गोर बंजारा समाजाने धाटीचे पालन करावे की धम्माचे पालन करावे?

गोर बंजारा समाजाने धाटीचे पालन करावे की धम्माचे पालन करावे?

दिनांक 23-4-2022 गोर बंजारा समाजाने धाटीचे पालन करावे की धम्माचे पालन करावे? 1) मनुवादी, आर्य भारतात येण्यापूर्वी भारताचा प्राचीन मुळनिवासी वर्ग म्हणजे आजचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (आदिवासी), इतर मागास वर्ग, भटका, निमभटका, विमुक्त, गुन्हेगार हा वर्ग आर्य, मनुवादी यांच्या कोणत्याही देवी-देवता, सण-उत्सव, कर्मकांड, मंदिर, तीर्थक्षेत्र व तटस्थानी असलेल्या, प्रतिमा, मुर्त्या, पुतळे व त्यांच्याशी संबंधित कोणत्याही कर्मकांडांना मानत नव्हता. मुळनिवासी, बहुजन, वंचित वर्ग हा निसर्ग, पूर्वज, माता-पिता, पशु, चार तत्त्व (अग्नी, वायु, वारा, भूमी) यांनाच वंदन करीत होता. आज हिंदुधर्माअंतर्गत जे जे कर्मकांड, सण, उत्सव साजरे केले जातात, ते हिंदुचे म्हणजे बहुजनांचे नसून ते सर्व मनुवादी आर्यांचे जीविकांचे साधन आहे. सर्व मुळनिवासी, बहुजन, वंचित वर्ग हा हिंदू नसून मुळनिवासी, बहुजनच आहे. हिंदू हा आर्यांचेच टोपण नांव असून त्यांनी हे हिंदू टोपण नाव त्यांच्या संरक्षणार्थ वापरले आहे. आर्य हे अल्पसंख्यांक आहे. पण बहुसंख्यांक होण्यासाठी त्यांनी मुळनिवासींना हिंदू या नावाने संबोधून हिंदुंना संरक्षण कवच, ढाल, तलवार, बंदुक, तोफ बनवून अल्पसंख्यांक असूनही बहुसंख्यांक दर्शवून या बहुसंख्यांकाच्या बळावर त्यांनी सत्ता संपादन केली असून, ज्यांच्या बळावर ते सत्ताधिश झालेत, त्यांनाच गुलाम बनवून ते विलासी भोगवादी जीवन जगत आहे. मुळनिवासी/बहुजन/वंचित वर्ग स्वत:ला बहुजन म्हणवून न घेता हिंदू बनून विनापगारी गुलाम, विनापगारी पोलिस, बैल बनून आर्यांचा धंदा असलेली धार्मिक शेती कसून त्याचे पोषण करीत असून स्वत: मात्र शोषित, नोकर, गुलाम बनून, देवाधर्माच्या नावाने पशुतुल्य जीवन जगत आहे, ही एक शोकांतिका आहे. यांचे एकमात्र कारण हिंदू आर्य, मनुवादी, ब्राह्मणवादी जीवनशैलीनुसार जगण्याचे, वागण्याचे ठरवून घेणे व या जीवनशैलीचे, धर्माचे, धार्मिक कर्मकांडाचे आयुष्यभर पालन करून तुमच्या शत्रुचे कष्ट न करू देता बसल्यांना खाऊ घालणे, पोषण करणे होय. आर्य ब्राह्मणांनी मनुवाद्यांनी (टोपन नाव धारण केलेल्या हिंदुवाद्यांनी) विनाकष्ट बसून खाण्यासाठीच देवाधर्माची, कर्मकांडांची, मंदिर-तीर्थक्षेत्रे, तिर्थयात्रा, दान-दक्षिणा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, अतिशुद्राची निर्मिती करून बहुजनांना गुलाम बनवून ठेवण्याची नीती अवलंबिली आहे. हे कपट कारस्थान समजून येईपर्यंत वंचित वर्ग गुलामच राहणार आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. 2) वस्तुत: गोर व बहुजन समाज हा आर्यपूर्व आर्य, मनुवादी अथवा हिंदू जीवनपद्धतीने जीवन जगत नव्हता. या जीवनपद्धतीमध्ये वर्णवादी व्यवस्था नव्हती. स्त्री-पुरुष समान व सर्व समाज म्हणजे वर्ग किंवा आलुतेदार-बलुतेदार, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योगपती, राजा, महाराजा वगैरे एकाच कुटुंंबातील सदस्याप्रमाणे परस्पराची काळजी घेऊन आनंदाने, शांततेने, सुखी, नैसर्गिक, मातृप्रधान, गणसंघात्मक सैन्यसंघासह, लोकतांत्रिक, समाजवादी, जात, धर्म देव, दैव, कर्मकांडविरहीत जीवन जगत होते. मनुवाद्याची पौराणिक, जातीधर्मयुक्त जीवनपद्धती त्यावेळेस अस्तित्वात नव्हती. लोक किंवा समजा निर्मित समाज हितकारी व प्रगतिशील नियम, कायदा, तत्त्व, सूत्र, पद्धतींवर आधारित ती जीवनशैली होती. यालाच गोर बोलीत गोरधाटी किंवा गोर राजवट, गोर समाज व्यवसथा म्हणतात. इतर बहुजन समाजात गोरधाटी या शब्दासाठी त्या त्या समाज समुहात किंवा बोलीभाषेत वेगळे किंवा पर्यायी नाव असेल. पण तिचे स्वरूप पूर्णत: थोड्याफार फरकाने धाटीसमच होते व आजही आहे. परंतु बहुजन मुळनिवासींच्या संघर्षात पराभवानंतर मनुवादी विकृत जीवनपद्धती सुरू झाली. ही मनुवादी जीवनपद्धती, संस्कृती धाटीविरुद्ध होती. श्रेष्ठ-कनिष्ठतेची होती. अमानवीय, शोषक वर्णवादी होती व आहे. या जीवनपद्धतीची व धाटीची कालांतरांनी भेसळ झाली. स्वच्छ पाण्यात गढुळ पाणी मिसळावे, याप्रमाणे मानवी संस्कृतीचे रुपांतर अमानवीय संस्कृतीमध्ये झाले व ही अमानवीय संस्कृती, जीवनपद्धती गौतम बुद्धांच्या धम्म अनुयायांच्या अस्तित्वापर्यंत टिकून राहिली. धम्म अनुयायीचा पराभव झाल्यानंतर पुन्हा अमानवीय मनुवादी जीवनपद्धती सुरू झाली. ती आजपर्यंत टिकून आहे. याच जीवनपद्धतीला मोगलांच्या काळात हिंदू जीवनपद्धती संबोधले जात होते. हिंदू जीवनपद्धती म्हणजे गुलामी जीवनपद्धती. बहुजन सारे गुलाम म्हणजे दिू व अभिजन म्हणजे राजा, मालक, शासनकर्ते होय. आजचे सर्व मनुवादी सोडून बाकी हिंदू नसून सिंधूजन म्हणजे श्रमजीवी कष्ट न करणारे, गोचिडासमान रक्त शोषण करणारे, परोपजीवी किंवा झाडावर वाढणारी पिवळी अमरवेल होय. ही अमरवेल झाडाचे सर्व अन्नरस शोषून घेते व झाड वाळून जाते. पण अमरवेल जिवंत राहते. आज मनुवादी (अभिजन) जिवंत आहे व वंचित, बहुजन झपाट्याने झाडाप्रमाणे नष्ट होत आहे. मनुवाद्यांनी बहुजनांचा/मुळनिवासींचा पराभव करून सत्ता स्थापन केल्यानंतर जे पौराणिक साहित्य म्हणजे उत्तरकालीन वेद, श्रुती, स्मृती, गीता, भागवत, रामायण, महाभारत, उपनिषद, वेदांत, ब्राह्मणग्रंथ, धर्मसुत्रे वगैरेच्या आधारावर जी जीवनपद्धती उभी आहे, ही जवीनपद्धती धाटी व धम्मवाद्यांची नव्हती. मनुवाद्यांनी मुळनिवासी/बहुजनांना अव्रत म्हणजे कोणतेही व्रत न करणारे, अपव्रत/अन्यव्रत म्हणजे चुकीचे अथवा मनुवादी वगळून इतर व्रत करणारे, अयाज्ञिक म्हणजे यज्ञ न करणारे, अश्रध्द म्हणजे मनुवादावर श्रद्धा न ठेवणारे, अदेवस्य म्हणजे मनुचे देव न मानणारे, अनिंद्र म्हणजे इंद्राला न मानणारे, अरी म्हणजे मनुवादाचे शत्रु, असुर म्हणजे सुरा (शराब) पान न करणारे, अवर्ण म्हणजे वर्णव्यवस्था न मानणारे, मृध्रवाच म्हणजे न समजणारी बोली बोलणारे. दैत्य, दानव, राक्षस, सैतान, निशाचर, दास, दस्यू, भूत, पिशाच्च, अगडबंब, विचित्र, पाखंडी, लोभी, नरमांसभक्षक, कंजुस, दुष्टात्मा, मायावी, जादूपरायण वगैरे नावाने संबोधून हिनविण्याचा, बदनाम करण्याचा सर्व पौराणिक ग्रंथात प्रयत्न केलेला आहे. म्हणून मनुवादी जीवनशैली, शास्त्र, देव, देवी, कर्मकांड, मंदिर, मूर्ती, यज्ञयाग, मंत्र-तंत्र, दान-दक्षिणा, तीर्थयात्रा ही संस्कृती, जीवनशैली गोर/बहुजनांची नाही. गोर बंजारा/बहुजनांची संस्कृती/सभ्यता/जीवनशैली ही प्राचीन प्रकृतिवंदक व धाई व धम्मानुसार जीवनव्यापन करणारी पद्धत आहे. धाई व धम्म हे दोन्ही शब्द पर्यायी शब्द असून दोन्हीचा अर्थ समान आहे. मनुवादी जीवनशैली ही मुळनिवासी बहुजनांची नसल्यामुळे ती बहुजनांची शोषण करणारी असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना 22 प्रतिज्ञा देऊन मनुवादी जीवनशैलीचा त्याग करून धम्म मार्गाने वागण्याचे सांगितले आहे. गोर बंजारा समाजाने डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन केले किंवा इतरांनी केले तर ते सर्वजण धाटी व धम्म जीवनशैली मार्गाचाच अवलंब करीत आहे, असे समजावे. यासाठी मुळनिवासी/बहुजनांनी मनुवाद, सनातनवाद, ब्राह्मणवाद, हिंदुवाद, हिंदुत्ववाद म्हणजेच पूर्ण पौराणिक जीवनपद्धती त्याग करण्याची कठोर प्रतिज्ञा अनिवार्य आहे. कारण पौराणिक वादामध्ये जातीवर्णवाद, धर्मवाद, देव-देववाद, कर्मकांडाद, अवतारवाद, यज्ञयाग, मंत्र-तंत्रवाद, मुर्तिपूजा, तीर्थक्षेत्र असल्यामुळे बहुजनांचे पोषण ऐवजी सतत अमर्याद शोषण काढून त्याच्या पदरी गुलामी येते व हे सर्व अमानवीय आहे. आज पूर्ण भारताला, जाती, धर्म, देव, दैववादांनी अशांत बनविले असून देशात हिंदुत्वाच्या आडून ब्राह्मणवाद, भांडवलशाही, लुटशाही, शोषणशाही, गुलामशाही, भ्रष्टाचार, अनारोग्य, निरक्षरता, बेरोजगारी, उपासमार, कुपोषण, विनयभंग, व्याभिचार, बलात्कार, गुुंडशाही, विषमता या सर्व बाबींचा नंगानाच चालु आहे. ब्राह्मणवाद केवळ देवाधर्माच्या, जातीच्या नावाने हैदोस घालत असून स्वकियांच्या हवाली देशाची पूर्ण देशच विकून दुसर्‍या देशात स्थाईक होण्याच्या प्रयत्नात आहे. बहुजनांची सर्व क्षेत्रात कोंडी केल्यामुळे त्यांच्या मनातील हा दुष्ट हेतु आताशी कुठं बहुजनांच्या लक्षात आला आहे. आता बहुजनांनी सुद्धा त्वरीत संघटित होऊन मनुवादावर जोराचा हल्ला केल्याशिवाय बहुजनांचे अस्तित्व शक्य नाही, हे त्रिकालाबाधित सत्य समजावे. जय भारत -जय संविधान - जय बहुजन प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments