बहुजन समाज व हिंदू राष्ट्र

बहुजन समाज व हिंदू राष्ट्र

बहुजन समाज व हिंदू राष्ट्र हिंदु राष्ट्र संकल्पना ही इ.स.नंतरची आणि मुस्लिम शासकांंच्या काळानंतरची आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर या संकल्पनेने विशेष जोर धरलेला असून इ.स.न 2014 मध्ये भाजपला मिळालेल्या लोकसभेच्या निवडणूकी नंतर मात्र या संकल्पनेला मुर्त स्वरुप देण्यासाठी भाजप व भाजप परिवाराकडून हुकूमशाही वृत्तीने प्रयत्न सुरु झालेले आहे. यासाठी भाजप सरकारनी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घटनेच्या सर्व मूल्यांना तिलांजली दिली असून बहुुजन समाजाची कोणत्याही क्षेत्रात पर्वा न करता त्यांनी हिंदू राष्ट्राचा घोडा सर्व अडथळे दूर करुन अतिवेगाने दामटण्याला सुरुवात केलेली आहे. खरे पाहता भाजप परिवारांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच हिंदू, हिंदूत्व आणि हिंदूराष्ट्राचा पाया घालण्यास सुरुवात केली होती. भाजपचे अटल बिहारी प्रधानमंत्री झाल्यानंतर हा पाया मजबूत करण्यात आला व 2014 नंतर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनल्यानंतर या हिंदू राष्ट्राचा कळस अथवा शिखर चढविण्यास सुरुवात झाली आहे. हे शिखर चढविण्याच्या तयारीसाठी भाजपनी सर्व प्रथम ब्राह्मण प्रधानमंत्री बहुजनांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस पक्षात घुसविला. काँग्रेस पक्षात ब्राह्मण मंत्र्यांची संख्या वाढविली व त्यांच्या माध्यमांनी देशाच्या हिताच्या खोट्या व फसव्या घोषणा देऊन देशात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण राबवून बहुजनांचे व घटनेचे बहुजसंख्य अधिकार काढुन ते ब्राह्मण,बनिया,ठाकूर, राजपूत वगैरे श्रीमंत्र कुटुंबे व उद्योगपती, कारखानदार, कंत्राटदार, बिल्डर, मंत्री, अधिकारी यांना देऊन बहुजनांना बेकार व आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा सपाटा लावला. सर्व शैक्षणिक संस्था, आर्थिक संस्था, संरक्षण संस्था, रोजगार क्षेत्र, व्यापार क्षेत्र, निर्माण क्षेत्र, वाटपक्षेत्र, तेल-गॅस क्षेत्र, विदेश क्षेत्र त्यांच्या ताब्यात देऊन सर्व बहुजनांना कानाखाली ठेवण्याच्या अनेक योजना राबविल्या, राबवित आहेत. एवढेच नव्हे तर घटनेने बहुजन मागासवर्गाला दिेलेले मुलभूत हक्क व अधिकार सुद्धा काढून घेत आहेत. यानंतर मॉल्स निर्माण करुन बहुजनांचे लहानमोठे उद्योग, दुकाने बंद करुन बहुजनांमध्ये बेकारी वाढविली व ब्राह्मणांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळवून दिला. 2005 पासून विशेष आर्थिक क्षेत्राच्या निमित्ताने संसदेत बहुमताने मंजुरी न घेता गुपचुप पणे सेझ चे विधेयक मंजुर करुन घेतले असून तेव्हापासून तर आजपर्यंत सेझसाठी देशी व विदेशात राहणार्‍या ब्राह्मण बनीयांना बहुजनांच्या करोडो एकर जमीन अनेक सवलती व कमी किमतीत देऊन करोडो बहुजन शेतकरी बांधवांना भूमिहीन बनवून विस्थापित करुन त्यांचा सत्यानाश केलेला आहे. बहुजनांचे आमदार-खासदार व लोकप्रतिनिधी मात्र देशात काहीच घडलेले नाही अशा आवेशात फिरत असून शासनापुढे गोंडा हलवित फिरत आहेत. वस्तुत: अशा लोक प्रतिनिधींना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. पण समाजद्रोही व स्वार्थी बहुजन प्रतिनिधींना हे कळेत तो सोन्याचा दिवस ठरेल. ब्राह्मण वर्ग हा स्वत:ला वैदीक, आर्य, सनातनी धर्माचा म्हणवून घेतो. हा वर्ग हिंदू नसून तो बहुजनांना हिंदु व स्वत:ला ब्राह्मणच म्हणवून घेतो. हा ब्राह्मण वर्ग भारतात इ.स.पूर्व 3250 ते इ.स.पूर्व 1500 ते 1700 च्या काळात केव्हातरी भारतात येऊन येथील मुळ निवासी बहुजनाना हरवून येथे स्थाईक व शासनकर्तासुद्धा झालेला आहे. मूलनिवासी(बहुजन) हा भारतात इ.स.पूर्वी 7000-6000 वर्षापासून राहतो. तो या देशाचा मालक व राजा होता. म्हणून बहुजनांना लढाईत हरवून ब्राह्मण बलशाली झालेला असून त्यांचे बहुजनावरील वर्चस्व अद्यापही कमी होऊ शकलेले नाही. आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी या देशाला भारत या नावाने ओळखले जात होते. आजही भारत नावानेच ओळखला जातो. पंरतू ब्राह्मण भारताऐवजी हिंदूराष्ट्र घोषित करण्याचे प्रयत्न करीत आहे. हिंदू हे नांव मुस्लिम भारतात येईपर्यंत ब्राह्मण समाजाच्या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही. पण मुस्लिमाने येथील बहुजनांना हिंदु म्हणजे नोकर, सालदार, गडी, सेवक संबोधु लागले. ब्राह्मणही त्यांच्या वर्चस्वापासून बहुजनांना गुलाम, दास, नोकरच समजतात. या गुलाम, दास,नोकर, अडाणी लोकांवर ब्राह्मण व मुस्लिम दोन्ही राज करीत होते. म्हणून हे बहुजन आजही त्यांचे गुलाम, नोकर, दास आहेत असे ते समजतात. या गुलामावर आज देखील राज्य करणारा ब्राह्मणच आहे व बहुजन गुलामच आहेत. म्हणून जो गुलाम बहुजनावर राज्य करतो तो ब्राह्मण समाज व जो गुलाम आहे, शोषित आहे तो हिंदु म्हणजे गुलाम आहे, व ब्राह्मण राजा, शासक आहे. म्हणून ज्या बहुसंख्य बहुजन गुलाम समाजावर, देशावर ब्राह्मण वर्ग राज्य करतो तो देश म्हणजे हिंदु (गुलाम) राष्ट्र व जेथे गुलाम लोक ब्राह्मणाची गुलामी करतात तो हिंदुत्चाचा म्हणजे गुलामीचा राष्ट्र अशी त्यांची संकल्पना असून हिंदुसाठी ब्राह्मणांनी जे मनुस्मृती नावाचे धर्मग्रंथ बनविले आहे. त्याच धर्म ग्रंथानुसार हिंदु राष्ट्राची, गुलामाच्या राष्ट्राची समाज व शासन व्यवस्था कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू असल्यामुळे ते भारताऐवजी हिंदुराष्ट्र, घोषित करुन हिंदुसाठी बनविलेल्या मनुस्मृती ग्रंथानुसारच येथील शासन व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत या राष्ट्राच्या घटनेमध्ये मात्र ब्राह्मणी मनुस्मृतीचे सर्व धर्म नियम कालबाह्य ठरवून बहुजनांना ब्राह्मणासारखेच सर्व अधिकार देण्यात आलेले आहे. भारत राष्ट्राच्या घटनेस जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली असून या घटनेप्रमाणे ब्राह्मण बहुजनांना समान अधिकार देण्यात आलेले आहे. परंतु ब्राह्मणांना मात्र बहुजनांना कोणतेच अधिकार द्यायचे नसल्यामुळे ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरच्या घटनेला विरोध करीत असून हिदु (गुलामा) साठी लिहीलेली मनुस्मृतीची घटनाच त्यांना बहुजनांना लागू करायची आहे व ब्राह्मणाचे वर्चस्व व श्रेष्ठत्व कायम ठेवायचे आहेत. म्हणून ते हिंदु, हिंदुत्व व हिंदु राष्ट्राची घोषणा बेंबीच्या देठापासून करीत आहेत. हिंदु राष्ट्राचा आधार मनुस्मृती ग्रंथ आहे. मनुस्मृती ग्रंथ हा बहुजनाच्या दमनाचा आणि ब्राह्मणाच्या उत्थानाचा, प्रगतीचा, श्रेष्ठत्वाचा, कष्ट न करता बसून खाण्याचा, बहुजनांना पशु समान वापरण्याचा, वेठ बिगार बनवून ठेवण्याचा, ब्राह्मण वर्गाचा घटनात्मक धर्म ग्रंथ असून ब्राह्मणाच्या सर्व विकृत प्रवृत्तींना, कृतींना संरक्षण देणारा आहे, तर भारतीय संविधान हे बहुजन ब्राह्मण या दोन्ही वर्गांना समान मापाने वागणूक अथवा न्याय देणारे आहे. कोणत्याही प्रकारच्या दुर्व्यव्यवहारात व विकृत, अमानवी, विषमतावादी व्यवहारात ब्राह्मणांना शिक्षा अथवा दंड नको आहे. म्हणून ब्राह्मण वर्ग भारताला, भारतीयतेला, भारतीय संविधानाला मान्यता न देता त्या जागी मनुस्मृती प्रदत कायद्याला आधार बनवून हिंदु, हिंदुत्व व हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी जीवापाड अमानवी, हिटलरशाहीवादी, हुकुमशाही प्रयत्न चालू आहे. त्यांच्या या दुष्ट प्रवृत्ती व हेतूला बहुजनातीलच बहुसंख्य बिनपगारी गुलाम, चमचे,अविचारी समुह समर्थन देत असून आपल्या भावी पीढीतील संततीसाठी कायमस्वरुपी गुलामीचा पाया मजबुत करीत आहे. बहुजनातील बिनपगारी ब्राह्मणी व ब्राह्मणी धार्मिक गुलामांना जर ब्राह्मणी मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिणामाची माहिती नसेल तर अशा गुलामांना मी जाहिर आवाहन करतो की, त्यांनी एकदा तरी भारतीय संविधानाचा आणि हिंदुवादी मनुस्मृतीचा तुलनात्मक अभ्यास करावा व बहुजनाचा खरा शत्रु आणि खरा मित्र कोण आहे, याची ओळख करून घ्यावी. हिंदु धर्माच्या घटनात्मक मनुस्मृतीमध्ये वर्ण व्यवस्थेची व्यवस्था केलेली असून ब्राह्मण वर्ग सर्व श्रेष्ठ मानण्यात आलेला आहे. इतर तीन वर्ण क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र यांना तुच्छ व अस्पर्श्य मानण्यात आलेले आहे. पाचवा वर्ग वर्ण बाह्य असून तो अतिशुद्र ठरविण्यात आलेला आहे. या सर्व वर्णांना ठराविक कामे म्हणजे धंदे वाटप करण्यात आलेले असून कोणालाही आपला धंदा सोडून दुसरा धंदा करण्याची मनाई तसेच एका मालकाची सेवा सोडून दुसरीकडे सेवा अथवा काम करण्यावर सुध्दा प्रतिबंध लावण्यात आलेले आहे लग्न संबंध सुध्दा आपापल्या वर्णाशिवाय दुसर्‍या वर्णात करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ब्राह्मण मात्र कोणत्याही वर्णाची बायको करु शकतो व कोणत्याही वर्णातील विवाहित, अविवाहित मुलगी अथवा स्त्री ब्राह्मणांस पसंत आल्यास तिला इच्छेनुसार अनेक दिवस भोगण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांना कोणी आडवा आल्यास त्याची हत्या करण्याची सुध्दा तरतूद आहे. याशिवाय सर्व शुद्रांना चांगली घरे बांधून राहणे, चांगले वस्त्र, अलंकार, भांडे, प्रवासाची वाहने,पादत्राने, छत्री, हत्यारे, अन्न, पाणी, गादी, पलंग,खुर्च्या वापरणे यावर सुध्दा बंधने घातलेली आहे. गाढव, कुत्रे कोंबड्या वगळून इतर कोणतेही पशु व धनसंपत्ती ठेवण्याची, गावांत राहण्याची मनाई करण्यात आलेली आहे. गावांबाहेर राहण्यास सुध्दा त्यांना फक्त तीन दिवसासाठी परवानगी घ्यावी व रोज रात्री तीन वेळा पोलीस पाटलाकडे हजेरी लावण्याचे बंधन आहे. बहिष्कृत अस्पृर्श्यांना रस्त्याने चालण्यास, थुंकण्यास सुध्दा मनाई करण्यात आलेली आहे. अस्पृश्यांना मृत जनावरांचे मांसाहार करणे व मृत जनावरे ओढण्याचे, गाडण्याचे व कातडे सोलण्याचे काम देण्यात आले आहे. मृताचे निमंत्रण देण्याचे, अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अस्पृश्यांचे पदचिन्हे मोडण्यासाठी कमरेला खराटे व रस्त्यावर थुंंकी पडू नये म्हणून गळ्याला एक मडके बांधून फिरण्याचे बंधन आहे. ब्राह्मण वर्गावर सावली सुध्दा पडू नये असे बंधन घालण्यात आलेले आहेत. शिक्षण घेण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा व वेदग्रंथ वगैरे ऐकण्याचा अधिकार नाही. ब्राह्मण विरुध्द साक्ष देण्याचा, शिव्या देण्याचा, समोर बसण्याचा सुध्दा अधिकार नाही. केवळ ब्राह्मण वर्गाची सेवा करणे व त्यांच्यासाठी राबणे एवढेच कर्तव्य बहुजन शुद्रांना मनुस्मृतीत देण्यात आलेले आहे. हाच मनुस्मृतीप्रणित हिंदुस्तान आर्य ब्राह्मणांना 2019 च्या निवडणूकीनंतर भारतात आणावयाचा आहे. म्हणून बहुजनांना आता ठरविणे आहे की, त्यांना संविधानात्मक भारत हवा की मनुस्मृतीप्रणित हिंदुस्तान हवा. आज रोजी संविधानाचा भारत असला तरी सत्ताधारी ब्राह्मण वर्ग मनुस्मृती समर्थित हिंदुस्तानाचेच धोरण व नीती अंमलात आणत आहे. 2019 नंतर भाजप सत्तेवर आल्यास संविधानाचा भारत नष्ट करुन शंभर टक्के मनुस्मृतीरुपी हिंदुचा हिंदुस्तान व हिंदु राष्ट अस्तित्वात येणार आहे, व सर्व बहुजनांना (शुद्रांना) मनुस्मृतीचे नियम (कायदे) लागू केले जाणार आहे. या कायद्याची सुरुवात मागील अनेक वर्षात ठराविक ठिकाणी अस्पृश्य समाजावर लावून केलेली आहेच. 2019 नंतर भाजप सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर हिंदु राष्ट्राची घोषणा करुन मनुस्मृतीचे कायदे फक्त बहिष्कृत, अस्पृृश्य आणि आदिवासी, भटक्यांनाच नव्हे तर सर्व बहुजन शुद्रांना क्रमश: लावले जाणार असून बहुजनाच्या महापुरुषांचे पुतळे, साहित्य व इतिहास सुध्दा नष्ट केला जाणार आहे. भविष्यात अखंडपणे भारतावर मनुवादी ब्राह्मणाची सत्ता राहणार असून बहुजन शुद्रांची गुलामी सुध्दा अखंडपणे राहणार आहे. दुसरी बाब म्हणजे बहुजनाची हत्या करुन त्यांच्या शरीर अवयवांची बेधडक विक्री केली जाईल किंवा अन्य देशात विकून अमाप धनसंपत्ती मिळविली जाणार आहे. आजपर्यंत मनुवाद्यांनी बहुजन प्रतिनिधींना मनुवादी बनवून संविधान मोडीत काढले असून बहुजनाविरुध्द शेकडो नव्हे तर हजारो निर्णय घेतलेले आहे. परंतु बहुजनांचे नालायक, बैल व नंदीच्या बुध्दीच्या बहुजन प्रतिनिधींनी सर्व बहुजन विरोधी निर्णयाला मुक संमती दिली असून स्वस्वार्थासाठी बहुजनाचा बळी दिलेला आहे. अशा दलाल, भडवे, गोंडाघोळू बहुजन प्रतिनिधींना बहुजनांनी फिरु न द्यायला पाहिजे व त्यांच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे. सरकारातून बाहे पडण्याचे आदेशय दिले पाहिजे. पण संपूर्ण बहुजन समाज झोपलेला असून विकावू झाला असल्यास बहुजनांना गुलामी शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जयभारत जय संविधान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments