प्रिय प्रफुल्लजी डी. चव्हाण (परम हिंदु धर्म अनुयायी)

प्रिय प्रफुल्लजी डी. चव्हाण (परम हिंदु धर्म अनुयायी)

दि. 1/1/2023 प्रिय प्रफुल्लजी डी. चव्हाण (परम हिंदु धर्म अनुयायी), यांना धाटी व धम्म अनुयायी, प्रा. ग.ह. राठोड व चि. राजपालसिंह यांचा सप्रेम नमस्कार. प्रिय प्रफुल्लजी, आपण अत्यंत प्रेमाने व स्वयंमाने आम्हा पिता पुत्रावर उधळलेले सुगंधी फुले आम्ही दोघांनी वेचली आणि आमच्या मेंदूत सुरक्षित ठेवलेली आहे. याचे कारण आपण वाहिलेली ही अति मोलाची सुगंधी फुले भविष्यात आमच्या उपयोगी पडू शकतात. तुमची आमची प्रत्यक्ष ओळख नाही. कधी एखाद्या विषयावर चर्चासुद्धा नाही. म्हणून आपल्याविषयी अधिक जाणून घेण्याची आमच्या दोघांची उत्सुकता वाढली आहे. करिता कृपया आपण आपली ओळख योग्यतासह आम्हाला कळविल्यास खूप आनंद होईल. याबरोबरच आपणास कोण कोणत्या धर्माचे परिपूर्ण ज्ञान आहे, हे देखील कळवावे. आपण स्वत:ला हिंदू मानता. तेव्हा आपण मागील किती पिढ्यांपासून हिंदुत्वाला मानता, हिंदू धर्माचा खरा इतिहास काय आहे, या हिंदू धर्मामुळे आपले आणि आपल्या समाजाचे कोण-कोणते फायदे व तोटे झालेत हे देखील कळविण्याची तसदी द्यावी. या शिवाय हिंदू धर्म, धाटी आणि धम्म याचा आपणास तुलनात्मक अभ्यास आहे की नाही, असल्यास या तिन्हीमध्ये हिंदू धर्म, गोर धाटी व बुद्धांचा धम्म यामध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ कोण आहे व श्रेष्ठ व कनिष्ठतेची कारणे कोणती आहेत, हे देखील तपशीलवार द्यावे. याशिवाय बामसेफने आणि धम्माने आपले किती घोडे चोरलेत आणि त्यामुळे आपले कोणते नुकसान झाले हे देखील कळवावे. या बरोबरच हिंदू धर्माने तुम्हाला आणि समाजाला काय काय दिलेले आहे व सर्वांचे कोणते भले झाले याबद्दल कळविल्यास फार मोठे उपकार होतील. गोर बंजारा समाज 1947 पूर्वी गांव शहरापासून दूर जंगलात का राहत होता व समाज पूर्ण अशिक्षित का होता. 1947 नंतर तुरळक गोर समाज गाव शहरात का राहू लागला व त्याचे कोणते परिणाम आज दिसून येत आहे, हे देखील सविस्तर कळवावे. आजचे दिवस तुम्हाला कोणामुळे मिळाले याचाही खुलासा करावा. भारताचे संविधान कोणी लिहिले व संविधानाचा आधार किंवा गाभा तत्त्वाबाबतही सविस्तर लिहावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सवर्ण, आदिवासी (सर्व भटके विमुक्तांसाठी), इतर मागास, अल्पसंख्याकांसाठी कायदे बनविलेले आहे. आदिवासी (एस.टी. साठी) कलम 342/366/ व 244 (अनुसूची 5 व 6 नुसार) सर्वांगीण विकासाची तरतूद केलेली आहे. गोर समाजाला एस.टी. सूचीत येण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी व आदरणीय नायक बापुच्या माध्यमाने आवाहन केले होते. परंतु महाराष्ट्राच्या गोर समाजाने नायक बापु व बाबासाहेबांचे आवाहन नाकारले. वेळ गेल्यावर शहाणे होऊन एस.टी प्रवर्गासाठी संघर्ष करीत आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण असून या बाबतीत नायक बापु व डॉ. बाबासाहेबांच्या नावाने खडे फोडत राहणे हे मूर्खपणाचे द्योतक आहे. इतर मागासाची जनगणना इंग्रजांच्या काळात झाली नसतानाही, बाबासाहेबांनी 340 कलमाद्वारे या समुहाला न्याय दिलेला आहे. शत्रु वरील कलमे अमलात आणु लागलेला नाही व तुम्ही सर्व मागास हक्कांसाठी सर्वजण संयुक्तपणे संघर्ष करीत नाही. हा दोष सर्वांचा आहे. नायक बापु किंवा बाबासाहेब तुमच्या आमच्या नाकर्तेपणाला जबाबदार नाही. उठसुठ बाबासाहेबांना दोष देणे हा कृतघ्नपणा आहे. हिंदू धर्म हा दुर्गंधी व किड्यांनी भरलेली नाली असून या नालीमध्ये गोर समाज आनंदाने राहू इच्छितो. याचा अर्थ हिंदू धर्मात राहु इच्छिणार्‍या गोर समाजाला हिंदू धर्माचे अमानवी वर्णवादी तत्त्वज्ञानाचे व त्याच्या आजपर्यंतच्या दुष्परिणामांचे ज्ञानच नाही. हिंदू धर्म ही अमानवी, शोषक विचारधारा आहे. सत्यधर्माचा अंश यामध्ये तीळमात्र नाही. हिंदू धर्म जर मानवी व चांगला असता तर तो विनासायास जगभर पसरला असता. ज्या बौद्ध धम्माचा तुम्ही द्वेष करता धम्म हा जगभर का पसरला या बाबत तुम्ही का विचार करीत नाही. हिंदू धर्मात जे दोष आहेत, अमानवियता आहे. शोषण, फसवणूक, निरर्थक कर्मकांड, भोंदूगिरी, विकृती, विनाश आहे. याच्या तुलनेत बौद्ध धम्मात दहा टक्के जरी दोष विकृती द्वेषींनी सिद्ध केली तर मी द्वेषीची माफी मागून त्यांचा जाहीर सत्कार व ऐपतीप्रमाणे पुरस्कार देण्यास तयार आहे. धम्म विचारधारा हा निर्मळ पाण्याचा झरा आहे. सदर निर्मळ झर्‍याचे, वाहत्या प्रवाहाचे पाणी प्याल्याने कोणीही आजारी पडत नाही, शोषण, फसवणूक होत नाही. हिंदू मंदिर आणि तीर्थक्षेत्रांवर जो गलिच्छ प्रकार चालु आहे. हा प्रकार तुम्हाला बुद्धविहारात सापडणार नाही. विहारातील भिक्खू हे फक्त समाजप्रबोधनाचे व जागृतीचे काम करतात. हिंदूधर्मीय भोंदू, परोपजीवी साधू-संताप्रमाणे शोषण व फसवणुकीचे, लुटीचे धंदे, राजकारण, अर्थकारण, फुटपाडीचे धंदे व हिंदू धर्माची गुलामी करीत नाही. बौद्ध धम्म विचारधारा, तत्त्वज्ञान आणि सिद्धांतसुद्धा गोरधाटी समान मानवतावदी, मूर्तीपूजा आणि कर्मकांडविरोधी आहे. समतावादी, सत्यवादी, विज्ञानवादी आणि कल्याणकारी, सर्जनशील, स्त्री महात्म्यवादी, भाग्यावर, देवावर विश्‍वास न ठेवणारा, स्वर्ग-नरक वगैरेची भीती न दाखविणारा असल्यामुळे आम्ही धम्म विचारधारेचा आदर, सन्मान करतो. मी कोणाच्याही निरर्थक बडबडीला उत्तर देत नसतो. माझ्या विचारधारेवर कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधून शंकेचे समाधान करून घ्यावे. उगीचच चिखलफेक करून मोठेपणा घेऊ नये व बदनाम करू नये. कारण अशा मानसिक, बौद्धिक गुलामांना लिखित उत्तर देण्यास माझ्याकडे वेळ नसतो. तेव्हा विनंती आहे की, माझ्या विचारावर ज्यांना आक्षेप आहे, त्यांनी थेट दूरध्वनीवरुन अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. ज्यांना जिकडे जायचे आहे, त्यांनी तिकडे खुशाल जावे. परंतु स्वार्थासाठी समाजाचे भविष्य धोक्यात आणू नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. धम्म, धाटी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, वर्णविचार, बुद्ध, बौद्ध, बौद्धत्व वगैरेबाबत शंका समाधानासाठी प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क करू शकता. जय भारत - जय संविधान प्रा. ग.ह. राठोड टिप - हिंदू बनने म्हणजे आदिवासींनी (गोर समाजाने) आदिवासींचे सर्व घटनात्मक अधिकार त्याग करणे होय. भाजप आणि आर.एस.एस. ने आदिवासींचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन मनुस्मृतीचा कायदा लावून गुलाम बनविण्याचा पक्का कट रचलेला आहे, हे कृपया समजून घेण्याचे करावे.

G H Rathod

162 Blog posts

Comments