गोर बंजारा साहित्य संमेलन आणि कुर्‍हाडीचा दांडा

गोर बंजारा साहित्य संमेलन आणि कुर्‍हाडीचा दांडा

दि. 25/05/2022 गोर बंजारा साहित्य संमेलन आणि कुर्‍हाडीचा दांडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की, ज्या समाजाला आपला सामाजिक इतिहास माहीत नाही, तो समाजाचा इतिहास निर्माण करू शकत नाही. असा अज्ञानी समाज दुसर्‍याचा गुलाम बनतो किंवा कालप्रवाहात नष्ट होतो. अशाच प्रकारे गोर साहित्य संमेलनाचा ज्यांना खरा इतिहास माहीत नाही, असे लोक साहित्य संमेलने घेऊ शकत नाही. ते फक्त साहित्यिकांना, संमेलनाला व समाजाला बदनाम करून परंपरा खंडित करू शकतात. जिल्हा पातळीवरचे साहित्य संमेलन कालवश देवीदास मुडे गुरुजी व कालवश प्रा. मोतीराज राठोड यांनी घेतलेेले आहे, याला कोणीही नकार देणार नाही. पण अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन घेण्याची कल्पना ही प्रा. ग. ह. राठोडची आहे. या कल्पनेला मूर्त स्वरुप देण्याचे काम विशेषत: डॉ. प्रकाश राठोड, प्रा. विक्रम जाधव, प्रा. ताराचंद राठोड, प्रा. धोंडू चव्हाण, सीताराम राठोड व इतर काही नागपूरकरांनी, पत्रकार मनोहर चव्हाण यांच्या सहकार्‍याने वाशिमचे प्रथम साहित्य संमेलन पार पाडले आहे. दुसरे साहित्य संमेलन सुद्धा नागपुरला वरील मंडळींच्या प्रयत्नानेच घेण्यात आले होते. पहिल्या व दुसर्‍या साहित्य संमेलनाला अखिल भारतीय बंजारा सेवा संघाची संमती होती. संघाने मदतसुद्धा केली होती. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व मनोहर चव्हाण हे संयोजक होते. पण ऐन वेळी बंजारा सेवा संघाने (स्वागतपदासाठी) परवानगी व मदत सुद्धा नाकारली आणि (नागपूर) ऐवजी मुंबईला साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले. काही हितशत्रुंनी नागपुरच्या दुसर्‍या संमेलनावर बहिष्कार टाकून मुंबई संमेलनाचे समर्थन केले. परंतु स्वागत अध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण व पत्रकार मनोहर चव्हाण आणि इतर काहींनी वप्रा. ग.ह. राठोड यांच्या सल्ल्याने स्वतंत्र साहित्य संघाची निर्मिती करून या संघामार्फत नागपुरचे दुसरे साहित्य संमेलन यशस्वी केले. दुसर्‍या साहित्य संमेलनाचे खरे संमेलनाध्यक्ष डॉ. प्रकाश राठोडच होते. पण बंजारा सेवा संघाने धोका दिला व फुट पाडल्यामुळे व काही हितशत्रुंचा विरोध व धनाभावामुळे अध्यक्ष बदलावा लागला. कारण पैशाशिवाय संमेलन पार पडणे शक्य नव्हते. म्हणून नियुक्त संमेलन अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोडच्या संमतीने साहित्य संघाने दुसर्‍या संमेलनाध्यक्षाचा शोध सुरू केला. अशा वेळेला संमेलनाला मदत करण्यासाठी व अध्यक्ष बनण्यासाठी पवार दांपत्य पुढे आले. संघाला प्रतिकूल परिस्थितीत दाता व अध्यक्ष मिळणे अवघड झाल्यामुळे महिला अध्यक्ष असणे ठिक समजून काही कमतरता असुनही संघ व समितीने श्रीमती सुनीता पवार यांची संमेलन अध्यक्षपदी निवड केली होती. आर्थिक मदत व परिवर्तनवादी विचारांची संमेलनात मांडणी करण्याचे पवार दांपत्याने संघ समितीला आश्‍वासन दिले होते. पण या दोन्ही आश्‍वासनाची पूर्तता पवार दांपत्याने केली नाही. अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. साहित्य संघ अध्यक्ष प्रा. ग.ह. राठोड त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असुनही ते संमेलनासारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील मुद्यावर चर्चा करण्यासाठी कधीही एकत्र आले नाही. अखिल भारतीय प्रथम साहित्य संमेलनाला मदत व परवानगी देणारे व दुसर्‍या साहित्य संमेलनाला प्रथम परवानगी देऊन नंतर नकार देणारे अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजू नायक यांनी नागपुरच्या दुसर्‍या साहित्य संमेलनानंतर लगेच पाचवे अखिल भारतीय साहित्य संमेलन कसे घेतले, हे कधी न समजणारे कोडे आहे. नवनिर्मित अखिल भारतीय साहित्य संघाने साहित्य संमेलन घेण्याचे, अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष, संयोजक नेमणुकीचे सर्व अधिकार साहित्य संघाकडे ठेवले आहे. तेव्हा पूर्व अध्यक्षाची संमती, निमंत्रण देणे किंवा न देणे हा अधिकार सर्वस्वी संघाकडे आहे. डॉ. अशोक पवार व डॉ. श्रीमती सुनीता पवार यांनी अध्यक्ष बनण्यापूर्वी दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही व संघाशी संबंध सुद्धा ठेवला नाही. तेव्हा आपोआपच साहित्य संघाशी त्यांचे संबंध राहिलेले नाही व यामुळे त्यांच्याशी संपर्क ठेवण्याची संघालाही गरज नाही. साहित्य संघाविरुद्ध व साहित्य संमेलनाविरुद्ध काही विघ्नसंतोषी, कुर्‍हाडीचे दांडाधारी यांना घेऊन तक्रार करणे व्यर्थ आहे. या दंपतीचा खरा इतिहास संघाला माहीत आहे. प्रसंग आल्यास हा इतिहास जनतेसमोर आणता येईल. साहित्य संमेलनात महिलांना प्राधान्य देण्यात यावे व संमेलन यशस्वी करण्यासाठी ऐन संकटप्रसंगी मदतही मिळावी, म्हणून श्रीमती सुनीता पवार (राठोड) ची संघाने नेमणूक मोठ्या अपेक्षेने केली होती. वेळ वाया जाऊ नये व संमेलन यशस्वी व्हावे या हेतुने प्राधान्य देण्यात आले होते. पण त्यांनी संघाची अपेक्षा भंग केली. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे साहित्य संमेलनाला काही मोजक्या लोकांची कांव कांव दिसत आहे. कांव कांव करणारे 8/10 विचारवंत असतील. यादी मात्र साठ लोकांची दिसून येते. या कावळ्यांचे म्हणणे आहे की, संमेलन हे बुद्धवादी आहे. आजपर्यंतचे तिन्ही संमेलन गोर बंजारा समाजाला बुद्धाकडे नेण्याचे प्रयत्न करीत आहे. म्हणून हे संमेलन गोर, धाटी, द्रोही संमेलन आहे. विचारवंतांना हे का समजत नाही की, जगात दोनच विचारधारा आहे. एक पुरोगामी व दुसरी प्रतिगामी किंवा परिवर्तनवादी व अपरिवर्तनवादी. धर्म अनेक आहे. भारतात लोकशाही आहे व लोकशाहीने स्वातंत्र्य दिलेले आहे की, देश धर्मातीत आहे पण जनतेला कोणताही धर्म, धंदा, निवास, भाषा, अलंकार, पोशाख, संस्कृती, रक्तसंबंध, स्वीकारण्याचा अधिकार आहे. राष्ट्रहित सांभाळून सर्वांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. जे गोर मुसलीम, इसाई, बौद्ध, शिख, राजपूत झालेत, त्यांना दोष देणारे, बदनाम करणारे तुम्ही कोण आहात व घटनेने त्यांना हे अधिकार दिलेले आहेत. विचारांची लढाई विचारांनी झाली पाहिजे, मुजोरपणाने, हुकुमशाहीने योग्य नाही. ज्यांना धाटीच्या मार्गे जाणे आहे, ज्यांना धर्माच्या मागे जाणे आहे, ज्यांना धम्माच्या मार्गे जाणे आहे, तो त्यांच्या इच्छेचा, अधिकाराचा प्रश्‍न आहे. तुम्हाला ज्या मार्गाने जाणे आहे, त्या मार्गाने जा. प्रचार, प्रसार करा तसे साहित्य निर्माण करा आणि परिवर्तन घडवून आणा. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. जे शंभर वर्षांपूर्वी होते, ते आज नाही. मग तुम्ही भुतकाळात जाणार आहात काय? काय योग्य व काय अयोग्य हे काळ आणि वेळ ठरवित असते. रुढीग्रस्त, मनुवादी ठरवू शकत नाही. संत तुकडोजीने सांगितले आहे की, रुढी सनातन है नही, बदले समय अनुसार है। स्थल, काल आदी भेदसे, बने सार असार है। पर तत्व जो है सत्य के, वे बदलते नही। बस यही है, मेरा धर्म, मत भूल के कहना कही। तथागत बुद्धाला मानणार्‍याचा, त्यांच्या विचारधारेला, मार्गाने वागणार्‍याचा काही विद्वान द्वेष करतात. त्यांना महार, धेड म्हणून हिनवितात. पण देशाची घटना एका महाराने, धेडानी लिहिली आहे. या घटनेवर पूर्ण देशाचा कारभार चालु आहे. या घटनेमुळे तुम्हाला पाच हजार वर्षांच्या गुलामीतून मुक्त होता आले आहे. शिक्षण, सत्ता, संपत्ती, साधने, सुख, संरक्षण, शांती, समृद्धी मिळाली आहे. ही घटना पूर्णत: बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर उभी आहे. या बुद्धाला (गौतमाला) छ. शिवाजी, सयाजीराव, रा. शाहू, म. फुले, डॉ. आंबेडकर, सर्व संतांनी, सेवालाल बापु, वसंतराव नायक बापु, काशीराम, उपरेकाका, अशा हजारोंनी गुरू मानून समाजकार्य आणि मनुवादाचा विरोध केलेला आहे. बुद्धाला मानणार्‍यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. जगात 600 कोटीपैकी दीडशे कोटी लोक बौद्ध आहेत. भारताची ओळख पूर्ण जगात बौद्ध (बुद्धांचा) देश म्हणून आहे. जगात सर्वाधिक मूर्त्या, विहारे गौतमाची म्हणजे बुद्धांची आहेत. बुद्ध विचारधारा ही हिंदू (ब्राह्मण), मुसलीम, शिख, इसाई, पारसी पूर्वीची आहे. गौतम बुद्धांनी व डॉ. आंबेडकरांनीच भारतातून शोषक, लुटारू, ब्राह्मणांवर हल्ला करून बहुजनांना आज जे मिळत आहे, ते मिळवून दिलेले आहे. 33 कोटी देवांनी भारताला स्वातंत्र्य, मिळवून दिलेले नाही. देशाची घटना आणि घटनेमुळे मिळालेले सर्व अधिकार हे केवळ गौतम बुद्ध अनुयायी डॉ. भीमराव आंबेडकरांमुळे मिळालेले आहे. जर तुम्ही भारतीय घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानत असाल तर त्यांचा गुरू गौतम बुद्धांचा अपमान करणे हा कृतघ्नपणा, अविचारीपणा आहे, यात शंका नाही. गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण विश्‍वाचे बाप आहे. जे 33 कोटी देवांनी, आईवडिलांनी तुम्हाला दिले नाही ते या दोन महामानवांनी सर्व जगाला दिले आहे. तेव्हा तुमच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांंचा जयजयकार करा, डोक्यात शेण भरले असेल तर रामकृष्ण घोटत ब्राह्मणांची अखंड गुलामी करीत राहा. बुरा जो देखन मै चला, बुरा न मिला कोई जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोई। जय भारत - जय संविधान राजपालसिंह राठोड सचिव, अखिल भारतीय बंजारा सेवा संघ.

G H Rathod

162 Blog posts

Comments