औरंगाबाद शहर हे बंजारा तांडास्थळी वसलेले आहे.

औरंगाबाद शहर हे बंजारा तांडास्थळी वसलेले आहे.

दि.13/2/2022 औरंगाबाद शहर हे बंजारा तांडास्थळी वसलेले आहे. आज औरंगाबाद शहर वसलेल्या स्थळी निजामपूर्व काळात बंजारा तांड्याचे चार नायक म्हणजे चार भाऊ राहत होते. चारही भावांची चार स्थळी वस्ती म्हणजे तांडे होते, असे बंजारा समाजाचे कालवश नेते नान्हूसिंग जेसू जाधव रा. कचनेर पांढरी तांडा-1, यांनी मला 2-3 वेळेस सांगितले होते. नान्हुसिंग जाधव यांना हा इतिहास त्यांचे वडील जेसू नायक यांनी सांगितल्याचे त्यांनी मला सांगितले होते. नान्हूसिंग जाधव हे वयाच्या 95 व्या वर्षी 5-6 वर्षापूर्वी वारले. त्यांच्या वडिलांनी सांगितलेला हा इतिहास आजपासून सव्वाशे ते दीडशे वर्षांपूर्वीचा असावा. त्यांचे म्हणने असे होते की, पदमसिंग, भावसिंग, करणसिंह व करोडीमल हे चार भाऊ किंवा नायक आजच्या औरंगाबाद स्थळी तांडावस्ती करुन काही अंतरावर राहत होते. पदमसिंह नायक हे आजच्या पदमपुरा स्थळी, भावसिंग नायक हे भावसिंगपुरा स्थळी राहत होते. इतर नायक सुद्धा लहान लहान वस्ती करुन याच परिसरात राहत होते. 12-13 लहान मोठे तांडे या भूमीवर राहत होते. पण इतर नाईकांची नावे त्यांच्या स्मरणात नसल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळी बंजारा समाज गुरांच्या पाठीवर व्यापार करीत होता व यामुळे तांडेसुद्धा अस्थिर होते, म्हणजे स्थलांतरित होत होते. म्हणून या स्थळी जेव्हा निजामशाहीचे वर्चस्व वाढले, तेव्हा काळाच्या प्रवाहात तांडे व त्यांचे नायक सुद्धा स्थलांतरीत झाले. पण त्यांच्या तांड्याच्या नायकांच्या नावावरुन त्या तांडा स्थळांना नायकाच्या नावाने संबोधले जाऊ लागले व आज सुद्धा संबोधले जात आहे. पदमसिंह नायकाच्या तांड्याला पदमपुरा, भावसिंग नायकाच्या तांड्याला भावसिंगपुरा, करणसिंह नायकाच्या तांड्याला कर्णपुरा व करोडीमल नायकाच्या तांड्याला किराडपुरा या नावाने संबोधले जाते. काळाच्या प्रवाहात परिस्थितीनुसार हा वास्तव इतिहास विसरला गेला आहे किंवा पडद्याआड लपविण्यात आल्याचे दिसून येते. परंतु तर्क व वरील पुराव्यांआधारे हा कथित इतिहास 100 टक्के वास्तव वाटतो. हा इतिहास किंवा कथा मी 1965 मध्ये नान्हूसिंग जाधव कडून ऐकली होती, ती चिंतनार्थ जसीच तसी मी येथे दिलेली आहे. प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments