बहुजन बंधू भगिनींनो,
जयभारत, जय संविधान.
प्रयोजन असे की, मूळनिवासी बहुजनांच्या सिंधू नदीकाठची संस्कृती विनाशानंतर भारतात पौराणिक, सनातन, ब्राह्मणी संस्कृती फोफावली. निसर्ग, प्रकृती, पूर्वज, पशू, चार तत्त्व, वृक्षवल्ली, मातृवंदना ऐवजी सिद्धार्थ गौतमाच्या धम्म स्थापनेपर्यंत मूर्तीपूजा, मंदिर क्षेत्र निर्माण, दान-दक्षिणा, यज्ञयाग, मंत्रतंत्र वगैरे परजीवी ब्राह्मणोंपयोगी बहुजन शोषक कर्मकांडे अमर्याद स्वरुपात वाढली. पुढे धम्माच्या प्रचार-प्रसारामुळे वरील सर्व कर्मकांडे इतिहास जमा झाली होती. परंतु धम्म समर्थक राजा बृहद्रथाची ब्राह्मण सेनापती पुश्यमित्र शुंग यांनी हत्या केली व सत्ता हाती घेऊन पुन्हा ब्राह्मणी पौराणिक निरोपयोगी बहुजन शोषक व ब्राह्मण पोषक कर्मकांडे सुरु करण्यात आली. छत्रपती शिवाजी, सयाजीराव गायकवाड, शाहू, म.फुले यांच्या काळात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिखित घटना प्रभावामुळे ब्राह्मणी संस्कृती मंदावली होती. मुळ सिंधू संस्कृतीकडे लोक वळत होते. तरी पण आर.एस.एस., विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे ब्राह्मणी संघटनांचा मवाळ विरोध चालू होता. कारण या संघटनांना धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताची घटना मान्य नव्हती. सत्तास्थानी या संघटनेचे कट्टरवादी संख्येने कमी असल्यामुळे घटनेचा उघड उघड विरोध न करता सत्ता प्राप्तीनंतर घटनाच बदलून टाकण्याची व्यूहरचना करीत होते व सत्तेची संधी शेवटी त्यांनी इव्हीएम मशीनची रचना करुन फसवून 2014 ला प्राप्त केली. भाजप पक्ष हे वरील सर्व जाती, धर्मवादी कट्टर संघटनेचे अपत्य असल्यामुळे, आता घटना बदलून बहुजनांवर स्वातंत्र्यपूर्व काळातील मनुस्मृतीचे सर्व नियम बहुजनांना लावून, त्यांना कायमचे गुलाम बनविण्याचे धोरण आखले आहे. यासाठी त्यांनी सर्व राष्ट्रीय साधनसंपत्तीचे खाजगीकरण करुन ही सर्व साधने आणि संपत्ती स्वजनांच्या ताब्यात देण्याचा सपाटा लावला आहे. एवढेच नव्हे तर सर्व बहुजनांचे उच्च, दर्जेदार व व्यावसायिक शिक्षणाचे दरवाजे बंद करुन त्यांना केवळ श्रमजीवी, बेकार, लाचार बनवून वापरण्याचे डावपेच रचलेले आहे. हिंदुत्व, हिंदू, हिंदूराष्ट्र हे त्यांचे संरक्षण कवच असून सर्व बहुजनांना हिंदू धर्माचे आमिष देऊन दिशाभूल करुन सर्वांसाठी एकच ब्राह्मण वर्चस्व असणारा हिंदूधर्माच्या नावे ब्राह्मण (मनु) धर्म स्थापन करुन कर्मकांडाद्वारे बहुजनांचे शोषण, लूट करुन विनाकष्टाचे भोगवादी जीवन जगण्याचा त्यांचा अमानवी हेतू आहे. सिंधू संस्कृतीच्या विनाशापासून (मधला धम्म अनुयायाचा काळ वगळून) हा ब्राह्मण वर्ग धार्मिक कर्मकांडाची नशा चढवून दान-दक्षिणा व कर्मकांडाद्वारे अमाप संपत्ती जमा करुन विलासी जीवन जगत आहे. ब्राह्मण, बनिया, राजपूत, ठाकूर, सिंधी, गुजराती, पारसी हे सर्व सधन समाज सिंधू संस्कृती पतन काळापासून बहुजनांना साधनसंपत्तीहीन बनवून वापर करीत आहे. हा बहुजनांचा वापर करणारा वरील केवळ पंधरा टक्के समाज असून, शिक्षण, सत्ता, संपत्ती, साधने व संघटनांच्या बळावर पंच्यांशी टक्के बहुजनांचा वापर करीत आहे. याचा अर्थ वरील 15% समाज हा 85% बहुजन समाजाचा शत्रू आहे. या शत्रू समाजाच्या संघटना, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर यांच्याशी संलग्न हजारो संघटना या सुद्धा बहुजनांच्या शत्रू आहेत. या संघटनांशी सर्व बहुजनांनी असलेले संबंध तोडून सर्व बहुजनांना संघटित करुन सत्ता व साधने हातात घ्यायला हवे. पण असंघटीत, अविचारी, मूर्ख बहुजन लाखो-करोडोंनी वरील संघटनेत कार्यरत असून ते सर्व बहुजन कुर्हाडीचा दांडा बनून स्व बहुजनांना गुलामीत ठेवण्यासाठी वरील त्यांनी निर्माण केलेल्या भाजपर सरकारचा उदो उदो, जयघोष करुन गुलामीला, मरणाला आमंत्रण देत आहे. बहुजनातील अनेक तीतर हाती धरुन वरील संघटना व भाजप हा पक्ष बहुजनांना त्यांच्या जाळ्यात फसवून काट्याने काटा काढावा, याप्रमाणे बहुजन हाती धरुन बहुजनांचे अस्तित्व नष्ट करण्याचे काम तीतरांमार्फत, दलाल, चमचे, पाळीव कुत्रे यांच्याद्वारा भाजप व त्यांच्या मातृसंघटना करीत आहे. तेव्हा बहुजनांनी आता या पाळीव तीतर, पाळीव कुत्रे, कुर्हाडीचे दांडे, दलाल, चमचे यांना ओळखून त्यांची जिरविली पाहिजे व सर्व बहुजन अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, भटके, अल्पसंख्य सर्वांना भाजप सरकार पाडण्याची शपथेवर, प्रतिज्ञा करुन संघटित बनून पाडण्याचे महान कार्य करण्याची गरज आहे.
आपला एक बहुजन हितचिंतक,
जय भारत, जय संविधान, जय बहुजन