महाराष्ट्राचे शिल्पकार - कालवश वसंतराव नाईक

हजारो वर्षापासून भयंकर अज्ञानरुपी अंधारात, गाव- शहराच्या संस्कृती- सभ्यतेपासून अतिदूर, निरक्षरता ,अज्ञान, अं

हजारो वर्षापासून भयंकर अज्ञानरुपी अंधारात, गाव- शहराच्या संस्कृती- सभ्यतेपासून अतिदूर, निरक्षरता ,अज्ञान, अंधश्रध्दा, अज्ञान, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक, औद्योगिक, तांत्रिक जाणीवांपासून वंचित, डोंगरदर्‍यांच्या पायथ्याशी वसलेल्या, दळणवळण आणि आरोग्याच्या कोणत्याही सोई- सवलती नसलेल्या उजाड तांडावस्तीमध्ये, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या गहुली गावांअंतर्गत येणार्‍या तांड्यात फुलसिंग नाईक आणि हुणकाबाईच्या पोटी दिनांक 1 जुलै 1913 रोजी  कालवश हाजुसिंग नाईक (उर्फ वसंतराव नाईक) यांचा जन्म झाला. बंजारा गण भटका, पण वसंतराव नाईकांचे वडील मात्र शेतीनिष्ठ होते. अशा या शेतकरी, पण दर्‍याखोर्‍यात राहणार्‍यास भटक्या गणात वाढून आणि अनेक शैक्षणिक अडचणींना तोंड देत उच्च शिक्षण घेऊन हा शेतकर्‍याचा मुलगा पुढे 11 वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री राहून अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने, भेदभाव, पक्षपात न करता सर्व जनतेची सेवा करुन सर्वांचा हृदय  सम्राट होऊन गेला.

या जनतेच्या  हृदय सम्राटावर हजारो पिढीपासून कोणत्याही प्रकारचे राजकिय आणि प्रशासकिय तसेच जनसेवेचे संस्कार नसतांना सर्व राजकिय व प्रशासकिय नेत्यांना लाजवेल व विचार चिंतन करायला लावेल अशी कर्तबगारी करुन जाणार्‍या मुख्यमंत्र्याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण पर्वताएवढ्या महाराष्ट्र राज्याच्या अनेक समस्या सहजरित्या सोडवून महाराष्ट्र राज्यात सामाजिक, राजकिय, आर्थिक , सांस्कृतिक, कृषि, औद्योगिक व दळणवळण, पाणी पुरवठा वगैरे अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणणारा, तसेच युध्द, दुष्काळ व नैसर्गिक संकटावर सहजरित्या मात करणारा त्यांच्या सारखा नेता न भूतकाळात झाला आणि वर्तमानकाळातही दिसून येत नाही. आज शेतकर्‍यांच्या स्वहत्या व बेरोजगारीचे तांडव नृत्य दिसून येत असतांना अनेकांना नाईक साहेबांच्या कार्याची आठवण येत असेल. आजच्या काळात ते मुख्यमंत्रीपदावर असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकारी वाढू दिली नसती व शेतकर्‍यांच्या स्वहत्यासुध्दा घडू दिल्या नसत्या. शेतकरी व कामगारांसाठी त्यांचा तीळ तीळ जीव झुरत होता. वस्तुत: नाईक साहेब शेतकरी कामगारांचे प्राणच होते. कष्ट करणार्‍यांचे कल्याण व्हावे. त्यांचे दु:ख कमी होऊन त्यांच्यासाठी सुखाचे दिवस यावे अशी त्यांची अंतरिक इच्छा व भावना होती, नाईक साहेबांनी आजची बेरोजगारी, पिण्याच्या पाण्याची समस्या, आरोग्यसमस्या, वीजसमस्या, झोपडपट्टीच्या समस्या, शैक्षणिक आरक्षण जनगणनेच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, दहशतवाद, जातीय दंगली, वगैरे अनेक समस्यांवर त्यांनी सामोपचाराने मार्ग काढला असता. पण आज ते हयात नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झाली आहे, यात कुणाचेही दुमत होणार नाही. हा स्वच्छ प्रशासनाचा, लोककल्याणाचा, समतेचा, सौहार्दतेचा, प्रेमाचा,मिळून मिसळून राहणार्‍यांचा सुवर्णकाळ मानला जातो.

भटक्या, अतिमागास, गणातील, शेतकरी, शेतमजुरांच्या ,शिक्षणाचा अनेक पिढ्यांना साधा गंध नसणार्‍या तांड्यातून, अनेकानेक शैक्षणिक अडचणींवर मात करुन कालवश वसंतराव नाईक हे सन 1933 मध्ये शालांत  परिक्षा, 1937 मध्ये कला शाखेची पदवी परीक्षा व 1940 मध्ये वकीलीच्या परीक्षेत पास होऊन ते वकीली व वकीलीबरोबरच समाजपरिवर्तन व समाजसेवेचे काम करु लागले होते. पुढे 6 जुलै 1941 ला त्यांनी वत्सला घाटे नामे ब्राह्मण तरुणीशी नोंदणी पध्दतीने प्रेमविवाह केला. यानंतर काही दिवसांनी म्हणजे 1943 मध्ये ते पुसद तालुका काँंग्रेस समितीचे अध्यक्ष बनले. पुढे पुसद नगर पालिकेची निवडणून लढवून 1946 मध्ये ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष 10 वर्षांपर्यंत राहून पुसदच्या सुधारणेत बहुमोलाची व प्रशंसनीय भर घातली. नंतर 1 नोव्हेंबर 1956 पासून 10 एप्रिल 1957 पर्यंत ते सहकार मंत्रीपदावर राहिले व 11 एप्रिल 1957 ते 30 एप्रिल 1960 पर्यंत ते कृषीमंत्री राहिले. 1 मे 1960 ते 4 डिसेंबर 1963 पर्यंत ते राजस्व (महसूल) मंत्री राहिले. यानतंर 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. यानंतरही ते मुख्यमंत्री राहिले असते पण जातीवादाने त्यांचा बळी घेतल्यामुळे केंद्रशासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कोणतीही तक्रार न करता नम्रपणे राजीनामा देऊन टाकला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंतरावजी नाईक हे 1977 ला वाशिम मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. शेवटी 6 ऑगस्ट 1979 ला सिंगापूर येथे दौर्‍यावर असतांना उदकवाहकामध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी गहुलीला सरकारी इतमानाने करण्यात आला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र व देशसुध्दा हळहळला.

जवळजवळ एकूण 33 वर्षेशासकिय जबाबदारीच्या पदावर राहून त्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणाने, कोणताही भेदभाव, पक्षपात न करता सर्वांना पुत्रवत समजून सेवा केली. त्यांची अरुंधती नावाची तरुण कन्या अविवाहितच वारली. दोन्ही मुले अविनाश आणि निरंजन सध्या विदेशात व्यवसायात आहेत.

अविनाशच्या पत्नीचे नाव नीता असून त्यांना नंदिनी व अंजली नावाच्या दोन कन्या आहेत. निरंजनच्या पत्नीचे नाव मीना असून संततीबद्दल माहिती नाही. नाईक साहेबांचे वडील बंधू राजूसिंग नाईक यांना सुधाकरराव नाईक ,मनोहरराव नाईक व मधुकरराव नाईक अशी तीन मुले आहेत. पैकी सुधाकरराव व मधुकरराव कालवश झालेत. मा. मनोहरराव नाईक सध्या आमदार आहेत. मात्र समाजसंघटन आणि सामाजिक ज्वलंत समस्यांकडे त्यांचे विशेष लक्ष नाही, ही एक शोकांतिका आहे. कालवश वसंतराव नाईक शासन प्रशासन व्यवस्थेत 33 वर्षे राहिले. पैकी 11 वर्षे1 महिना 20 दिवस ते मुख्यमंती पदावर कार्यरत होते. या 33 वर्षाच्या राजकारणात त्यांनी गांव, तालुका, जिल्हा, विभागीय ते राज्य पातळीपर्यंत अनेकानेक लोक कल्याणाच्या व महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य  सुख- समृध्दीच्या शेकडो योजना राबविल्या. त्यांनी या योजना राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्याचा कधी नव्हे त्यापेक्षा हजारोपटीने विकास व सुधारणा घडून आली. शहरी विकासाबरोबरच  ग्रामीण क्षेत्र व ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व शेती विकासाकडे नाईक साहेबांनी विशेष लक्ष पुरविले, शेती विकासाच्या कार्यामुळे ते आज हरितक्रांतीचे जनक मानले जातात. शेतीक्षेत्रास संकरित बियाणे, रासायनिक खते, औषधी, फलोत्पादन, दूध- विकास योजना, कोल्हापूरी व वसंत बंधारे, कमाल जमीन धारणा भूमिहीनांना भूमि वाटप दूधविकास योजना, रोजगार हमी योजना, कापूस व विविध धान्य खरेदी योजना, बाजारपेठा, पाणी अडवा पाणी जिरवा योजना, जलसंधारण योजना, पाझर तलाव, नालाबंडींग, विहीर कर्ज, कृषीउद्योग, कृषी विद्यापीठ, कुळकायदा, कृष्णा गोदावरी पाणी वाटप योजना, कसेल त्याची जमीन योजना, कॉटन फेडरेशन योजना, सुतगिरणी, कापड मील, साखर कारखाने, दळणवळणासाठी रस्ते, मोठी धरणे, राशन वाटप योजना , पीक कर्ज अशा योजना राबवून त्यांनी शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणली. अन्नधान्याच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नव्हे तर देशाला स्वावलंबी बनवून निर्यातसुध्दा वाढविली. राज्य, समाजसुधारणा व कल्याणाच्या क्षेत्रात नाईक साहेबांनी महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाची स्थापना, नळयोजना, झोपडपट्टी सुधार योजना, दारुबंदी कायदा, महसुल वसूली योजना, महाराष्ट्र राज्य लॉटरी योजना, बॅकबेरी क्लेमेशन योजना, आश्रमशाळा योजना, वृक्षलागवड योजना राबवून महाराष्ट्र राज्याचा कायापालट घडवून आणला.

नाईक साहेबांच्या काळात दुष्काळ महापूर, कोयना भूकंप, चीन- पाकयुध्द, पक्ष विभागणी, आरक्षणाचा तिढा, सीमातंटा, पाणीवाटप असे अनेक संकटे, अडचणी, समस्या निर्माण झाल्या पण कालवश वसंतरावजी नाईक यांनी सामंजस्याने, संमतीने सर्वांच्या सहकाराने, विचाराने देवाण-घेवाणीने या सर्व संकटावर व्यवस्थितरित्या मात केली,व राज्याची घडी बिघडू दिली नाही व वरील सर्व कामे त्यांनी यशस्वी केली.

नाईक साहेबांना वरील सर्व क्षेत्रात यश मिळण्याचे व महाराष्ट्र राज्याचे  प्रगतीचे कारण म्हणजे त्यांचा अत्यंत गोड आणि त्यांचा दृढनिश्‍चयी विश्‍वास, करारी स्वभाव, त्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता, काम करण्याची व करुन घेण्याची पध्दत, ध्येयनिष्ठा, जिद्दीपणा, दिलदारपणा, आपुलकी, जिव्हाळा, समताभाव, माणूसकी, लिनता ,प्रेम, सौहार्दपणा, सामंजस्यवृत्ती, सौजन्यशीलता, मोकळेपणा,निगर्वीपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती, दूरदर्शीपणा, शालिनता, तारतम्य, गुणी व चांगली माणसे ओळखण्याची त्यांची विद्वता असे अनेक गुण होय. या सर्व गुणांच्या खजिन्यामुळे, महान कल्याणदायी कार्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शिल्पकार, शेतकर्‍यांचा देव, राजा, हितचिंतक, अमोल हिरा, लोकप्रिय नेता, भूमिपुत्र, अजातशत्रु, प्रबोधनकार, मने जिंकणारा महापुरुष, शेतीवेडा शेतकरी, युगपुरुष अशा अनेक विशेषणांनी त्यांचा गौरव करीत होते. व आजही करतात. माननीय कालवश वसंतरावजी नाईकांचा काळ हा वस्तुत: महाराष्ट्राचा खरा सुवर्णकाळ मानला जातो. शेतकर्‍यांना, मजुरांना सर्व क्षेत्रात न्याय देऊन सुखी बनवून शासनकर्ती जमात अथवा राजा बनविण्याची त्यांची इच्छा व स्वप्न होते. बळीराज्य निर्माण करुन पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचा त्यांचा मनोदय होता. शेतकर्‍यांना उद्योजक व शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे मालक बनविण्याची त्यांची इच्छा होती. आजचे मधले दलाल ते नष्ट करु इच्छित होते. खरोखरच आज नाईक साहेब हयात असते तर त्यांनी शेतकर्‍यांवर, कामगारांवर व सामान्य जनांवर अन्याय, अत्याचार होऊ दिला नसता, शेती ही काळी आई व उद्योगाची जननी आहे असे ते म्हणत.  शेतकरी जगला तर कोण मरेल व शेतकरी मेला तर कोण जगेल  हे त्यांचे विचार त्रिकालाबाधित सत्य आहे. पण आज शेतकर्‍यांची अवस्था पाहिली जात नाही. असे अति खेदाने म्हणावे लागत आहे. नाईक साहेबांसारखा शेतीप्रेमी, शेतीवेडा, शेती व शेतकरी हितचिंतक नेता निर्माण होण्याची आज खरी गरज आहे. पण आज एकही नेता शेतकर्‍यांची शेतमजुरांची व शेतीची बाजू घेऊन संघर्ष करणारा दिसत नसल्यामुळे भविष्यात देश अन्न व दूध, दही, तुप ओरडत फिरणार आहे. गरीब जतना कुत्र्याच्या मौतीने मरणार आहे. विशेष आर्थिक क्षेत्र विकासामुळे शेतकरी भूमिहीन होऊन निर्वासित, बेकार होऊन भरकटणार आहे. शेती विदेशींच्या मालकीची बनवून देश विकला जाणार आहे. नाईक साहेबांनी आज असे होऊच दिले नसते. आज कारखान्याच्या मालांचे भाव आभाळाला भिडत आहेत तर शेतकर्‍यांच्या शेतमालांचा खर्चसुध्दा वसूल होऊ लागलेला नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन स्वहत्या करुन घेत आहे. आज नाईक साहेब असते तर त्यांनी असे होऊच दिले नसते. नाही तर ते शेतकर्‍यांबरोबर आंदोलनात उतरले असते. शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी पद आणि प्राणाची बाजी लावली असती. शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी आज एखाद्या वसंतराव नाईक सारखा न्यायप्रेमी नेत्याच्या जन्माची खरी गरज आहे.

कालवश वसंतराव नाईक जोपर्यंत राजकारणात होेते, तोपर्यंत त्यांनी महार ,मांग ,चांभार ,इतर मागास भटके ,मराठा, ब्राह्मण बनिया असा कोणताच भेदभाव होऊ दिला नाही. सर्वांना पुत्रवत समजून सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य घालविले. पण ते ज्या समाजात जन्मले, त्या समाजासाठी त्यांनी विशेष असे काही केले नाही. राजकीय कार्यभारामुळे किंवा पक्षपात केल्याचा दोष माथी येईल या विचारांनी कदाचित त्यांनी काही केले नसावे. आरक्षण धोरणाच्या चौकटीत राहून जेवढे काही अल्पसे करता येईल तेवढेच  सेवा क्षेत्रातील काम त्यांनी केले.परंतु अधिकारी वर्गांनी  व जातीवादाने आरक्षणाची अंमलबजावणीसुध्दा पुर्णपणे होऊ दिली नाही. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे घुसखोरी करुन व अधिकारी वर्गांनी व जातीवादाने आरक्षणाची अंमलबजावणी सुध्दा पुर्णपणे होऊ दिली नाही. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे घुसखोरी करुन जातीवाद्यांनी आरक्षण प्रभावहीन केले. या व्यतिरिक्त समाजाची एखादी मजबूत संघटना सुध्दा बांधता आली नाही. तालुका, जिल्हा, विभागीय अथवा राज्यस्तरापर्यंत राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधी सुध्दा त्यांनी निर्माण केले नाही. समाजाला व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्थाही त्यांनी दिल्या नाही. त्यांच्या काळात समाजात सुशिक्षित, जाणकार वर्ग नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचला नाही. व त्यामुळे त्यांना देता येणेही शक्य झाले नसावे. राजकीय व शासकीय कार्यभारामुळे साहित्याच्या रुपात वैचारिक शिदोरीही समाजाला त्यांनी दिली नाही. सर्व क्षेत्रात सर्वाधिक फायदा त्यांच्याकडून सुधारित व शासनकर्त्या समाजानीच घेतला. वसंतराव नाईकांच्या काळात बंजारा समाज राजकीय फायद्याशी व महत्वाशी परिचित नव्हता. त्यांना मार्गदर्शन व मदतनीसही नव्हते. शिक्षित तरुण- तरुणींची पहिलीच पिढी तियार होत होती. सामाजिक बांधिलकीची त्यांना जाणीव नव्हती. ते फक्त स्वत: पुरताच विचार करीत होते. या सर्व कारणामुळे राजकीय फायद्याचा संपूर्ण मलिदा, मलई, तूप सर्व सुधारित विकसित राजकीय लोकांनीच खाऊन फस्त केले. बंजारा समाजाला पाणीयुक्त ताकसुध्दा मिळाले नाही. आजही मोठ- मोठ्या तांड्यांना महसुलीचाही दर्जा दिला गेलेला नाही. तांड्याला रस्ता, विज, आरोग्य केंद्र, शाळा, मंगल कार्यालय, धर्मशाळा, वाचनालय, व्यायामशाळा, पोलिस चौकी, बससेवा, नळयोजना अशा मूलभूत नागरी सोयी उपलब्ध नाहीत. आजही 90 टक्के बंजारा गण मोळी गवत विक्री, दारुभट्टी, ऊसतोड, रोडकाम, इमारत बांधकाम, माती खोदकाम, पशुपालन, शिकार, मासेमारी, सोंगनी, विहीर- तळे, नालाबंडीगची कामे दलाली, मांसविक्री वगैरे कार्य करुन उदर निर्वाह करीत आहे. दारिद्रय आणि शिक्षणाच्या  खाजगीकरणामुळे यापुढे समाजात व्यावसायिक शिक्षण घेण्याची पात्रता नसल्यामुळे भयंकर बेकारी, गरीबी, निरक्षरता, अनारोग्य उपासमार होऊन तीव्रगतीने समाजाचा संहार घडून येणार आहे. अशी परिस्थिती असतांनाही आजचे शासनकर्ते, पुढारी बंजारा समाजाला 11 वर्षे मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही बंजारा समाजाला आणखी काय हवे आहे, असे म्हणतात. एखाद्याच्या घरात कुटुंबप्रमुखाचे जेवण झाले म्हणजे सर्वांचेच जेवण झाले किंवा गावातला एखादा माणूस श्रीमंत असला तर संपूर्ण गावच श्रीमंत आहे. तसेच वर्ग एकचा अधिकारी भाऊ व शेती कसणारा भाऊ समान आहे, अशातलेच कथन प्रस्थापित, जातीवादी पुढार्‍यांचे नाईक साहेब व बंजारा समाजाच्या सुधारणा बाबतचे आहे. प्रस्थापितांचे हितसंबंध धोक्यात येऊ नये व बंजारा समाज आहे तसाच भटका, मागास व गुलाम रहावा. निरक्षर दरिद्री रहावा, या हेतूने केलेले वरील कथन आहे. भोळा, असंघटीत बंजारा समाज या कथनातील स्वार्थ आणि कपटपणा ओळखत नसल्यामुळे तो बहुसंख्य असुनही प्रस्थापिताकडून आजच्या काळात तो केवळ वापरला जात आहे. प्रस्थापितांचे तो पदस्पर्श करीत आहे, भीक मागत आहे हे एक वास्तव सत्य आहे.

कालवश आदरणीय वसंतराव नाईकांनी भौतिक स्वरुपात बंजारा समाजाला काही दिले नसले तरी सुरुवातीपासून बहुसंख्येने सत्तेवर असलेला प्रस्थापित जातीवादी सुधारित, गांव- शहरात राहणारा, सुसंस्कारित म्हणवून घेणारा समाज, भटक्या मागास दारिद्रय, निरक्षर बंजारा समाजाला नेहमी जंगली, लभांडे, ससे धरणारे म्हणवून चिडवित हिनवित होता व आजही चिडवितो, हिणवितो पण कालवश नाईक साहेबांनी त्यांच्या राजकीय काळात महाराष्ट्राचा कायापालट करुन व जवळजवळ एक तप मुख्यमंत्रीपदी राहून हे सिध्द करुन दिले आहे की, सुसंस्कारित, सुधारित, विकसित, समाजापेक्षा असंस्कारित, भटका, निरक्षर, दरिद्री असंघटीत बंजारा समाज नाईक साहेबांच्या रुपाने सर्वच क्षेत्रात कणभर नव्हे तर मणभर कार्यक्षम, गुणवत्ता धारक, मानवतावादी, समतावादी, न्यायवादी आहे. बंजारा गणाला नाईक साहेबांकडून मिळालेले एवढेच धन समाजाला मानसिक बळ देणारे आहे. हेच मानसिक बळ समाजाला भविष्यात संघटित करणारे आहे.

जयभारत - जय संविधान

प्रा. ग. ह. राठोड, औरंगाबाद

मो.9881296967

महाराष्ट्राचे शिल्पकार - कालवश वसंतराव नाईक

हजारो वर्षापासून भयंकर अज्ञानरुपी अंधारात, गाव- शहराच्या संस्कृती- सभ्यतेपासून अतिदूर, निरक्षरता ,अज्ञान, अंधश्रध्दा, अज्ञान, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक, औद्योगिक, तांत्रिक जाणीवांपासून वंचित, डोंगरदर्‍यांच्या पायथ्याशी वसलेल्या, दळणवळण आणि आरोग्याच्या कोणत्याही सोई- सवलती नसलेल्या उजाड तांडावस्तीमध्ये, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या गहुली गावांअंतर्गत येणार्‍या तांड्यात फुलसिंग नाईक आणि हुणकाबाईच्या पोटी दिनांक 1 जुलै 1913 रोजी  कालवश हाजुसिंग नाईक (उर्फ वसंतराव नाईक) यांचा जन्म झाला. बंजारा गण भटका, पण वसंतराव नाईकांचे वडील मात्र शेतीनिष्ठ होते. अशा या शेतकरी, पण दर्‍याखोर्‍यात राहणार्‍यास भटक्या गणात वाढून आणि अनेक शैक्षणिक अडचणींना तोंड देत उच्च शिक्षण घेऊन हा शेतकर्‍याचा मुलगा पुढे 11 वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री राहून अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने, भेदभाव, पक्षपात न करता सर्व जनतेची सेवा करुन सर्वांचा हृदय  सम्राट होऊन गेला.

या जनतेच्या  हृदय सम्राटावर हजारो पिढीपासून कोणत्याही प्रकारचे राजकिय आणि प्रशासकिय तसेच जनसेवेचे संस्कार नसतांना सर्व राजकिय व प्रशासकिय नेत्यांना लाजवेल व विचार चिंतन करायला लावेल अशी कर्तबगारी करुन जाणार्‍या मुख्यमंत्र्याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण पर्वताएवढ्या महाराष्ट्र राज्याच्या अनेक समस्या सहजरित्या सोडवून महाराष्ट्र राज्यात सामाजिक, राजकिय, आर्थिक , सांस्कृतिक, कृषि, औद्योगिक व दळणवळण, पाणी पुरवठा वगैरे अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणणारा, तसेच युध्द, दुष्काळ व नैसर्गिक संकटावर सहजरित्या मात करणारा त्यांच्या सारखा नेता न भूतकाळात झाला आणि वर्तमानकाळातही दिसून येत नाही. आज शेतकर्‍यांच्या स्वहत्या व बेरोजगारीचे तांडव नृत्य दिसून येत असतांना अनेकांना नाईक साहेबांच्या कार्याची आठवण येत असेल. आजच्या काळात ते मुख्यमंत्रीपदावर असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकारी वाढू दिली नसती व शेतकर्‍यांच्या स्वहत्यासुध्दा घडू दिल्या नसत्या. शेतकरी व कामगारांसाठी त्यांचा तीळ तीळ जीव झुरत होता. वस्तुत: नाईक साहेब शेतकरी कामगारांचे प्राणच होते. कष्ट करणार्‍यांचे कल्याण व्हावे. त्यांचे दु:ख कमी होऊन त्यांच्यासाठी सुखाचे दिवस यावे अशी त्यांची अंतरिक इच्छा व भावना होती, नाईक साहेबांनी आजची बेरोजगारी, पिण्याच्या पाण्याची समस्या, आरोग्यसमस्या, वीजसमस्या, झोपडपट्टीच्या समस्या, शैक्षणिक आरक्षण जनगणनेच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, दहशतवाद, जातीय दंगली, वगैरे अनेक समस्यांवर त्यांनी सामोपचाराने मार्ग काढला असता. पण आज ते हयात नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झाली आहे, यात कुणाचेही दुमत होणार नाही. हा स्वच्छ प्रशासनाचा, लोककल्याणाचा, समतेचा, सौहार्दतेचा, प्रेमाचा,मिळून मिसळून राहणार्‍यांचा सुवर्णकाळ मानला जातो.

भटक्या, अतिमागास, गणातील, शेतकरी, शेतमजुरांच्या ,शिक्षणाचा अनेक पिढ्यांना साधा गंध नसणार्‍या तांड्यातून, अनेकानेक शैक्षणिक अडचणींवर मात करुन कालवश वसंतराव नाईक हे सन 1933 मध्ये शालांत  परिक्षा, 1937 मध्ये कला शाखेची पदवी परीक्षा व 1940 मध्ये वकीलीच्या परीक्षेत पास होऊन ते वकीली व वकीलीबरोबरच समाजपरिवर्तन व समाजसेवेचे काम करु लागले होते. पुढे 6 जुलै 1941 ला त्यांनी वत्सला घाटे नामे ब्राह्मण तरुणीशी नोंदणी पध्दतीने प्रेमविवाह केला. यानंतर काही दिवसांनी म्हणजे 1943 मध्ये ते पुसद तालुका काँंग्रेस समितीचे अध्यक्ष बनले. पुढे पुसद नगर पालिकेची निवडणून लढवून 1946 मध्ये ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष 10 वर्षांपर्यंत राहून पुसदच्या सुधारणेत बहुमोलाची व प्रशंसनीय भर घातली. नंतर 1 नोव्हेंबर 1956 पासून 10 एप्रिल 1957 पर्यंत ते सहकार मंत्रीपदावर राहिले व 11 एप्रिल 1957 ते 30 एप्रिल 1960 पर्यंत ते कृषीमंत्री राहिले. 1 मे 1960 ते 4 डिसेंबर 1963 पर्यंत ते राजस्व (महसूल) मंत्री राहिले. यानतंर 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. यानंतरही ते मुख्यमंत्री राहिले असते पण जातीवादाने त्यांचा बळी घेतल्यामुळे केंद्रशासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कोणतीही तक्रार न करता नम्रपणे राजीनामा देऊन टाकला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंतरावजी नाईक हे 1977 ला वाशिम मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. शेवटी 6 ऑगस्ट 1979 ला सिंगापूर येथे दौर्‍यावर असतांना उदकवाहकामध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी गहुलीला सरकारी इतमानाने करण्यात आला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र व देशसुध्दा हळहळला.

जवळजवळ एकूण 33 वर्षेशासकिय जबाबदारीच्या पदावर राहून त्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणाने, कोणताही भेदभाव, पक्षपात न करता सर्वांना पुत्रवत समजून सेवा केली. त्यांची अरुंधती नावाची तरुण कन्या अविवाहितच वारली. दोन्ही मुले अविनाश आणि निरंजन सध्या विदेशात व्यवसायात आहेत.

अविनाशच्या पत्नीचे नाव नीता असून त्यांना नंदिनी व अंजली नावाच्या दोन कन्या आहेत. निरंजनच्या पत्नीचे नाव मीना असून संततीबद्दल माहिती नाही. नाईक साहेबांचे वडील बंधू राजूसिंग नाईक यांना सुधाकरराव नाईक ,मनोहरराव नाईक व मधुकरराव नाईक अशी तीन मुले आहेत. पैकी सुधाकरराव व मधुकरराव कालवश झालेत. मा. मनोहरराव नाईक सध्या आमदार आहेत. मात्र समाजसंघटन आणि सामाजिक ज्वलंत समस्यांकडे त्यांचे विशेष लक्ष नाही, ही एक शोकांतिका आहे. कालवश वसंतराव नाईक शासन प्रशासन व्यवस्थेत 33 वर्षे राहिले. पैकी 11 वर्षे1 महिना 20 दिवस ते मुख्यमंती पदावर कार्यरत होते. या 33 वर्षाच्या राजकारणात त्यांनी गांव, तालुका, जिल्हा, विभागीय ते राज्य पातळीपर्यंत अनेकानेक लोक कल्याणाच्या व महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य  सुख- समृध्दीच्या शेकडो योजना राबविल्या. त्यांनी या योजना राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्याचा कधी नव्हे त्यापेक्षा हजारोपटीने विकास व सुधारणा घडून आली. शहरी विकासाबरोबरच  ग्रामीण क्षेत्र व ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व शेती विकासाकडे नाईक साहेबांनी विशेष लक्ष पुरविले, शेती विकासाच्या कार्यामुळे ते आज हरितक्रांतीचे जनक मानले जातात. शेतीक्षेत्रास संकरित बियाणे, रासायनिक खते, औषधी, फलोत्पादन, दूध- विकास योजना, कोल्हापूरी व वसंत बंधारे, कमाल जमीन धारणा भूमिहीनांना भूमि वाटप दूधविकास योजना, रोजगार हमी योजना, कापूस व विविध धान्य खरेदी योजना, बाजारपेठा, पाणी अडवा पाणी जिरवा योजना, जलसंधारण योजना, पाझर तलाव, नालाबंडींग, विहीर कर्ज, कृषीउद्योग, कृषी विद्यापीठ, कुळकायदा, कृष्णा गोदावरी पाणी वाटप योजना, कसेल त्याची जमीन योजना, कॉटन फेडरेशन योजना, सुतगिरणी, कापड मील, साखर कारखाने, दळणवळणासाठी रस्ते, मोठी धरणे, राशन वाटप योजना , पीक कर्ज अशा योजना राबवून त्यांनी शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणली. अन्नधान्याच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नव्हे तर देशाला स्वावलंबी बनवून निर्यातसुध्दा वाढविली. राज्य, समाजसुधारणा व कल्याणाच्या क्षेत्रात नाईक साहेबांनी महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाची स्थापना, नळयोजना, झोपडपट्टी सुधार योजना, दारुबंदी कायदा, महसुल वसूली योजना, महाराष्ट्र राज्य लॉटरी योजना, बॅकबेरी क्लेमेशन योजना, आश्रमशाळा योजना, वृक्षलागवड योजना राबवून महाराष्ट्र राज्याचा कायापालट घडवून आणला.

नाईक साहेबांच्या काळात दुष्काळ महापूर, कोयना भूकंप, चीन- पाकयुध्द, पक्ष विभागणी, आरक्षणाचा तिढा, सीमातंटा, पाणीवाटप असे अनेक संकटे, अडचणी, समस्या निर्माण झाल्या पण कालवश वसंतरावजी नाईक यांनी सामंजस्याने, संमतीने सर्वांच्या सहकाराने, विचाराने देवाण-घेवाणीने या सर्व संकटावर व्यवस्थितरित्या मात केली,व राज्याची घडी बिघडू दिली नाही व वरील सर्व कामे त्यांनी यशस्वी केली.

नाईक साहेबांना वरील सर्व क्षेत्रात यश मिळण्याचे व महाराष्ट्र राज्याचे  प्रगतीचे कारण म्हणजे त्यांचा अत्यंत गोड आणि त्यांचा दृढनिश्‍चयी विश्‍वास, करारी स्वभाव, त्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता, काम करण्याची व करुन घेण्याची पध्दत, ध्येयनिष्ठा, जिद्दीपणा, दिलदारपणा, आपुलकी, जिव्हाळा, समताभाव, माणूसकी, लिनता ,प्रेम, सौहार्दपणा, सामंजस्यवृत्ती, सौजन्यशीलता, मोकळेपणा,निगर्वीपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती, दूरदर्शीपणा, शालिनता, तारतम्य, गुणी व चांगली माणसे ओळखण्याची त्यांची विद्वता असे अनेक गुण होय. या सर्व गुणांच्या खजिन्यामुळे, महान कल्याणदायी कार्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शिल्पकार, शेतकर्‍यांचा देव, राजा, हितचिंतक, अमोल हिरा, लोकप्रिय नेता, भूमिपुत्र, अजातशत्रु, प्रबोधनकार, मने जिंकणारा महापुरुष, शेतीवेडा शेतकरी, युगपुरुष अशा अनेक विशेषणांनी त्यांचा गौरव करीत होते. व आजही करतात. माननीय कालवश वसंतरावजी नाईकांचा काळ हा वस्तुत: महाराष्ट्राचा खरा सुवर्णकाळ मानला जातो. शेतकर्‍यांना, मजुरांना सर्व क्षेत्रात न्याय देऊन सुखी बनवून शासनकर्ती जमात अथवा राजा बनविण्याची त्यांची इच्छा व स्वप्न होते. बळीराज्य निर्माण करुन पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचा त्यांचा मनोदय होता. शेतकर्‍यांना उद्योजक व शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे मालक बनविण्याची त्यांची इच्छा होती. आजचे मधले दलाल ते नष्ट करु इच्छित होते. खरोखरच आज नाईक साहेब हयात असते तर त्यांनी शेतकर्‍यांवर, कामगारांवर व सामान्य जनांवर अन्याय, अत्याचार होऊ दिला नसता, शेती ही काळी आई व उद्योगाची जननी आहे असे ते म्हणत.  शेतकरी जगला तर कोण मरेल व शेतकरी मेला तर कोण जगेल  हे त्यांचे विचार त्रिकालाबाधित सत्य आहे. पण आज शेतकर्‍यांची अवस्था पाहिली जात नाही. असे अति खेदाने म्हणावे लागत आहे. नाईक साहेबांसारखा शेतीप्रेमी, शेतीवेडा, शेती व शेतकरी हितचिंतक नेता निर्माण होण्याची आज खरी गरज आहे. पण आज एकही नेता शेतकर्‍यांची शेतमजुरांची व शेतीची बाजू घेऊन संघर्ष करणारा दिसत नसल्यामुळे भविष्यात देश अन्न व दूध, दही, तुप ओरडत फिरणार आहे. गरीब जतना कुत्र्याच्या मौतीने मरणार आहे. विशेष आर्थिक क्षेत्र विकासामुळे शेतकरी भूमिहीन होऊन निर्वासित, बेकार होऊन भरकटणार आहे. शेती विदेशींच्या मालकीची बनवून देश विकला जाणार आहे. नाईक साहेबांनी आज असे होऊच दिले नसते. आज कारखान्याच्या मालांचे भाव आभाळाला भिडत आहेत तर शेतकर्‍यांच्या शेतमालांचा खर्चसुध्दा वसूल होऊ लागलेला नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन स्वहत्या करुन घेत आहे. आज नाईक साहेब असते तर त्यांनी असे होऊच दिले नसते. नाही तर ते शेतकर्‍यांबरोबर आंदोलनात उतरले असते. शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी पद आणि प्राणाची बाजी लावली असती. शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी आज एखाद्या वसंतराव नाईक सारखा न्यायप्रेमी नेत्याच्या जन्माची खरी गरज आहे.

कालवश वसंतराव नाईक जोपर्यंत राजकारणात होेते, तोपर्यंत त्यांनी महार ,मांग ,चांभार ,इतर मागास भटके ,मराठा, ब्राह्मण बनिया असा कोणताच भेदभाव होऊ दिला नाही. सर्वांना पुत्रवत समजून सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य घालविले. पण ते ज्या समाजात जन्मले, त्या समाजासाठी त्यांनी विशेष असे काही केले नाही. राजकीय कार्यभारामुळे किंवा पक्षपात केल्याचा दोष माथी येईल या विचारांनी कदाचित त्यांनी काही केले नसावे. आरक्षण धोरणाच्या चौकटीत राहून जेवढे काही अल्पसे करता येईल तेवढेच  सेवा क्षेत्रातील काम त्यांनी केले.परंतु अधिकारी वर्गांनी  व जातीवादाने आरक्षणाची अंमलबजावणीसुध्दा पुर्णपणे होऊ दिली नाही. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे घुसखोरी करुन व अधिकारी वर्गांनी व जातीवादाने आरक्षणाची अंमलबजावणी सुध्दा पुर्णपणे होऊ दिली नाही. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे घुसखोरी करुन जातीवाद्यांनी आरक्षण प्रभावहीन केले. या व्यतिरिक्त समाजाची एखादी मजबूत संघटना सुध्दा बांधता आली नाही. तालुका, जिल्हा, विभागीय अथवा राज्यस्तरापर्यंत राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधी सुध्दा त्यांनी निर्माण केले नाही. समाजाला व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्थाही त्यांनी दिल्या नाही. त्यांच्या काळात समाजात सुशिक्षित, जाणकार वर्ग नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचला नाही. व त्यामुळे त्यांना देता येणेही शक्य झाले नसावे. राजकीय व शासकीय कार्यभारामुळे साहित्याच्या रुपात वैचारिक शिदोरीही समाजाला त्यांनी दिली नाही. सर्व क्षेत्रात सर्वाधिक फायदा त्यांच्याकडून सुधारित व शासनकर्त्या समाजानीच घेतला. वसंतराव नाईकांच्या काळात बंजारा समाज राजकीय फायद्याशी व महत्वाशी परिचित नव्हता. त्यांना मार्गदर्शन व मदतनीसही नव्हते. शिक्षित तरुण- तरुणींची पहिलीच पिढी तियार होत होती. सामाजिक बांधिलकीची त्यांना जाणीव नव्हती. ते फक्त स्वत: पुरताच विचार करीत होते. या सर्व कारणामुळे राजकीय फायद्याचा संपूर्ण मलिदा, मलई, तूप सर्व सुधारित विकसित राजकीय लोकांनीच खाऊन फस्त केले. बंजारा समाजाला पाणीयुक्त ताकसुध्दा मिळाले नाही. आजही मोठ- मोठ्या तांड्यांना महसुलीचाही दर्जा दिला गेलेला नाही. तांड्याला रस्ता, विज, आरोग्य केंद्र, शाळा, मंगल कार्यालय, धर्मशाळा, वाचनालय, व्यायामशाळा, पोलिस चौकी, बससेवा, नळयोजना अशा मूलभूत नागरी सोयी उपलब्ध न

G H Rathod

162 Blog posts

Comments