गोर बंजारा समाज हा कधीच धर्मवादी नव्हता

गोर बंजारा समाज हा कधीच धर्मवादी नव्हता

दि. 1/2/2023 गोर बंजारा समाज हा कधीच धर्मवादी नव्हता बंधू भगिनींनो, गोर बंजारा समाज हा सिंधू सभ्यता, संस्कृती, समाज, शासन, शहर, सांघिक धंदे निर्माता असून तो आजचा आर्यांचा शत्रू होता. कारण विदेशातून आलेल्या क्रूर, असभ्य, असंस्कृत, भटक्या, स्वैराचारी, परोपजीवी, लुटारू, डाकेखोर, विध्वंशक, अश्रमी आर्य ब्राह्मणांनीच सिंधू सभ्यताचा अनेक पद्धतीने विध्वंस करून ते शासक बनले होते. सिंधू संस्कृती ही आर्य आगमन पूर्व काळात जात, धर्म, देव-दैव, मूर्तीपूजामुक्त, शोषक, फसवे, निरर्थक कर्मकांडमुक्त श्रमजीवी व संघ, लोकतंत्र, मातृसत्ता प्रधान सैनिक सभ्यता होती. प्रकृती, पूर्वज, पशु, पंचतत्त्व, वृक्षवल्ली, नद्या, डोंगर, पर्वत, आकाश, वंदक संस्कृती होती. पूजक म्हणजे पूजा करणारी, दान-दक्षिणा, यज्ञयाग करणारी नव्हती. वंदन करणारी म्हणजे सन्मान, आदर करणारी, उपकार मानणारी व सत्य म्हणजे विज्ञान, बुद्धिप्रामाण्य मार्गाने चालणारी संस्कृती व संस्कृतीचे लोक होते. स्त्रीचा सर्वाधिक सन्मान व कुटुंब प्रमुख होती. प्रत्येक घरातून देश रक्षणार्थ एक सैनिक तयार केला जात होता. संस्कृती व समाज विचार, तत्त्वज्ञान, सिद्धांत प्रधान व चिंतन, मंथन, समिक्षण, मार्गदर्शन, मार्गक्रमण करणारा होता. लोेक शेती, व्यापार, पशुपालन, शिल्पकारी, गृहउद्योग करणारे स्वावलंबी, स्वाभिमानी, बहादुर, लढाऊ, विश्‍व व्यापारी, विश्‍व प्रवासी होता. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, सहकार, स्त्री सन्मान, परिवर्तन, संकरण व समन्वय, सहजीवनवादी समाज होता. नियम, शिष्टाचार, कायदा, सर्वांचे कल्याण, सर्जन निर्माण, सुख-समृद्धी, शांतता या तत्त्वांवर समाज व शासन व्यवस्था उभी होती. परंतु मध्य एशिया व उत्तर धु्रवाकडून आलेल्या क्रूर, असभ्य आर्य ब्राह्मणांनी या समृद्ध, सुखी संस्कृतीचा तोडफोड, जाळपोळ, लूटपाट, खूनखराबी, पळवा पळवी करून त्यांचे वर्चस्व स्थापन केले. हे अधर्मी म्हणजे कष्ट न करणारे लोकांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र अशी चार्तुर्वणीय व्यवस्था निर्माण केली. याच बरोबर त्यांनी मंदिर, क्षेत्रे, अनेक जाती, अनेक देव-देवी, अनेक धर्म, अनेक कर्मकांड, पूजाविधी, दान-दक्षिणा, यज्ञयाग वगैरे निर्माण करून विनाकष्ट बसून खाण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. यालाच ते सनातन म्हणजे कधी न बदलणारा. ब्राह्मणी, वैदिक, आर्य, मनुस्मृतीचा धर्म म्हणतात. बहुजनांना फसविण्यासाठी, सोबत ठेवून त्यांचे शोषण करण्यासाठी याच मनुस्मृती प्रणित धर्माला ते हिंदू म्हणून सर्व बहुजनांची फसवणूक व लूट करीत आहेत. वस्तुत: हिंदू म्हणजे सर्व बहुजनांचा अर्थात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, भटके-विमुक्त, अल्पसंख्य या सर्व लोकांचा समूह आहे, धर्म नव्हे. कारण बहुजन सिंधू संस्कृतीचे सर्व लोक हे भारताचे मूळनिवासी भारताचे शासक, मालक असून त्याचां धर्म प्राकृतिक तत्त्वाचा आहे हे मी सविस्तर वर सांगितलेले आहेच. मुगल-मुसलीमांच्या काळात सर्व बहुजन हे मुसलीम व मोगल राजाचे गुलाम, नोकर, वेठबिगार होते. या गुलाम, नोकर आणि सर्व वेठबिगारांना राजे हिंदू म्हणजे गुलाम, नोकर, वेठबिगार, गडी म्हणत होते. म्हणून हिंदू हा धर्म नसून बहुजनांना, गुलामांना दिलेले नाव, विशेषण आहे. ब्राह्मण सुद्धा बहुजनांना गुलामच मानतात. म्हणून गुलामांवर नोकर, वेठबिगार, गडी इ. वर राज करणारे ब्राह्मण भारताला व भारतातील बहुजनांना अखंड गुलामच बनवून ठेवण्याच्या उद्देशाने भारताला हिंदूराष्ट्र व हिंदूधर्म बनविण्याचा जयघोष करीत आहेत. सर्व भारतीय जर हिंदू आहे तर जातीच्या नावाने विभागणी का करण्यात आलेली आहे. ते म्हणजे ब्राह्मण वर्ग स्वत:ला हिंदूऐवजी ब्राह्मण, आर्य का म्हणवून घेतो? जाती, देव, धर्म, मंदिर, क्षेत्र व दान-दक्षिणांची, त्यांची पोषण करणारी संस्कृती त्यांना अखंड जिवंत ठेवावयाची आहे व सर्व बहुजन लुटण्यासाठी या हिंदू संस्कृतीला बांधलेले, फसलेले असल्यामुळे व बहुजन ही संस्कृती आपलीच समजत असल्याने आयते गुलाम टिकवून ठेवण्यासाठी ब्राह्मण लोक व अंधभक्त हिंदू धर्म व हिंदू राष्ट्राचा जयघोष करीत आहेत ही एक शोकांतिका असून बहुजनांचा मूर्खपणा, गुलामी आहे व बहुजनांचा धर्म हा श्रमण व प्रकृती धर्म आहे हे समजेल. तो बहुजनांसाठी कल्याण व सर्जनाचा सुखाचा दिवस ठरेल असे मला वाटते. बहुसंख्य बहुजन समाज हा इसाई व मुसलीम धर्माकडे वळलेला आहे. याचे कारण हिंदूधर्मीयांनी (ब्राह्मणांनी) केलेले अन्याय अत्याचार आणि गरिबी, असुरक्षितता आहे. संपूर्ण बहुजन समाज हा निधर्मी, धर्मविहीन होता. तो धर्म उदयाच्या, धर्म उत्पत्तीच्या आधी प्राकृतिक धर्माचे पालन करीत होता. ब्राह्मण, हिंदू, मुसलीम, इसाई, शीख, पारसी, लिंगायत वगैरे नावसुद्धा त्यांच्या कानावर नव्हते किंवा ऐकले नव्हते. पण हा समाज नंतरच्या काळात अनेक धर्मवादी राजाचा गुलाम बनला व या गुलामीमुळे या समाजाला त्या राजाच्या धर्माप्रमाणे वागावे लागले. राजाच्या धर्माचा, दबाव, संस्कार, संरक्षण, गरज, गरिबी वगैरे अनेक कारणे धर्माला बळी पडण्याची कारणे असू शकतात. जर कोणत्याच धर्माचा उगम झाला नसता तर बहुजन समाज हा धर्मनिरपेक्ष राहिला असता. तो कोणाच्या दबावाखाली आला नसता किंवा धर्मपरिवर्तनाची गरज सुद्ध पडली नसती. पण म्हण आहे की, जसा राजा तशी प्रजा असते. म्हणून ज्या राजाच्या राज्यात बहुजन समाज राहत होता, त्या राजाच्या नियमाप्रमाणे गरजेप्रमाणे बहुजनांना राहणे भाग पडले होते. पण आता गरज नसल्यास धर्म परिवर्तन ऐवजी प्राकृतिक धर्माचे, नियमांचे पालन करून धर्मनिरपेक्ष बनून राहणे हे सर्वोत्तम आहे. बौद्ध धर्म, शीख धर्म, सत्यधर्म, लिंगायत धर्म, कबीर धर्म, धाटी धर्म, शिवधर्म, रविदास धर्म हे सर्व धर्म अथवा पंथ नसून मानवी, समतावादी, कल्याण व सर्जनकारी विचारधारा, तत्त्वज्ञान व जीवनशैली आहे. ही जीवनशैली अन्यायी नसून समतामूलक असल्यामुळे या विचारधारेच्या मार्गाने चालणे अयोग्य नाही. कारण या सर्व विचारधारा या मानवी आहेत. दीक्षा न घेता या विचारधारांचा अवलंब करून जीवन जगणे सर्वोत्तम आहे. कारण या विचारधारात विकृती, अन्याय, अत्याचार, निरर्थक कर्मकांड, शोषण, इतर धर्मापेक्षा फार कमी व सहनीय आहेत. तेव्हा बहुजनांनी कोणत्याही धर्मात न राहता अथवा दीक्षा न घेता वरील धर्मनिरपेक्ष विचारधारांचा आधार घेऊन, स्वीकार करून धर्मनिरपेक्ष जीवन जगण्यास कोणाचीही हरकत नसावी. जय भारत - जय संविधान - जय जगत प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments