बौध्द धम्म पदे विचार व आचारसंहिता

बौध्द धम्म पदे विचार व आचारसंहिता

बौध्द धम्म पदे विचार व आचारसंहिता बौध्द तत्वज्ञानात बौध्द धम्म पदे, थेर गाथा आणि थेरी गाथा, ही तीन ग्रंथे बुध्द घोषाचार्यांच्या विचारानुसार ग्रंथ संकल्पनेअंतर्गत समाविष्ट केली जाणारी ग्रंथे आहेत. गाथा आणि ग्रंथ याबाबत ग्रंथाअंतर्गत गाथा अथवा गाथाअंतर्गत अनेक ग्रंथे येतात याबाबत एकवाक्यता आढळून येत नाही. सुतपिठकात जी वचने आली आहेत त्यांना उदान असे म्हणतात. खुदकणिक याच्या यादीत उदानाचा उल्लेख आलेला आहे. सम्राट अशोक काळात किती उदाणे अस्तित्वात होती. याबाबत देखील विचारवंतात मतभिन्नता आढळून येते. परंतू त्यात कालमानानुसार भरच पडत गेली. याबाबत मात्र दुमत असल्याचे काही कारण नाही. इतिवृत्तकामध्ये 112 प्रकरणांचे संकलन आहे. ती सम्राट अशोक कालीन होती. व त्यानंतर त्यामध्ये देखील भर पडत गेलेली आहे. सांची आणि बर्हुत या स्तुपाच्या आजुबाजूला कोरल्या गेलेल्या सुप्रसिध्द जातक कथा याचीही संख्या मोठी दिसून येते. त्रिपिटके ही बौध्दतत्वज्ञानाची कोनशिला आहेत. त्यामध्ये देखील शेकडो ग्रंथाचा समावेश होतो. आचार्य रजनिशांनी (ओशो) त्यात टाकलेली भर अथवा कबीर आणि गौतम बुध्द याबाबत केलेली तुलना प्राचीन बौध्द तत्वज्ञान व अर्वाचिन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द अँड हीज धम्मा’, या ग्रंथात विज्ञानवादावर आधारित असलेला शुध्द स्वरुपातील बुध्दाचा धम्म एकंदरीत ग्रंथसंपदेची मालिका मोठी आहे. धम्मपदे या ग्रंथ मालिकेतील गौतम बुध्दाने वेळोवेळी दिलेल्या प्रवचनांचा संग्रह गाथा अथवा ग्रंथ होय. जो मौखीक स्वरुपात पिढी दर पिढी एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे, एका समुह व समाजाकडून दुसर्‍या समाजाकडे प्रवाहित झालेली वचने व उपदेशाचा भाग आहे. बौध्द तत्वज्ञान मुख्यत: पाली भाषेतील त्रिपिटक अथवा त्रिपिटक ग्रंथ समुदाय वाड्:मयीन प्रकारात मोडणारी ग्रंथ विचारधारा होय. सुतपिटकात गौतम बुध्दाच्या आणि प्रमुख शिष्यांच्या उपदेशाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला प्रकार आहे. विनयपिटकात भिक्षूकांच्या वर्तनावर आधारीत निर्माण करण्यात आलेला आचार विचार व सदाचार संहितेवर आधारीत असलेला टिकास्त्र संग्रह संहिता म्हटले तरी वावगे ठरु नये. अभिधम्मपिटकात सात प्रकरणाच्या साहाय्याने बुध्दाच्या उपदेशाचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सूतपिटकात पाच विभागात एकूण 34 सुतांचा संग्रह करण्यात आलेला आहे. खुदकनिकाय म्हणजे लहाण-लहाण प्रकारात संग्रहीत करण्यात आलेला ग्रंथ प्रकार होय. ज्यामध्ये एकूण 15 प्रकरणे आढळून येतात. त्यापैकी खुदकपाठ, धम्मपद, उदाण, इतिवुत्तक, सुत्तानिपात, विमानवसू, पेतवत्थु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस, पटिसंभिदामग्ग, अपदाण, बुध्दवंस व चरियापिटक हा सुतापिटकाचा विस्तार होय. तथा विनयपिटकातील पारमिका पाचित्तियादि, महावग, चुल्लवग व परिपाठ असे विविध पाच भागात त्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्यापैकी धम्मपदे हा प्रकार असल्याचे आढळून येते. ‘धम्मपदे’ मराठी अनुवादकार आयुष्यमान कृष्णा साळवे यांनी विनम्रपणे प्रकाशित केलेल्या ग्रंथावर स्वत:चा मालकी हक्क न सांगता धम्मकार्याचा केलेला प्रपंच हा सर्वांसाठी अनुकरणीय आहे. त्याचे स्वागतम व कौतुकच केले पाहिजे. ‘धम्मपदे’ बौध्द साहित्य प्रकारातील लोकप्रिय व तथा सर्वोत्कृष्ट विचारसंहिता व उपदेश संहिता म्हटली तरी वावगे ठरु नये. गौतम बुध्दाने नैतिक पातळीवर केलेले उपदेश जनसामान्यांसाठी राजा व रंकासाठी दैनंदिन जीवनात संग्रही करुन आचरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली वचने होत. गौतम बुध्दाने ‘बुध्द धम्माची’ स्थापना करीत असतांना मनुष्याच्या जीवनकाळात आचरणाच्या पातळीवरा पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, देव-दानव, धर्म-कर्म या कपोलकल्पीत कल्पनाविलासाच्या पलीकडे जाऊन वास्तविक पातळीवर आचरणात आणता येणारा धम्म प्रस्थापित केला. सदरिल विचार जगाच्या पातळीवर सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या चीन, भारत, नेपाळ, ब्रम्हदेश, जापान, तथा इतर अनेक देशात प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याचे कारण तो आचरणाच्या पातळीवर साधा सरळ व सोपा होता. बौध्द तत्वज्ञानामध्ये पंचशील, आष्टांग, त्रिशरण, ध्यानधारणा यामागे प्रकृतीनिष्ठ टिकावू विकास व विज्ञानवादाला पोषक व पुरक अशा स्वरुपाचे असल्याचे बहुतांशी लोकांना लक्षात आले नाही. हे विशेष. प्राचिन काळात बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार होण्यास सदरील धम्माला मिळालेला राजाश्रय असला तरीही ते आजतागायत टिकण्यामागे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या तत्ववेत्यांनी स्विकारण्यामागे तात्विक व वास्तविक बाजू भरभक्कम होती हे होय. भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही, लोकसंख्या व जगातील सर्वाधिक जातीधर्माचे लोक बहुसंख्येने गुण्यागोविंदाने राहण्याचे तथा त्यामध्ये खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मा व धर्मनिरपेक्षता याच्या समावेशखाचा अमीट असा मिलाप हा बौध्द तत्वज्ञानातूनच आलेला आहे. भारतीय लोकशाही व संविधानाचा पाया मजबूत करण्यासाठी मैलाचा दगड म्हणून सदरील तत्वज्ञान, उपदेश, विचार वचने याच्याकडे पाहिले गेले तरी ते वावगे ठरु नये. प्राचीन काळापासून आजतागायत बौध्द आचार-विचार व सदाचार यामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार आले अथवा आणले गेले असले तरीही बुध्दाने धम्मपदाच्या शिकवणीतून व उपदेशातून मांडलेली आहेत. त्यामुळे धम्मपदे बौध्द साहित्यातील केवळ सर्वोत्कृष्ट व लोकप्रियच ग्रंथ नाही तर तो विविध पात्र व उपदेशाच्या माध्यमाने नैतिक पातळीवर समाजाची धारणा, समाजाची नितीमुल्ये विविध वग्गाच्या माध्यमातून भरभक्कम केलेला आहे. यमक अपमाद चित्त इत्यादी 26 वग्गाच्या माध्यमातून तथा 423 पाली भाषेतील गाथा तथ ग्रंथामध्ये वर्गीकृत स्वरुपात मांडलेला आहे. त्रिपिटकातील याचे स्थान सुतापिटकातील 5 वा भाग तथा खुदकनिकायच्या खुदकपाठातील 15 उपविभागातील 2 रा भाग असल्याचे स्पष्ट होते. सदरील ग्रंथातील सर्वाधिक गाथा ़ित्रपिटकाच्या विविध सुतामध्ये प्रसंगबध्द पध्दतीने आढळून आली आहेत. धम्मपदाची रचना ही मौखिक स्वरुपात बुध्दाने दिलेल्या उपदेशाला धरुन संपादित करण्यात आलेली आहेत. जी वचने गौतमबुध्दाने विविध ठिकाणी पाली भाषेत दिलेली प्रवचने याचा भाग होती. उपलब्ध साधनानुसार इ.स. पुर्व धम्मपदाची रचना ही इ.स.पुर्व 300 व 100 यादरम्यान प्राप्त झाल्याचे पुरावे आहेत. धम्मपदाचे महत्व - बौध्द तत्वज्ञानामध्ये विविध भिक्खू संघ यावर सदरील धम्मपदाचा प्रचंड प्रभाव आहे. बौध्द भिक्खू धम्म पदे आत्मसात व आचरणात आणल्याशिवाय बौध्द भिक्खूला सदरील अधिकार दिले जात नसे. धम्मपदाचा उत्पत्तीपासून असा अर्थ आहे की धम्म विषयक कोणताही शब्द अथवा ओळी किंवा पद्यात्मक वचने ग्रंथामध्ये स्वयंस्पष्ट केले आहे की, अनेक अनर्थ पदरचनेव्यतिरिक्त अर्थयुक्त शेकडो गाथातील भाषणापेक्षा असे एकमात्र अर्थपद, गाथापद व धम्मपद हे अधिक योग्य व सोयीस्कर आहे. ज्याचे श्रवण केल्यानंतर व्यक्ती समाज व संघाला उपशांती प्राप्त होईल. ज्या आधारे बौध्द भिक्खू साधू गाथेतील अंशमात्र आधाराने आपले प्रवचन सुरु करु शकेल. सदरील धम्मपदामध्ये विविध पात्रे त्यातील कथानक व प्रत्येक गाथेतील विशुध्द अर्थ विविध दृष्टांताच्या स्वरुपात व कथाच्या स्वरुपात स्पष्ट करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये देवदत्त, बुध्दघोष, कालवर्ती, प्रसवदत्ता, उदीयन इत्यादीच्या कथा सदरील गाथा व ग्रंथामध्ये विविध पात्रे उदाहरण देऊन स्पष्ट केल्यामुळे व सदरील गाथा ह्या पद्यात्मक पध्दतीने रचना केल्यामुळे वास्तविक जीवनाशी त्याची नाळ जुळते. ‘अट्टकथा’ म्हणजे भाषार्थासहित स्पष्ट केलेल्या कथा. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्गा अथवा वचने व उपदेश असल्याचे डी. डी. कोसंबी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये ब्राम्हण वग्गो कुठून व कसे आले हा माझ्या अज्ञानाचा भाग असला तरी तो संशोधनाच्या पातळीवरचा निश्‍चितच आहे असे मला प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. 1) यमक वर्ग अथवा वग्गो धम्मपद - या प्रथम वर्गामध्ये चक्क्षुपाल यांच्या कथा, स्थविर, तीस्स, कालयक्षीली, कोसांबी भिक्षु, महाकाल, चुलकाल, देवदत्त, स्थविरसारीपुत्र, नंद, चुंद, सुकरीक, सुमणा, दोन भिक्षुमित्र इत्यादी 20 पात्राच्या साहाय्याने यमक वग्गामध्ये 20 प्रकारचे उपदेश करण्यात आलेले आहे. मन हे सर्वश्रेष्ठ व सर्वेसर्वा आहे. वेरत्वशांतीचे उपाय म्हणजे क्षमा, वेरुपी बिमारीचा उपचार, प्रेम, दया, करुणा ही होत. वादसमाप्त करण्याचे उपाय कमजोर वृक्षाला हवा वादळ उखडून टाकते. जो पहाडाप्रमाणे मजबूत असतो त्याला वादळ काही करु शकत नाही. कामाय वस्त्राचे अधिकारी कोण कोणाला सार प्राप्ती होते. कुणाच्या चित्तामध्ये राग प्रवेश करतो पापी व्यक्तिमध्ये दु:ख अधिक असते. वयापेक्षा ज्ञान मोठे नसते. इत्यादी उपदेश यमक वग्गो मध्ये देण्यात आलेले आहेत.

G H Rathod

162 Blog posts

Comments