सवर्णांचे षडयंत्र

सवर्ण म्हणजे स्वत:ला श्रेष्ठ, बुध्दिमान, युक्तीबाज, अधिकारप्राप्त, राजा, वंदनीय, आदरणीय, बहादुर, क्षत्रिय,सुंदर, सुखभोगी, स्वाभिमानी, मालक, धनवान, प्रतिष्ठावान,इज्जतवान, कष्ट न करणारा, आयतखाऊ, परोपजीवी, परंपरावादी, देव, धर्म, जातीवादी, ब्राह्मण्यवादी, सनातनवादी, कर्मकांडवादी व असवर्ण म्हणजे वरील वैशिष्ट्याच्या विरुध्द असलेला जनसमुह समजावा.

सवर्ण म्हणजे स्वत:ला श्रेष्ठ, बुध्दिमान, युक्तीबाज, अधिकारप्राप्त, राजा, वंदनीय, आदरणीय, बहादुर, क्षत्रिय,सुंदर, सुखभोगी, स्वाभिमानी, मालक, धनवान, प्रतिष्ठावान,इज्जतवान, कष्ट न करणारा, आयतखाऊ, परोपजीवी, परंपरावादी, देव, धर्म, जातीवादी, ब्राह्मण्यवादी, सनातनवादी, कर्मकांडवादी व असवर्ण म्हणजे वरील वैशिष्ट्याच्या विरुध्द असलेला जनसमुह समजावा. सवर्ण व असवर्ण समुहाला प्रस्थापित-अप्रस्थापित, अभिजन-बहुजन, सुधारलेला-मागास, श्रेष्ठ-कनिष्ठ, सनातनी-असनातनी, वैदिक-अवैदिक, हिंदु-अहिंदु, आर्य-अनार्य, विदेशी-मुळनिवासी, ब्राह्मण-अब्राह्मण वगैरे अनेक नावाने संबोधले जातात. याशिवाय असवर्णांना, दलित, वंचित, बहिष्कृत, शुद्र, भटके, निमभटके, गुन्हेगार, आदिवासी, इतर मागास, अस्पृश्य, वनवासी, जंगली वगैरे नावाने सुध्दा हिनवले जाते. असवर्ण समुह हा बहुसंख्य अति कष्टकरी असतो. सवर्णांपैकी सुध्दा क्षत्रिय, वैश्य समुह हा कष्टकरी असतो. परंतु या कष्टकरी समुहामध्ये ब्राह्मण, बनिया,ठाकुराप्रमाणे श्रेष्ठवाद व ब्राह्मणवाद ठसाठस भरलेला असतो, व स्वत:ला सवर्ण समजत असल्यामुळे तो इतर असवर्णांच्या, म्हणजे अतिशुद्र दलित, बहिष्कृत, वंचित, भटके, विमुक्त गुन्हेगार व आदिवासींचा द्वेष करुन त्यांना अस्पृश्य, कनिष्ठ समजून त्यांना सन्मान न देता, कनिष्ठ गुलाम मानून त्यांच्या कष्टाचे शोषण करुन वापरत राहतो. सर्व सवर्णांना दलित, वंचित, बहिष्कृत, अस्पृश्य वर्गाची सर्वांगीण प्रगती होऊ नये, ते गरीबच राहावेत, ते आपल्या कानाखाली व पायाखालीच राहावे, ते आपले गुलाम, नोकर बनून राहावे, आपला सर्व क्षेत्रात त्यांनी सन्मान करावा, आदेश पाळावे, आपल्याशी कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा करु नये, आपल्यापेक्षा मोठे, धनवान, इज्जतवान, होऊ नये, आपल्याशी रोटी-बेटी व्यवहार करु नये, अशी त्यांची पक्की धारणा असून या नियमांचे खंडण केल्यास हा सवर्ण वर्ग असवर्णांवर असहनीय, अमानविय, अशोभनीय, अपमानजनक व्यवहार करतो. एवढेच नव्हे तर अस्पृश्यांचा सर्वनाश केल्याशिवाय त्याला समाधान मिळत नाही. असा हा व्यवहार अस्पृश्यांशी स्पृश्यांचा मागील पाच हजार वर्षापासून चालत आहे. अनेक महापुरुषांनी, संतांनी, समाजसुधारकांनी,स्पृश्यांनी, सवर्णांनी, असवर्णांशी माणुसकीचा समतेचा व्यवहार कराव, असे प्रयत्न केलेले आहेत. परंतु या विषमतावादी, आयतखाऊ, परोपजीवी, श्रेष्ठवादी सवर्णांमध्ये मात्र बदल अथवा, परिवर्तन घडत असल्याचे दिसून येऊ लागलेले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सवर्ण-असवर्ण अथवा स्पृश्य-अस्पृश्य मधील अंतर कमी व्हावे किंवा मिटावे म्हणून भारतीय राज्यघटनेत सर्वांच्या संमतीने अंतर मिटविण्यासाठी कलमे बनविली. परंतु शासनकर्ता सवर्ण वर्गाचीच शासनावर पकड मजबूत झाल्यामुळे त्यांनी घटनेच्या तरतूदींवर प्रामाणिक व इमानदारीने अंमलबजावणी केली नाही. एवढेच नव्हे तर, आजपर्यंत या तरतूदींकडे दुर्लक्ष करुन अस्पृश्यांना कानाखाली व पायाखाली कसे ठेवता येईल यांचेच डाव खेळत आहे. यामुळे दिवसेंदिवस दोन्ही समाजांतील अंतर वाढून स्पृश्यांवर अनन्वित अन्याय अत्याचार हा समुह करीत आहे. सवर्ण समाज गुन्हेगार असूनही गुन्हेगारांना दंड व शिक्षा करण्याऐवजी निरपराध अस्पृश्यांनाच बेदखल करण्याचे प्रयत्न करीत आहेत. सर्व क्षेत्रात सवर्णांची पकड म्हणजे, अधिकारी, मंत्री, पोलीस, न्यायाधिश यंत्रणा त्यांच्याच हातात असल्यामुळे सर्वच सवर्णांना वाचविण्याचा व निरपराध, निराधार, लाचार, बेसहाय अस्पृश्यांना धमक्या, दहशतीखाली ठेवून, गुलामीखाली ठेवून सवर्ण वर्ग त्यांच्या कष्टाचे शोषण करण्यात स्वत:ला धन्य व श्रेष्ठ समजत आहे. एवढेच नव्हे तर, असवर्णांना सवर्णांशी स्पर्धा करुन पुढे जाण्याचा अधिकार नाही. केवळ सेवा करणे, राबणे हेच असवर्णांचे कर्तव्य आहे, अशी जतावणी करुन स्पर्धा करणार्‍या, अस्पृश्यांचे मुडदे पाडत आहे, घरे जाळत आहे, नागवे करुन मिरवणूक काढीत आहेत, वाटेल ती शिक्षा व दंड करीत आहे. सर्वांसमक्ष माता, भगिनी, सुना, लेकीचा विनयभंग, बलात्कार करीत आहे. अक्षम्य अपराध करुन ही निरपराध असल्याचे सिध्द करुन पुन्हा पुन्हा अपराध, अन्याय, अत्याचार करुन अस्पृश्यांना जीवन जगणे कठीण करीत आहे. पशुंपेक्षाही अनेक पटीने भयंकर वागणूक देत आहे. अस्पृश्यांची बाजू घेऊन एकही स्पृश्य पुढे येत नाही. संपूर्ण शासन व सवर्ण समाज व्यवस्था ही, वंचित, बहिष्कृत, अस्पृश्यांच्या विरुध्द असल्यामुळे भारतात सर्वत्र मनुकायद्याची दहशत पसरली असून अस्पृश्य समाज हवालदिल झालेला असून त्याच्यासमोर करावे तरी काय व जगावे तरी कसे व संरक्षण तरी कोणाचे घ्यावे अशा प्रकारचे महान व नाविलाजी संकट अस्पृश्य, बहुजनांसमोर आज उभे आहे. कारण सर्वच स्पृश्य, ब्राह्मण, बनिया, ठाकुर, क्षत्रिय, वैश्य वर्ग अस्पृश्य, भटके, विमुक्त, आदिवासी वर्ग यांच्या विरोधात असून क्रुरपणाची अमानविय, विषमतेची वागणूक सवर्ण समाज मागासांना देत आहे. मुंगीला साखर, गायीला भाकर, दगडाला प्रसाद, वस्त्रे, अलंकार घालणारा हा सवर्ण समुह सेवाधारी अस्पृश्यांना रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा सुध्दा देण्यास तयार नाही, ही केवढी मोठी विसंगती व चिंताजनक बाब आहे? मुंगीचा तर कोणालाच फायदा नाही. उलट त्रास आहे. गाय दुध, दही, तुप, शेण देते, बैलाचा उपयोग होतो. कातडी, हाडे वगैरेेंचा उपयोग होतो. म्हणून तिच्यावर दया, माया दाखविणे योग्य आहे. पण सवर्ण, स्पृश्य समाजाची प्रत्येक कामे म्हणजे शेती, पशुपालन, बांधकाम, खोदकाम, स्वच्छतेची कामे, गृह उपयोगी वस्तू निर्मितीची, वाहतुकीची, ओझ्याची, संरक्षणाची, देखरेखीची व इतर अनेक कामे बहुजनांच्या अस्पृश्यांच्या, कष्टाशिवाय, त्यागाशिवाय, मदतीशिवाय होतच नाही. बहुजन, अस्पृश्य समाज नसता, वंचित, बहिष्कृत, गरीब, समाज नसता तर परोपजीवी, सवर्ण, स्पृृश्य, श्रेष्ठ समजला जाणारा, अभिमानी, जातीवादी, समाजाला आजचे आरामाचे, विलासी, भोगवादी, विनाकष्टाचे जीवन जगताच आले नसते. त्यांना सुध्दा अस्पृश्यांसारखीच सर्व कामे करुन कष्टाचे जीवन जगावे लागले असते. हाक माराल तेथे हा बहुजन समाज, वंचित, बहिष्कृत अस्पृश्य समाज सवर्ण समाजाच्या सेवेत, ऊन, वादळ, पावसात, दिवसा, रात्री केव्हाही पोटासाठी का होईना हजर असतो. या वंचित समाजाच्या मदतीशिवाय सवर्ण समाज एक पाऊल सुध्दा पुढे सरकू शकत नाही. याचप्रमाणे सवर्ण समाज वंचित, बहिष्कृत व अस्पृश्य समाजाशिवाय जगूच शकत नाही. आज संपूर्ण जगात जे भौतिक परिवर्तन व सुधार अथवा विनाश घडून आलेले आहे, हे सर्व बहुजन, बहिष्कृत, वंचित, गरीब, अस्पृश्य समाजाच्या कष्टातूनच घडून आलेले आहे. संपुर्ण विश्‍वाची, सुख, समृध्दी, शांती या सर्व बाबी केवळ कष्टकरी समाजामुळेच दिसून येत आहे. आयत्या बिळातील नागोबा प्रमाणे आयतखाऊ सवर्ण समाज हा बहुुजन, शुद्राच्या कष्टावर निर्लज्जपणे, कुटीलपणे, षडयंत्रपणामुळे, पुरुषार्थहीनपणे, साम, दाम, दंडाने, दहशत, दाब, गुंडागर्दी, हुकुमशाही पध्दतीने योग्यता नसतांना अति अभिमानाचे, गर्विष्ठपणाचे जीवन जगत आहे. वस्तुत: कष्टकरी समुह हा आई-वडीलासम त्यागी समुह आहे. आई-वडील ज्याप्रमाणे संततीसाठी वाटेल ते कष्ट सहन करुन संततीचे जीवन सुखाचे बनविण्याचे प्रयत्न करतात. याचप्रमाणे अस्पृश्य, बहिष्कृत, वंचित, बहुजन, शुद्र वर्गांनी रात्रंदिवस कष्ट करुन, कष्ट सहन करुन, शिक्षण, सत्ता, संपत्ती, अन्न, वस्त्र, निवारा वगैरे सर्व सुखसाधनांपासून वंचित राहून, अर्धपोेटी, उपाशी, कुपोषित, अपमानित, बेकार, बिमार राहूनही, सवर्णांचे पोषण, संरक्षण केले आहे. वंचितांच्या कष्टातुनच, कष्टामुळेच सवर्णांना आजपर्यंतचीसवर्र् समृध्दी प्राप्त झालेली आहे. ‘मेहनत करे मुर्गी और अंडा खाये फकिर’ या म्हणीप्रमाणे कष्टाच्या माध्यमांनी बहुजन, शुद्रांनी, अस्पृश्य, भटके, विमुक्त आदिवासी या सर्व समुहांनी कष्ट व त्यागाच्या माध्यमांनी देशाला समृध्दीच्या शिखरावर पोहचविले आहे. पण हा संपूर्ण वर्ग आज रोजी पशुमय जीवन जगत असून समृध्दीच्या माध्यमांनी निघालेली सर्व मलई, तुप मात्र सवर्ण समाज हडप करीत असून कष्ट करणार्‍यांना पाणी मिश्रित ताक सुध्दा मिळू द्यायला आजचा सवर्ण समाज तयार नाही. वस्तुत: हा आई वडीलांशी केलेल्या कृतघ्नपणासारखा बेईमानी व निर्लज्जणाचा, अमाणुसकीचा कळस आहे. या कष्टकरी, समाजाला मागील पांच हजार वर्षापासून मनुवाद्यांनी व त्याचबरोबर मनुवाद्यांचे समर्थक, जाती, धर्मवादी सवर्णांनी शिक्षण, सत्ता, संपत्ती, संधी, शस्त्रे धारण व प्रगतीचे व्यवसाय, संधी या सर्वांपासून वंचित ठेवल्यामुळे हा वर्ग वंचित, बहिष्कृत, अप्रगत, अस्पृश्य, दलित बनून राहिलेला आहे. वस्तुत: स्वावलंबी, स्वाभिमानी, कष्टकरी गरीब समाज हा सवर्णांपेक्षा बहादुर आहे. जे सवर्णांना शक्य नाही, ते हा वंचित समाज सहज करतो. परंतु सत्ता, अधिकार, शस्त्रे यापासून तो वंचित असल्यामुळे व सवर्णांपेक्षा ते अल्पसंख्य असल्यामुळे तो गुलामीचे जीवन जगत आहे. सवर्ण समाज असवर्णांच्या कष्टाला, बहादुरीला सुध्दा भितो. असवर्णांना संधी मिळाली तर ते आपल्यापुढे जातील व त्यांच्यासारखे वाईट दिवस आपल्यावर येतील या धास्तीने सवर्णांनी असवर्णांना शिक्षण, संपत्ती, सत्ता, शस्त्रे, संरक्षण साधने मिळू नये अशा प्रकारचे शासकिय धोरण राबवित आहे. खाजगीकरण, विदेशी कंपन्या, मॉल्स, थेट गुंतवणूक, आरक्षण बंद, संविधान विरोध, दहशतवाद, नक्षलवाद, पशुसंरक्षण, नोट बंदी, धर्मांतर बंदी, कठोर नियम, नोकर कपात, ठेकेदारी पध्दत, महागाई, जमीन अधिगृहन कायदा,विचारस्वातंत्र्य बंदी, हे सर्व धोरण, वंचिताची घोडदौड रोखण्यासाठीच राबविले जात आहे. सवर्णांना अमर्याद सवलती, सार्वजनिक तिजोरीची सवर्णांच्या प्रगतीसाठी व सुखासाठी उधळपट्टी, असवर्णांच्या वस्तीमध्ये सत्यानाश करण्यासाठी दारुची भट्टी व दंगली घडवून त्यांच्या पाठीवर आणि डोक्यावर पोलिसांची लाठी, निरपराध्यांना कोर्टाच्या खेटी, नक्षली ठरविण्यासाठी रेटा रेटी, व सर्व क्षेत्रात बहुजनांची कोंडी करुन सर्वांना गुपचूप बसविण्याचा व देशात मनुवादी शासन व समाज व्यवस्था निर्माण करण्याचा, संविधान व आरक्षण संपविण्याचा हटवादीपणा वर्तमान सरकारचा प्रयत्न चालू आहे. विधीमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, सर्व प्रचार साधने, निवडणूक आयोग, संरक्षण विभाग, उद्योग क्षेत्र, परिवहन क्षेत्र, तेलक्षेत्र, वितरणक्षेत्र, पोलीसक्षेत्र, रोजगार क्षेत्र, व्यापार क्षेत्र, वित्तीय (बँक) क्षेत्र, आयात-निर्यात क्षेत्र, विदेशी संबंध क्षेत्र, शिक्षण, साहित्य, इतिहास क्षेत्र, व इतर सोयीचे व मलई मिळण्याचे क्षेत्रे अथवा साधने प्रस्थापित, सवर्ण समाज मन मानेल तसा उपयोग करुन चैनीचे व सुखाचे जीवन जगतो. चैनीचे जीवन जगण्यासाठी सवर्णांना कष्टच करावे लागत नाही. केवळ मलई कशी खाता अथवा हडप करता येईल अशी दुष्ट आणि कपट, शोषक, लुटारु, अमानवी, विकृत, भ्रष्टाचारी, देशद्रोही, कष्टकरी द्रोही बुध्दीचा वापर करावा लागतो. अशाप्रकारे सार्वजनिक हिश्याची तिजोरी लुटण्यात, आनंद मानण्यात, सवर्णांना अमानवी आनंद मिळतो. कष्ट करणारा, सर्वांना हवे ते पुरविणारा कष्टकरी मात्र, नग्न, उघडा-पाघडा व उपाशी राहतो व शुद्र समजला जातो. खरे म्हणजे कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. कष्ट आणि कष्टकरी हाच खरा सर्वांचा देव आहे. कृत्रिम मंदिरातील देव कष्टकर्‍यांना काहीच देत नाही. उलट कष्टकर्‍यांना लुटून, पुजारी, जोगडे, जटाधारी, भगवाधारी, टिळाधारी, आयतखाऊ, आळशी, परोपजीवी लोकांची बसून खाण्याची व्यवस्था मंदिरातील अन्यायी देव करतो. तुकडोजींनी सांगितले आहे की, ‘देव म्हणजे घेवचि नाही, सर्व काही देवचि देव’ अर्थ जो देत राहतो, घेत काहीच नाही, तोच खरा देव, दाता, मालक होय. मंदिरातील देव काही देत नाही, घेतच राहतो व तो आळशींना देत राहतो. खरा देव कष्टकरी आहे. जे हवे ते तो सर्वांना कष्टाच्या माध्यमाने देतो. कष्टाचा मोबदला थोडा घेतो. कधी कधी तर घेतच नाही. पण गरजवंतांना हवे ते मिळवून देतो. त्याच्याकडे जे द्यायला आहे, ते मंदिराच्या देवाच्या बापाकडे सुध्दा नसते. मग मंदिरातील दगडांचा देव तुम्हाला काय देणार? पुण्याची खोटी आमिषे देवून मंदिराचा देव कष्टकर्‍यांनाच लुटतो आणि जातीवादी, धर्मवादी, परोपजीवी लबाडांची व्यवस्था करुन देतो. 33 कोटी देवांनी प्रस्थापितांना वगळून बहुजनांना काहीच दिलेले नाही. बहुजनांना जे मिळालं आहे ते संविधानाने दिलेलं मिळालं आहे. म्हणून संविधानाचा निर्माता हाच बहुजनांचा खरा देव आणि बाप, पालक आहे. म्हणून बहुजनांनी देवळातील सर्व देवाचा त्याग करुन संविधानरुपी बापाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना आदरपूर्वक कोटी नव्हे तर, मरेपर्यंत वंदन करीत राहिले पाहिजे व त्याचबरोबर शोषक, आणि दिशाभूल करणार्‍या प्रस्थापितांची सुध्दा संगत सोडली पाहिजे. संगत सोडणे शक्य नसल्यास त्यांच्यापासून सावध राहणे व स्वावलंबी बनने आवश्यक आहे. कारण हा समुह विश्‍वासनीय नसून तो बहुजनांचा शोषक व मालक बनू इच्छितो. प्रस्थापितांच्या शोषणातून, गुलामीतून मुक्त होण्यासाठी सर्व शोषितांनी आपसांतील सर्व प्रकारचे मतभेद विसरुन संघटित होण्याची व संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रातील आपले हक्क व अधिकार प्राप्त करण्यासाठी संघटित लढा देण्याची गरज आहे. खाजगीकरणा, विदेशी कंपन्या, मॉल्स, साधने संग्रह या सर्वांवर बहिष्कार टाकला गेला पाहिजे. आरक्षण विरोधी, घटना विरोधी, समान शिक्षण विरोधी, रोजगार विरोधी, ठेकेदारी सेवक नीतीविरोधी, शिक्षण संस्था बंद करण्याविरोधी, वंचित विरोधी धोरणाच्या विरोधात देशभर एकदाच आंदोलन उभे केले गेले पाहिजे. या वैयक्तिक बहिष्कारामुळे त्यांना श्रम व श्रमिकांचे महत्व व गरजेची, सन्मानाची, त्यांच्या झालेल्या गैरसोयीची जाणीव होईल व त्यांच्या शोषक असन्मानजनक व्यवहारात बदलाची अपेक्षा करता येईल. प्रस्थापितांचा निष्ठुरपणा कमी करण्यासाठी त्यांचे राजकिय क्षेत्रातील वर्चस्व सुध्दा कमी करुन बहुजनांचे वर्चस्व वाढविण्याची खरी गरज आहे. याशिवाय सरकारला सर्व राष्ट्रीय साधनांचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी सुध्दा मजबुर केले गेले पाहिजे. सर्वांना समान संधी व दर्जा निर्माण करण्यासाठीचे धोरण राबविले गेले पाहिजे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक मोठे धोरण तयार करुन ते अंमलात आणले गेले पाहिजे. आतापर्यंतच्या आरक्षणांचा व धोकेबाजीचा आढावा सादर केला गेला पाहिजे. दर पाच वर्षांनी आरक्षणाचा आढावा घेणे अति अनिवार्य ठेवले गेले पाहिजे. अन्याय-अत्याचार कोणत्या जनसमुहावर होत आहे. ते का व कोण करीत आहे, ते न होण्यासाठी सुध्दा कायमची उपाययोजना अंंमलात आणली गेली पाहिजे. निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्यास त्याचे प्रतिनिधीत्व हटविण्याची सुध्दा व्यवस्था झाली पाहिजे. पशुसंरक्षण व पशुहत्याबंदीमुळे कोणावर अन्याय होतो, त्याचा आढावा घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना आखली गेेली पाहिजे. भूमीहीन, निवाराहीन, रोजगारविहीन,बेकार जनतेच्या उदरनिर्वाहासाठी व व्यसने निर्मुलनासाठी प्रभावी व गतीने पावले उचलण्याची व शिक्षणसंस्थेत मुल्यशिक्षण देण्याची प्रभावी योजना बनविली गेली पाहिजे. याचप्रमाणे इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सर्व संमतीने खरा इतिहास लिहिला गेला पाहिजे. या सर्व बाबींसाठी बहुजनांनी जागृत राहण्याची खरी गरज आहे. जयभारत-जयसंविधान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments