खरा गोरमाटी कसा असावा अथवा नसावा

खरा गोरमाटी कसा असावा अथवा नसावा

1) खरा गोरमाटी क्रांतीवीर सेवालाल बापुच्या पाच पाराचा पालनकर्ता असावा. 2) खरा गोरमाटी मा. वसंतरावजी नायक यांच्या समाजात, धर्म न मानणारा, माणसं जोडणारा, शेतकरी, कामगार, वंचितांच्या हितचिंतक सर्वांना सोबत घेवून चालणारा, परिवर्तनवादी, विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर माणणारा असावा. 3) गोरमाटीह समाजात, घरात गोरबोली बोलणारा, तांड्याला भेटी देऊन गोर समाजाला चांगली दिशा देणारा व शत्रुंची ओळख करुन देणारा असावा. 4) निवडणूकीत गोर अथवा बहुजन नायक उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढविणारा, विकाऊ, समाजासोबत बेईमानी, घात करणारा गोरमाटी नसावा. 5) आर.एस.एस., भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट या जातीवादी धर्मवादी पक्षांना कळत नकळत मदत करणारा गोरमाटी चुकूनही नसावा. 6) विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना माणणारा , परंतु तथागत भगवान बुद्धाचा द्वेष करणारा खरा गोरमाटी नव्हे. 7) शेटजी,भटजी, लाटजीचे कपट कारस्थान न ओळखणारा व गो समाजाचा खरा इतिहास न जाणणारा खरो गोरमाटी असूच शकत नाही. 8) मुर्तीपुजा करणारा मंदिर क्षेत्रनिर्माता गोरमाटी गोर गुरु सेवालाल बापुंचा शत्रु व नकली, विश्‍वासघातकी गोरमाटी समाजावा. 9) ब्राह्मणांच्या कथनाप्रमाणे वागणारा खरा गोरमाटी असूच शकत नाही. 10) भिख मागणारा महिलांवर अन्याय करणारा, खरा गोरमाटी नाही. 11) परिस्थिती, काळ आणि वेळेनुसार परिवर्तन घडविणारा खरा गोरमाटी समजावा. 12) पक्षपात न करता न्याय देणारा अथवा वागणारा खरा गोरमाटी मानावा. 13) संकट काळातही हिंमत न हारता संघर्ष करीता राहणारा गोरमाटी मानावा. 14) शासन, समाज,संरक्षण व्यवस्था, पारदर्शक ठेवणारा गोरमाटी मानावा. 15) पशुपालन,शेती,व्यापार,कारागिरी, शिल्पकारी, बुध्द,नृत्य,गायक,अलंकार भडक वस्त्रे, शिकार, समता चाहता गोरमाटी समजावा. 16) विधवा स्त्रीला इच्छेप्रमाणे पुर्नविवाहास मान्यता देणारा खरा गोरमाटी समजावा. 17) प्रकृती, निसर्ग,पशु,वृक्ष,पुर्वज, वंदन(पूजक नव्हे) गोरमाटी समाजावा 18) विश्‍वव्यापार व जगभर संबंध ठेवणारा भटकणारा समाज गोरमाटी समजावा. 19) प्रत्येक तांड्यातील/नायक पंचायतला माणणारा(जातपंचायत नव्हे) गोर मानावा. 20) शोषक सावकार व शासकीय न्यायालयाचा विरोध करणारा गोरमाटी मानावा. 21) गरीबांची लुट अथवा शोषण करणारा अन्याय अत्याचार करणारा गोरमाटी नसावा. गोरमाटी या शब्दाचा खरा अर्थ माझ्या विचाराने विचारी,चिंतक सत्यवादी, कल्याणवादी, सर्जन, समता, न्याय, स्वातंत्र्य, मानवतावादी, विधायकतावादी, मेहनती, स्वावलंबी, स्वाभिमानी, उत्तम संघटक, संघशृक, भ्रमणशील, मनमौजी, गायन,नृत्य,श्रंगार अलंकार, निसर्ग, पशु,शेती,व्यापार, मातृत व लोकशाही प्रेमी आहे. सिंधुकाली संस्कृतीचा व संस्कृतीच्या निर्मात्यांचा अभ्यास व चिंतन केल्यानंतर मी गोरमाटी, गोर मननणीया, गोर माणस यांच्या बाबात वरील सर्व निष्कर्ष काढले आहे. माझे हे निष्कर्ष चूक असतीलही परंतु या गोर समुहाच्या एकूण सर्व गुण व स्वभाव संस्कृती, जीवनशैली, वैशिष्ट्य यावरुन हे सर्व निष्कर्ष लादलेले आहेत. या निष्कर्षांना वगळून जो वागतो, तो गोर मानावा. जयभारत- जय संविधान प्राचार्य ग.ह.राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments