मंदिर हा जनावरांचा गोठा?

मंदिर हा जनावरांचा गोठा?

देह हे देवाचे देवुळ, देवळाचा देव, मेला अंतरीचा जागवारे, असे एक संत वचन आहे. या वचनाचा भावार्थ असा आहे की, वर्तमान काळात जे अनेक मंदिरे, देवळे, मठ, निर्माण करण्यात आली आहे, व या देवळात, मंदिरात ज्या मूर्त्या, प्रतिमा, पुतळे स्थापित करण्यात आल्या आहेत. हे सर्व सामान्य माणसं आणि महान महापुरुषाच्या असतात. वस्तुत: ही मंदिरातील सर्व प्रतिके विशेष विचार, कार्य अथवा आदर्शांची स्मृतीमात्र असते. गावांच्या, शहराच्या बाहेर निघालेला रस्ता दुसर्‍या एखाद्या गांव, शहर अथवा स्थळाला पोहचविण्याचे साधन असते. या रस्त्याप्रमाणेच मंदिरात असलेली अथवा अन्यत्र असलेली कोणतीही प्रतिमा ही समाजाला विशिष्ट उद्देशाकडे, विचाराकडे किंवा आदर्शाकडे स्मृतीरुपाने नेणारी असते. प्रतिमा ही केवळ स्मृतीसाठी असते. वंदनासाठी, आदर, सन्मानासाठी असते. पुजा, प्रार्थना, आरती, अभिषेक, साठी नसते. फक्त प्रतिमा अथवा मूर्ती त्या मृतमूर्तीचे जीवंतपणी असलेले कल्याणकारी, सर्जनकारी, विधायक, मानवता, समता, न्याय, बंधुत्व, संवेदनशीलतावादी, आदर्श विचार कार्य आपल्या मेंदूत साठवून ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी असते. मूर्ती, प्रतिमा, स्मारके नसली व त्यांच्यामधून आदर्शांचा इतिहास सर्वत्र सर्वांना वाचनासाठी उपलब्ध असला तर ते लाखमोलाचे व उपयुक्त असते. प्रतिमा, मूर्ती, स्मारके, मंदिर वगैरेंना सर्वांनी भेट देण्याची मनाई असल्यामुळे वाद, भांडणे, विनाश, अशांतता निर्माण होते. पण त्यांच्या आदर्श विचार, आदर्शांचे ग्रंथ, इतिहास वाचनास कोणासही अडचण अथवा बंधन नसते. म्हणून प्रतिमा, मूर्ती, स्मारकांचे उदारीकरण प्रचार, प्रसार करण्याऐवजी, त्या महापुरुषाचा इतिहास अथवा चरित्र ग्रंथ तयार करुन तो सर्वत्र उपलब्ध करुन देणे हे सर्वोत्तम आहे, असे ग्रंथ वाचून विचारात परिवर्तन व कृती शक्य आहे. प्रतिमा, मूर्त्या, स्मारके यांना केवळ भेटी देवून पदरात काहीही पडत नाही. तेव्हा मंदिर, मंदिरात मूर्त्या, प्रतिमा वगैरे बसविणे योग्य व फायदेशीर आहे का, याबाबत खरे विचारवंत आणि पुरोगामी यांनी विचार करुन समाज प्रबोधनाचे काम करुन अंधविश्‍वास व अंधश्रध्दा दूर करण्याचे महान कार्य करावे. खाद्यपेय पदार्थ पाहिल्याने भूक व तहानाची तृप्ती हो त नाही. वृक्ष सावली पाहून उन्हाची दाहकता कमी होत नाही. खाद्य पदार्थ खावे लागते व पेय पदार्थ प्यावे लागते. वृक्ष सावली खाली बसावे लागते. खाण्यापिण्याने व सावलीत बसल्याने सुख व तृप्ती प्राप्त होते. याच नियमानुसार महापुरुषांच्या चरित्रातून विचार ,आदर्श व कार्य आचरणात आणावे लागते. प्रतिमा, पुतळे, स्मारके ऐवजी महापुरुषांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन व आचरण महत्वाचे आहे. मंदिर,मूर्तीची संकल्पना ही इसवीसनानंतर अस्तित्वात आली आहे. प्रथम शंकराचार्यानंतर मंदिर, मूर्तीच्या कामाला, निर्मितीला गती मिळालेली आहे. इसवीसनापूर्वी व सिंधु सभ्यताच्या काळात मंदिर व मंदिरातील मुर्त्याचे महत्व व अस्तित्व दोन्ही नव्हते. इसवीसनानंतर भट ब्राह्मणांनी व साधु संतांनी, विशेषत: अश्रमी, परोपजीवी लोकांनी स्वार्थासाठी मंदिर-मुर्तीचा धंदा, व्यापार, दुकाना किंवा रोजगार हमी योजना, बनवून घेतली आहे. या योजनेअंतर्गत देव धर्मभोळ्या, अंधश्रध्द लोकांचे शोषण व अश्रमी, परोपजीवी लोकांचे पोषण होते. देशात मंदिर, मुर्त्या नसल्यातरी, कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नाही. तेव्हा मंदिर निर्माण व मुर्त्यां स्थापन बद्दल देशात कायदा निर्माण करण्याची खरी गरज आहे. भारतात मंदिर, खोट्या देवाच्या मुर्त्या, जातीवाद व धर्मवादामुळे प्रचंड नुकसान, विषमता, निरक्षरता, अशांतता पसरलेली आहे. वस्तुत: मंदिर या नावाचा, शब्दाचा, सुरुवातीला खरा अर्थ मन व देहाची बांधणी, निर्मिती करा असा असावा. कारण माणसाचे मन आणि देह, शरीर मजबुत, तंदुरुस्त असले तर त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. माणसाचे मन व देह सुदृढ व ताब्यात, नियंत्रणात असले तर त्याच्याकडून सहसा चुकीचे काहीही घडणार नाही. मन विकृत व देह दुर्बळ असले तर माणसाला योग्य निर्णय घेता येणार नाही व योग्य दिशा सुध्दा मिळणार नाही. म्हणून प्रथम मन व त्यानंतर देह याची उत्तमोत्तम बांधणी करणे म्हणजेच मंदिराची अर्थात मन+देह = मंदिराची बांधणी असा अर्थ किंवा उद्देश सर्वांसमोर असावा. मन व देह बांधा, नियंत्रित करा. सुदृढ, मजबूत, अविकारी, निरोगी बनवा, बांधा असाच अर्थ ध्वनीत होत असावा, असाच हेतू असावा. कारण कबिरांनी सांगितले आहे की, ‘मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर (देह)। ना खिची गयी कमान, तो कैसा छुटेगा तीर‘॥ तात्पर्य, मन आणि शरीर हे उभय मित्र आहेत.परस्परांच्या सहकार्याशिवाय मनाचा व देहाचा उद्देश साध्य होत नाही. म्हणून प्रत्येक माणसांनी आपले मन आणि देहाची योग्य बांधणी करणे हेच खरे मंदिर कार्य आहे. मुर्त्या, प्रतिमा, पुतळे वगैरेसाठी माती, विट, सिमेंट, वाळू, लोखंडाचे मंदिर निर्माण करणे, यात कोणतेही औचित्य दिसत नाही. उलट अश्रमी, परोपजीवी, साधूसंत, भगत-भोपे, भट, पुरोहित यांना आयत्या दुकाना खोलून देण्यासारखा व आपली लुट करण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखा बहुजनांचा अविचारीपणा किंवा मूर्खपणा आहे, असे माझे प्रखर मत आहे. मनाचे वैशिष्ट्ये सांगत असतांना संत बहिणाबाईंनी सांगितले आहे की, ‘मन हे ओढाळ, ओढाळ, ओढाळ। आता होता भुईवर, गेला आभाळात’॥ तथागत बुध्दांनी तर मन हे माणसाच्या सर्व कृतिचे केंद्र असल्याचे सांगून मन व देह अविकृत ठेवण्यासाठी धम्माची अर्थात नैतिक मुल्यांची, नीतीनियमांची, नीतीसुत्राची प्रस्थापना करुन भिक्खु-भिक्खुनीद्वारा त्यांचा जगभर प्रचार प्रसार केला. संत तुकाराम महाराजांनी सुध्दा मनाचे महत्व सांगतांना ‘मन करारे प्रसन्न, सर्व सिध्दिचे कारण’ असे विशद केले आहे. संत रविदासांनी ‘मनही पूजा, मनही धूप, मनही सेवु सहज स्वरुप’। तर कबीरांनी, ‘मनके हारा हार है, मनके जीता जीत है’। संत तुकारामांनी सुध्दा सांगितले आहे की, ‘सत्य, असत्यासी मन केले गवाही, जुमानिले नाही बहुमता’ अर्थात मानवाच्या सर्वच कृतीचे केंद्र मन आणि शरीर, देह आहे. तेव्हा मन आणि देह हे कोणत्याही कृती अथवा विचारांचे गुलाम व्हायला नको. दोन्ही मानव अंगानी अत्यंत संयमाने, संवेदनशीलतेने, विचारपूर्वक, कल्याणप्रद, विधायक आणि सर्जनजन्य दिशेनेच वाटचाल करणे अनिवार्य आहे. म्हणूनच, विद्वानांनी, साधु-संतांनी, महापुरुषांनी मनुष्यांनी जीवनात आपल्या मन आणि देहाची सर्वोत्तम बांधणी करण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे मानसिक व देहिक बांधणी करण्याचे नियम व आचरणाच्या सुत्राची मांडणी केलेली आहे. परंतु भट, पुरोहित, साधु-संत, भगत भोपे या परोपजीवी, आळशी, आयतखाऊ, शोषक समुहांनी मनाला मंदिर व देहाला देव बनवून मृत देहाला मंदिरात स्थापन करुन या निर्जीव, खोट्या मंदिर व देवाचे दर्शनासाठी गर्दी जमवून धर्मभोळ्या, देवभोळ्या, अंधश्रध्द, लोकांना लुटून बसून खाण्याचे सोपे तंत्र शोधून काढलेले आहे. या परोपजीवी लांडग्यांनी पुढे या लहान मंदिरांना क्षेत्राचे स्वरुप दिले. फक्त क्षेत्राचेच नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र, पापकर्म धुवून काढणारे क्षेत्र जाहिर केले. या क्षेत्राला भेट देवून तेथे दान दक्षिणा देणार्‍यांना व कर्मकांड करुन घेणार्‍यांना भरपूर आमिषे दाखवून लुट करुन आयते, विनाकष्ट बसून खाण्याची व्यवस्था करुन घेतली. वस्तुत: तिर्थ म्हणजे अविकृृत व क्षेत्र म्हणजे बहादुर, विद्वान, विचारी महान विभूती, त्यागी व्यक्ती व दर्शन म्हणजे विचार, तत्वज्ञान असा अर्थ ध्वनीत होता. तीर्थक्षेत्राचे दर्शन घेणे याचा अर्थ वीर, बहादुर, क्रांतीकारी, त्यागी, विद्वान, विचारी, अविकृत विभुतीचे विचार घेणे, ग्रहण करणे, स्वीकारणे, ऐकणे असा उद्देश तीर्थक्षेत्र दर्शनाचा प्राचीन काळी होता. परंतु अलीकडच्या काळात भटांनी, व भोंदू, गांजाकस, कामिक साधुसंतांनी मात्र मंदिराचे व तीर्थक्षेत्राचे मृत व्यक्तिंचे, किंवा महापुरुषांच्या मुर्त्यांचे संग्रह स्थळ बनवून धनसंपत्ती लाटण्याचे, गोळा करण्याचे केंद्र बनवून घेतलेले आहे. तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याचा वास्तव अर्थ असा आहे की, विशिष्ट स्थळी राहणार्‍या अविकृत, उच्च, कल्याणकारी, सर्जनकारी विचारांच्या विद्वानांची, विचारवंताची त्यागी अथवा मानवतावादी महापुरुषांच्या भेटी घेऊन त्यांचे विचार घ्यावे, ग्रहण करावे. मंदिर तीर्थक्षेत्र स्थळी असलेल्या खोट्या देवी देवतांचे पाया पडावे अथवा हात जोडावे, नमन करावे, त्यांच्याभोवती चकरा माराव्यात असा नाही. निर्जीव मुत्यार्ंना भाव अथवा भावना, चेतन शक्ती नसल्यामुळे त्या मुर्त्यांसमोर केलेल्या आरत्या, पूजा, प्रार्थना, गजर, अभिषेक, मिरवणुका, त्यांची अतिसुंदर अशा मंदिरात स्थापना हे सर्व प्रकार अविचारीपणाचे मानावे लागेल. महापुरुषांना मानवंदना, पुष्प अर्पण, आणि नम्र अभिवादन पुरेसे आहे. अंधारनिर्मूलनाचे साधन म्हणून तेवती ज्योत या पलीकडे सर्व थोतांड आहे. महापुरुषांचे गुण गात बसण्यापेक्षा ते आचरणात आणने व प्रचार प्रसार करणे हीच त्याची भक्ती आणि खरे अनुयायित्व आहे. मंदिर व तीर्थक्षेत्र आणि यांच्याशी संबंधित सर्व कर्मकांड, अथवा नीती ही पारध्याच्या पाळीव तीतर व जाळी सारखी आहे. पारधीचा पाळीव व प्रशिक्षित तीतर पिंजर्‍यात सुरक्षित राहतो. पण जंगलातील अप्रशिक्षित, भोळे तीतर जाळीत आडकून जीव गमावतात. याचप्रमाणे मंदिर व क्षेत्राचे विश्‍वस्त मंदिर-तीर्थक्षेत्राच्या कर्मकांडापासून दूर राहतात व सामान्य देव-धर्मभोळे व अंधश्रध्द लोकांना कर्मकांडात गुंतवून, त्यांची लुबाडणूक करुन त्यांच्या दान-दक्षिणा व दानधर्मावर विनाकष्ट बसून खातात व भोग-विलासी जीवन जगतात. दानधर्म करणार्‍यांना खोट्या समाधानाशिवाय काहीही मिळत नाही. उलट कष्टाची कमाई, वेळ व मनुष्यबळ वाया जातो. पण खोट्या पुण्य, मोक्षाच्या अपेक्षेने भक्त भाकड जनावराच्या पोषणाप्रमाणे भट-पुरोहितांचे व भोंदू साधु-संताचे पोषण करुन समाज व देशद्रोहाचे काम करीत राहतो, ही एक शोकांतिका आहे. शेतकरी तरी भाकड जनावरांचा सांभाळ करीत नाही. तो विकून टाकतो. पण देवाला माननारा माणूस मात्र देव, मंदिर, तीर्थक्षेत्र, कर्मकांड वगैरेच्या माध्यमानी भट-पुरोहित भगत, भोपे, भोंदू साधु संत यांचे सतत पोषण करीत आलेला आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने भारतात ही सर्वाधिक घातक बाब आहे. शेतकरी ज्याप्रमाणे शेती उपयोगी व दुधारु जनावरांना गोठ्यात बंद करुन अथवा दावनीला बांधून त्याचा उपयोग घेतो. याचप्रमाणे वरील परोपजीवी समुहांनी देवधर्मांध लोकांना मंदिर तीर्थक्षेत्रात गुंतवून त्यांची सांपत्तिक लुट करीत आहे व देवधर्माचा व कर्मकांडाचा विरोध करणार्‍यांच्या हत्या घडवून आणत आहे व देशात देवधर्मांध मनुवादी शासन व समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, हे कोणीही नाकारणार नाही. कारण मंदिर व तीर्थक्षेत्र हे दोन्ही साधन मनुवाद्यांना म्हणजे ब्राह्मण वर्गाला व त्यांच्या प्रचारकांना विनाकष्ट बसून खाण्याचे जबरदस्त साधन आहे. या दोन्ही साधनामुळे हा वर्ग पिढ्यान पिढ्या विनाकष्ट बसून विलासी, भोगवादी जीवन जगत आलेला आहे व जोपर्यंत देव-देवी, मंदिर, तीर्थक्षेत्र अस्तित्वात राहतील, तोपर्यंत हा वर्ग देव-धर्म, मंदिर, तीर्थक्षेत्र अस्तित्वात राहतील, तो पर्यंत हा वर्ग देव-धर्म, मंदिर, तीर्थक्षेत्र गुलामांचे शोषण करुन तो सुखी जीवन जगत राहणार आहे व गुलाम मात्र असहनीय यातना पिढ्यान पिढ्या भोगत राहणार आहे, हे वास्तव आहे. आज आपण दूरदर्शन, व्हॉट्सअ‍ॅप वर पाहत आहोत की, भारताच्या सरकारी तिजोरीत जेवढे सोने, हिरे, मोती, माणिक, चांदी, पैसे आहेत, याच्या चौपट पाचपट संपत्ती मंदिरात लपवून ठेवण्यात आलेली आहे. देशात निरक्षरता, बिमारी, बेकारी, कुपोषण, उपासमार, अस्वच्छता, नागरी सुविधांचा अभाव, उघडेनागडेपणा, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, विज पुरवठा अशा अनेक प्रचंड आणि पर्वताएवढ्या समस्या देशासमोर आहे. देशावर कर्जाचा डोंगर आहे. शेतकरी, कामगार वर्ग हैरान आहे. संरक्षण दलाच्या अनेक समस्या आहे. शेतकरी कर्जामुळे स्वहत्या करुन घेत आहे. दुसरीकडे मंदिर-तीर्थक्षेत्राचे विश्‍वस्त, तेथील पुजारी, भट, पुरोहित, कर्मचारी मोठ्या पगारावर चोरी लुटमारी, भ्रष्टाचाराच्या माध्यमाने लड्या कुत्र्याप्रमाणे पोसले आहेत. देशाच्या विकासामध्ये, समृध्दीमध्ये, संरक्षणामध्ये, कष्टामध्ये या समुहांचे जवळ जवळ शुन्य योगदान आहे. ते केवळ भाकड जनावरासारखे उत्पादक जनावरांचा चारा खाऊन मस्ताळलेले आहे. या जनावरांचा त्रास उत्पादक जनावरांना व्हावा, तसा त्रास सामान्य कष्टकरी समुहाला मंदिर, तीर्थक्षेत्र व संबंधित वर्गामुळे होत आहे. मंदिर, तीर्थक्षेत्र हे वस्तुत: देवधर्मभोळ्या, अंधश्रध्द समुहाला लागलेले भयानक रोग असून या रोगामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होऊन बरबाद होत आहे. यास्तव या रोगाचे मुळ मंदिर आणि तीर्थक्षेत्र निर्मितीवर व त्यांच्याशी संबंधित सर्व कर्मकांडावर बंदी लादणे आवश्यक आहे. जर हे शक्य नसेल तर सर्व मंदिर तीर्थ़क्षेत्रांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व या ठिकाणी जमा होणार्‍या सर्व साधन संपत्तीचा उपयोग देश विकासाच्या योजनेसाठी खर्च करण्यात यावा. असे केल्याने आज रोजी देशाच्या ज्या अनेक गंभीर समस्या आहेत, त्या दूर होण्याला व देश प्रगतीच्या शिखरावर जायला वेळ लागणार नाही, यात शंका नाही. मंदिरावरील विश्‍वस्तांचे मालकी हक्क हटवून ते हक्क सार्वजनिक केल्यास देशाच्या प्रगतीमध्ये वेगाने भर पडेल, यात शंका नाही व गैर प्रकारही होणार नाही. संत तुकडोजी महाराजांनी सांगितले आहे की, मंदिर तीर्थक्षेत्राशी अनेक चमत्कार जोडून धर्मभोळ्या लोकांना लुटले जात आहे. या मंदिरात - उगीच भरले चमत्कार, पुजापातीचे डोंगर, एका हाती खोदावी जमीन, हे पुजनाहुन अति महान परिणाम शेकडो, पूजा, प्रार्थनेहुनी अधिक त्यांचा जमीन खोदण्याचा अर्थ कष्ट करण्याशी आहे. कष्टाशिवाय काहीही मिळत नाही हे सत्य तुकडोजीने सांगत असतांना, पुजा, प्रार्थना, मंदिर, क्षेत्र हे सर्व थोतांड असल्याचे नकळत सांगितले आहे. पुढे त्यांनी सांगितले आहे की, गांव हा विश्‍वाचा नकाशा, गांवावरुनी देशाची परिक्षा। गांवाचि भंगता, येइल अवदशा या भारत देशा. येेथे गांव हे देखील कष्टाचे प्रतिक आहे. गांवात शेतकरी, मजुर वर्ग, व त्यांची देशाच्या सीमेवर लढणारी संतती राहते. गांवाचा शेतकरी, शेतमजूर, शहर मजुर व सीमा संरक्षक सैन्य हे देशाचे प्राणतत्व आहेत तेव्हा सुंदर शहरे निर्माण करण्याऐवजी, कष्टकरी शेतकरी, मजुर, सीमासंरक्षक दल यांची सर्व प्रथम सर्वांगीण प्रगती व्हायला पाहिजे, असा उपरोक्त कवनाचा अर्थ आहे. आज गांव भक्कास व गांवाच्या कष्टांवर जीवन जगणार्‍या शहरी समुहाचा विकास, गल्ली गल्लीत मंदिर व तीर्थस्थळे शोषणासाठी निर्माण होत आहे हे सर्व हास्यस्पद, निरर्थक, घातक व अमानवीय प्रकार आहे, यात शंका नाही. जयभारत-जयसंविधान प्रा. ग.ह. राठोड.

G H Rathod

162 Blog posts

Comments