मुर्तीपुजा अन प्राणप्रतिष्ठा

मुर्तीपुजा अन प्राणप्रतिष्ठा

जगातील महापुरुषांची त्यांच्या शारिरीक ठेवणीची, त्यांच्या व्यक्तीमत्वाची त्यांच्या वेषभूषा, अलंकार, त्यांच्या सुंदरतांची, सुडौलपणाची , त्यांची उंची त्यांचे हावभाव, त्यांनी केलेले कार्य, त्यांचा जीवन सघर्ष वगैरेची भावी पिढीला जाणीव व्हावी. त्यांच्यापासून बोध घेता यावा, त्यांचा इतिहास जाणून घ्यावा, त्यांच्या कृतीवर कार्य करता यावे, भूतकाळासारखा आदर्श समाज घडविता यावा अथवा भूतकाळात जे योग्य नव्हते, त्याचा त्याग करुन सामाजिक जीवन शांतीचे, सुखाचे जगता यावे म्हणून प्राचीन काळात मुर्त्या, प्रतिमा, पुतळे वगैरे तयार करण्यात आले होते. आजचे पुतळे प्रतिमा, मुर्त्या ज्या तयार केले जातात ते मंदिर, तीर्थक्षेत्र स्थळी बसवून त्यांची पूजा, आरती,अभिषेक व दानदक्षिणा, धनसंपत्ती जमा करुन त्याचे महात्म्य, चमत्कार, प्राणप्रतिष्ठीत असल्याचा प्रचार-प्रसार करुन धर्म व देव भोळ्या लोकांना लुटून उदरनिर्वाह करण्यासाठी निर्माण केले जात आहे. आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी काही विशिष्ट स्थळी कला, प्रदर्शनासाठी व ऐतिहासिक माहितीसाठी मूर्त्या होत्या, पशुपक्षी, वृक्ष वगैरेंच्याही मुर्त्या होत्या, पण या मुर्त्यांची पूजा, प्रार्थना, आरती, अभिषेक होत नव्हते,त्यांच्यासाठी मंदिरे व तिर्थक्षेत्रे सुद्धा नव्हती व कोणी मुर्त्यांची पूजा सुद्धा करीत नव्हते, केवळ स्मृती टिकून रहावी, प्राचीन इतिहास समजावा, एवढ्यासाठीच मूर्त्या होत्या, लोक मुत्यार्र्ंचे पूजन व मंदिर क्षेत्रात त्यांची स्थापना करुन धनसंपत्ती कमविण्याऐवजी त्यांचे विचार आणि कार्य अंमलात आणत होते, त्यांच्या पावलावर पावले ठेवून चालण्याचा प्रयत्न करीत हेाते. थोडक्यात आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी भारतात मुर्तीपुजा, मंदिर, तिर्थक्षेत्रे नव्हते व त्याकाळातील लोक मुर्तीपूजा सुद्धा करीत नव्हते, तसेच त्या माध्यमाने सामान्य जनांना लुटण्याचे फसविण्याचे कामही कोणी करीत नव्हते, समाज शोषणमुक्त आणि सुखी समाधानी होता, आजच्या काळात मात्र ज्यांना कष्टाचे काम होत नाही, पोट भरत नाही व कोणी सन्मानही करत नाही, असे भटजी, पुरोहित, भगत, भोपे, साधू संत, साधव्या यांर्नी, देवी, मंदिरे, तिर्थक्षेत्रे निर्माण करुन चमत्कार, पुण्य, मुक्ती, संपत्ती, संतती, सुख, शांती वगैरेची अमिषे दर्शवून देवधर्म, भोळ्या लोकांची लुट करुन विनाकष्टाचे भीकमय जीवन जगत आहे. वस्तुत: हा भोळ्या कष्टकरी समाजावर फार मोठा व गंभीर अन्याय अत्याचार आहे. निर्जीव मुर्त्या, प्रतिमा, पुतळे, स्मारके यांना भावना,समज आणि धनसंपत्तीची गरज असते का? निर्जीव मुर्तीत जर प्राण प्रतिष्ठित करता येते तर मग मृत देहात ही प्राण टाकून जीवंत का करता येत नाही? कावेबाज, स्वार्थी, आळशी, परोपजीवी, कष्ट न करता बसून खाणार्‍यांनी, प्रतिष्ठाणच्या लबाड विश्‍वसतांना व मंदिर मुर्ती, तीर्थक्षेत्र व कर्मकांंडाच्या माध्यमांनी दान-दक्षिणा व धन जमा करणार्‍यांना वरील खोटे काम करतांना थोडीस सुध्दा लाज वाटू नये ही किती लज्जास्पद बाब आहे. खरे म्हणजे अशा भोंदू लोकांवर बंधने घालून त्यासाठी दंड व्यवस्था करणे हे खरे शासनाचे परमकर्तव्य आहे. पण शासन व्यवस्थाच या लज्जास्पद कामात सहभागी व समर्थक असेल तर माझ्यासारख्यांनी त्यांच्याकडून राष्ट्रीय प्रामाणिक व राष्ट्रनिष्ठ कामाची अपेक्षा करणे व्यर्थ आणि मूर्खपणा आहे. आज देशात शेतकरी, कष्टकरी, सीमेवरील जवान, मोठा त्याग करुन सर्वांचे रक्षण करीत आहे. अशा ह्या पालक, रक्षक लोकांसाठी त्यांच्या त्यागाची परतफेड म्हणून त्यांच्यासाठी काही न करता, परोपजीची, शोषक, लुटारु वरील लोकांना सर्व क्षेत्रात सवलती, अनुदान, समर्थन, सन्मान करणे हे शासनाचे नाकर्तेपणाचे, अज्ञान व मूर्खपणाचे, तसेच समाज शोषणाचे अक्षम्य अपराध आहे असे मला तरी वाटते. आज गल्लीबोळात करोडोंनी मुर्त्या, मंदिरे, तीर्थक्षेत्रे निर्माण होत असून कष्टकर्‍यांसाठी त्याची उपयोगीता शुन्य असून उलट त्या माध्यमांनी कष्ट करणार्‍यांची लुट, त्याची शक्ती व वेळ सुध्दा वाया जात असून त्यांना सुखाऐवजी दु:खच भोगावे लागत आहे. संकट काळात त्याच्यासाठी देव, देवमुर्ती, मंदिर, तीर्थक्षेत्र, कर्मकांडे वगैरे कोणीही उपयोगी पडत नाही. आजपर्यंत कोणताही देव भक्ताच्या सुख, दु:ख, आनंद सोहळ्यात सहभागी झालेला आहे, असे कोणीही प्रमाणित करुन दाखवावे. त्यांना मी माझ्या कुवतीनुसार बक्षीस देईल. प्रत्येक माणसाला संकट प्रसंगी देवाऐवजी शेवटी त्यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार, सगेसोयरे व कुटुंबच धावून येतो. हेच लोक त्याच्या जाण्याने हळहळ दु:ख व्यक्त करतात व रडतात. मंदिराचा देव मात्र मेल्यावरही दानदक्षिणा, धनसंपत्ती जमा करण्यात व धार्मिक कर्मकांड करुन लुटण्यातच गर्क असतो. शेवट पर्यंत त्याला पैशाशीच प्रेम असते. भक्ताची त्याला तीळमात्र हळहळ, दु:ख अथवा चिंता नसते. जयभारत- जयसंविधान प्रा. ग.ह. राठोड औरंगाबाद.

G H Rathod

162 Blog posts

Comments