डॉ. बाबासाहेब आंबेडकर के मौलिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर के मौलिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर के मौलिक विचार जन्म- 14 एप्रिल 1891 भाग- 4 मृत्यू - 6 डिसेंबर 1956 1) शहाण्या माणसाला मुर्ख बनविणारा ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ होय. 2) अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांचा गांधीनी कट्टर विरोध सुडात्मक भावनेने केला. 3) धर्मांतरानंतर माझा नवा जन्म होत आहे. 4) प्रज्ञेशिवाय ज्ञान नाही. ज्ञानाशिवाय प्रज्ञा नाही. 5) गमावलेले हक्क भिक मागुन मिळत नाही. ते प्राप्त करण्याकरिता तळहातांवर शिर घेऊन लढावे लागते. 6) खरोखर महार लोकांचा मी ऋणी आहे. 7) मला मायदेश नाही. ज्या देशात आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट वागविले जाते, तो माझा देश आणि माझा धर्म मी कसे म्हणू शकेन. 8) जो पक्ष आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि विचाराशी, तसेच सामाजिक व राजकिय तत्वाशी जमवून घेणारा असेल. अशा पक्षाशी समझौता अगर युती करावी. 9) राजकारण म्हणजे केवळ सत्ताकरण नव्हे, तर ते लोकहितकारण आहे. 10) संपूर्ण भारत मी बौध्दमय करीन. 11) माझ्या इतका धर्माचा अभ्यास करणारा मी पाहु इच्छितो. 12) मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे, तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. मनात उत्साह नसेल, तर अभ्युदयही नाही. 13) हिंदु धर्म हा नष्ट धर्म आहे, आणि ज्या धर्मान आमचा नाश केला आहे, तो हिंदु धर्म त्यांचाही नाश करील. 14) माझ्या समाजाचा उध्दार करु शकलो नाही तर विजेच्या खांबावर स्वत:ला लटकावून जीव देईन. 15) अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाची टकरा मारुन मी माझे डोके फोडून घेणार आहे. 16) पारतंत्र्यामध्ये ज्यांच्या आम्हाला बाता सहन होत नाहीत. स्वातंत्र्यामध्ये त्यांच्या आम्हाला लाथा सहन कराव्या लागतील. 17) मी जर मंत्री असतो तर नेहरुला जेलमध्ये सडविले असते.

G H Rathod

162 Blog posts

Comments