वंचितांना न्यायदेणारी वंचित आघाडी शिवाय दुसरी आघाडी आहे तरी कोणती?

वंचितांना न्यायदेणारी वंचित आघाडी शिवाय दुसरी आघाडी आहे तरी कोणती? Add your comments and let me know what you think.

वंचितांना न्यायदेणारी वंचित आघाडी शिवाय दुसरी आघाडी आहे तरी कोणती? 1) स्वातंत्र्य आणि बहुजन समाजाची दुरावस्था - स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण बहुजन समुह हा क्रमश: ब्राह्मण-बनिया विदेशी आक्रमक, मोगल मुस्लीम व ब्रिटिशाचा तिहेरी गुलाम होता. प्रथम ब्राह्मण-बनियांचा दुसरा मोगल-मुस्लीमांचा व तिसरा ब्रिटिशांचा गुलाम होता हे सर्वांना माहित आहे. ब्राह्मण-बनिया इ.स.पूर्व 1500 पासून या देशाचा शासक वर्ग होता व आजही आहे. बहुजन वंचित वर्ग मुगल-मुस्लीमांच्या भारत प्रवेशापर्यंत बहुजन वंचित वर्ग केवळ ब्राह्मण-बनियांचा गुलाम होता. नंतरच्या काळात तो क्रमश: मुगल-मुस्लीम व ब्रिटिशांचा सुध्दा गुलाम बनून राहिला. ब्राह्मण-बनियांनी मात्र मुगल-मुस्लीम व ब्रिटिशांशी संगनमत करुन चाळीस टक्क्यांपर्यंत शासन प्रशासनात भागीदारी घेऊन भोगमय व विलासी जीवन जगले. बहुजन वंचित मात्र वरील तिन्ही शासकाच्या काळात पशुपेक्षाही भयंकर चोवीस घंटे कष्ट करुन ही अत्यंत पीडादायक, अन्न, वस्त्र, निवासविहीन जीवन जगले व आजही जगत आहेत. स्वातंत्र्यानंतर बहुजन वंचितांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती होईल व सुखाचे दिवस येईल, अशी सर्व वंचितांना अपेक्षा व आशा होती. पण घडले व घडत आहे ते विपरीत व भयानक आहे. तरी सुध्दा बहुजन वंचित समुह आपले खरे शत्रु कोण आहेत व मित्र कोण आहेत यांची ओळख करुन न घेता भक्ष्याला रक्षक व रक्षकाला भक्षक समजून वंचित बहुजन आघाडी विषयी अनावश्यक टिका टिप्पनी करुन बहुजनांना स्वस्वार्थासाठी शत्रुच्या दावणीला बांधण्याला बांधण्याची चर्चा करीत आहे. बापाला बाप न मानता शेजार्‍याला बाप मानणार्‍यांची संख्या आजही वंचितांची संख्या कमी नाही, ही एक भयंकर शोकांतिका आहे. 2) स्वातंत्र्याचा फायदा कोण घेत आहे? - स्वातंत्र्य मिळून आज 72-73 वर्षे उलटून गेले आहेत. पण संपूर्ण देशाच्या साधन संपत्ती, सेवाक्षेत्र, राजकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, उद्योग, व्यापार, कारखानदारी, खदानी, तेल, संरक्षण क्षेत्रावर केवळ ब्राह्मण-बनिया, राजपूत, ठाकूर, मराठा या ठराविक वर्गांनीच वर्चस्व स्थापन केलेले दिसून येते. वरील वर्ग समुहांनी संपूर्ण देशात घराणेशाही व राज्यशाही स्थापन केलेली आहे. वस्तुत: हा वर्ग परोपजीवी, कष्ट न करणारा वर्ग आहे. कष्ट करुन देशाला उभा करणारा व समृध्द करणारा हा कष्टकरी वंचित बहुजन समाजच आहे. या समाजाच्या अस्तित्वाशिवाय एका समृध्द, सुखी, स्वावलंबी, स्वाभिमानी देशाची कल्पना करणेच निरर्थक आहे. हा कष्टकरी, वंचित बहुजन समाज हा देशाचा खरा पायाचा दगड आहे. पण आजचा भांडवलशाहीवादी, परोपजीवी, षडयंत्रकारी, जातीवादी सवर्ण समाज संविधानाप्रमाणे हक्क अधिकार तर द्यायला तयार नाहीच, पण या वंचित समाजाची जनगणना करायला सुध्दा तयार नाही. कारण हे परोपजीवी, बहुजनांचे शोषक, गोचीडाप्रमाणे खुर्चीला चिपकून बसलेले, कष्टाला भिणारे भित्रे लोक जनगणना झाल्यास जनसंख्यानुसार सर्व क्षेत्रात भागीदारी द्यावी लागेल व आपले आयतखाऊ जीवन संपेल म्हणून जनगणना करण्यास तयार नाही. एवढेच नव्हे तर जनसंख्यानुसार सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व द्यायला सुध्दा तयार नाही. वस्तुत: आज सत्तेत संविधानविरोधी बुध्दिहीन, निर्लज्ज, भ्रष्टाचारी गुंडे व व्याभिचारीच नव्हे तर स्वैराचारी लोक सत्तेवर बसलेले आहेत. 72-73 वर्षांनंतर सुध्दा वंचित बहुजनांना घटनाविरोधी, जातीवादी लुटारु, शोषक वर्ग ओळखू न येणे हा वंचित समुहाचा मूर्खपणा तर आहेच. बहुजन हितचिंतक व महापुरुषांचा स्वप्नभंग, अपमान व त्यांच्याशही केलेली महान गद्दारी आहे. आज रोजी कमीत कमी, म. फुले, रा. शाहु महाराज व महात्यागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खर्‍या अनुयायांनी तरी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर प्रमाणे बहुजन वंचितांना एकत्र जोडण्याचे काम करुन सत्ता प्राप्तीकडे वाटचाल करायला हवी. 3) राजकिय पक्ष आणि त्यांचे कारस्थान - आज भारतात काँग्रेस, भाजप, शिवसेना व कम्युनिस्ट असे चार पक्ष भांडवलदारांचेच आहे. भांडवलदारांचेच नव्हे तर हे संविधान विरोधी, जाती, धर्मवादी व बहुजन वंचितांचा सतत द्वेष, तिरस्कार, अन्याय, अत्याचार, पक्षपात करणारे व सवर्णांचे पाठीराखे आहेत. बहुजन वंचितांमध्ये फुट पाडून त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकिय क्षेत्रात कसे वापरुन घेता येईल व कोणत्या परिस्थितीत हा वंचित वर्ग सवर्णांना वरचढ होणार नाही याची काळजी घेणारा, दाबून ठेवणारा धोरणाचा व नीतीचा आहे. गेल्या 72 वर्षांपासून वरील सर्व पक्ष सत्ता, संपत्ती, शिक्षण, सेवा, उद्योग, व्यापार, सहकार, बँकींग, संरक्षण, योग्य प्रतिनिधित्व बहुजन, वंचित वर्गाकडे जाऊ द्यायला बिलकुल तयार नाही. उलट घटना प्रभाव नष्ट करुन आरक्षण हटविण्याचे, खाजगीकरण, विदेशी गुंतवणूक, भूमि अधिग्रहण कायदा करुन शेतकरी, कष्टकरी असलेल्या बहुजन वंचित समुहाला बरबाद करण्याचे धोरणे राबविली जात आहे. आज सत्ताधार्‍यांपैकी ब्राह्मण, बनिया, राजपूत, ठाकूर, देेशमुख मराठा कष्ट न करता तुपासी खात आहे व कष्टकरी बहुजन, वंचित, भटका, आदिवासी उपाशी आहे. वरील पक्षाच्या तुलनेत शेतकरी कामगार, समाजवादी, प्रजासत्ताक, आर.पी.आय., बीएसपी वगैरे बहुजनवादी पक्ष कमकुवत असल्यामुळे किंवा सर्व संघटित होत नसल्याने आज जातीवादी भांडवलदार पक्ष माजले असुन हुकुमशाहीचे व गुंडगीरीच्या धोरणांनी वंचितांना वंचितच ठेवण्याचे संगनमताने प्रयत्न करीत आहे, हे वंचितांनी जाणून घेण्याची अनिवार्यता आहे. 4) अ‍ॅड. बाळासाहेब (प्रकाशजी) आंबेडकर व वंचित आघाडी - वरील बहुजनवादी पक्ष वगळून बाकी सर्व आहिरे व जातीवादी, धर्मवादी पक्ष हे वस्तुत: बहुजनाच्याच मतदानावर सत्ताधारी बनतात व बनलेले आहेत. बहुजनांशिवाय कोणताच जातीवादी, धर्मवादी पक्ष निवडून येऊ शकत नाही. ब्राह्मण-बनिया, राजपुत, ठाकूर व देशमुख मराठा सर्वांची संख्या माझ्या मतेच चाळीस टक्के पेक्षा जास्त नसावी. बाकी 60-65 टक्के मतदाता हा बहुजन समाजच आहे. सधन व सत्ताधारी मराठा समाज हा बहुजनाचा मोठा भाऊ आहे. या वर्गाने मनुवाद्यांना साथ न देता बहुजनांना सोबत घेऊन राजकारण केल्यास सत्ता बहुजनाकडेच राहते. पण आता बहुजन-मराठामध्ये भाऊपणाचे संबंध दिसून येऊ लागलेले नाही. कारण हा सधन समाज आरक्षणासाठी बहुजनामध्ये घुसखोरी करुन मुळ बहुजनांना बेदखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुजनांमध्ये अनुसूचित जाती जमाती वगळल्यास इतर मागासात (आलुतेदार-बलुतेदार) भटके, विमुक्त, आदिवासी यांना संख्येच्या प्रमाणात आजपर्यंत सत्तेत असणार्‍या कोणत्याच पक्षाने सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्याचे काम केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे सत्य मा. बाळासाहेब आंबेडकरांनी फार दिवसापासून ओळखलेले आहे. म्हणूनच त्यांनी आजपर्यंत कोणत्याही पक्षाची हुजरेगीरी, दलाली, चमचेगीरी, लाळघोटेपणा, शेपूट हलविण्याचे काम केलेले नाही. त्यांच्यामध्ये काही दोषही असतील. पण त्यांच्या इतका बहुजन हितचिंतक, प्रखर वक्ता, स्वाभिमानी, अभ्यासु, राजनीतिज्ञ, कुटनीतीज्ञ, स्वावलंबी नेता सध्यातरी नाही. कु. मायावतीजी बहन ह्याही बहुजन हितचिंतक व आंबेडकरवादी आहेत. पण त्यांची दिशा संभ्रमात्मक असल्यामुळे बहुजनसुध्दा संभ्रमात आहेत. मा. प्रकाशरावजी आंबेडकरांनी वंचित समुहाचे दिर्घकालीन शत्रु अचुकपणे हेरल्यामुळे ते कोणत्याच शत्रुच्या जाळात न फसता स्वतंत्रपणे बहुजनांचे अस्तित्व व स्वाभिमान टिकविण्यासाठी ते धडपडत असून यासाठीच त्यांनी बहुजन वंचित आघाडीची निर्मिती करुन ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. 2019 च्या लोकसभा/ राज्यसभेला वंचित आघाडीशी युती करतांना सर्वच पक्ष वंचित आघाडीला महत्व न देता स्वाभिमानशुन्य बोलणी करीत होते. 72 वर्षानंतर ही वंचितांना योग्य प्रतिनिधित्व देवू इच्छित नव्हते. अपमानजनक, बोलणी करीत होते. वंचित आघाडी वंचित बहुजनाचा पक्ष असतांनाही जनसंख्यानुसार अथवा भावकीच्या वाट्यात राष्ट्ररुपी बापाच्या संपत्तीत समाज वाटा असतांना सर्व पक्ष आपआपल्या पक्षातील उमेदवारांचाच विचार करीत होते. लहान्या भावाला अथवा पक्षाला न्याय देत नव्हते. म्हणून मा. बाळासाहेबांनी सर्वांना नकार देऊन स्वबळावर वंचित आघाडीचे सर्व उमेदवार घोषित केले व अभिमानी,च स्वार्थी काँग्रेस पक्षाला धडा सुध्दा दिला. या एकांगी लढाईत बाळासाहेबांना यश मिळाले नसले तरी प्रथम प्रयत्नाने अनपेक्षित मते घेऊन भल्या भल्याची त्यांनी जिरविली, हे काही थोडके नव्हे. केवळ दोन महिन्याच्या वंचित आघाडीने जे यश मिळविले आहे, हे पाहता येणार्‍या काळात वंचित आघाडी महाराष्ट्रात सत्ताधारी निश्‍चितपणे बनणार हे नाकारता येणार नाही. फक्त वंचितांनी मा. बाळासाहेबांवर दृढ विश्‍वास ठेवण्याची व संघटित बनून संघर्ष करण्याची खरी गरज आहे. याच बरोबर सत्ताधार्‍यांच्या गुलामीत असणार्‍यांनी सत्तेबाहेर पडून नि:स्वार्थपणे वंचित आघाडीला तन-मन-धनानी सहकार्य करण्याची गरज आहे. 4) जातीवादी पक्ष व वंचित आघाडीचे कार्य - जातीवादी पक्षांनी अति वंचितांना तर सोडाच, वंचितांना सुध्दा 72 वर्षात न्याय दिलेला नाही. ना भूतो ना भविष्यती एवढे जातीवादी पक्षांनी न दिलेले प्रतिनिधित्व वंचितांना व अतिवंचितांना मा. बाळासाहेबांनी 2019 च्या निवडणूकीत दिलेले आहे. आज शेकडो वंचित अतिवंचित समाजात आमदार-खासदार म्हणवून समाजात फिरत आहे. काय हा सन्मान तुम्हाला आजपर्यंत जातीवादी पक्षांनी दिला होता व भविष्यात देईल असे वाटते काय? कैकाडी, गोंधळी, कोल्हाटी, गोसावी, पारधी, वडर, भील, साळी, तंबोळी, लोहार, कुंभार, सुतार, घीसाडी बंजारा व तत्सम अनेक समाजाला प्रतिनिधित्व देवून मा. बाळासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल केलेली आहे. अशी अपेक्षा आपण इतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीकडून करु शकत नाही. अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी बरोबरच उपरोक्त अति दूर्लक्षित, वंचित समुहाला प्रतिनिधित्व देऊन शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे व समता स्थापन करण्याचा त्याचा हेतु दर्शविलेला आहे. यात शंका नाही. 6) मा. बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसची युती न केल्यामुळे भाजपची सत्ता आली - वस्तुस्थिती आहे. काँग्रेस वंचित आघाडीची मा. बाळासाहेबांनी युती तोडल्यामुळे आजची भाजपी हुकुमशाही सत्तेवर आलेली आहे, हे सत्य काही प्रमाणात सत्य आहे. वस्तुत: भाजपी सत्ता ही ईव्हीएम व निवडणुक आयोगाच्या व न्यायालयाच्या अन्यायी धोरणामुळे आलेली आहे हे वास्तव फार थोडे जाणकार जाणतात. पण काँग्रेस-वंचित आघाडी झाली असती तरी वरील तीनही कारणामुळे भाजपची सत्ता येणारच होती हे ही फार थोडे लोक समजतात. कारण वरील तिन्ही घटक त्यांनी बरोबरीला ठेवल्यामुळे त्यांची जीत ठरलेलीच होती. त्यांना मिडियाची सुध्दा मोठी साथ होती. युती मुळे भाजपला काही खासदार कमी पडले असते. पण खासदार खरेदी करुन भाजप त्यांची सरकार कपट नीतीने बनविणारच होता, ही न मिटणारी रेषा होती. तेव्हा वंचित आघाडीला दोष देणे हे सर्वथा निरर्थक आहे. वंचित आघाडीला फक्त संसदेत व राज्यात जास्तीत जास्त वंचित आघाडीचे प्रतिनिधित्व निवडून यावेत ही अपेक्षा होती. कारण कधी नव्हे एवढ्या प्रमाणात वंचित समुह संघटित झाला होता. तेव्हा संधी व स्वाभिमान न गमविता वंचितांनी शत्रुशी सामना करावा व बहुजनांच्या शक्तिचे प्रदर्शन घडवून आणावे अशी मा. अ‍ॅड. बाळासाहेबांची इच्छा व अपेळा असावी म्हणून युती न करणेच योग्य असे त्यांना वाटले असावे. दुसरी बाब म्हणजे गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेससह सर्वच पक्ष अल्पसंख्य सवर्णांना सर्वाधिक प्रतिनिधीतव देत आहे. पण संपूर्ण वंचित समुह संघटित झाल्यानंतर वंचितांना संख्येच्या प्रमाणात काँग्रेसला प्रतिनिधीत्व देण्यास हरकत नव्हती. पण जातीवाद व पक्षपात यांच्या नसा नसात भरलेला असल्यामुळे वंचित आघाडीला मा. अ‍ॅड. बाळासाहेबांच्या मागणीनुसार जागा देण्यास नकार दिल्यामुळे स्वाभिमानी बाळासाहेबांनी युतीला सपशेल नकार दिला. आजपर्यंत आपण पाहिलेले आहे की संसदेत व विधानसभेत ज्या समाजाचे सर्वाधिक प्रतिनिधी, म्हणजे खासदार-आमदार आहेत, त्याच समाजाची खुप मोठी प्रगती झालेली आहे. वंचित अति वंचितांचे संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांची प्रगती तर सोडाच, त्यांच्यावर सतत अन्याय-अत्याचार, गरीबी, बेरोजगारी, निरक्षरता वाढत आहे. यास्तव वंचित प्रतिनिधींना यावेळी तरी प्राधान्य देण्यात यावे असे मा. अ‍ॅड. बाळासाहेबांचे मागणे होते. पण जातीवादींच्या मनोवृत्तीत बदल न झाल्यामुळे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला यात मा. अ‍ॅड. बाळासाहेबांचे खुप चुकले असे मानव अज्ञानीपणाचे लक्षण आहे. बाळासाहेब दलाल आहे, भाजपी अथवा संघीष्ट आहे असे मानणे हा आंबेडकरी चळवळीचा अपमान आहे. कधीही नव्हे एवढा बहुजन वंचित समुह आता संघटित झाला आहे. सत्ता आता हात इशारे करीत आहे. शत्रु घाबरलेले आहे. अशावेळी बहुजनातील फुट व आघाडीवरील अविश्‍वास ही फार मोठी घोडचूक ठरविण्याची शक्यता आहे. सर्व जातीवादी पक्षाचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. सर्व पक्षपाती व शत्रु आहेत. म्हणून आता शेवटच्या क्षणी वंचित बहुजनांना वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही, याची खुनगाठ मजबुत बांधून सत्ताधारी बनण्याची प्रतिज्ञा सर्वांनी करणे अनिवार्य आहे. मा. अ‍ॅड. बाळासाहेब, दलाल, चापलूस, चमचा, स्वार्थी, शेपूट हलविणारे, गोंडा घोळणारे, उष्टे खाणारे, पत्रावळी उचलणारे असते तर ते आठवले बनले असते. त्यांनी सर्व वंचितांना संघटित करण्याचे, शेवटच्या माणसास सत्तेत सहभागी करुन घेण्याची धडपड कार्य त्यांनी केले नसते. पैसे देणार्‍याकडून त्यांनी पैसे घेतलेही असतील, पण त्यांनी पैशाची भीक मागितली नसावी असे मला वाटते. शेवटी घर कुटुंब चालविण्यासाठी धनाची गरज असतेच. राजकारण चालविण्यासाठी तर धन अनिवायृ आहे. पण धन घेतांना अथवा स्वीकारतांना त्यांनी आंबेडकरी चळवळीला कुठेही बाधा येऊ दिलेली नाही. बहुजना हाती सत्ता यावी, तो शासक वर्ग बनावा यासाठीच्या त्यांच्या प्रामाणिक हेतुला कलंकित करण्याचा कोणीही प्रयत्न करणे ही लज्जास्पद बाब असुन, बहुजनांनी विपरित काळी विनाश बुध्दी येते, असे सांगितले जाते. याचप्रमाणे आपल्या हातांनी आपल्या चळवळीला बदनाम करुन आपल्या पायावर कुर्‍हाड मारुन घेण्याचे प्रयत्न करु नये. उलट सर्व आंबेडकरी चळवळीदारांना संघटित करुन सत्ता प्राप्तीचे सर्वांनी प्रयत्न करावे असे माझे प्रामाणिक मत आहे. 7) वंचित बहुजन आघाडी नावाच्या फळझाडाचे संवर्धन व संरक्षण करणे - मा. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित आघाडी नावाचे गोड फळ देणारे झाड विचारपूर्वक लावलेले आहे. या गोड सत्तारुपी झाडाची फळे खाण्यासाठी सर्व बहुजनांना खाऊ घालण्यासाठी सर्व वंचित बहुजनांनी या गोड फळे देणार्‍या झाडाचे संरक्षण व संवर्धन करणे ही बदलत्या काळाची गरज व वेळ सुध्दा आहे. या झाडाला गोड फळे येणारच आहे. याची मला खात्री आहे. पण या झाडाला गोड फळे येण्याच्या आधीच कच्च्या फळांवर काठी दगडाचा मार वंचितांनी सुरु केला तर पिकलेली गोड फळे हाती न येऊ देण्याला वंचितच जबाबदार व गुन्हेगार राहणार आहे. या सर्व मुद्यावर आपण सर्व सुजाण बहुजन नागरिक, मनन, चिंतन, मंथन करुन विश्‍वरत्न, राष्ट्रपिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याची भीम प्रतिज्ञा करु या. म्हणुन बहुजन बंधू भगीनींनो, माझ्या मते, देशातील निष्ठावान आंबेडकरी पक्ष वगळून इतर सर्व पक्ष हे जातीवादी, धर्मवादी व विषमतावादी आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला वंचित आघाडी हाच एक पक्ष सध्या तरी, समतावादी, जाती व धर्म निरपेक्ष असल्याचे मा. बाळासाहेबांनी सर्व वंचित घटकांना राजकिय क्षेत्रात प्रतिनिधीत्व देऊन सिध्द केलेले आहे. राजकारणामध्ये ज्या समाजाचा प्रतिनिधी असतो, त्यांचा झपाट्याने विकास होतो. याच कारणामुळे सर्व ब्राह्मण, बनिया, मराठा, राजपुत, ठाकूर या वर्ग समुहाचा विकास झालेला आहे. वंचितांचा थोडा फार विकास वंचित मुख्यमंत्री कालवश वसंतरावजी नाईक व मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात झालेला आहे, हे सर्व वंचितांनी जाणून घ्यावे. आता येणार्‍या काळात महाराष्ट्रातील वंचितांचा विकास करुन घ्यावयाचा असेल तर वंचित आघाडीलाच निवडून आणून मा. बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनविल्याशिवाय वंचितांचा विकास शक्य नाही. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री आदरणीय बहन मायावतीजी झाल्यामुळे खुप मोठे परिवर्तन घडून आले आहे. तेव्हा महाराष्ट्रात मा. अ‍ॅड. बाळासाहेब यांना मुख्यमंत्री बनविण्याशिवाय, महाराष्ट्रातील वंचित वर्गाचा विकास होणार नाही, याची जाणीव वंचितांनी ठेवावी असे माझे नम्र आवाहन आहे. जय भारत - जय संविधान राजपालसिंह राठोड औरंगाबाद.

Guru

11 Blog posts

Comments