हिंदु धर्म हा बहुजनांचा धर्म आहे का?

हिंदु धर्म हा बहुजनांचा धर्म आहे का?

आर्य, वैदिक, सनातनी धर्मााचा समर्थन करणारा ब्राह्मण वर्ग हा विदेशातुन म्हणजे युरोप खंडाच्या अनेक देशातून इ.स. पुर्व 3250 ते 1500 च्या काळात भारतात आलेला आहे, असे बहुसंख्य इतिहासकारांचे म्हणने आहे. म्हणजे आर्य आजचा ब्राह्मण वर्गाला भारतात येऊन सात सव्वा सात हजार वर्षे झालेली आहेत. पण भारतात आर्य येण्यापूर्वीपासून हजारो वर्षापुर्वी भारतात राहणारा जो वर्ग होता, तो म्हणजे वर्तमान काळाचा आदिवासी, भटका, विमुक्त,गुन्हेगार, इतर मागास वर्ग आणि अनुसूचित जाती, जमातीचा हा देश आहे. वरील बहुजन समाज हा इसवीसन पूर्वीपासून म्हणजे जवळ जवळ आजपासून आठ ते नऊ हजार वर्षापासून राहत आलेला आहे. म्हणजे आर्य भारतात येण्यापूर्वी 6-7 हजार वर्षापासून राहत आहे. म्हणून तो भारत देशाचा मालक, राजा आणि भारताचा मुळ निवासी आहे. आर्य भारतात 4-5 हजार वर्षानंतर आलेला आहे असून तो भारतीय मुळनिवासी लोकांचा शरणार्थी आणि भिक्ष्ाूक होता. त्यांना मुळ निवासींनी धन- संपत्ती न कमविता भिक्षा मागून खाण्याच्या अटीवर शरणार्थी आणि भिक्ष्ाुक म्हणून आश्रय दिलेला होता. एका अर्थाने ते मुळनिवासी वर्गाचे गुलामच होते. त्या काळात त्यांच्या धर्माला आर्य, वैदिक अथवा सनातन धर्म नावाने संबोधले जात होते. देशात जनता मुळनिवासी सुखी व शांत जीवन जगत होती. आर्य लोकांनी जेव्हा भारतात प्रवेश केला, त्यावेळी मात्र ते अत्यंत मागासलेले म्हणजे स्वैराचारी, असभ्य, भटके, शेती न करणारे, मांसाहारी, कंदमुळ, फळे, फुले खाऊन जगणारे, लुटारु, डाकेखोराच्या टोळ्यांच्या स्वरुपात राहत होते. मुळनिवासींना लुटणे, गुरेढोरे आणि स्त्रिया पळविणे, उचलून नेणे, उपभोग घेणे, पुरुष वर्गाचा संहार करणे , उघड्यावर, गुहेत, झोपड्यात राहणे, जंगलात लपून राहणे असे त्यांचे जीवन होते. मुळ निवासी भारतीयांची घरे जाळणे, शेती लुटणे, जाळणे, पाण्याचे बंधारे फोडणे असे अमानवी दुष्ट कामे ते करीत होते. मुळ निवासी ( आजचा बहुजन वर्ग) आणि या आर्यामध्ये दररोज लढाया होत होत्या. कालांतराने समझोता झाला आणि आर्यांनी भिक्षा मागून जगावे असे ठरले. कालांतराने बेटी व्यवहारही सुरु झाले. परस्परांचे व्याही बनले. पुढे आर्यांनी त्यांच्या गोर्‍या विषकन्या मोठ्या प्रमाणात मुळनिवासी अनार्य राजा महाराजा आणि राजपुत्राच्या घरात घुसविल्या, काही भेटीच्या स्वरुपात दान केल्या. राजा महाराजांमध्ये फुट पाडली. राजा महाराजा भोगी जीवनात गुंग असतांना व त्यांच्यातील फुटीचा फायदा घेऊन, खोट्या दोस्ती करुन त्यांच्याशी लढाया, युध्द करुन हरविले आणि त्यांची सत्ता स्थापन केली. पुढे चालून कायदे, धर्मग्रंथ, धर्मगुरु, धर्मक्षेत्र बनवून बहुुजन मुळनिवासी, अनार्यांना त्यांनी गुलाम बनविले व राज्याचा उपभोग घेऊन कर्मकांडे निर्माण करुन दानदक्षिणाच्या माध्यमानी बसून खाण्याची व्यवस्था निर्माण केली, ती व्यवस्था आजही टिकून आहे. या देशाचा मुळ मालक, राजा बहुजन समाज आजही रात्र- दिवस गुलामाप्रमाणे कष्ट करुन आर्य ब्राह्मणांना बसवून खाऊ घालुन त्यांचे पोषण करीत आहे आणि स्वत:चे शोषण करवून घेत आहे. मानव संस्कृतीचा असा हा क्रमश: इतिहास आहे. 2) वेद, उपनिषद, पुराण, श्रुती, स्मृती व इतर ग्रंथाची निर्मिती- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे, की ज्या समाजाला आपला प्राचीन इतिहास माहित नाही, तो समाज इतिहास घडवू अथवा निर्माण करु शकत नाही. इतिहास अशा बेफिकीर समाजाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, किंवा असा बेफिकीर समाज बहादूर, पराक्रमी असला तरी दुसर्‍या शासनकर्ता समाजाचा गुलाम बनल्याशिवाय राहत नाही, बहुजन समाजाने भारताचा इतिहास घडविला आहे. पण त्याला आपल्या पराक्रमी आणि आदर्श इतिहासाची विस्मृति झाल्यामुळे तो वर्तमानकाळी पुरुषार्थहीन आणि बौद्धिक, मानसिक गुलाम बनून कष्टाचे हलाखीचे आणि पशुचे जीवन जगत आहेत. कारण तो आपला आर्य आगमनापूर्वीचा इतिहास विसरुन गेलेला आहे. मूलनिवासी बहुजन अनार्य आर्याबरोबर झालेल्या लढाईत पराभूत झाल्यानंतर आर्य भारताचे राजे, शासक बनले, आर्य वस्तुत: अनाडी होते, पण सत्ता हातात आल्यानंतर त्यांनी मूलनिवासी बहुजनांनीच लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण आणि बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञान सुसंगत, आदर्श मानवतावादी वेदग्रंथामध्ये प्रचंड हेरफेर, बदल करुन सर्व वेदग्रंथ त्यांच्या हिताचे बनवले, यानंतर त्यांनी पुन्हा पुराण,उपनिषद, श्रुती, स्मृती, गीता, भागवत, ब्राह्मणग्रंथ, धर्मसुत्रे, रामायण, महाभारत वगैरे ग्रंथ लिहीले आणि या ग्रंथांमध्ये ब्राह्मणवर्ग हा सर्वश्रेष्ठ वर्ग ठरवून कष्ट न करता बसून विलासी जीवन जगता यावे म्हणून अनेक देवी देवतांची आणि कर्मकांडाची व्यवस्था करुन घेतली. आज देव धर्मभोळ्या लोकांना अंधश्रद्ध निरक्षर बहुजनांना देवधर्मांध धनवानांना कर्मकांडाकडे वळवून मंदिर क्षेत्रस्थानी अमर्याद धनसंपत्ती जमवून हा मनुवादी जनसमुह भोगवादी विलासी जीवन जगत आहे. हेच आजचे वास्तव आहे. अंधश्रध्दा पसरविण्यासाठी आज मनुवाद्यांनी लाखोनीं लुटारु. मंदिरे, परोपजीवी साधुसंत, साध्वी तयार करुन आणि विश्‍वहिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निमित्ती करुन संपूर्ण बहुजन समाजाला दिशाहीन बनवून शोषणाचे व शासन करण्याचे कार्य चालू आहे. डॉ. आ.ह. साळुंखेच्या कथनाप्रमाणे आज धड बहुजनांचे आणि डोके(मेंदू) मात्र ब्राह्मणांचा बन्यामुळे बहुजन समाज ब्राह्मणांच्या गुलामीतून बाहेर पडण्यास बिलकूल तयार नाही, कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे बहुजनच बहुजनांचा शत्रु आणि देवा धर्माच्या नावाने शोषक बनल्यामुळे बहुजनांची हालत आज मेंढपाळाच्या कुत्र्यासारखी म्हणजे न मेंढ्यांपाशी न लेंड्यांपाशी अशी झालेली दिसून येत आहे. यालाच म्हणतात धोबीका कुत्ता न घरका न घाटका. मित्रांनो मनुवादींनी तयार केलेल्या वरील अनेक धर्मग्रंथांपैकी मनुस्मृती हा धर्मग्रंथ अत्यंत विषमतवादी आणि विषारी ग्रंथ आहे हा ग्रंथ ज्या बहुजनांने वाचलेला नाही त्याला खरा अमानवी हिंदू धर्म कधीही समजनार नाही, असे माझे ठाम मत आहे हा ग्रंथ न वाचनारा माणूस बैल समजावा. आजचे वेद ग्रंथ हे प्राचीन काळात बहुजनांनी लिहिलेले बुद्धीप्रामाण्वादी वेदग्रंथ नसून ब्राह्मणांनी त्याच्या फायद्यासाठी बदल,फेरफार, करुन लिहिलेले उत्तरकालीन ब्राह्मणी वेदग्रंथ आहेत. आर्य ब्राह्मणांनी वरील जे जे ग्रंथ लिहिलेले आहे. त्यापैकी मनुस्मृती नावाचा ग्रंथ हा ब्राह्मणांचा संविधानासारखा कायदाग्रंथ असून हा ग्रंथ अतिशय अमानवी, शोषणवादी, गुलामी समर्थक, बहुजनांसाठी जहाल असा विषारी ग्रंथ आहे. या ग्रंथात बहुजन समाजाचा शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, तांत्रिक, संरक्षणात्मक अशा कोणत्याही प्रकारच्या हक्क अधिकारांचे संरक्षण होणार नाही अशा प्रकारचे अतिशय कठोर, निर्दय, अमानवी नियम,कायदे बनविण्यात आलेले आहेत. हे मनुवादी कायदे वाचल्यावर कोणत्याही बहुजनाचे तो आज स्वत:ला हिंदू व हिंदूधर्मी समजत असल्यास रक्त खवळल्याशिवाय आणि मनुस्मृती ग्रंथ जाळल्याशिवाय राणार नाही याची मला खात्री आहे. विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली होती आणि भारतीय संविधान बाबांनी का व कोणासाठी लिहिले हे कळून येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे केवढे हितचिंतक होते व त्यांनी बहुजनांसाठी केवढा त्याग केलेला आहे हे कळून येईल. मनु संस्कृतीचे म्हणजे ब्राह्मणी धर्माने, आजच्या हिंदू धर्माने हिंदूत्वाने बहुजनांना काहीही दिलेले नाही. जे जे बहुजनांकडे विशेष होते ते सर्व मनुशाहीने नष्ट करुन बहुजनांना असहनीय यातना, पशुमय जीवन आणि गुलामीचे जीवन दिलेले आहे. मनुस्मृतीने जाती.धर्म,देव-देवी, कर्मकांड तीर्थक्षेत्रे निर्माण करुन देशाचा सत्यानाश केलेला आहे. बहुजनांना जे काही मिळालेले आहे ते भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानामुळे मिळालेले असून संविधान नष्ट होताच स्वातंत्र्यापूर्वीच्या मनुशाहीचा अंमल सुरु होणार आहे. 1991 पासूनच मनुशाहीच्या पायाभरणीचे काम खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण माध्यामाने सुरु झालेले आहे. 2019 नंतर या इमारतीवर कळस चढविण्यात येणार आहे. सध्या बहुजनांची सर्व क्षेत्रात कोेंंडी करण्याचे काम भुमिगतरित्या जोरात चालू आहे. तेथून पुढे सर्व बहुजनांना मनुशाहीचे फळ भोगावे लागणार आहे. 4) आता हिंदु धर्म समर्थकांसाठी हिंदु धर्मशास्त्र मनुस्मृतीमध्ये प्राचीन काळी बहुजन समाजासाठी कोणकोणते कायदे बनविले होते, या कायद्याची थोडक्यात सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. मनुस्मृती हा ग्रंथ वस्तुत: हिंदुचा (आर्य ब्राह्मणांचा) कायद्याचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ मानला जातो. या मनुस्मृती धर्मग्रंथाच्या नियमाने जो बहुजन वागत नव्हता, त्याच्यासाठी खालील दंड व शिक्षेची व्यवस्था केलेली होती. या हिंदुच्या (ब्राह्मणाच्या) धर्मग्रंथानी म्हणजेच मनुस्मृतीने कायदा बनवून बहुजनावर खालील बंधने लादली होती. मनुस्मृतीमध्ये संपूर्ण मानव समाजाचे चार विभागात (चार वर्णात) विभागणी केलेली होती.1) ब्राह्मण 2) क्षत्रिय 3) वैश्य 4) शुद्र. या चार वर्णात ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरविण्यात आला होता. या ब्राह्मणांनी कोणताही गंभीर गुन्हा केला तरी त्याला कोणत्याही प्रकारचा दंड अथवा शिक्षा केली जात नव्हती. तो सर्व वर्णाचा गुरु मानला जात होता. परंतु शुद्राचा गुरु नव्हता. क्षत्रिय, वैश्यांना सुध्दा ब्राह्मण शुद्र, अस्पृश्य मानत होता. तीच परिस्थिती आदिवासी, भटके आणि विमुक्तासाठी होती. कोणत्याही शुद्रांना शिक्षण घेण्याचा, लिहिण्याचा वाचनाचा, वेद व इतर ग्रंथ ऐकण्याचा सुध्दा अधिकार नव्हता. शिक्षण घेणार्‍याचे मुंडके उडविले जात होते, लिहिणार्‍याचे हात तोडले जात होते. वाचणार्‍याची जीभ कापली जात होती व ऐकणार्‍याच्या कानात सळई गरम करुन खुपसली जात होती. शुद्रांना चांगले कपडे वापरण्याचा, पायात चपला वापरण्याचा, डोक्यावर मुकुट घालण्याचा, गाड्या, घोड्यावर बसण्याचा, मिरवणुका काढण्याचा, घरे बांधण्याचा, रंगरंगोटी करण्याचा, छत्री वापरण्याचा , तांबे पितळाची भांडी वापरण्याचा, उंच आसनावर बसण्याचा, गादी पलंगावर झोपण्याचा, मुर्दे जाळण्यचा, मल विसर्जनानंतर पाणी वापरण्याचा, जमीनदार होण्याचा, धनसंपत्ती बाळगण्याचा, जाणवे घालण्याचा, मिष्टान्न व पौष्टीक आहार खाऊ देत नव्हते. मोलमजुरी मिळू देत नव्हते. एका घरच्या नोकराला दुसर्‍या घरी कामाला जाऊ देत नव्हते. नोकर आजारी असला तरी सुटी देत नव्हते. सार्वजनिक ठिकाणी येऊ देत नव्हते, विहीर, नद्या,तळे वगैरे ठिकाणचे पाणी घेऊ देत नव्हते. कोणाच्याही शेतातून, मालकी जमीनीतून शुद्रांना गुरेढोरे नेवू देत नव्हते. सार्वजनिक रस्त्याने चालू देत नव्हते. अंगावर सावली सुध्दा पडू देत नव्हते.रस्त्याने पदचिन्ह राहू नये म्हणून कमरेला झाडू बांधण्याची सक्ती व रस्त्यावर थुंकी पडू नये म्हणून गळ्यात गाडगे बांधावे लागत होते. शुद्राची ओळख पटावी म्हणून काळा दोरा बांधावा लागत होता. पक्की घरे बांधु देत नव्हते, हॉटेल, धर्मशाळा, मंदिरात प्रवेश करु देत नव्हते, तोंड लावून पाणी पिऊ देत नव्हते, वरुन पाणी प्यावे लागत होते. गांवात प्रवेश घेऊ देत नव्हते, गावाबाहेर सुध्दा तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस थांबू देत नव्हते. गावात तीन दिवसासाठी थांबत असतांना सुध्दा व गाव सोडतांना सुध्दा परवानगी घ्यावी लागत होती. जवळच्या सर्व साधनांची नोंद करुन द्यावी लागत होती. साधनात वाढ झाली तर चोरीचा ठपका लावला जात होता.लहान मुले मुली, वृध्द म्हतारे, म्हतारी वगैरे सर्वांना रात्री 11 वाजता व सकाळी 4 वा. पोलिस पाटलाकडे हजेरी लावावी लागत होती. धन सापडल्यास हिसकावून घेण्यात येत होते. चोरी करायला लावून चोरीचा माल घेऊन टाकत होते व गुन्हेगार ठरवून दंड दिला जात होता. संरक्षणासाठी शस्त्रे धारण करु देत नव्हते. सैन्यात प्रवेश देत नव्हते. गुन्हा घडल्यास नाजूक स्थळी मिरची भरली जात होती. ओनवे करुन पाठीवर बसायला लावत होते. कोलदांडा घालून, दोरीने आवळून पाणी ओतत होते. थंड पाण्यात, उन्हात उभे करीत होते, कोणत्याही बाईची इज्जत उघड्यावर सर्वांसमोर, लेकरांसमोर सुध्दा लुटत होते.उलटे टांगून धूर देत होते. सुळावर टांगत होते, तप्त धातु कान-नाक तोंडात ओतत होते. कडेलोट करीत होते. विरोधात बोलू देत नव्हते विरोधात साक्ष देऊ देत नव्हते. डुकरे, कुत्रे, मांजरे, गाढवाशिवाय इतर पशू ठेवू देत नव्हते. किंमती दागिने घालु देत नव्हते, उद्योग धंदा, व्यापार स्वत:ची शेती करु देत नव्हते, गुन्हयाबद्दल चाबकाने अंग फोडून काढीत होते. जोहार न घातल्यास मृत ढोरे न ओढल्यास, लाकडे न फोडल्यास, झाडझुड न केल्यास सुद्धा मनात येईल ती शिक्षा हिंदू धर्मी लोक सर्व शुद्रांना देत होते. तेव्हा असा हा निर्दय क्रुर अमानवी पक्षपाती धर्म बहुजनांनी शुद्रांनी आपला मानावा ही किती निर्लज्जपणाची, अडाणीपणाची व मूर्खपणाची बाब आहे, ही विचारणीय बाब आहे. डॉ. बाबासाहेबांनी वरील कायद्याच्या मनुस्मृती ग्रंथाची होळी केली नसती, संविधान निर्माण केले नसते तर आज पर्यंत हिंदू धर्म माननार्‍या शुद्रांना वरील सर्व मनुस्मृती कायद्याची फळे भोगावी लागली असती. आज हिंदू धर्मातील शुद्र लोक कोणत्या धर्माचे गुणगाण करीत आहेत. आणि कोणत्या धर्माची निंदा करीत आहे हे अविचारी हिंदू भारतीयांना समजत नसले तरी जगाचे डोळे केवळ आंबेडकरवादाकडे लागलेले आहे. हे कोणाला समजून देण्याची गरज नाही. आता देशात लवकरच हिंदू, हिंदूत्व, हिंदूराष्ट्राची स्थापना आणि मनुस्मृती आणि गीताग्रंथाचे नियम सर्व शुद्र हिंदूंना लागू होणार आहेत. जेव्हा या कायद्याचा उपभोग घेण्यासाठी सर्व हिंदू शुद्रांनी तयार राहावे. एवढीच अपेक्षा आहे. शेवटी गर्वसे कहो हम हिंदू हैङ्ख ही घोषणा देत रहा व मनुस्मृती ग्रंथाचे गीता ग्रंथाचे कायदे लवकर अंमलात आणा असे निवेदन मोदीजींना लवकर पाठविण्याचे करा. तुर्त एवढेच.. जय भारत जय जगत, जय संविधान, जयभीम प्रा.ग.ह.राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments