वंचित वर्गाचे भवितव्य व प्रस्थापितांचे कारस्थान

वंचित वर्गाचे भवितव्य व प्रस्थापितांचे कारस्थान

दिनांक 23-4-2022 वंचित वर्गाचे भवितव्य व प्रस्थापितांचे कारस्थान 1) भारतीय लोक दोन प्रकारचे आहेत- 1. श्रमजीवी व 2. अश्रमजीवी. अश्रमजीवी लोक बहुसंख्य वर्ग एक, दोन व तीनची नोकरी करतात. चार वर्गची नोकरी करीत नाही. तसेच सर्व विदेशी नोकर्‍यासुद्धा अश्रमी (प्रस्थापित) लोकच करतात. उद्योग, व्यापार, मोठमोठ्या एजन्सीज लोकप्रतिनिधी, पक्ष व संघटना प्रमुख हाच वर्ग असतो. सहकारी संस्था, शिक्षण संस्था, सुतगिरण्या कापूस फेडरेशन, दुग्ध उद्योग, दाळमिल, कपडामिल, इमारतींचे साहित्य, दुकाना आडता, बँका, साखर कारखाने, हार्डवेअर दुकाना, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बहुतेक करून प्रस्थापित वर्गच असतो. देशातील सर्व मोठी ठेकेदारीची कामे, ठेकेदारीच्या नोकर्‍या, प्रशिक्षण, संशोधन केंद्र, वितरण विभाग, हिशेब खाते, कायदे बनविणे, अमलात आणणे, न्यायदान करणे, प्रचार-प्रसार, प्रकाशन, अभ्यासक्रम, सर्व आयोगांचे प्रमुख हा प्रस्थापित/अश्रमी वर्गच असतो. बँकेतून मनाला वाटेल तेवढे कर्ज घेणे व बुडविणे, दिवाळा काढून घेणे, सुट मिळविण्यात, कर न भरण्यात, याच वर्गाचा सहभाग असतो. मोठमोठे भ्रष्टाचारही हाच वर्ग करतो व गुन्हा करूनही गुन्हेगार न ठरणारा, जेलच्या बाहेर राहणारा हाच वर्ग आहे. श्रमिक कष्टकरींचे शोषण करणारा, अत्याचार, अन्याय करणारा, न्याय न देणारा, तुच्छ समजणारा हाच प्रस्थापित, अश्रमी वर्ग आहे. 2) पराभूत सैन्याकडून मिळणारे, धाडीत मिळणारे, बुडीत खातेदाराचे, काळे धन सापडलेले धन, संस्था, संघटनांकडून, विदेशातून मिळणारे अनुदान, हाच प्रस्थापित वर्ग हडप करतो. अनेक देणगीदाराकडील धन हडप करणारा वर्गसुद्धा हाच असतो. जनविकासाच्या योजनेतून सुद्धा अरबो-खरबोची रक्कम पचविणारा, पैसे घेऊन बाहेर देशात पळून जाणारा हाच प्रस्थापित, अश्रमी वर्ग मोठ्या संख्येत आहे. नोटबंदीचा फायदा, बँका लुटण्याचा फायदा, काळे धन देश-विदेशात लपविण्याचा फायदा, देशातील वेगवेगळ्या खदानीचा व खदानीमध्ये सापडलेल्या मालाचा म्हणजे लोखंड, तांबे, पितळ, दगड, सोने, चांदी, हिरे, मोती, गॅस, रॉकेल, पेट्रोल, युरेनियम, हिलीयम, स्फोटके, मंदिरे, शासकीय उद्योग, प्रतिष्ठाणे, विविध आयोग, शासन विभाग प्रमुख, कार्यालये प्रमुख/मालक/व्यवस्थापक हाच कष्ट न करणारा अश्रमी, आयतखाऊ, लुटारू, शोषक, भ्रष्टाचारी, जाती/धर्मभेद, पक्षपात करणारा प्रस्थापित वर्ग आजही आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा, म्हणजे स्वातंत्रय संग्रामात मरणारा, त्याग, बलिदान करणारा, कारखाने, इमारती, रस्ते, देशाच्या सीमेवर लढणारा, शेती करणारा, पशुपालन करणारा, कष्टकरी/ श्रमिक वर्ग, वंचित वर्ग, बहुजन वर्गावरील सर्व अमाप फायदा देणार्‍या क्षेत्र, धंदा, नोकरी व गावांत राहणारा व व्यापार, मालकी या सर्वांपासून हजारो वर्षांपासून हजारो मैल दूर असून तो शोषित, गुलामीचे, उपासमारीचे, अतिशय दु:खाचे, अन्याय, अत्याचारांचे, कष्टाचे जीवन जगत आहे. 3) याचे कारण म्हणजे हा प्रस्थापित अल्पसंख्य वर्ग संघटित, शिक्षित, सत्ताधारी, साधनसंपन्न असून त्यांनी बहुजन/वंचित वर्गाला उच्च व व्यावसायिक शिक्षणापासून, नोकरी, व्यापार सत्तेपासून नेहमी दूर ठेवण्याचा, त्याला गटा-गटात विभागण्याचा, फूट पाडण्याचा व भांडणे लावून फायदा लाटण्याचा प्रयत्न करीत आलेला आहे. वंचित/बहुजन वगाृलाप मात्र या अश्रमिक/प्रस्थापित वर्गाचे कपटी डवपेच, दुष्ट, अमानवीय हेतू, कारस्थान समजून न आल्यामुळे तो प्रस्थापित वर्गावर विश्‍वास ठेवून धोक्याचे, कष्टाचे, गुलामीचे जीवन जगत आलेला आहे. अश्रमी/प्रस्थापित/जातीवादी, देव-धर्मवादी हा वर्ग केवळ दहा-बारा टक्के व वंचित/बहुजन वर्ग हा 80 ते 90 टक्के असताना संघटित, शिक्षित, साधन-संपन्न न झाल्यामुळे तो मागील हजारो वर्षांपासून अल्पसंख्यांक वर्गाची गुलामली करीत आलेला असून 2004 नंतर या अल्पसंख्य वर्गांनी बहुसंख्य/वंचित वर्गाची सर्व बाजूंनी नाकेबंदी केली असून वंचित वर्गाला कायमचे संपविण्याची प्रतिज्ञा केल्याचे दिसून येत आहे. यासाठी त्यांनी शिक्षणबंदी, नोकरी-रोजगारबंदी, आरक्षणबंदी, राजकीय सत्ताबंदी, अभिव्यक्तीबंदी, धर्मांतरबंदी, धनसंचयबंदी, संघटनबंदी, बेलेट पेपर निवडणूक बंदी, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांना, अनुदान बंदी, याशिवाय भूमिअधिग्रहन कायदा, ठेकेदारी नोकरभरती, तेरा पॉईंट रोस्टर, कॉलेजियन व लॅटरल पद्धतीने अधिकार्‍यांची नेमणूक पद्धत, खाजगीकरण, करण्याचा एफडीआय, विदेशी कंपन्यांना बोलाविणे, आर्थिक क्षेत्र निर्माण करून शेतजमीनी हडप करणे, मॉल्स निर्माण करून वंचितांचे कुटीर उद्योग बंद करणे, महागाई अमर्याद वाढवून करद्वारे सामान्यांची लूट करणे, विदेशात साधन संपत्ती, काळे धन लपविणे, विदेशी नोकर व सैन्यभरती करून वंचितांची हकालपट्टी करण्याचे धोरण राबविणे सुरू केले आहे. या सर्व अमानवीय धोरणांमुळे वंचितांचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात आलेले आहे. अशा या भयाण परिस्थितीत वंचित वर्ग नाच-गाण्यात, निरर्थक प्रदर्शन करण्यात, संघटित न होण्यात वेळ व शक्ती वाया घालत आहे. अशा भयाण वेळी शत्रु-मित्र न ओळखता शतफॅलाच साथ देण्यात धन्यता मानत आहे. अज्ञान, विचार, चिंतन मंथनाचा प्रचंड अभाव, बेजबाबदार वर्तणुक, विकाऊपणा, लाळघोटेपणा, स्वार्थीवृत्ती, समाज व देशद्रोही वृत्ती, अति अंधळेपणा, धर्म अंधता, महापुरुषांच्या महान त्यागाची विस्मृती, प्राचीन इतिहासाविषयी अज्ञान अशा अनेक घटक याला जबाबदार आहेत. या संकटातून वंचित वर्गाला वंचित वर्गाचे शासकीय क्षेत्रातले लोकप्रतिनिधीच बाहेर काढू शकतात. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून बहुजन/वंचित वर्गाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी वर्तमान सरकारवर संघटितपणे दबाव निर्माण करण्याची किंवा सरकारमधून त्वरीत व संघटितपणे बाहेर पडण्याची नितांत आवश्यकता आहे. याचबरोबर खाजगीकरण बंद करण्याची इव्हीएम हटविण्याची व राष्ट्रीयकरण करण्याची भूमिका कठोरपणे अवलंबविल्याशिवाय बहुजन/वंचित वर्गाला कोणतेही भवितव्य नाही याची जाण ठेवणे अनिवार्य आहे. 4) 1991 नंतर सुरू करण्यात आलेले खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण व नंतरच्या काळातील एफडीआय, सेझ, मॉल्स, स्मार्ट सिटी, गल्लोगल्ली मंदिर निर्मिती, मनुवादीचे समाज व देशद्रोहीचे पुतळे, संघ कार्यालय, संघ निर्मित अनेक संघटना, संस्था, प्रतिष्ठाणे, शाळा, महाविद्यालये, वृत्तपत्रे, सैनिकी शाळा, ठेकेदारी नोकरभरती, खाजगी नोकर भरती व वर दर्शविलेल्या अनेक बाबी, मुद्दे, धोरण, नीती हे सर्वच सर्व बहुजन वंचितांना एखाद्या मोठ्या इमारतीच्या पायामध्ये भरती दिल्यासम किंवा गाडल्यासारख्या योजना आहेत. भारतीय डॉ. आंबेडकर निर्मित घटनेला सुरुवातीपासूनच संघ परिवाराचा विरोध होता. घटना, संविधान अयशस्वी करण्यासाठी संघ परिवाराने सर्व पक्षात संघ समर्थक प्रतिनिधी घुसविले होते. त्यांचे संविधानविरोधी उद्देश साध्य करण्यासाठी संघ परिवाराने देशाच्या नसानसात प्रवेश केलेला आहे. देशाची संपूर्ण साधनसंपत्ती ताब्यात घेतलेली असून भारतीय बहुजन नोकरवर्ग हटवून विदेशी नोकर, सेना भरतीद्वारे बहुजनाच्या सर्व क्षेत्राची नाकेबंदी करून मनुस्मृती धर्मग्रंथाचा अंमल सुरू केलेा आहे. बहुजन पुरुषार्थहीन, बिनडोक लोकप्रतिनिधी, त्यांच्या पाळेल तीतर व कुत्र्याप्रमाणे संघ परिवाराची गुलामी करीत आहे. अशा परिस्थितीत बहुजन/वंचितांचे भवितव्य कसे राहणार आहे, यांचा विचार करतांना डोकं सुन्न होत आहे. आता कोणती क्रांती घडून येईल याचीही आशा दिसत नाही. तेव्हा बहुजनानी त्वरीत जागे होऊन अस्तित्व टिकविण्यासाठी संघटितपणे करो यामरोची नीती अवलंबविल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे मला वाटते. जय भारत - जय संविधान - जयभीम प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments