच्या पुढे गेली नसती. म्हणून धम्मधारकाचा द्वेष, अपमान करणे हे अमानवीय कृत्य आहे, असे माझे मत आहे. प्रा. ग. ह. राठोड.

G H Rathod

162 Blog posts

Comments