देशभक्त आणि देशद्रोहीची ओळख

देशभक्त आणि देशद्रोहीची ओळख

जगातील सर्व लोक अफ्रिकेतूनच सर्वत्र पसरलेले आहे असे इतिहासकारांचे म्हणने आहे. बॉबीलोनियाच्या नुपूर आणि उर नावांच्या स्थळी आफ्रिकेतून येऊन काही लोकांनी वस्ती केली. यानंतर प्रथम जनशुन्य अथवा ओसाड भारतात, पाकीस्तानच्या काही मैदानात कांही लोकांनी वस्ती केली. या मैदानाला आज रोजी मेहरगड म्हणले जात असून हे बलुचिस्थान राज्याच्या क्वेटा, किलात आणि सिबल या जिह्याच्या मध्यभागी स्थित आहे. या स्ञळी स्थाईक हेाण्यापूर्वी अफ्रिकेहून बाहेर पडलेले लोक लाल समुद्राच्या किनार्‍यावर राहत होते . हा लाल समुद्र सौदी अरेबियाच्या पश्‍चिमेला आणि अफ्रिकेच्या सहारा वाळुमय क्षेत्राच्या पुर्वेला म्हणजे अरबीया आणि अफ्रिकेच्या मधोमध अरबी समुद्राच्या उत्तर किनार्‍याला सलग्न आणि एडन आखातापासून भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर स्थित कैरोपर्यंत लांबच लांब लाल समुद्र पसरलेला आहे. या लाल समुद्राच्या पश्‍चिम किनार्‍यापासून आफ्रिका पर्यंत विस्तीर्ण व विशाल वाळु क्षेत्र पसरलेला आहे. आफ्रिकेच्या कांगो डोंगरातून निघालेली नाईल नदी ठिक ठिकाणी सहा जागी वळण घेत घेत भूमध्य समुद्राच्या दक्षिणपूर्व किनार्‍या जवळ समुद्राला मिळते. ही नाईल कांगो डोंगराच्या बाहेर पडताच सहारा वाळुमय क्षेत्रातून वाहत वाहत शेवटी भुमध्य समुद्राला मिळते. नाईल नदीच्या सहाव्या वळणापर्यंतचा दक्षिणेकडील भाग हा कांगो डोंगरातून निघालेल्या पांढरी आणि नीळ अशा दोन नदीचा भाग आहे. सहाव्या वळणापासून या श्‍वेत(पांढरी आणि नीळ नद्या एकरुप होऊन जातात ही नदी आफ्रिकेच्या इजिप्त देशातून वाहते. इजिप्तचा भूमध्य सागराकडचा क्षेत्र खालचा इजिप्त आणि दक्षिणेकडचा वरचा इजिप्त म्हणला जातो. नाईल नदी कैरोहून विभाजित होऊन वाहत वाहत पाच मार्गाने आलेल्या अलेक्झेंडरीया जवळ भुमध्य सागराला मिळते. लाल समुद्राच्या किनार्‍यावर (काठावर) राहणारे आणि नाईल नदीच्या काठाकडून दक्षिणेकडून पूर्वेकडे स्थलांंतरीत होणारे लोक एकावेळी कैरो आणि आलेक्झांडीयाच्या क्षेत्रात भूमध्य समुद्राच्या काठावर येऊन तेथे अनेक वर्षे राहून इराण आणि अफगाणिस्थानमार्गे भारतात पोहचून पाकीस्थानात, बलुचिस्थान, राज्यात प्रथम काछी (मेहरगड) मैदानावर वस्ती बनवली. येथे या लोकांनी 1500 वर्ष पशुपालन, शेती, व्यापार, करुन हळुहळु पंजाबमध्ये सप्तनदीच्या परिसरात इ.स.पूर्व 4500 पूर्व ते इ.स. पूर्व 1750 च्या काळात एक आदर्श शहरांची व आदर्श संस्कृती वसवली. मोहेजोंदाडो, हरप्पा, कालीबंगा वगैरे आदर्श शहरांची त्यांनी निर्मिती केली व सिंधु संस्कृती नावाची आदर्श मानवतावादी, समतवादी, जात,धर्म,कर्मकांडमुक्त व समाजवादी धर्मनिरपेक्ष संस्कृती विकसित करुन इ.स.पूर्व 2000 मध्ये विकासाच्या परमशिखरावर पोहचवली. इ.स.पूर्वीची म्हणजे 6000-4500 पर्यंतची मेहरगडची व इ.पू.4500 ते इ.स.पू.1750 पर्यंतची सिंधु संस्कृती जातधर्म, पंथ, कर्मकांडमुक्त समतावादी, मानवतावादी संस्कृत्या बहुजन समाजाच्या होत्या. मनुवादी ,ब्राह्मणवादी, संस्कृतीचा यांना गंध सुद्धा नव्हता हे दोन्ही स्थळांचे समूह पशुपालन शेती व्यापार, शिल्पकारीची कामे करुन उदरनिर्वाह करीत होती, म्हणून हे लोक श्रमण, संस्कृतीचे मानले जात होते, या वरील काळातील लोक सुर्य-चंद्र, तारे, पृथ्वी, अग्नी, पाणी, वायु, नदी, डोंगर, वृक्षवल्ली, घुबड, साप, बेडुक, मांजर वगैरेंना वंदन करीत होते. सम्मान करीत होते, कारण यांचे उपकार, उपयुक्तता ते प्रत्यक्ष अनुभवत होते. या काळात कोणतेही ब्राह्मणी साहित्य व देवता, कर्मकांड नव्हते, लोक सर्व वर्गाचे एकत्र राहत होते व रोटी बेटी व्यवहार परस्परात होत होते, म्हणजे आजची वर्ण व्यवस्था त्या काळात अस्तित्वात नव्हती, म्हणून आजच्या काळातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र,अतिशुद्र ही समाज व्यवस्था व धर्म व्यवस्था ही नसल्यामुळे लोक सुखाचे, समृद्धीचे, शांतीचे व सुरक्षित जीवन जगत होते, संपूर्ण मानव समुह शोषण व गुलामीमुक्त होता. उच्च नीचतेचा कुठेही गंध नव्हता, धंद्याच्या आधारावर कोणालाही उच्च निच्च मानले जात नव्हते, सर्व समुह कष्ट करुन जगत होते. परोपजीवी कोणताही लोकसमुह नव्हता. त्या काळात अनेक लोक समुह होते, यातला पणी जनसमुह हा मात्र मोठा व्यापारी व धनवान वर्ग होता. पणी समुहाची व नंतर आलेल्या ब्राह्मण समुहाची वेगळ्या जीवनशैली मुळे कट्टर शत्रुता होती. यामुळे ब्राह्मणांनी कृषकराज इंद्रांच्या मदतीने या पणी समुहाचा नाश केला असे ब्राह्मण लिखित उत्तरकालीन वेद ग्रंथात नमुद करण्यात आले आहे. पूर्वकालीन वेद ग्रंथ भारतीय मूलनिवासी(बहुजनांकडूनच) लिहिले गेल्याचे मत इतिहासकार डॉ. एस.एल.सिंह देवने त्यांच्या ‘ वैदिक असुर व आर्य ‘ या ग्रंथात तर्कपूर्णपणे मांडले आहे. हा ग्रंथ बहुजनांना वाचण्यासारखा आहे. पूर्वकालीन वेद ग्रंथ पूर्णपणे प्रक्षिप्त करुन आर्य ब्राह्मणांनी बहुजनांचा इतिहासच नष्ट केलेला नसून बहुजनांनासुद्धा आज रोजी नष्ट करण्याचे धोरण चालविले आहे. ब्राह्मण वर्ग भारतात आला नसता तर आज भारताचे व बहुजनाचे वेगळे चित्र आणि वेगळा इतिहास असता. 2) काही ब्राह्मण समर्थक लेखक ब्राह्मण वर्ग भारतात इ.स.पूर्व 1500 मध्ये आल्याचे सांगतात परंतू अनेक इतिहासकारांनी आर्य ब्राह्मण हे इ.स.पूर्व 3250 च्या जवळपास आल्याचे सांगितले आहे. कारण सिंधु संस्कृतीचा विनाश इ.स.पूर्व 1750 मध्ये झालेला आहे. सिंधु संस्कृतीचा विनाश ब्राह्मणांकडून नव्हे तर तद्पूर्वीच 1750 मध्ये झालेला आहे. हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणवाद्यांंकडून आर्य,ब्राह्मण इ.स.पूर्वी1500 मध्ये आल्याचे दर्शवून सिंधु संस्कृतीमध्ये विनाश दोषापासून मुक्त अथवा दूर राहण्यासाठी केलेला हा भट साहित्यिकांचा प्रयत्न दिसून येतो. आर्य ब्राह्मण हा भारतात इ.स.पूर्व 3250 च्या जवळपास आलेला असून तेव्हापासून आर्य ब्राह्मण व अनार्यामध्ये कित्येक वर्षे शितयुद्ध चालू होते व या युद्धात यश मिळवून इ.स.पूर्व 1750 मध्ये त्यांनी अनार्य संस्कृती नष्ट केली. आर्य ब्राह्मण हे मुळात युरोपीय देशाचे राहणारे. युरोपदेश हा शीतप्रधान देश असल्यामुळे तेथे शेती होत नव्हती, व तेथील लोकांना शेतीचे ज्ञान नव्हते. तेथील लोक केवळ मांसाहार, कंदमुळ, फळे खाऊन भटक्या अवस्थेत जगत होते. ते पूर्णत: जंगली, असभ्य, स्वैराचारी जीवन जगत होते. तेथे अति थंडी वाढल्यामुळेच मांसाहार, कंदमुळ, फळे कमी पडल्यामुळे ते टोळी टोळीने भारताकडे सरकले. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. युरोप खंडाच्या हंगेरी, आष्ट्रीया, बोहेमिया, डेन्युब नदी, स्वीत्झरलँड, मिश्र, जर्मनी, लिथुनिया, रुसचा क्षेत्र, कास्पीयन सागर, मध्य एशिया, सिरिया, असिरिया, जंबुद्वीप, सुमेरु पर्वत, केतुमांलखंड वगैरे अनेक देशातून त्यांच्या अनेक टोळ्या क्रमाक्रमाने भारतात आल्या. मांसाहार व स्त्रीयांसाठी त्यांनी प्रथम येथील मुळनिवासी, अनार्यांशी लढाया सुरु केल्या. पशु चोरून व महिला, मुली उचलून, पळवून नेऊ लागले. नंतर अन्न वस्त्राची माहिती, शेतीचे ज्ञान झाल्यानंतर ते लढाया करुन, चोर्‍या, डाकेमारी, जाळपोळ, तोडफोड, खुन खराबी करुन अन्न वस्त्र व इतर साधने घेऊन नक्षलवादी प्रमाणे जंगलात राहू लागले. वरील प्रकारामध्ये आर्य अनार्याचा नरसंव्हार व पशु-शेती व अन्नाचे नुकसान होऊ लागल्यानंतर काही काळानंतर त्यांच्यात सल्ला होऊन एकत्र राहण्याचे ठरले. परस्परांच्या स्त्रियांचे अपहरण होत होते. पण आर्य ब्राह्मणांच्या गोर्‍यापान मुली, स्त्रिया (अप्सरांना) पाहून भारतीय अनार्य राजा महाराजा बेभान झाले. अनेक राजा महाराजांनी व राजपुत्रांनी अनेक अप्सरा ठेवून अथवा लग्न करुन घेतले, व्याही, जावई बनले. संकरण वाढत गेले. अनार्य भोगवादी जीवनात गर्क झाले. हे पाहून आर्यांनी अनार्यांमध्ये फुट पाडून भांडणे लावली. नंतर एक एक राजांचा काटा काढला आणि संघटित होऊन अनार्यावर ताबा मिळवून येथील राजे बनले. बहुजनांनी विदेशी आर्यांना भीक मागून जीवन जगण्याच्या अटीवर आश्रय दिलेला होता. पण अनार्य, बहुजनाच्या मुर्खपणामुळे, भोगवादी व विषकन्या (अप्सरा) मुळे त्यांचा घात झाला व या चुकीमुळे आजही अनार्य (बहुजन) समाज राजाऐवजी गुलाम बनून जीवन जगत असून आता संव्हार होण्याच्या मार्गावर आहे. वस्तुत: सिंधु संस्कृतीच्या काळात विदेशी आर्य ब्राह्मणांना आश्रय अथवा शरण देऊन बहुजनांनी खुप मोठी अविस्मरणीय अशी घोडचूक केलेली आहे. या घोडचुकीचे फळ आज संपूर्ण बहुजन समाज भोगत असून अजूनही अन्याय अत्याचाराबाबत एकत्रीत येऊन विचार करण्याऐवजी गाढ निद्रेत आहे. 3) सिंधु संस्कृतीच्या काळात युरोपहून आलेला हा आर्य ब्राह्मण समुह त्या काळात सिंधुवासियांकडून शरणार्थी, भिक्षुक, जंगली, असभ्य, भटका, मांसाहारी, कंदमुळ, फळे आहारी, स्वैराचारी, अमिथुनी, अविश्‍वासी, धोकेबाज, शेती विरोधक मानला जाणारा आज रोजी, देव, ब्रम्हा, सर्वश्रेष्ठ, अश्रमी, भूसुर, भूदेव, भूपती, पृथ्वीपती, जगतपती, जगतगुरु, ईश्‍वर, भगवान, परमेश्‍वर, सर्वशक्तीमान, सर्वज्ञ- सर्वव्याप्त, अमर, अविनाशी वगैरे विशेषनांनी संबोधला जात आहे. वरील उदाहरणावरुन असे दिसून येते की, एखादा सर्वगुण संपन्न जनसमुह जेव्हा सत्ता, साधने व संघटनहीन बनतो, भोगवादी बनतो व आपसांत भांडत राहतो. अशावेळी नालायक, पुरुषार्थहीन जनसमुह देखील त्यांच्यावर प्रभुत्व जमवून त्यांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य करु शकतो. युरोपिय आर्यांची भारतीय मुलनिवासींवर राज्य करण्याची बिलकुल लायकी नव्हती. पण भारतीय बहुजन राजे विषकन्येच्या भोगात गर्क असतांना आर्य ब्राह्मणांनी त्यांच्यात फुट पाडून, भांडणे लावून, राजा महाराजांचा संव्हार करुन सत्ता, संपत्ती आणि साधने हातात घेऊन असाध्य सत्तेला साध्य केले. परंतु बहुजन समाज अद्यापही जागा न होता शत्रुच्या दावणीला बांधला जाऊन सर्वस्व गमावून टाकण्याच्या मार्गावर आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा प्राचीन सिंधु संस्कृतीकालीन आदर्श आणि गौरवपूर्ण इतिहास व महापुरुष सुध्दा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बहुजन मात्र अनेक चुल्या मांडून आपसांत लाथाळी आणि परस्परांवर चिखलफेक करुन आर्य ब्राह्मणाच्या गुलामीची मजा व आनंद घेत आहे. यालाच म्हणतातना विनाशकाले विपरित बुध्दी सुचत असते. 4) प्राचीन काळापासून विदेशी आर्य, वैदिक, सनातनी ब्राह्मण हा अति अविश्‍वासी, घातकी, कुटनीतीज्ञ राहीला असून तो प्राचीन काळापासून सतत बहुजनाचा घात करीत आलेला आहे. प्राचीन काळापासून बहुजनांचे राजे महाराजे व हितचिंतकाचे मुडदे पाडत आलेले आहे. या हत्या व खुन प्रकरणात प्रमुखत: राजा शंबर, राजा डोम, राजा बळी, राजा वासुकी, राजा रावण, राजा गोपीचंद, राजा हरिश्‍चंद्र, कंस, जरासंध, हिरण्य कश्यपू, शंकासुर, शंबुक, एकलव्य, सुपर्णखा, होळी, द्रौपदी, सीता, आहिल्या, तथागत बुध्द वगैरे बहुजन हितचिंतकाचा समावेश होतो. या सर्व इ.स.पूर्वीच्या घटना आहेत. राजा बृहद्रथाचा खून ही देखील इसवीसना पूर्वी 185 ची घटना आहे. इसवीसना नंतर या आर्यांनी हर्षराजा, राजा शिवाजी, शाहु नंतर बसवेश्‍वर, कबीर, रोहिदास, नामदेव, तुकाराम, म. फुले, डॉ. आंबेडकर वगैरे अनेक बहुजन हितचिंतकाची बदनामी आणि छळ केला. सावित्रीबाई फुले, जीजाऊ, आहिल्याबाई, ताराराणी वगैरेची सुध्दा बदनामी केली. बदनामी व छळ केले गेलेले असे लाखो बहुजन हितचिंतक व सुधारकांना आर्य ब्राह्मणांनी जगू दिले नाही व बहुजनाची प्रगती, जागृती होऊ दिली नाही. जातीवादी आर्य ब्राह्मणांची भाजपची सत्ता आल्यानंतर 2014 नंतर बहुजनाचे हितचिंतक, पुरोगामी विचारांचे विचारवंत, अंधश्रध्देचे कट्टर विरोधक गोपीनाथरावजी मुंडे, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची हत्या याच जातीधर्मवाद्यांनी घडवून आणलेली आहे व तसे पुरावेही मिळत आहे. अब्जो, खरबोनी भ्रष्टाचार करणारे स्वकीय विजय माल्या, ललित मोदी, निरव मोदी, चोकसी वगैरेंना सहकार्य देवून बाहेर देशात सुरक्षित ठेवलेले आहे व किरकोळ भ्रष्टाचारी बहुजन प्रतिनिधी छगन भुजबळ, लालु यादव यांना जेलमध्ये पाठवून बहुजनाची अभिजनाविरुध्द चाललेली चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न जातीवादी सरकार करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुजन आपल्या बरोबरीला येऊ नये अथवा आपल्या पुढे जाऊ नये. नेहमी कानाखाली व पायाखाली राहावे. मन मानेल तसा या बहुजनांचा वापर करता यावा, म्हणून मागील पाच दहा वर्षापासून मनुवादी संस्था, संघटना, पक्ष सर्वांनी मिळून बहुजनावर दहशत जमविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खैरलांजी सारखे अनेक हल्ले त्यांनी देशभर चालू केलेले आहे. काट्यानेच काटा काढावा याप्रमाणे बहुजनातील कुर्‍हाडीच्या दांड्यांना हाती धरुन त्यांनी ह्या दहशतवादी चळवळी चालविलेल्या आहे. दिल्ली येथील शिख समाजावरील हल्ला, गुजरात येथील मुस्लिम समाजावरील हल्ला, उत्तर प्रदेशातील बहुजनावरील हल्ले, आदिवासींवरील नक्षली हल्ले, इसाई कुटुंबावरील हल्ले, यावर्षाची भीमा कोरेगांव येथे संभाजी भिडेनी घडवून आणलेली दंगल, मुंबईवर कसाबच्या मध्यस्थीने घडवून आणलेला हल्ला. मागील अनेक वर्षापासून देशात ठिकठिकाणी घडवून आणलेले ब्राह्मणी बाँब स्फोट, हे सर्व हल्ले बहुजनामध्ये गैरसमज पसरविण्यासाठी व त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवून सत्तेपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि षडयंत्र मानावे लागेल. अयोध्येचे राम मंदिर प्रकरण हे देखील याच हेतूने हाताळले जात आहे. 5) एकूणच देशाशी आणि देशातील बहुजन समुहाशी आपली कोणत्याही प्रकारची बांधिलकी नाही, असे जातीवादी सरकार वागत आहे. सरकार कोणतेही असले तरी या सरकारमध्ये मनुवादी समुहाचाच भरणा सर्वाधिक असतो. यामुळे हा मनुवादी समुह फक्त मनुवादी समाजाचीच सर्व स्तरावर काळजी घेतो व बहुजनांना वार्‍यावर सोडून त्यांना मजबूर करुन त्यांच्या सुख आणि सोयीसाठी कसा वापर करता येईल एवढेच धोरण तो राबवित आहे कारण हा मनुवादी समुह भारत देशाशी व बहुजनाशी एकनिष्ठ नाही. जर हा समुह एकनिष्ठ असता तर बहुजनांना त्यांनी सर्व क्षेत्रात घटनेप्रमाणे प्रतिनिधीत्व दिले असते. देशातील शेतकर्‍यांची शेतजमीन त्यांनी विदेशी कंपन्यांच्या घशात घालून ते विदेशी क्षेत्र ठरविले नसते. शेतकर्‍यांना सुध्दा त्यांनी उद्योगपती प्रमाणे सर्व क्षेत्रात सवलती दिल्या असत्या. उद्योगपतीच्या काळा पैसा विदेशात लपविला नसता. खाऊजा, थेट गुंतवणूक, मॉल्स वगैरे सुरु करुन बहुजनाचे उदरनिर्वाहाची साधने नष्ट केली नसती. सर्वांचा समान विकास व्हावा म्हणून सर्वांना सर्वप्रकारचे शिक्षण समान पातळीवर मिळावे म्हणून प्रयत्न केले असते. शिक्षण अति महाग करुन शैक्षणिक संस्थांवर बंधने आणली नसती. मोठ मोठे रस्ते, उडाणपूल, स्मार्ट सिटी, धार्मिक मेळावे, खेळस्पर्धा, स्मारके वगैरेंना ज्याप्रमाणे निधी उपलब्ध करुन दिला जातो त्याचप्रमाणे देशातील वंचित समुह अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त, गुन्हेगार, आदिवासी वगैरेंना सुध्दा निधी देऊन त्याचा समान विकास घडवून आणला असता. पशुसंरक्षण, गोहत्याबंदी सारखे बहुजन घातक कायदे बनविले नसते. देशाचे संरक्षण करणार्‍या जवान व तदसम सेवाधारींना योग्य न्याय दिला असता. शेतकर्‍यांच्या मालाला सुध्दा योग्य भाव दिला असता. घटना मोडीची भाषा व भारताऐवजी हिंदुस्तान नामकरणाची घोषणा केली नसती. तिरंगा ध्वजाऐवजी भगवा ध्वजाची, संविधानाऐवजी गीता धर्मग्रंथाची, हिंदी ऐवजी संस्कृत राष्ट्रीय भाषेची घोषणा केली नसती. बहुजन महापुरुषाच्या पुतळ्यांची तोडफोड केली नसती. जनसंख्यानुसार सर्व भारतीयांना समान आरक्षण दिले असते. संरक्षणाची व स्वच्छतेची कामे सर्व समुहांना जबाबदारी म्हणून सर्वांना दिली असती. मोक्याच्या जागेवर सुध्दा गुणवत्तेनुसार सर्व समाजाच्या नेमणूका केल्या असत्या. अनावश्यक शोषक धार्मिक कर्मकांडावर व भोंदू संतांवर बंधने आणली असती. अनावश्यक मंदिरे, तीर्थक्षेत्रांना प्रोत्साहन दिले गेले नसते. जातीअंताचे प्रयत्न युध्दपातळीवर झाले असते. संविधानाचा योग्य सन्मान व अंमल झाला असता. गुन्हेगारांना पक्षपात रहीत शिक्षा अथवा दंड झाला असता. सर्व समाजाच्या सामुहिक वसाहती झाल्या असत्या. सर्वांना, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करुन दिली गेली असती. पण वरील सर्व क्षेत्रात सत्ता व साधने, क्षमता असूनही हेतूपुरस्सर अक्षम्य टाळाटाळी केली जात असल्यामुळे आजपर्यंत सत्तेवर असलेली मनुवृत्तीची सरकारच या सर्व प्रकारांना जबाबदार असल्यामुळे ते देशनिष्ठ व बहुजन निष्ठ नसल्याचे सूर्यप्रकाशाइतके सुस्पष्टपणे जाणवत आहे. चोविस घंटे कष्ट करणारा व सर्वांना सर्व साधनाची पुर्तता करणारा समाज आज उपाशी, कुपोषित, निरक्षर, बेकार असून कष्ट न करणारा, घाम न गाळणारा समाज मात्र तुपाशी खात आहे, हे सर्व प्रकार व लक्षणे समाजद्रोह आणि देशद्रोह नव्हे तर आणखी काय आहे. वरील सर्व घटना व कृती कार्यक्रमावरुन देशात कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही आहे हे ओळखून सावध राहण्याची खरी गरज आहे. जयभारत जय संविधान प्रा. ग. ह. राठोड, औरंगाबाद

G H Rathod

162 Blog posts

Comments