शब्द प्रयोगाचे महत्व

बहुजनांवर मनुवादी संस्कृतीचे संस्कार झालेले आहेत, मनुवादी संस्कृती ही देव-दैव, अवतार व चमत्कारवादी संस्कृती आहे.

बहुजनांवर मनुवादी संस्कृतीचे संस्कार झालेले आहेत, मनुवादी संस्कृती ही देव-दैव, अवतार व चमत्कारवादी संस्कृती आहे. वस्तुत: ही संस्कृती बहुजनांची नाही, बहुजनवादी संस्कृतीमध्ये विज्ञानवादी व लौकीक शब्दांचा प्रयोग होत होता पण बौद्धिक गुलामीमुळे बहुजनांना आपल्या संस्कृतीचा विसर पडला असून तो बहुजन शब्द प्रयोगांऐवजी मनुवादी शब्द प्रयोग बोलतांना लिहितांना करीत असतो. तेव्हा मनुवादी शब्दप्रयोग टाळता यावे म्हणून मी काही मनुवादी शब्दांसाठी पर्यायी बहुजनवादी शब्द दिले आहेत. बहुजनांनी मनुवादी शब्द प्रयोगाच्या स्थानी बहुजनवादी शब्द प्रयोग करीत जावे अशी अपेक्षा आहे. मनुवादी शब्द बहुजनवादी शब्द अवतार/अवतारकार्य = जन्म जन्मकार्य अवतार घेणे = जन्म घेणे अवतारी पुरुष = लोकोत्तर पुरुष, लौकीक पुरुष, अवैदिक पुरुष अलौकीक पुरुष = ऐहिक पुरुष अभागी = अपात्र भाग्यवान/ नशीबवान = पात्र, योग्य, लायक कमनशीबी = अपाय, अयोग्य ब्राह्मण = बहुजन, श्रमण, नाग आत्मकथन = जीवन चरित्र, स्वकथन, स्वजीवनी, स्वकथा स्वचरित्र, जीवनकथा, जीवनी आत्मकेंद्री = स्वकेद्री, संकुचित, आप्पलपोट्या, स्वार्थी आत्मघातकी = स्वहितबाधक, स्वहित घातकी, स्वहितविरोधी आत्मसात करणे = स्वीकार करणे, अंगीकार करणे, आचरणात आणने आत्मकार्य = स्व अथवा स्वत:चे कार्य आत्मनिर्भर = स्वावलंबी, स्वनिर्भर, स्वयंपूर्ण. आत्मगत = स्वगत, मनोगत आत्मानंद् = स्वानंद, कलानंद, काव्यानंद, अपार आनंद,उत्कटानंद परमानंद आत्मनिंदा = स्वनिंदा आत्मनिष्ठ = स्वनिष्ठ, दृढविश्‍वास आत्मपरिक्षण = स्वपरिक्षण,स्वतपासणी, स्वमूल्यमापन आत्मभान = स्वजाणीव, अस्मितभान आत्मप्रतिष्ठा = स्वप्रतिष्ठा, स्वपत, स्वमूल्य आत्मस्तुती = स्वस्तुती, स्वबढाई,स्वप्रशंसा आत्ममग्न = स्वलिन, स्वत:तच गर्क, तल्लीन होणे, स्वत:त बुडणे आत्माविष्कार/आत्माभिव्यक्ती = स्वअनुभव, स्व अविष्कार आत्मविश्‍वास = दृढ विश्‍वास, अभेद्य विश्‍वास, स्वविश्‍वास आत्मसन्मान = स्वसम्मान आत्मियता = जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, कणव, करुणा आत्मसंयम = स्वसंयम आत्मश्‍लाघा = स्वस्तुती, स्वबढाई, स्वतारिक आत्मसंवाद = स्वसंवाद आत्मसाक्षात्कार = स्वसाक्षातकार,यथार्थकथन, स्वज्ञान आत्महत्या = स्वप्राण त्याग, स्वहत्या आत्मनुभव = स्व अनुभव ईश्‍वर = निसर्ग, विज्ञान, सत्य ईश्‍वर कृपेने = निसर्ग नियमाने, विज्ञानाच्या नियमाने एकात्मता = ऐक्य, एकसंधता कमनशीब = कमी प्रयत्न, कमी हालचाल कर्मधर्म संयोगाने = कार्यकारणभावामुळे काव्यात्मक = काव्यमयता, काव्यपूर्णता कलात्मकपणे = युक्तीने, हुशारीने, कलेने, कलायुक्त, कलापूर्ण कैलासवासी = कालवश, स्मृृतिशेष, समावलेले गंगा भागीरथी = वैधवी, विधवा, दु:खी, पतिवियोगी, सुखांती तप = कष्ट, परिश्रम, मेहनत दलित = बौध्द बुध्द = विशुध्द ज्ञान, अविकृत, अविकारी, ज्ञान, दिव्य ज्ञान, पारदर्शक ज्ञान, तेजस्वी, नेत्रदिपक ज्ञान स्वर्गीय = अप्रतिम, अनन्य साधारण, अनुपम, अजोड, उत्कृष्टतम, सुंदरतम, उत्तमोत्तम दिंडी = मिरवणूक, फेरी संचालन दुर्दैवाने = चुकीने, दूर्लक्ष केल्याने, प्रयत्नाअभावी देवाशपथ = संविधानाची, आई- वडीलाची, ताईची शपथ देवाज्ञा = परिनिर्वाण, चारतत्वात विलीन, विझले, शांत झाले, निर्वाण, महानिर्वाण, गेले. धर्म = धम्म, नीती- नियम (नैतिक) धर्मयात्रा = प्रवासपथक, अभ्यास किंवा ज्ञान, माहिती पथक, मंडळ, संघ धम्मयात्रा = धम्मपथक, धम्मसहल, धम्मफेरी, धम्मप्रवास, धम्म भ्रमण धर्मांतर = धम्म क्रांती, धम्म स्वीकार, धम्म दिक्षा, विचारांतर , पथांतर, पथ अथवा = मार्ग,दिशापरिवर्तन धर्मांतरित = धम्मदिक्षित, धम्मीय, धम्मवंत नियतीचा घाला = कर्माचे फळ, कार्यकारणाचे परिणाम पाप = अकुशल, अपकिर्ती, बदनामी, वाईट, दुर्लौकिक पुजा = अभिवादन, वंदन, कृतज्ञता,गुणगौरव प्रथागात्म = वेगळेपणाने प्रेतयात्रा = प्रेत उचललेले काम, प्रेत प्रवास पुण्यानुमोदन = आदरांजली कृपेने = नीतीने, धोरणाने, सहानुभूतीने, संवेदनशीलतेने, तत्वाने बोधीसत्व = ज्ञानी बुध्द, प्रज्ञासूर्य मंत्र = विचार, युक्ती, कलातंत्र महात्मा = महान, थोर महापुरुष = महामानव, महानायक, महानायिका रामप्रहर = सकाळीच, सुर्योदयापूर्वी, झुंजरक्यात राक्षस = बहुजन, मुळनिवासी,भारतीय स्वातंत्र्यवीर, भारतके मुल शासक, राजे, मालक प्राक्तन = पुरुषार्थ,कष्ट, प्रयत्न विश्‍वात्मक = वैश्‍विक व्यासपीठ = विचार मंच अथवा ज्ञानमंच, मार्गदर्शक मंच, विचारी मंच, क्रांतीमंच, चिंतन मंच,बोधीमंच शरणं = सरणं, बुध्दमंदिर- बुध्दविहार, बुध्दधर्म- बुध्दधम्म सुदैवी = सुदैवी, प्रयत्न- धडपड, आत्मा- मन, पंतप्रधान- प्रधानमंत्री आशिर्वाद = सहयोग, मदत, सहानुभूती, हिंदुस्थान- भारत- बुध्ददेश ज्ञानयज्ञ = ज्ञानपर्व, ज्ञानार्जन, ज्ञानसर्जन आर्य = अर्य,अरि, भगवानबुध्द = तथागतबुध्द श्रीमान = आयुष्यमान,धीमान, श्रीमान- उपासक, श्रीमती- उपासिका श्रीमती = आयुष्यमती, जात- समाज, दलित- बहुजन, बौध्द वर = नवरदेव वधू = नवरी, दारिका राक्षस = रक्षक दानव = दाता दैत्स = देणारे, दानी दास = धनिक संदर्भ- डॉ. यशवंत मनोहर की साहित्य संपदा प्रा.ग.ह.राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments