भारतात महापुरुष जन्मास आले नसते तर जंगल राज्य असते?

भारतात महापुरुष जन्मास आले नसते तर जंगल राज्य असते?

जगात मानव समाजाचा इतिहास आजपासून मागील 7 ते 10 हजार वर्षांचाच उपलब्ध आहे, असे विद्वानांचे आणि इतिहासकारांचे, पुरातत्वविदांची मते आहेत. तद्पूर्वी पृथ्वीतलावर विविध गरीब पशु-पक्षी व हिंस्त्र पशुपक्ष्यांचे साम्राज्य पसरले आहेत. बलवान पशु आणि हिंस्त्र पशु-पक्षी, गरीब पशु-पक्षी व जलचर जिवांची निर्दयपणे शिकार करून मौजेचे आणि ऐश आरामाचे, भोगवादी जीवन जगत होते. गरीब, दुर्बल पशुपक्षी, वन्य धान्य, झाडांची मुळे, कंद, फळे खाऊन जगत होती. हे निसर्गचक्र मागील लाखो-करोडो वर्षांपासून चालू होते. पृथ्वीतलावर आजच्या सारखी शेती नव्हती. सर्वत्र विविध प्रकारचे गवत आणि वृक्षवल्लींचे धनदाट जंगल पसरलेले होते. मोठ मोठे जलसाठे व त्यात परस्परांवर जगणारे जीव अमर्याद वाढले होते. मात्र कधी कधी वाळलेल्या झाडांच्या फांद्या परस्परांवर घासून अग्नी तयार होऊन जंगल पेटले जात होते. जलसाठ्यापर्यंत जंगले पेटून त्यातील सर्व वन्य जीव नष्ट होत होते. फक्त पाखरे वाचत होती. पाण्यात पोहणारे प्राणी काही प्रमाणात वाचत होते. अग्नी भक्षस्थानी पडणारे सर्व जीव नष्ट होत होते. मानवाचा कुठेही पत्ता नव्हता. परंतु विचारी, बुद्धिवादी मानवाची जेव्हापासून या धरतीमातेवर उत्पत्ती झाली, तेव्हापासून मानवाने जंगले तोडून, जाळून शेती करायला आणि सुरक्षितस्थळी सुद्धा राहायला सुरुवात केली. प्राथमिक अवस्थेत मानव वन्य संपत्तीवर आणि जंगली पशुपक्ष्यांची शिकार करून जगला. हत्यारांचा शोध लागल्यानंतर त्यांनी हिंस्त्र पशुंवरही विजय मिळविला आणि शेतीचा शोध लावून, अन्नधान्यावर आणि काही पशुपालन करून मानव आनंदाने, सुखाने, संरक्षण हेतु संघटितपणे जगू लागला. पुढे मानव देशी-विदेशी व्यापारही करू लागला. आज तर मानवाने स्थल, जल आणि अंतराळावरही कब्जा केला आहे. पण विज्ञानाच्या शोधामुळे आणि अविचारीपणामुळे द्वेष, लोभ, तृष्णा, अहंकारामुळे संपूर्ण मानव समुहच नष्ट होण्याची लक्षणे दिसून येत आहे. मानवाची उत्पत्ती झाल्यापासून मानव इसवीसनपूर्व 1500 पर्यंत म्हणजे आजपासून 3500 वर्षांपूर्वी पर्यंत परस्पर द्वेष, तृष्णा, अहंकारामुळे सामूहिक जीवन जगत होता. मानव इसवीसन पूर्व 1500 पर्यंत सुख, समृद्धी आणि शांततेचे सामूहिक कष्ट करून जीवन जगत होता. परंतु इसवीसनपूर्व 1500 नंतर मात्र देशात एक आळशी, आयतखाऊ, कष्ट न करणारी, शेती, व्यापार, धंदा न करणारी केवळ लुटमार आणि सर्व प्रकारच्या पशु-पक्ष्यांचे केवळ मांसाहार करून जगणारी टोळी भारतात आली. लुटमार, लढाई, जाळपोळ, स्त्रिया उचलून नेणे, माणसाचा संव्हार करणारी, बसून खाणारी टोळी भारतात आली. भारतातील कष्ट करून सामूहिकपणे संघटित रुपात समाज आणि शासन व्यवस्था निर्माण करून द्वेष, तृष्णा, अहंकारमुक्त, सुख, समृद्धीचे, शांतीचे आणि समतेच्या जीवन जगणार्‍या मुळ समुहांचा लुटमारीत संव्हार केला आणि उरलेल्या लोकांना जंगलात जाऊन राहण्यास लाचार बनवून भारतात राज्य करू लागले. हे सर्व कसे घडले ते देणे या लेखात स्थानाभावामुळे शक्य नाही. पण या बाहेरुन आलेल्या जंगली युरेशियन आर्य आजच्या ब्राह्मण लोकांनी मात्र या देशात त्यांच्या विकृत, अमानवीय, विषमतेच्या संस्कृतीच्या (विकृतीचा) प्रचार-प्रसार सुरू केला आणि यामुळे या देशात द्वेषाचे, तृष्णा आणि अहंकाराचे विषमतेचे राज्य आणि समाजव्यवस्था निर्माण झाली. इसवीसनपूर्व 1500 च्या पूर्वी जी समाज व शासन व्यवस्था होती. या व्यवस्थेचा जो जनसमुह होता, या समुहामध्ये जात, वर्ण, वर्ग, धर्म, पंथ, देव, देवी, दैव, अतवार, स्वर्ग-नरक, ज्येष्ठ-कनिष्ठ, हिंदू किंवा ब्राह्मण ग्रंथ आणि साहित्यामध्ये ज्या संकल्पना आहेत, या सर्व संकल्पनांचा गंध त्या समुहाला नव्हता. कुटुंब, समाज, शासन व्यवस्था सर्वकाही वैयक्तिक अथवा सामूहिक कष्टावर, समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, स्नेहभाव, मैत्री, शेती, व्यापार, पशुपालन, रोटी-बेटी व्यवहार, भेदभावरहित, द्वेष, तृष्णा, अहंकाररहित नैतिक तत्त्वांवर व्यवहार चालत होते. त्यांचे नीती साहित्य कोणते होते हे अद्याप अज्ञात आहेत. परंतु त्या काळातला हा जनसमुह मानवतावादी, ऐहिक, जडवादी, पुरोगामी, सर्जनशील आणि कल्याणमय, शांतीचे जीवन जगत होता, हे सिंधुघाटीच्या उत्खननात उपलब्ध पुराव्यानुसार ते एक आदर्श जीवन जगत होते, हे सर्वच इतिहासकारांनी सिद्ध केलेले आहे. वर्तमान काळातील जीवनशैली, समाज आणि शासन व्यवस्था, साहित्य वगैरे सर्व काही अमानवीय, विषमतापूर्ण, क्रूर, निर्दय, पक्षपातपूर्ण, कष्ट न करणारी, शोषक, अन्याय, अत्याचार, उपासमार, निरक्षरता, अस्वच्छता, बेकारी, भिकारी, घरे, वस्त्रविहीन भटकरणारी, भ्रष्टाचाराने, निरर्थक कर्मकांडांच्या माध्यमाने लुटली जाणारी तर दुसरीकडे अल्पसंख्य लोक दही, दूध, रस, फळे, तूप, सुकामेवा खाणारी, शीतगृहात बसून राहणारी, अमर्याद धनसंपत्ती जमा करून कष्टकर्‍यांचे रक्त पिणारी अशी अशांततामय समाज व शासन व्यवस्था आहे. अशा या प्रतिगामी, अमानवीय, शोषक समाज व्यवस्था, शासन व्यवस्था निर्मितीला इसवीसनपूर्व 1500 च्या मागे पुढे भारतीय मुळनिवासींचा संव्हार करून भारतातच वस्ती करून राहणार्‍या युरेशियन आर्य ब्राह्मणांची वृत्ती, स्वभावगुण, त्यांनी या देशात निर्माण केलेले देव-देवी, तीर्थक्षेत्रे, कर्मकांड, वेद, पुराण, उपनिषदे, गीता, भागवत, रामायण, महाभारत, इतर ब्राह्मणग्रंथ, जाती, धर्म, वर्णव्यवस्था, निरर्थक शोषक कर्मकांड कारणीभूत आहेत. नसता भारतीय बहुजनांची जी आज गुलामीची आणि दयनीय अवस्था दिसून येत आहे, ती निर्माणच झाली नसती. भारत देश आज जगाच्या शिखरस्थानी सर्वांचा गुरू आणि सर्वांचा संरक्षक, पालक राहिला असता. ब्राह्मण आर्यांना प्रथम भारतात आश्रय अथवा शरण देणे ही भारतीय मुळनिवासी, बहुजनांची इतिहासातील घोडचूक ठरली आहे. आज या मनुवादाने ब्राह्मणवादाने, प्रतिगामी विचाराने, आर.एस.एस. व हिंदू महासभेच्या, संतपीठाच्या माध्यमाने देशात धुमाकुळ घालून पुरोगामी विचारवंतांना संपविण्याचे कारस्थाने चालविलेली आहेत. या कट कारस्थानामुळे विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी आणि बहुजन समाजाला जीवन जगणे व फिरणेही कठीण झाले आहे. अशा या प्रतिकूल आणि भयानक परिस्थितीवरही काही आशेची किरणे आणि महासूर्याचा प्रकाश दिसत आहे. हा महाप्रकाश बहुजनांना शत्रुंचा दमन करण्याचा आणि मार्ग दाखवून मानवतावादाकडे चालण्याचा मार्ग दाखवित आहे. हे मार्गदर्शक आणि महासूर्य म्हणजे तथागतापूर्वी होऊन गेलेले चार्वाक, तथागत बुद्ध आणि संपूर्ण पृथ्वीवर चमकणारे, महाप्रकाश देणारे डॉ. बाबासाहेब (भीमराव) आंबेडकर हे होय. या तीन महासूर्यांचा नेत्रदिपक महाप्रकाश कधीच कमी होणार नाही व यांच्या महाप्रकाशामुळे प्रतिगामी शक्तिंचा मुळासकट विनाश करता येईल यात कोणीही शंका घेऊ नये. फक्त सर्व बहुजनांनी या सूर्यप्रकाशाच्या रस्त्यानेच जाण्याची संघटीतपणे प्रतिज्ञा करावी, एवढेच कार्य आज बाकी आहे. इसवीसनानंतर डॉ. बाबासाहेबांचे आभाळाएवढे महान मानवतावादी कार्य वगळता इतरही अनेक महापुरुषांनी आणि पुरोगामी विचारांच्या संतांनी प्रतिगामी विचारांच्या विरुद्ध रणशिंग फुंकले होते व त्यामुळे जागृतीची ज्योत बहुजनांमध्ये सतत तेवत राहिलेली आहे. या जागृतीच्या ज्योतीमध्ये छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि विशेषकरुन म. फुले आणि सावित्रीबाईंचे खूप मोठे योगदान आहे. बहुजन जागृतीच्या संत मालिकेमध्ये चक्रधर स्वामी, बसवेश्‍वर, रविदास, कबीर, नानक, संत नामदेव, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व इतर अनेक संतांचे प्रभावी योगदान झालेले आहे. वरील तीन महासूर्यांनी, महापुरुषांनी, संतांनी इ. सर्वांनी वैदिक, विकृत संस्कृती, सभ्यता, वैदिक साहित्य, चारित्र्यहीन आणि खोटे व कल्पित देव-देवी, शोषक, मंदिर, तीर्थक्षेत्रे, कर्मकांड, पैसे लुटण्याच्या भट ब्राह्मणांच्या पूजा, प्रार्थना, आरत्या, अभिषेक, मुहूर्त, गण, कुंडली, वर्ग, वर्ण व्यवस्था, स्वर्ग, नरक, मोक्ष, यज्ञ, प्राणप्रतिष्ठा, ईश्‍वर, आत्मा, परमात्मा संबंध, पारलौकिकता, अध्यात्म, परमार्थ वगैरे सर्वांचा तीव्र विरोध, निषेध आणि बहिष्कार केलेला आहे. त्यांच्या विरोधात संघर्ष करून अनेक यातनाही भोगल्या आहे. चार्वाकम, बुद्ध, डॉ. आंबेडकरी विचारधारेचा एक विदेशी तत्त्ववेता कार्ल मार्क्स पण होऊन गेलेला आहे. त्यांनी सुद्धा मानवतावादी तत्त्वज्ञानाची पेरणी करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. अठराव्या शतकार गोर बंजारा समाजात एक क्रांतिकारी सेवालाल बापू नावाचे महापुरुष वरील महापुरुषांच्या, प्रज्ञासूर्याचा आणि संतांच्या विचाराने होऊन गेलेले आहेत. ते निरक्षर परंतु सधन व्यापारी व गोर प्रबोधनकार व क्रांतिकारीही होते. ते भटक्या समाजाचे असल्यामुळे व गाव-शहराच्या बाहेर राहिल्यामुळे त्यांचे प्रबोधन कार्य भटक्या समाजापर्यंत मर्यादित राहिले. परंतु ते अशिक्षित असूनही त्यांनी चार्वाक, तथागत बुद्ध, कार्ल मार्क्स व सर्व पुरोगामी संतांच्या विचारांची मांडणी व पेरणी केलेली आहे. ते केवळ तत्त्वज्ञानीच नव्हते तर ते एक महान दूरदर्शी विद्वान देखील होते. 265 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेले दूरदर्शी विचार आजच्या काळात तंतोतंत घडून येत आहे. यावरुन ते किती बुद्धी सामर्थ्याचे होते याचा अंदाज लावता येतो. त्या काळात प्रवासाची वाहने, लेखन, साहित्य, प्रचार-प्रसाराची साधने नसल्यामुळे ते अशिक्षित, भटके, दूर्लक्षित व गाव-शहरापासून दूर राहिल्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा समाजाला जास्त प्रमाणात झाला नाही. त्यांचे संपूर्ण विचार साहित्य सविस्तरपणे समाजासाठी निर्माण करण्याची आज खरी गरज आहे. एकूणच जंगली हिंस्त्र पशुसारखं वागणं, मनुवादी, प्रतिगामी, ब्राह्मणवादी, हिंदू, हिंदुत्ववादी, भोंदू, भट, पुरोहित, भोंदू साधू-संताचं वागणं, आळशी, आयतखाऊ, कष्ट न करता बसून खाणार्‍याचं वागणं, मंदिर, तीर्थक्षेत्रे निर्माण करणार्‍याच वागणं, देवी-देवता, दैव, पूर्वपापाचे कर्मफळ, अवतार मानणार्‍याच वागणं, कर्मकांड करणार्‍याचं वागणं, दान-दक्षिणा घेणार्‍याचं वागणे, या सर्व प्रकारच्या वागणार्‍या सारखं वागणे हे अमानवीय वागणे आहे. या सर्व अमानवीय वेद पुराणिकाविरुद्ध संघर्षाचे तत्त्वज्ञान चार्वाकाने मोडले, कार्ल मार्क्सने संघर्ष केला. तथागत बुद्धाने तर संपूर्ण मनुवादच नष्ट करून त्रिशरण, चार आर्य सत्य, पंचशील, अष्टांग मार्ग व दहा पारमिता इ. च्या माध्यमाने संपूर्ण जगच बौद्धमय करून टाकले होते. डॉ. बाबासाहेबांनी तर वरील सूर्याच्या तत्त्वज्ञानाला, विचारधारेला घटनात्मक रूप देऊन महासूर्य ठरले व विश्‍वरत्न बनले. 22 प्रतिज्ञांच्या माध्यमाने कृत्रिम देव-देवीच्या मुळ्याच उपटून फेकल्या. छ. शिवाजी, संभाजी, शाहू, म. फुले व पुरोगामी संतांनी पुरोगामी तत्त्वज्ञानाच्या खोल आणि मजबूत पाया घातला आणि या पायावर भव्य शिखर उभा करून महासूर्य डॉ. बाबासाहेबांनी सर्वत्र प्रकाश पसरविणारा सुवर्ण कळस चढविलेला असून जंगली समाज व शासन व्यवस्थेची जमिनीखालची सर्व मुळे उपटून फेकली आहे. आता सर्व बहुजनांचे परम कर्तव्य आहे की, डॉ. बाबासाहेबांनी चढविलेल्या कळसाचे बलिदान देऊन रक्षण करावे व विषारी प्रतिगामी वृक्ष पुन्हा उगणार नाही याची पुरेपूर दक्षता बाळगणे. नसता जंगलराजला खतपाणी घालण्याचे काम वर्तमान सरकार करीत आहे. या सरकारला पुढील निवडणुकीत धडा न शिकविल्यास हिंस्त्रपशुंप्रमाणे, हिंस्त्र शासनकर्ते सर्व बहुजनांचा संव्हार करणार हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. जय भारत- जय संविधान प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments