सर्व मागास वर्गांनी प्रस्थापितांवर बहिष्कार टाकावा.
दि. 7/5/2023
सर्व मागास वर्गांनी प्रस्थापितांवर बहिष्कार टाकावा.1) स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी मागासवर्गीय अर्थात अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी), विमुक्त भटका, इतर मागास (आलुतेदार-बलुतेदार वर्ग) हा विदेशी शासकांचा आणि भारतीय प्रस्थापित वर्गाचा म्हणजे उच्चवर्णीय, शिक्षित, भांडवलदार, जातीवादी, धर्मवादी ब्राह्मण, बनिया (जैन), गुजराती, सिंधी, शीख, पारसी, इसाई, राजपूत, ठाकूर या सर्व वर्गांचा गुलाम होता. घरगडी, सालगडी, वेठबिगार, नोकर, भूमिहीन, लाचार, खेळाची वस्तू, पशुसम वापरला जाणारा संपूर्ण बहुजन वंचित वर्ग होता. 33 कोटी देवांपैकी एकाही देवाने व प्रस्थापिताच्या जातीवादी, वर्णवादी, धर्मवादी, देववादीच्या वरीलपैकी एकाही नेत्यांनी वंचित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. ब्रिटिश वगळता एकही विदेशी शासनकर्त्यांनी वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित ब्रिटिशांनी सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला नसता व वंचितांना आजचे भारतीय संविधान जे वंचितांचे संरक्षण कवच आहे, हे देखील मिळाले नसते. विश्वरत्न डॉ. आंबेडकर व ब्रिटिशांमुळे भारतात कागदावर लोकशाही असली तरी प्रत्यक्षात मनुशाही, जाती वर्गशाही, धर्मशाही, भांडवलशाही कार्यरत आहे, हे सूर्य प्रकाशाइतकमे स्पष्ट दिसून येत आहे.
2014 नंतर मनुशाही, भांडवलशाहीची मुळे खोलवर रुजली जात असून ही मुळे उपटली जाण्याची चिन्हे बिलकुल दिसू लागलेली नाही. उच्चवर्णीयांनी बहुजनांना, वंचितांना कायम अखंड गुलाम, वेठबिगार बनवून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून गेल्या 75 वर्षांत त्यांनी वंचितांना काहीच दिलेले नाही. यापुढेही काहीही न देण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे सर्व वंचितांनी संघटित होऊन संवैधानिक हक्क आणि अधिकारासाठी दोन हाताच्या संघर्षाशिवाय आणि प्रस्थापित वर्गावरील पूर्ण बहिष्काराशिवाय पर्याय उरलेला नाही. कारण प्रस्थापित वर्गांनी देशातील संपूर्ण साधन संपत्तीवर घट्टपणे कब्जा केलेला अअसून संविधानिक हक्क-अधिकाराची चौकट उद्ध्वस्त करून देशात हुकुमशाही पद्धतीने खाजगीकरणाचा आणि ठेकेदारी पद्धतीचा घोडा वेगाने दामटून देशाची साधन संपत्ती विकून विदेशात स्थाईक होण्याची पूर्ण तयारी केल्याची दिसून येत आहे. कारण देशातील आजचा प्रस्थापित शासक वर्ग हा विदेशी असून भारताशी आणि ीभारतीयांशी त्यांचा कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या भावना नाहीत.
विदेशी आर्य ब्राह्मण व त्यांच्या विचारांचा मनु विचारगस्त संपूर्ण प्रस्थापिताच्या विचारधारेला भारतीय बहुजन वंचितांचा विरोध असल्यामुळे संपूर्ण प्रस्थापित वर्गाचा बहुजन वंचित वर्गांच्या संविधानिक हक्क-अधिकाराला, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला विरोध असून ते सूडभावनेने वंचितांना गुलाम, वेठबिगार बनवून वापर करीत आहेत. वर नावे निर्देशित परोपजीवी प्रस्थापित वर्ग हा गेल्या पाच हजार वर्षांपासून भारतीय सत्ता व साधन संपत्तीवर संघटितपणे एका विचाराने काबीज असून हा वर्ग केवळ एकूण संख्येच्या 15% असूनही 85% बहुजन वंचितांना सत्ता व साधन संपत्ती पासून वंचित ठेवून वंचिताप्रमाणे कोणतेही कष्ट न करता कोणताही त्याग न करता बहुजन वंचितांच्या कष्ट आणि त्यागावर विलासी भोगमय जीवन जगत आहेत, यांचे रहस्य व कारण बहुजन वंचितांच्या व वंचित लोक प्रतिनिधीच्या लक्षात का येत नाही, ही एक शोकांतिकाच मानावी लागेल. बहुजन वंचितांच्या आजच्या लोक प्रतिनिधींना एक तर बहुजन वंचितांच्या पूर्वजांचा, मेहनती, स्वाभिमानी, मानवतावादी, पराक्रमी राजा-महाराजांचा इतिहास माहीत नाही. प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या कट्टर, अमानवी शत्रुंची सुद्धा ओळख नाही. दुसरी बाबत आपल्या बहुजन वंचितांच्या गुलामी, बेकारी व पशुसम जीवनाविषयी विचारच करीत नाही. त्यांना सामाजिक बांधिलकीही नाही. अपवाद वगळून सर्व स्वाभिमानशून्य, स्वार्थी, विकाऊ, प्रस्थापितांचे समर्थक, चमचे, पाळीव तीतर, कुत्रे, बिनबुडाच्या भांड्यासारखी यांची प्रवृत्ती व स्वभाव बनलेला दिसून येतो. बहुजन वंचित समुहांनी आता या स्वाभिमानशून्य, निष्क्रिय, समाजद्रोही, पुरुषार्थहीन लोक प्रतिनिधींना धडा देण्याची मोहिम चालु करून लायक, जबाबदार प्रतिनिधीकडे प्रतिनिधित्व देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कुत्र्याच्या वाकड्या शेपटीप्रमाणे प्रस्थापितांच्या व्यवहारात गेल्या पाच हजार वर्षांपासून थोडासुद्धा बदल झालेला नाही. वैज्ञानिक व लोकशाही युगात देखील हा प्रस्थापित वर्ग धर्मनिरपेक्ष समाज व शासन व्यवस्थेऐवजी, शोषक हिंदू, मनु व ब्राह्मण राष्ट्राच्या दिशेने सर्वांना नेण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हा आता यापुढे सर्व बहुजनांनी संघटित होऊन पूर्ण प्रस्थापित वर्गांवर सर्व क्षेत्रांवर बहिष्कार टाकल्याशिवाय किंवा विरोधात जन आंदोलन उभे करून सत्ता स्थापित करण्याची अनिवार्यता आहे, असे माझे ठाम मत आहे. आज देशात जेवढे पक्ष आहेत, या सर्व पक्षात राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने त्यांनी प्रशिक्षित केलेले नेते, प्रतिनिधी घुसविलेले आहेत. फक्त घुसविलेलेच नसून त्यांना देश-विदेशातील सर्व प्रमुख क्षेत्रांच्या प्रमुख पदावर बसविलेले असून त्यांना केवळ आर.एस.एस. चे धोरण, नीती, नियम, घटना अमलात आणण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आर.एस.एस. समर्थक सर्व प्रस्थापित मंत्री, अधिकारी, उद्योगपती, व्यापारी, कारखानदार हे केवळ प्रस्थापित वर्गांच्या हिताची कामे, कायदे करतात आणि बहुजनांचे अहित कसे होईल, प्रगती कशी रोखता येईल, वर्चस्व कसे कमी करता येईल, परस्परात भांडणे कसे लावता येईल, शोषण कसे करता येईल, फसवून जेलमध्ये कसे पाठविता येईल, त्यांच्या प्रगतीच्या वाटावरून कसे हटविता येईल, असे अनेक प्रकारचे कारस्थाने रचतात. बहुजनांना अशी कपट कारस्थाने ते कळू देत नाहीत. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेत. संविधानाची शपथ घेऊन सत्ताधिश होतात पण संविधानावर 10% सुद्धा अंमलबजावणी होऊ देत नाही. खाजगीकरणाद्वारे मनुवादाला बळकटी देत असून आपले बहुजन प्रतिनिधी त्यांच्यासमोर नंदी बैलासम मान हलवितात व कुत्र्यासम गोंडा हलवितात. बहुजन वंचित प्रतिनिधी तथागत बुद्ध, छ. शिवाजी, सयाजी, शाहू, सेवालाल, म. फुले, डॉ. आंबेडकर, मा. कांशीराम व त्यांच्या अनुयायांचा जयजयकार, भाषणे करतात, पण बहुजन वंचितांवर कितीही अन्याय, अत्याचार झाले तरी सरकार मधून बाहेर पडण्याची साधी धमकी सुद्धा देत नाही. उलट 50 खोके घेऊन बोके बनतात आणि निवडून दिलेल्या जनतेवरच गुरगुरतात. मिळालेल्या खोके, ठेकेदारी, भ्रष्टाचाराच्या माध्यमाने कमावलेल्या धनाच्या बळावर तथाकथित बहुजन वंचित लोक प्रतिनिधी जात-धर्मभोळ्या सामान्य मतदारांना विकत घेतात व निवडून येतात. या धनवान बहुजन प्रतिनिधींनी 1975-80 नंतर विशेषत: महाराष्ट्रात संस्थानिक व घराणेशाही निर्माण केली असून सत्तेचे केंद्रीकरण केल्यामुळे अतिहुशार, बुद्धिमान वंचितांच्या वाट्याला सत्तासुत्रे येण्याची शक्यता पूर्णत: मावळली आहे. सत्ता निर्बुद्ध, जाती धर्मवादी व गुंड लोकांच्या व चमचेगिरी करणार्याच्या भ्रष्ट आणि चारित्र्यहीन व हुकुमशहाच्या हातात केंद्रीत झालेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य व बहुजनांच्या हित कल्याणासाठी ज्या महापुरुषांनी त्याग व बलिदान केलेले आहे, त्यांचे स्वप्न धुळीत मिळालेले आहेत.
इसवीसन सुरू होण्याच्या पूर्वीपासून या देशात ब्राह्मण, बनिया, गुजराती, सिंधी वगैरे जात समुहांनी बहुजन वंचितांचे सावकारी, व्यापार, धार्मिक कर्मकांड, जमीनदारी वगैरेच्या माध्यमाने बहुजन वंचितांच्या पूर्वजांचे मन मानेल तसे शोषण केलेले असून वर्तमान काळात सत्तेवर हेच लोक बसलेले असल्यामुळे यांची पाचही बोटे तुपात बुडालेली असून हा वर्ग सोन्याच्या ताटात जेवत आहे. गेल्या तीन-चार हजार वर्षांपासून बहुजन वंचित समुह कष्ट व त्यागाच्या माध्यमाने राष्ट्रनिर्मितीच्या कामात आपल्या शेकडो पिढ्या बरबाद करीत असून हा प्रस्थापित वर्ग, राष्ट्रीय साधन संपत्तीचा दुरोपयोग करून बँका लुटून मरणाच्या, कष्टाच्या व महागाईच्या धाकाने विदेशात पळून स्थाईक होत आहे. एकूणच हा प्रस्थापित वर्ग देश बहुजन वंचित वर्गाला देशोधडीला लावण्याच्या मार्गाला लागलेला आहे. बहुजन वंचित प्रतिनिधी मात्र या लांडग्यांना बळी पडलेला असून आज रोजी बहुजन वंचिताला कोणीही वाली, संरक्षक, पालक, हितचिंतक उरलेला दिसून येत नाही. आजचा राजकारणी वर्ग हा वंचित बहुजनांचा बळी घेऊन अमर होण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. बहुजन वंचितांमध्ये भविष्यात व आज रोजी तथागत गौतम बुद्ध, शिवाजी, सयाजी, शाहू, सेवालाल, फुले, पेरीयार, डॉ. आंबेडकर, कांशीराम निर्माण होण्याची शक्यता मावळली असून या सर्व महामानवांचे वारसदार अनुयायी दगाबाज निघाल्याचे दिसून येत आहे. प्रस्थापित शत्रुंनी त्यांच्या स्वत:च्या संरक्षणाचे इव्हीएम, इडी, सीबीआय सारखे बहुजन व वंचित संव्हारक शस्त्रे तयार केल्यामुळे बहुजनांसमोर आता जनआंदोलनाचा करो अथवा मरो हा एकमेव मार्ग उरलेला असून या मार्गाची यशस्वीता सुद्धा सर्व बहुजनांच्या, वंचितांच्या संघटन शक्तीवर अवलंबून आहे. विकाऊ, पुरुषार्थहीन, अविचारी बहुजन वंचित वर्ग संघटित होईल याची सुद्धा शाश्वती नसल्यामुळे भविष्याच्या गर्भात काय काय दडलेले आहे, हे भविष्यकाळच ठरविणार आहे. बहुजन वंचितांपैकी इतर मागास वर्ग व आदिवासी भटक्यांना प्रस्थापित शत्रू वर्गाची ओळख झज्ञली व ते या वर्गाच्या पक्ष व सर्व संघटनेच्या बाहेर पडले व इव्हीएम फोडून तोडून केवळ बहुजन प्रतिनिधींना सत्तेवर बसविले तर परिवर्तन घडून सत्ता बहुजनांच्या हाती येण्यास वेळ लागणार नाही. पण यासाठी प्रथम शत्रु-मित्राची ओळख करून शत्रुंवर पूर्णत: बहिष्कार टाकण्याची प्रथम अट आहे.
जय संविधान - जय भीम
गहरा चिंतन