बहुजनांनी मतदान अधिकारांचा सदुपयोग करावा.

बहुजनांनी मतदान अधिकारांचा सदुपयोग करावा.

दिनांक 22-4-2022 बहुजनांनी मतदान अधिकारांचा सदुपयोग करावा. 1) मतदानाचा अधिकार कोणी दिलेला आहे? - देशातील सर्व नागरिकांना मतदान करून योग्य, लायक, चारित्र्यवारन, मतदातानिष्ठ उमेदवारांना जे 21 व नंतरच्या काळात 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री/पुरुषाला निवडून आणण्याचा अर्थात मतदान करण्याचा अधिकार देशाच्या घटनेने दिलेला आहे. हा मतदानाचा अधिकार जो लोकप्रतिनिधी घटनेप्रमाणे व शपथ घेतल्याप्रमाणे जात, देव, धर्मनिरपेक्ष राहून व मतदाताशी बांधिलकी ठेवून व एकनिष्ठ राहून मतदाताची, समाजाची व देशाची सेवा करील, त्याच्यासाठीच देण्यात आलेला आहे. जो लोकप्रतिनिधी समाज, जाती, धर्म, देव इ. भेद करून वागेल किंवा वागणारा असेल, चरित्रहीन, भ्रष्ट असेल त्यांना निवडून आणण्यासाठी दिलेला नाही. लाच अथवा अमिष देऊन मतदान मागणार्‍यासाठी हा अधिकार देण्यात आलेला नाही. म्हणून संविधानाचा हेतू डावलून जो मतदाता चरित्रहीन, नालायक पक्षपात करणार्‍या उमेदवाराला लाच अथवा अमिष घेऊन मतदान करतो, तो मतदाता व मतदान घेणारा प्रतिनिधी हे दोन्हीही समाज, देश व संविधान घटनाविरोधी, देशद्रोही, नालायक ठरतात. म्हणून मतदाता व उमेदवार या दोघांनी असा द्रोह, गुन्हा करू नये, असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते. लाच, अमिष घेऊन-देऊन जेथे उमेदवार निवडले जातात, त्या क्षेत्रात संविधानानुसार समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या दृष्टीने विकास घडून येत नाही. अशा वर्तनामुळे गरजवंतांवर अन्याय होतो, विषमता वाढते आणि भ्रष्टाचार, वाद, भांडणे वाढून देशाचे अतोनात नुकसान होते. 2) लोकप्रतिनिधी अथवा उमेदवाराचे परम कर्तव्य - निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आपल्या क्षेत्रातील मतदाराच्या आशा अपेक्षा लक्षात घेऊन गरजेनुसार देव धर्म जात निरपेक्ष राहून कोणत्याही समुहावर अन्याय होणार नाही, हे जाणून केलेल्या कामात कोणतेही गैर व्यवहार न होऊ देता काय करणे व मतदारांना विश्‍वासात घेऊन सर्वांना खुष ठेवण्याचे प्रयत्न करणे अनिवार्य आहे. अशामुळे बंडखोरी वाढून देशाचे कोणतेही नुकसान होत नाही व देशाची प्रगती गतीने होऊन सर्व गुण्यागोविंदाने नांदतात. देशाची प्रगती जलद गतीने होण्यासाठी उमेदवारांनी खालील कामे क्रमाक्रमाने पार पाडण्याचा प्रयत्न करावा. 3) जनतेची कोणती कामे अग्रक्रमाने करावीत? - उच्च प्रतीचे सर्व प्रकारचे शिक्षण जनतेला कसे मिळेल, याचा उमेदवारांनी प्रथम विचार करावा. यासाठी योग्य ठिकाणी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वस्तीगृह, स्पर्धापरीक्षा केंद्र, क्रीडा केंद्र, ग्रंथालय, कलाकेंद्र, सभागृह, बगीचे, व्यायामशाळा, अतिथीनिवास संग्रहालय, स्वास्थ्य केंद्र, तांत्रिक शिक्षण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, महिला विकास केंद्र, दिव्यांग आश्रम, वगैरे निर्माण करावीत. सामुहिक व आंतरजातीय धर्मीय विवाह मंडळ, शिक्षण क्षेत्रात अद्यावत इमारती, विज्ञान साहित्य, प्रयोगशाळा, तज्ञ शिक्षक वर्ग, स्वच्छतागृह, पुरेसे पाणी, विजपुरवठा, कर्मचारी वर्ग व सुरक्षितता. अशाप्रकारच्या व्यवस्थांना प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय जनतेला पक्के रस्ते, नळाचे स्वच्छ पाणी, घर व शेतीला पुरेसा विजपुरवठा, स्थानिक स्वराजय संस्थेच्या इमारती, बाजारपेठा, पशुसंवर्धन केंद्र, कृषिसुधार केंद्र, शेतकरी-कामगार भवण, पर्यावरण संवर्धन केंद्र, शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेल्या साधनांचा पुरवठा, तटामुक्ती समिती, हगणदरीमुक्त गांव समिती, शेतरस्ते, गायरान, शेतमाल संरक्षण गोदाम, जंगली पशुपासून शेतीचे रक्षण, गुन्हेगार प्रतिबंधक समिती, सहकारी संस्था, दूध केंद्र, ऊस कारखाने, सुतगिरण्या, कापडमिल फेडरेशन, कुटीर उद्योग, प्रोत्साहन केंद्र, शेतकरी सहयोग केंद्र, रोजगार हमी योजना, तळे, धरण, नाला बडींग, सामुहिक विहीरी, पाणी अडवा पाणी जिरवा योजना, जैविक खत निर्मिती केंद्र, सांडपाणी व्यवस्था, रात्र-दिवे, अशी अनेक नव नवी कामे लोकप्रतिनिधी करू शकतात व आपआपल्या क्षेत्राचा सर्वांगीन विकास घडवून आणु शकतात. 4) काय करणे टाळावे? - महापुरुषांचे पुतळे, देवाचे मंदिर यामुळे विवाद, भांडणे, जाळपोळ, मोडतोड, चेंगरा-चेंगरी, खुनखराबी, चोरी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून महापुरुषांच्या नावाने व देवाच्या नावाने संस्था, प्रतिष्ठाणे, इमारती, चबुतरे तयार करून; भिंतीवर महापुरुषांचे, देवाचे विचार, तत्त्वज्ञान, कार्याची माहिती द्यावी व भिंतीवर छायाचित्रे, प्रतिमा वगैरे लावणे शक्य होईल असे करावे. कारण महापुरुषांच्या पुतळ्यांपेक्षा व देवांच्या मंदिरांपेक्षा महापुरुषांचे व देवांचे विचार व कार्य हे अति मोलाचे व वैचारिक परिवर्तन घडविणारे असते. तसेच कोणत्याही वाद्याचा गजर शक्यतो टाळावा. जनता मोठ्या प्रमाणात एकत्र आली तरच गरजेनुसार मोठ्या गजराचा (आवाजाचा) उपयोग करावा, असे माझे मत आहे. जय भारत - जय संविधान प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments