भटक्या निम भटक्या समाजाची प्रगती विचार परिवर्तनानेच शक्य आहे.

भटक्या निम भटक्या समाजाची प्रगती विचार परिवर्तनानेच शक्य आहे.

दि. 1/2/2023 भटक्या निम भटक्या समाजाची प्रगती विचार परिवर्तनानेच शक्य आहे. भारतातील संपूर्ण मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, भटक्या, अर्धभटक्या, विमुक्त, गुन्हेगार व अल्पसंख्य समाजाचा इतिहास, कष्टकरीचा, स्वावलंबी, स्वाभिमानी, बहादुरी, गणसंघ, लोकतांत्रिक, मातृप्रधान, राष्ट्रीय सेना द्वारा राष्ट्र रक्षक, संघर्षशील, समतावादी आदर्श जीवनशैलीचा इतिहास आहे. वरील संपूर्ण समूह हाच या देशाचा खरा मुळनिवासी, मालक व राजा होता. या देशाची प्रगती, सुख, समृद्धी, शांतता, संरक्षण, देशाला आवश्यक असणार्‍या सर्व खाद्यपेय, वस्त्र, अलंकार, शस्त्रे, घरगुती वस्तुंचा तो स्वतंत्र निर्माता होता. देशाच्या रस्त्यांचा, मोठमोठ्या इमारतीचा, विहीरी, तळे, धरणे, कारखाने, खदानी, बस, रेल्वे, विमानतळ, शेतीची अवजारे, निर्माता व संशोधक सुध्दा तोच होता व आजही या सर्व बाबींचा कर्ता धरता हाच मागास वर्ग आहे. सवर्ण समाज हा प्राचीन काळापासून विना कष्ट या मागास समाजाला अशिक्षित ठेवून त्यांच्या कष्टाचे शोषण करून व त्यांचे घटनात्मक अधिकारांचे हनन करून आरामाचे व भोगवादी जीवन जगत आहेत. लोकशाहीच्या देशात सवर्णांनी मागासवर्गाचे हेतूपुरस्सर शोषण करून त्यांची प्रगती थांबविणे, हा जघण्य अपराध आहे. अमानविय व्यवहार व मानवी हक्काचे हनन आहे. सवर्ण समाजाने या मागासवर्गाला त्यांच्या विरोधात संघटीत होऊ नये व देशाच्या साधनसंपत्तीमध्ये वाटेकरी होऊ नये म्हणून या अशिक्षित, अडाणी वर्गाची अनेकानेक जाती, धर्म, देव-देवी, मध्ये विभागणी करून त्यांच्यात भांडणे व स्पर्धा लावून दिल्यामुळे ते दिवसेंदिवस सत्ता व सुख साधनांपासून दूरावत असून सवर्ण लांडग्यांना संपूर्ण देशच लुटण्याची व घराणेशाही निर्माण करण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे. या संधीचा दुरोपयोग सवर्ण समाज राक्षसी व दमन पद्धतीने करीत आहे, हे कृत्य देशाच्या हिताच्या दृष्टीने अतिशय घातक असून देशात हुकुमशाही निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. देशाचा खरा आधार शेतकरी-कष्टकरी वर्ग, सीमा संरक्षक दल, पोलीस वर्ग, शिक्षक, संशोधक, वैद्यक (चिकित्सक) वर्ग, परिवर्तनवादी साहित्यिक, सुधारक वर्ग आहे. परंतु या वर्गावर अक्षम्य अन्याय-अत्याचार होत असून मूठभर उद्योगपती, आमदार खासदार, अधिकारी वर्ग सर्व मागासवर्गीयांना लुटून, शोषण करून गुलाम व वेठबिगार बनविण्याचे कपट कारस्थान चालू आहे. या कपट कारस्थानाचे सर्वाधिक बळी भटके, निमभटके, विमुक्त, गुन्हेगार व इतर मागासवर्ग ठरत असून हा वर्ग अन्न, वस्त्र व निवासाअभावी हैराण आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, स्वास्थ्य, रोजगाराचा अभाव, नोकर्‍यांचा अभाव, महागाई, लिचिंग, स्त्रियांचे शीलहरण, अन्याय, अत्याचार, देवाधर्माच्या, जातीच्या नावाने अन्याय, अत्याचार, पक्षपात यामुळे हा वर्ग त्रस्त झाला असून पशुसमान जीवन जगत आहे. अति गरिबी, महागाई, अन्याय, अत्याचार, बेकारी, अशिक्षितपणा यामुळे हा वर्ग आधार व संरक्षण, सहकार्याच्या अपेक्षेने धर्मांतराकडे वळला आहे. हा वर्ग स्वत:ला हिंदू मानतो. हिंदू धर्माचे आचरण, देव-देवीचे कर्मकांड करतो. पण सवर्ण हिंदू त्यांना बरोबरीचे अधिकार देत नसल्यामुळे त्यांना धर्मांतराशिवाय पर्याय सापडत नाही, ही एक शोकांतिका आहे. वस्तुत: संपूर्ण मागासवर्ग हा सिंधू संस्कृतीचा म्हणजे प्रकृती, पूर्वज, पशूवंदक होता. त्या काळात जाती, धर्म, देव-देवी, कर्मकांड या संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या. म्हणजेच मागास, भटका समाज हा पूर्णत: जात, देव, धर्ममुक्त निधर्मी, धर्म, जात, कृत्रिम देव मानणारा नव्हता. परंतु सिंधू संस्कृतीचा पराभव झाल्यापासून आजपर्यंत मनुवादी आर्यांचे, वैदिकांचे, सनातन्यांचे, पुराणवाद्यांचे, ब्राह्मणी विचारधारेचे म्हणजे धर्माचे वर्चस्व वाढल्यामुळे या धर्माचे संस्कार, दबाव, सहचर्य अर्थात सहयोगी जीवन, कर्मकांडांचे प्राधान्य, प्रचार, प्रसार, मान-सन्मान, आकर्षण यामुळे मागासवर्ग हा या ब्राह्मणी धर्माचा अनुकरणप्रिय बनला. वस्तुत: तो प्राचीन काळात धर्मविहीन धर्मनिरपेक्ष, निधर्मी, धर्म न मानणारा, निसर्ग, प्रकृती, अदृश्य शक्तिला मानणारा व वंदन करणारा होता. परंतु विदेशी अश्रमी, परोपजीवी, आळशी, स्वार्थी, असभ्य, शोषक, विषमतावादी ब्राह्मण वर्गाने जाती, धर्माच्या नावाने बिनाकष्टाची शेती म्हणजे 33 कोटी देव-देवता, हिंदू (ब्राह्मण) धर्म मंदिर, देवळे, मठ, तीर्थक्षेत्रे आयतखाऊ साधू-संतांची, पुजार्‍यांची फौज तयार करून तो या देव, मंदिर, क्षेत्र नावाच्या शेतीतील उत्पन्नावर बसून तुपाशी खात आहे. बिनडोक मागास बैलाप्रमाणे राबून दान-दक्षिणा, पूजा, ग्रहशांती वगैरेच्या माध्यमाने ब्राह्मनांना घरात बसवून खाऊ घालत आहे. मागास वर्ग देव धर्माकडे वळला नसता आणि कष्टाचा पैसा त्यांनी शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार, संघटन, सत्तेकडे वळला असता तर अल्पसंख्य सवर्ण समाजाला हटवून बहुसंख्य मागास वर्ग गुलाम न बनता आज सत्ताधारी निश्‍चित असता असे मला वाटते. आता आपण मागास व भटके, अर्धभटके यांच्या विचारशक्तीबाबत विचार करू या. मानव हा विचारशील प्राणी आहे, असे म्हटले जाते. तसेच विचार न करणारा पशुसमान मानला जातो. विचार करणारा माणूस बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञान व सत्यवादी मानला जातो. पण बुद्धिवादी, विचारवान माणूस शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार, अनुभव यांनीच घडतो. शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार व अनुभव देण्याची शासक वर्गाची जबाबदारी असते. पण शासक वर्गच बुद्धिहीन असेल तर प्रजा बुद्धिवान होणे शक्य नाही. शासक वर्गाच्या डोक्यात जाती, कृत्रिम देवी-देवता, विज्ञानहीन, तर्कहीन धर्म, पंथ, निरर्थक कर्मकांडरुपी गोबर भरलेला असेल तर प्रजेच्या डोक्यातही गोबरच राहणार यात शंका नाही. मृत, निर्जीव दगड, धातु, काष्टच्या, चित्राच्या देव-देवीला आरशासमान सोन्या-चांदीचे करोडो अब्जो रुपयांचे मंदिरात बसविणे आणि सर्व प्रकारच्या गरजा भागविणार्‍या कष्टकर्‍यांना, उघड्यावर ठेवणारे उघडेपाघडे ठेवणारे, अर्ध उपाशी, निरक्षर, अडाणी, बेरोजगार ठेवणारे आणि भीक मागायला लाचार करणारे शासकवर्ग आणि समाजच आहेना. असा हा समाज बुद्धिवादी कसा असू शकतो? जसा राजा तशी प्रजा असे म्हटले जाते. राजा बुद्धिहीन अंधश्रद्ध असल्यामुळे प्रजासुद्धा विचारहीन आणि अंधश्रद्ध बनलेली आहे. आज शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाची गरज, स्वास्थ्यासाठी दवाखाण्याची गरज, गांव सुधाराची गरज असताना सुंदर शहरे, गल्लीबोळात मंदिर, तीर्थक्षेत्रे व तिथपर्यंत दर्शनासाठी हायवे निर्मितीचे काम चालू आहे. ग्रामीण क्षेत्रात उच्च व दर्जेदार शिक्षण, स्वास्थ्य, पिण्याचे पाणी, रस्ते, बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातला कर्मचारी वर्ग आणि गावकरी सुद्धा शहराकडे धाव घेत असून गांवे ओसाड पडत आहेत. शेती करायला मजूर व शेतमालाला भाव नसल्यामुळे महागाई, बेरोजगारीमुळे स्वहत्या वाढत आहेत. 33 कोटी देव-देवता मंदिराच्या एका कोपर्‍यात दडून बसलेले आहेत. देशात कोरोना दुष्काळ, महापूर, विदेशी आक्रमण, गुंड, दहशतवादी, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा यांनी कहर माजविला आहे. मंदिर, तीर्थक्षेत्रांतील देव-देवी कष्टकरी वर्गाला काय देतात, याबाबत काहीच विचार करीत नाही. उलट श्रद्धेच्या पोटी दान-दक्षिणाच्या माध्यमाने कष्टकरी बरबाद होतो. संकटप्रसंगी मदत करण्यासाठी संरक्षक दल, पोलीस, शेजारी, आप्तेष्टच येतात. मंदिरातील देव कधीच लोकांच्या मदतीला येत नाही. उलट परोपजीवी पुरोहितांसाठी दान-दक्षिणेद्वारे धन जमा करीत राहतो. ब्राह्मण पुरोहित जमा रकमेतून एक पैसा देखील कष्टकर्‍यांसाठी खर्च करीत नाही. बहुजन संत आणि समाजसुधारकांनी काय सांगितले आहे, यावर बहुजनांनी गंभीरपणे चिंतन करावे. 1) देव पहावयासी गेलो। देव होऊनी ठेलो। देव देव करता शिनले माझे मन। जेथे जाय तेथे दगड सेंदूर। म्हणती देव मोठे मोठे। पूजीताती दगड गोटे सोडूनीय आईबापा। भटा म्हणती पाया पडू देव बापा। तुका म्हणे कैसे हे अंध जन। गेले विसरुन खर्‍या देवा। वेड लागले लोकांना। देव मानती दगडाला। 2) पत्थर पूजेसे हरी मिले, तो मै पूजू पहाड। इस पत्थरसे चक्की भल्ली। पिस खावे पुरा संसार। 3) काकर पाथर जोडीके, मजिद लियो बनाये। ता चढ़े मौला बांगदे, क्या बहिरा है खुदा। 4) नवसे कन्यापुत्रे होती। का करावे लागे पती। 5) मंत्राने मरे अरि। कशाला हवी तलवार कट्यारी। मित्रांनो, वरील सुभाषिते ही संत तुकोबा व संत कबीराची असून सहज समजण्यासारखी आहेत. म्हणून मी विस्ताराने अर्थ देत नाही. तात्पर्य, असा की आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी आपण सर्व मागास वर्ग भटक्यासह जातीय भेदभाव, देव, दैव, धर्म व धार्मिक कर्मकांडे मानत नव्हतो. कष्ट करून, उद्योग करून सर्वजण एकोप्याने राहत होतो. आपण जातीवादी, धर्मवादी, 33 कोटी देववादी, मूर्तीपूजा, मंदिर, तीर्थक्षेत्रे निर्माते नव्हतो. त्यांची आपल्याला गरज पडली नाही, आताही नाही. जाती, देव, दैव, धर्म, मूर्ती, मंदिर, तीर्थक्षेत्रे हे ब्राह्मणांनी कष्ट न करता बसून खाण्यासाठी व बहुजन मागास भटक्या विमुक्तांना लुटून फसवून खाण्यासाठी बनविले असून ब्राह्मणांच्या अधिन मागासांना रहावे लागत असल्यामुळे ते मागास राहिले आहेत. त्याच्या फायद्यासाठी त्यांनी मागासांना जातीवादी, धर्मवादी, मूर्ती, मंदिर, क्षेत्रवादी बनविले आहे. मागास, भटके सर्व जाती, धर्मवादी मूर्तीपूजावादी नव्हते व आजही निधर्मी राहिले तर आपले काही बिघडणार नाही. कष्टाशिवाय देवालाही काही मिळत नाही व मागास कष्टकरी आहे म्हणून कष्टच आपला खरा धर्म व देव आहे. कष्टाशिवाय जगू वाचूच शकत नाही. म्हणून सर्व जगाचा धर्मसुद्धा कष्ट म्हणजे श्रम धर्म आहे. हिंदू, मुसलीम, शीख, इसाई हे ठरावीक समाजाचे स्वार्थ साधन आहे. म्हणून सर्व मानवी धर्माचे त्याग करून नैसर्गिक श्रम धर्माचे पालन करावे, असे माझे मत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व धर्मीयांचा, भारतीयांचा देशाचा संविधान हाच खरा व श्रेष्ठ धर्म आहे. देशाच्या संविधान/घटना/कायदा/नियम या धर्माचेच सर्वांनी पालन व संरक्षण करणे अनिवार्य आहे. जातीय आधारावरील जे धर्म आहेत, उदा- हिंदू, मुसलीम, इसाई, शीख, पारसी, लिंगायत, जैन, बौद्ध वगैरे ज्यांनी त्यांनी आपल्या घर अंगणात मानावे, साजरे करावे. दुसर्‍यांना अडचण होईल असे धर्माच्या नावाने कोणीही कोणतेही धार्मिक कर्मकांड सार्वजनिक स्थळी करू नये. भारत व भारताचे संविधान हे जात, ईश्‍वर, धर्मनिरपेक्ष आहे याची सर्वांनी जाणीव असू द्यावी, हे खर्‍या राष्ट्रीयत्वाचे प्रतिक, लक्षण आहे. देश, धर्म, जात, ईश्‍वर व धार्मिक निरर्थक कर्मकांडमुक्त कसा राहील याची काळजी विशेषत: शासन व समाजाने घ्यावी. असे वागल्यानेच देशाची सर्वांगीण प्रगती घडून येईल व तो विश्‍व गुरू व सर्वश्रेष्ठ बनेल. मात्र देश व्यसनमुक्त व जातीमुक्त बनणे ही पहिली गरज आहे. दुसरी बाब ईश्‍वर म्हणजे सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व व्याप्त, सर्व संकटमोचक नव्हे. सर्व देव-देवी, समाज, देश सुधारक, पालक, संरक्षक आणि मार्गदर्शक आहे. हे कालवश देव (महामानव) काही मागत नाही, घेत नाही, देत नाही. त्यांना दिलेल्या कोणत्याही वस्तुंचा ते वापरसुद्धा करीत नाही. मंदिर, तीर्थक्षेत्र, स्मारक बनले जावे अशी त्यांची मागणी किंवा अपेक्षा सुद्धा नव्हती. मग त्यांच्या नावाने हे सर्व कोण करतो का करतो, हे ओळखून आपण अशा फसव्या बाबींपासून दूर राहणे हे केव्हाही श्रेयस्कर, श्रेष्ठतर होय. पडद्याआडून या सर्व खेळाचा खेळाडू ब्राह्मणच असतो व सर्व फायदे ब्राह्मणच लाटतो. तेव्हा देव व धर्माविषयीचे सर्व विचारांचा त्याग करून देव, धर्म, जात निरपेक्ष जीवन जगून सर्वांना सोबत घेऊन सुख, शांती व समृद्धीचे मार्ग सर्वांनी अवलंबवावा असे मनापासून वाटते. जय भीम- जय भारत- जय संविधान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments