प्रिय वाचक बंधू भगिनींनो,
सर्वांना जय सेवालाल, जय संविधान.
प्रयोजन असे की, गेल्या 20-21 वर्षांपासून मी सतत धर्मांध शक्तिविरुद्ध माझ्या लिखाणाद्वारे जनजागरणाचे काम करीत आहे. तसे तर मी लहानपणापासून अंधश्रद्धेविरुद्ध सुद्धा अनेक विज्ञानवादी संघटनेबरोबर राहून अंधश्रद्धा निर्मूलनाचा व समाजाला विज्ञानाची दृष्टि देण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहे. या प्रयत्नात व धडपडीत असतांना 2000 च्या अलीकडच्या काळात मी जनजागृतीच्या हेतुने लहान मोठी 30 पुस्तके प्रकाशित केलेली आहे. याचबरोबर जवळ जवळ 2500 ते 3000 लेख लिहिले आहे. काही लेख प्रसार माध्यमांनी छापले आहे तर काही लेख मी समाज प्रसार माध्यमावर दिलेली आहे. पूर्ण भारतात या पुस्तकांचा व लेखांचा खूप मोठा प्रिय वाचक वर्ग आहे, याचा मला अभिमान व आनंद आहे. वाचकांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मी सर्व बंधू-भगिनी वाचकांचे अंतकरणापासून अभिनंदन व स्वागत, आभार व्यक्त करीत असून भविष्यातही वाचक वर्ग माझे साहित्य वाचत राहून जनजागरणाचे काम करीत राहतील अशी अपेक्षा व अशा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो.
दुसरी अति महत्त्वाची व आनंदाची बाब अशी की, माझ्या अनेक वाचकांपैकी काही वाचकांनी मिळून माझे हे समाज उपयोगी साहित्य संपादित स्वरुपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे, ही माझ्यासाठी आनंदाची व समाजासाठी उपयुक्त घटना आहे. हे कार्य कोण कोण करीत आहे, याची मला पूर्ण माहिती नाही. परंतु प्रमुख्यत: दमाळ प्रकाशन प्रमुख गणेश करमटोट व सुग्रीव राठोड या दोन्ही मित्रांनी साहित्य संपादनासाठी माझ्याशी सविस्तर चर्चा करुन संपादनासाठी परवानगी व दोन शब्द मनोगत व्यक्त करण्याची विनंती, परवानगी मागितली आहे. समाजहित व जागृतीसाठी त्यांचे हे कार्य बहुमोलाचे व अनिवार्य आहे. त्यांची ही निर्व्याज, नि:स्वार्थी भावना जाणून कोणत्याही प्रकारचा मोबदला न स्वीकारता व मान सन्मानाची अपेक्षा न करता मी या दोन्ही मित्रांना व त्यांच्या सहकार्यांना माझे साहित्य संपादनाची आनंदाने संमती देत असून सदर साहित्याचा उपयोग/फायदा समाजाला अवश्य करुन द्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. विशेष करुन दमाळ प्रकाशनचे प्रकाशक गजानन करमटोट यांचे मी अंतकरणपूर्वक आभार व धन्यवाद देतो.
आपला सर्वांचा चाहता,
प्रा. ग. ह. राठोड
अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघ, भारत.