क्रांतीवीर सेवालाल बापुचे बोल अन गोर जीवनशैली

अठराव्या शतकाच्या चौथ्या दशकांत म्हणजे 15 फेब्रुवारी 1739 गोर समाजात एक महान दूूरदर्शी विचारवंत होऊन गेले. वस्तुत: ते एक पशुपालक,लदेणीद्वारा देशी विदेशी व्यापार करणारे व्यापारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक समता, मानवता, न्यायवादाचे कट्टर वाहक व समर्थक होते.

अठराव्या शतकाच्या चौथ्या दशकांत म्हणजे 15 फेब्रुवारी 1739 गोर समाजात एक महान दूूरदर्शी विचारवंत होऊन गेले. वस्तुत: ते एक पशुपालक,लदेणीद्वारा देशी विदेशी व्यापार करणारे व्यापारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक समता, मानवता, न्यायवादाचे कट्टर वाहक व समर्थक होते. ते गोर व गोरेत्तर समाजाचे प्रबोधनकार सुध्दा होते. त्यांच्या विचारामध्ये, चार्वाक, बुध्द, सम्राट अशोक, चक्रधर, बसवेश्‍वर, रविदास, कबीर, संत नामदेव, तुकाराम, गोरा कुंभार, सेना नाव्ही, जगनाडे महाराज, सावता, नरहरी, संत गाडगेबाबा, तुकडोजी, संत बहिणाबाई, अवंतीबाई, अहिल्याबाई, पेरीयार रामस्वामी, छ. शिवाजी, शाहु, सयाजीराव व म. फुले, सावित्रीबाई,ललईसिंह यादव, कर्मवीर भाऊराव पाटील, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम वगैरे आजपर्यंतच्या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांचे वैचारिक रसायन अथवा शिदोरी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होती. म्हणूनच ते मूर्तीपुजा, व्यक्तिपुजा, मंदिर, तीर्थक्षेत्र, देव, दैव, जाती, वर्णव्यवस्था, यज्ञ, स्वर्ग- नरक, मंत्र-तंत्र, अवतार, पूर्वजन्म, पुन:र्ज़न्म व निरर्थक धार्मिक कर्मकांडाचे कट्टर विरोधक होते. म्हणूनच त्यांनी जनजागृती करतांना गोर बोलीत सांगितले आहे की, केनी भजो, पूजो,धूजो मत अर्थ कोणाच्याही नावााचे स्मरण करु नका. एवढेच नव्हे तर कोणाची पुजा सुध्दा करु नका आणि अंगात देव अथवा देवी आल्याचे ढोंग व फसवेगिरीचे काम करु नका. कारण देव, धर्म, जात, मंदिर आणि तीर्थक्षेत्र हे सर्व परोपजीवी, कष्ट न करता बसून खाणार्‍या ब्राह्मणांनी व त्यांनी पोसलेल्या भट-पुरोहितांनी, भगत भोपानी आणि भगवेधारी भोंदू, आळशी, कामीक साधु संतांनी निर्माण करुन भोळ्या लोकांची फसवणूक करुन बसून खाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. दैवीशक्ती, चमत्कार, मंत्र-तंत्र, पापपुण्य, स्वर्ग-नरक, मोक्ष, मुक्ती हे सर्व थोतांड आहे, असे त्यांनी ठासून सांगितलेले आहेे. वरील वचनावरुन त्यांचे बोल सत्य असल्याची खात्री होते. परंतु त्यांचे भक्त व अनुयायी त्यांच्या शिकवणूकीच्या विरुध्द वर्तन करुन त्यांचा अपमान व बदनाम करीत आहे. सेवालाल बापुचा मुर्तीपुजा, मंदिर, तिर्थक्षेत्र निर्माण, नामस्मरण जात, धर्म, देव संकल्पनेला विरोध असतांना त्यांचे वारसदार अनुयायी, भक्त, समर्थक गोर मात्र त्यांच्या इच्छेच्या विरुध्द मूर्तीपूजा, मंदिर, तीर्थक्षेत्र, धर्माची स्थापणा करुन त्यांना उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. वास्तवात हा सेवालाल बापुचा त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आणि जागृती कार्याचा महान अपमान आहे. त्यांनी दिलेल्या पंचशीलापैकी (पाच पारापैकी) अपवाद वगळता कोेणीही पालन करीत नाही आणि त्यांच्या नावाचा, किर्तीचा, मंदिराचा, क्षेत्राचा फायदा घेऊन पोटासाठी, मोठेपणासाठी, पदासाठी बापुचा वापर करीत आहे. हे कृत्य बापुबरोबर कृतघ्नपणा, धोकेबाजी व सामान्य जनाची फसवणूक करण्यासारखे आहे, असे माझे मत आहे. कोणालाही भजु, पुजू, अंगात देव आणू नका. त्यांचे मंदिर, पुतळे, क्षेत्र बांधू नका असे सांगून गेल्यानंतर सुध्दा त्यांच्या अपेक्षा विरुध्द वागणे, हा त्यांचा अपमान नव्हे का? त्यांचे विचार व कार्य कृतीत आणने, त्याचा प्रचार प्रसार करणे हीच त्याची खरी भक्ती किंवा अनुयायीत्व आहे. गोर छो तो गौर करो म्हणजे गोर म्हणजे विद्वान, विचारी,सभ्य, समजदार, शहाणे, ज्ञानी, मानवतावादी, समतावादी, न्यायवादी. तुम्ही गोर असाल तर प्रत्येक कृृतीचा बरे वाईटपणा तपासून जे सत्य, योग्य, न्यायपूर्ण, समतावादी, उपयोगी आहे, ते विचार करुन आचरणात आणा असे बापुन वरील बोधवचनाद्वारे सांगितले आहे. पण आजचा गोर (विचारी, विद्वान) असतांनाही विचार न करता, दुसर्‍या समाजाची संस्कृती, सभ्यता, इतिहास, साहित्य, देव देवी, जातीप्रथा, धर्माचे सोंग ढोंग, मंदिर, मुर्ती, क्षेत्र निर्माण करुन गोर समाजाच्या आदर्श जात, धर्म, देव देवी, कर्मकांड निरपेक्षतेला कलंकीत करीत आहे. याशिवाय वंदनीय सेवालाल बापुनी गोर समजाला सांगितले आहे की, जाणजो, छाणजो अन पछज मानजो, म्हणजे काय घडत आहे ते आधी जाणून घ्य, नंतर ते योग्य आहे की अयोग्य आहे, याची शहानिशा करा आणि नंतर जे योग्य, सर्वांच्या हिताचे, सत्य आहे, तेच स्वीकारा. आजचा गोर समाज वरच्या बोध वचनातून काही न शिकता नाकात वारा घुसल्यानंतर जनावरे ओरडत कुणीकडेही पळत सुटतात, याचप्रमाणे समोर असलेल्या घटनेची, जात, देव, धर्म, मुर्त्या, पुतळे, स्मारके, मंदिर, तीर्थक्षेत्र, यात्रा, पशुबळी, यज्ञ, भंडारा, भोग,धबुकार, चोकोपूजा, उपासतापास, सण, उत्सव, लग्नकार्य, रुढी परंपरा वगैरे पध्दतीचा, कार्याचा, बरे वाईटपणा न तपासता दुसरे जनसमुह करीत आहे, त्यांचे अंधानुकरण करीत आहे, हे कधीही समर्थनीय नाही. गोर छो तो गौर करो, बना विचार करेर कोई काम मत करो या गोर संस्कृतीच्या मूल्यतत्वाला कलंक लावणार्‍या आणि समाजाला दिशाहीन बनविणार्‍या या कृती आहेत. सेवालाल बापुंनी हक्क अधिकारापासून वंचित लोकांना आणखी एक सत्य सांगितले आहे की, आपण काळे माथेर लोक छा, करनच पगे पगेपर चुके करा छा अथवा रोयती राज मळेनी, कल्लोळ करणु लाग छ याचा अर्थ असा आहे की, निरक्षर असल्याकारणाने आपल्याला काही समजत नाही, आपण रोज किंवा पावला पावलावर चुका करतो व त्याचे परिणाम भोगतो, म्हणून शिक्षण आवश्यक आहे व वंचितांनी हे जाणून घ्यायला पाहिजे की, रडत बसल्याने, नशीबावर बसल्याने किंवा भीक मागत बसल्याने हक्क अधिकार मिळत नाही. ते मिळण्यासाठी, संघर्ष, मोर्चे, आंदोलने, उपोषण, जागरण करावे लागते. यासाठी, सभा, बैठका, अधिवेशन, मेळावे, प्रचार ,प्रसार, वेळ आल्यास त्याग करावे व मरावे सुध्दा लागते. गोर समाज याबाबतीत किती पुढे आहे याबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे. निरर्थक धर्मासाठी, वेळ, मनुष्यबळ आणि पैसा खर्च केल्याने आरक्षण, बढती, अनुशेष, प्रतिनिधीत्व, मतदानाचे अधिकार, संख्येच्या प्रमाणात पैसा, तांड्याला महसुली दर्जा, शिष्यवृत्ती, शाळा व इतर नागरी सोयी सवलती मिळणार नाही. संविधान मोडीत निघाल्यास सर्वांना गुलामी शिवाय पर्याय नाही. म्हणून निरर्थक धार्मिक क्षेत्रात शक्ती वाया घालण्यापेक्षा शिक्षण, उद्योगधंदा, योग्य प्रतिनिधीत्व, नोकरी, आर्थिक वाटा मिळण्यासाठी (लोकसंख्येच्या प्रमाणात) आणि जनगणना, घरकुल योजना, रस्ते, विज, पाणी, स्मशानभूमी, वाचनालय, सभागृह, आरोग्य सेवा वगैरेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. सेवालाल बापुंनी निरक्षर, अडाणी, भित्रे, वंचित समुहाला जागृत करतांना सांगितले आहे की, माणसानी, समाजानी जीवन जगतांना आक्रमक आणि निडर, हिंमतीने जीवन जगायला हवे. कोणासही भिऊन दूर दूर राहणे योग्य नाही. आपल्या हक्कासाठी तो संघर्षशील राहिला पाहिजे. कारण जो छाती (हिंमत) करीय, ओनच साथ मळीय, यश मळीय अन जो हायनाकीय (हिंमत हार जाय वु मर जाय, नष्ट वे जाय असे ठामपणे सांगितले आहे. तात्पर्य, माणसांनी जीवनात निराश, उदास, नाराज होऊन अथवा हिंमत सोडून कोणीही वागू नये. हे जीवन जगत असतांना भले ती भेट रखडो अन सत्कर्म करत जावो. अशाने तुम्हाला जीवनात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्‍वास दिलेला आहे. कथनी करेपेक्षा, करणी (सत्कर्म) करन वतावो. नुसते बोलत राहू नका. प्रत्यक्ष काम करुन दाखवा. कारण सांगत बसण्यापेक्षा स्वत: ते काम प्रत्यक्षात करुन दाखविणे हे केव्हाही उपयोगी आणि श्रेष्ठ, उत्तम आहे यात शंका नाही. आणखी गोर समाजाच्या वास्तविक जीवनाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले आहे की, गोर समाज केशुला फुले प्रमाण मोरीय केशुला फुल अथवा झाडाचे उदाहरण देतांना सेवालाल बापुंनी गोर समाजाच्या वास्तववादी अति कष्टाच्या जीवनाकडे इशारा केलेला आहे. त्याच्या स्वभाव व गुणवत्तेकडे, त्याच्या अभिक्षावृृत्ती अथवा स्वभावाकडे, प्रतिकूल परिस्थितीतही न भिनार्‍या निडर,करारी,स्वाभिमानी स्वभावाकाडे, वैशिष्ट्याकडे इशारा करुन त्यांची तुलना अतिप्रतिकुल परिस्थितीतही पळसाचे फुल कसे लथपथ बहरुन येते, उन्हाळ्याच्या कडक उन्हातही पळस फुलाचे सौंदर्य, जंगलाची शोभा वाढविण्यास कसे कमी पडत नाही, त्याच्यासी तुलना करुन गोर समाजाचे श्रेष्ठत्व, दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे हे विशेष आहे. उन्हाळ्याच्या भर उन्हात,खोडांना पाणी नसतांना सर्व पाने गळून पडल्यानंतरही पळसफुल वेळ वर अमाप प्रमाणात बहरलातो. आपल्या सुगंधाने व रंगाने ते जंगलाची शोभा वाढवितात. उन्हाळा अथवा उन्हाला दोष न देता व पावसाळ्याची प्रतिक्षा न करता फुले वेळेवर बहरुन येतात व त्याचे कर्तव्य पार पाडतात. याचप्रमाणे गोर समाज अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत घाबरत नाही, आपले स्वभाव गुण सोडत नाही. मिळेल ते काम प्रतिकुल परिस्थितीत करतो, पण गयावया करीत नाही, रडत नाही, कोणाला शरण जात नाही, कोणाकडे भीक मागत नाही, तो स्वत:च्या पायावर उभा राहून कष्ट करुन जीवन जगतो, म्हणून सेवालाल बापुनी गोर समाजाला केशुला(पळस फुलाची) उपमा देवून या समाजाच्या स्वाभिमानी कष्टाचा, हिंमतीचा, संघर्षाचा, खरा इतिहास बापूनी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे दिसून येते, तात्पर्य केशुला फुल हे गोर संस्कृती, सभ्यताचे एक आदर्श स्वाभिमानी प्रतिक आहे असे मानावे लागेल. गोर समाजाचा प्राचीन इतिहास अथवा जीवनशैली त्यांचा प्राचीन महत्वाचा व्यवसाय कोणता होता हे जगाला माहित व्हावे व त्यावर त्यांनी कसा विजय अथवा त्यात कसे यश संपादन केले आहे, याबाबत प्रबोधन करतांना अथवा माहिती देतांना सेवा लाल बापुनी कथन केले आहे की, प्राचीन काळात सिंधु संस्कृतीच्या काळात गोर समाजाकडे अमर्याद प्रमाणात शेती होती, तो शेती, पशुपालन करीत होता, पण सिंधु संस्कृतीच्या आर्यांच्या आक्रमणामुळे विनाश झाल्यामुळे गोर समाजाला त्यांची शेती व पशुधन सोडून जंगलात पलायन करावे लागले होते व यामुळे तो भूमिहीन झाला होता. सिंधु नदीच्या परिसरात असलेली त्याची शेती पडीत पडून होती, अर्थात मृत नापीकी झाली होती. गोर समाजाला वन्य साधनांवर जीवन जगावे लागत होते. परंतू सेवालाल बापुला गोर समाजाच्या कष्टाबाबत व शेती प्रेमाबाबत तसेच शेती व्यवसायच्या परंपरागत वारसा हक्का बाबत माहिती असावी म्हणून सिुधु संस्कृतीचे पतन झाल्यानंतर व त्याची शेतजमीन त्यांना सोडावी लागली असली तरी गोर समाज त्याच्या इच्छा शक्तीच्या बळावर व वारसा हक्क प्राप्त करण्यासाठी पडीत अथवा सोडून आलेली शेतजमीन वहीत केल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वास असावा. म्हणूनच त्यांनी गोर समाजाला जागृत करतांना, अथवा प्राचीन गोर जीवनाची माहिती देत असतांना कथन केले होते की, येणार्‍या काही काळात गोर समाज आपली सोडून आलेली शेत जमीन वहीत नसलेली शेतजमीन पुन्हा मिळवून ती वहीत केल्याशिवाय म्हणजे जिवंत केल्याशिवाय राहणार नाही. सेवा लाल बापुचे हे बोल आज सत्यात उतरवलेले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 50 वर्षापूर्वी गोर समाज99% भूमिहीन समाज होता. तो जंगलात राहून वन्य संपत्ती, व पशूवत जीवन जगत होता. पण जंगलात राहत असतांना सुद्धा त्यांनी जंगलाची तोड करुन तेथे शेतजमीन तयार करुन शेती, करायला सुरुवात केली. नंतरच्या काळात त्यांनी शासनाकडून शेतजमीनी मिळवल्या व शेती करता बचत करुन त्यांनी दुसर्‍या शेतमालकांकडून शेत जमीनी खरेदी करुन आज बहुसंख्य गोर समाज हा शेतमालक बनलेला दिसून येतो. याचा अर्थ त्यांनी शेतीरुपी आपल्या सोडून दिेलेल्या आईला पडीत, नाउपजावू,जमीनीला उपजावू बनवून जीवंत केल्यासारखे काम केलेले आहे. गोर समाज येणार्‍या काळात शेती शिवाय जगू शकणार नाही असा सेवालाल बापुना विश्‍वास असेल व गोर समाज आपली सिंधु नदीच्या क्षेत्रात सोडून आलेली शेतजमीन पुन्हा मिळवल्याशिवाय, वहीत केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांचे (बापुंचे) स्वप्न गोर समाजानी सत्यात उतरवले आहे. गोर समाजानी बापुच्या कथनाप्रमाणे आज रोजी मुईमटी, पडीत जमीनी,वहीती केल्या आहे, जीवंत केल्या आहेत. म्हणूनच आज गोर समाजात लोकोक्ति प्रत्येकाच्या तोंडी दिसून येते की गोर समाज, मुईमट्टी, सरजीत, जीवंत करेल आणि हे बोधवचन अथवा लोकोक्ती प्रत्येकाच्या तोंडी दिसून येते,की गोर समाज, मुईमट्टी सरजीत, जीवंत करेल आणि हे बोधवचने अथवा लोकोक्ती आज सत्यात उतरली दिसून येते, कारण एका वेळेस भूमिहीन असलेला गोर समाज आज मोठ्या संख्येने शेतजमीनी बाळगून आहे. खरोखरच गोर समाजानी सेवालाल बापुचे बोल वचन सत्यात उतरवलेले ओह, यात शंका नाही. मुईमट्टी म्हणजे नापीकी, पडीत बंजर शेत जमीन असा अर्थ ध्वनीत झालेला आहे. म्हणून मुईमट्टी म्हणजे पडीत जमीन सरजीत, जीवंत केली जाईल असा अर्थ करावा. क्रांतीवीर, प्रबोधनकार, जागृतीकार,सेवालाल बापु फक्त एक महान विचारवंत, त्यागी महापुरुषच नव्हे तर ते एक महान दृष्टा, अर्थात दुरदर्शी, बुद्धिवान, तर्कवादी, काळाचे चक्र ओळखणारे तत्वज्ञानी होते, त्यांचे अनेक दुरदर्शी येणार्‍या काळात काय काय घडण्याची शक्यता आहे, याबाबतीचे सत्यवचन खालीलप्रमाणे असून काळाच्या प्रवाहात ते खरोखरच सत्य ठरत आहे, सेवालाल बापुनी 250-300 वर्षापूर्वी केलेल्या दूरदर्शीपणा, दृष्टी, विचाराबाबत तीळमात्र शंका कोणीही घेऊ शकणार नाही, असे माझे ठाम मत आहे, त्यांचे दुरदर्शी येणार्‍या काळाचे अंदाज वर्तवणारे वचन खालीलप्रमाने आहेत. 1) रंडीचे, (भ्रष्टाचारी, लबाडांचे) राज्य येईल. 2) कली म्हणजे कलेचा यंत्राचा युग येणार आहे. 3) या यंत्रयुगात महागाई खुप वाढणार आहे 4) एका रुपयात एक कटोरा पाणी मिळेल 5) रुपयाचे बारा-तेरा चने मिळतील 6) सोन्याच्या किमतीत गाई जनावरे मिळतील. 7) जनावरांना चारा कमी पडेल 8) जनावरांच्या हाडाचे ढिगार मिळतील 9) आई-वडील आणि मुलांत विचार राहणार नाहीत 10) सासु सुनेचे पटणार नाही 11) नवरा बायकोचे पटणार नाही 12) नवरा बायको एका ताटात जेवण करतील 13) नवराबायकोचे देखील क्षणात बिघडेल 14) रुपये घराघरात, गल्ली गल्लीत ठेवलेले(लपवलेले सापडतील 15) खायला अन्नधान्य कमी पडेल 16) भ्रष्टाचारीच्या घरी पैसाच पैसा राहील. 17) लोकांना राहायला जागा कमी पडेल 18) लोक पाण्यातसुद्धा घरे बांधतील 19) लोक पाण्यावरसुद्धा शेती करतील 20) जंगले कमी होतील 21) जंगलातील जनावरे गावांत येतील. 22) तर्‍हे तर्‍हेचे रोग येतील 23) घरोघर डॉक्टर वैद्य फिरतील 24) डॉक्टरांना रोगाचे निदान होणार नाही 25) लोक पाहता पाहता मरतील 26) भावाभावाचे पटणार नाही 27) बिना बैलाच्या गाड्या चालतील 28) बिना लग्नाचे मुले-मुली एकत्र राहतील 29) हे सतयुग(साधे) युग आहे, यानंतर(यंत्रयुग) कल युग येईल 30) कलयुगात(यंत्रयुग) गर्दी वाढेल 31) घराघरात भगत भोपे(महाराज) होतील 32) आळी आळीत नगारा( वाद्य) वाजतील 33) घराघरात वाद-भांडणे होतील 34) घराघरात गोंधळ माजेल 35) जगाच्या बातम्या क्षणात कळतील 36) माणसांना पंख फुटेल 37) घर बसल्या बसल्या जग पाहता येईल 38) माणुसकी कमी होत जाईल 39) भ्रष्ट लोक धन पळवतील 40) धान्याचे भांडार भरुन राहतील, पण लोक मरतील 41) लोक बेकार फिरत राहतील 42) चांगले चांगले लोक मोहमायात फसतील 43) लोक दूर दूर जंगलात जाऊन राहतील 44) घराघरात(मुसलकंद) शस्त्रे राहतील 45) सेवाचे (माणुसकीचे) विचार लोकांना तारतील 46) गोर बंजारा समाज कलाकुसरीचे, शिल्पकारीचे कामे करतील 47) अमानवी(पापी)लोकांची वस्ती नष्ट होईल 48) मानवतावादी लोकांची वस्ती टिकून राहील 49) जीवंत नवर्‍याची बायको दुसर्‍याची बायको बनेल 50) खाटकांना जनावरे विकली जातील 51)धर्माच्या नावे गोंधळ माजेल 52) देवाधर्माच्या, जातीच्या नावाने मुडदे पडतील जयभारत- जयसंविधान प्रा. ग.ह. राठोड औरंगाबाद.

G H Rathod

162 Blog posts

Comments