गोर बंजारा समाज विस्तार आणि संस्कृती (जीवनशैली)

गोर बंजारा समाज विस्तार आणि संस्कृती (जीवनशैली)

दि. 12/12/2022 गोर बंजारा समाज विस्तार आणि संस्कृती (जीवनशैली) गोर बंजारा समाज हा भारताचाच नागरिक व रहिवासी नसून तो एक जागतिक स्तरावरचा समाज आहे. परंतु त्यांची भारतात सर्वाधिक संख्या असून तो भारताचा संविधानिक नागरिक आहे. या समाजाची जनगणना शासनाने हेतुपुरस्सर केलेली नाही. परंतु यांची भारतातील लोकसंख्या 10 ते 12 कोटीच्या जवळपास आहे. भारतातील सर्व राज्यात हा समाज कमी अधिक संख्येत पसरलेला असून शासनाने या समाजाला एका सूचीत न ठेवता फूट पाडून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सूचीत समाविष्ट केले आहे. वस्तुत: या समाजाची बोलीभाषा, पोशाख, अलंकार, सांस्कृतिक सण-उत्सव, सोयर संबंध, जन्ममृत्यू, विवाह, संस्कार, स्वातंत्र्यापूर्वीचे निवासस्थान, व्यवसाय, त्यांचे छंद, समाजातील महिलांचे स्थान समान होते व आजही आहे. परंतु व्यवसायाच्या व समाजसेवा व धारणेच्या आधारावर समाजात शंभरपेक्षा जास्त पोट किंवा उपवर्ग (जाती, समाज) आहे. संख्येने सर्वात मोठा व प्रमुख गोर बंजारा समाज प्रत्येक राज्यात कोटीने असून इतर व्यावसायिक व समाजसेवी समाज प्रत्येक राज्यात 10 हजार ते एक लाखांच्या पुढे कुठेही नसावा. सर्व उप अथवा सेवक समाजाची लोकसंख्या कोटीच्या मागे पुढे असेल असे माझे मत आहे. या उपसेवक समाजात प्रमुखत: ढाडी, ढालिया, भाट, लभाना, नायकडा, सोनार, नावी, जांगड (अनाथ) वगैरे समुहांचा समावेश असून हा समुह आदिकाळापासून गोर बंजारा बरोबर तांड्यातच राहत आलेला आहे. आज रोजी तांड्याबाहेर सुद्धा राहत आहे. बाहेरच्या अनेक देशात राहणारा, परंतु गोर बंजाराचे वंशज मानणारा समाज देखील आहे. हा समाज समुह स्वत:ला रोमा, जिप्सी व इतर अनेक नावांनी ओळखला जातो. यांचे संपूर्ण सांस्कृतिक जीवन हे भारतीय गोर बंजारांशी मिळते जुळते आहे. हे सर्व विदेशी गोर बंजारा भारतीय गोर बंजारांशी संबंध ठेवून आहेत. उपरोक्त गोर बंजारा समाज हा हडप्पा, मोहेंजोदडो, चन्हुदडो, कालीबंगा या शहराचा निर्माता असून ही शहरे सप्तसिंधू नदीकाठाची प्राचीन म्हणजे इ.स. पूर्व 5 ते 4 हजार वर्षापूर्वीची आहे. आज ही शहरे जमिनीच्या गर्भात असून सप्तसिंधू नदीच्या क्षेत्रात असल्यामुळे तेथील प्राचीन संस्कृती सिंधू संस्कृतीच्या नावाने ओळखली जाते. गोर बंजारा समाज या संस्कृतीचा निर्माता असल्यामुळे त्यांची संस्कृती सुद्धा सिंधू संस्कृतीच होती व आजही तीच आहे. सिंधू संस्कृतीचे लोक पूर्वज, प्रकृति व पशुवंदक होते. जात, देव, धर्म, मंदिर, तीर्थक्षेत्रे या संकल्पना त्या काळात मुळातच नव्हत्या. जात, देव, धर्म, मूर्तीपूजा, क्षेत्रदर्शन या संकल्पना आर्य वर्चस्वानंतर उदयास आलेल्या आहे. सर्व धर्मांची उत्पत्ी इसवीसन सुरू झाल्यानंतरची म्हणजे 2022 वर्षांपूर्वीची आहे. म्हणून इसवीसन पूर्वीचा अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी) इतर मागास, आजचा संपूर्ण भटका समाज, अल्पसंख्य हा जात, देव, धर्मनिरपेक्ष आहे. म्हणून उपरोक्त समाजाचा हिंदू ब्राह्मणी सनातनी, वैदिक, मुसलीम, इसाई, पारसी या धर्मांशी थोडासुद्धा संबंध येत नाही. जैन व बौद्ध मत हे धर्म नसून विचारधारा आहे. जैन मत ही अहिंसक व बौद्ध ही नैतिक, मानवी, समतावादी, विज्ञानवादी विचारधारा आहे. याचा अर्थ आजचा मागास, वंचित, अस्पृश्य, भटका धर्मविहीन (धर्मनिरपेक्ष) समूह आहे. या समुहाची सिंधूकालीन श्रमण (समण, शरण) जीवनशैली आहे, धर्म नव्हे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आजचा हिंदू धर्म हा मनुचा, ब्राह्मणांचा धर्मरक्षक, कवच आहे. म्हणून हिंदू धर्माचे सर्व फायदे हे मनुवाद्यांना, ब्राह्मणवाद्यांना, सनातन्यांना होतात व सर्व बहुजनांचे, वंचितांचे, अस्पृश्यांचे, बहिष्कृतांचे, अल्पसंख्याकांचे शोषण होते. म्हणून वरील सर्व वर्गांनी हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्राचे, हिंदू धर्माचे समजू नये व समर्थनसुद्धा करू नये. काही गोर बंजारा समाजाचे संत, महंत, नायकडा, लभाना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, बजरंग दल, भाजप, शिंदे शिवसेना गट आणि आर.एस.एस. चे दलाल, हस्तक मिळून संघटितपणे धर्मनिरपेक्ष धाटी जीवनशैलीधारक गोर बंजारा समाजाला हिंदू धर्म, हिंदुत्वाकडे नेण्याचे व हिंदुराष्ट्र निर्माण करून सर्व गोर बंजारांना धर्माचे गुलाम बनविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रचार-प्रसार व सभा-बैठकाच्या माध्यमाने दिसून आले आहे. हा प्रयत्न व कार्यक्रम धाटीधारक, धाटी जीवनशैली समर्थक सर्व गोर बंजारा समाजाच्या हित, मर्जी, इच्छेविरुद्ध आहे. म्हणून या प्रयत्नाला कार्यक्रमाला समर्थन देणार्‍याचा व संमेलनाचा गोर बंजारा समाज सर्वत्र निषेध करीत आहेत. काही मोजक्या संत महंतांना व अल्पसंख्य लभाना, नायकडा समाजाला हिंदू गोर बंजारा नायकडा-लभाना कुंभ संमेलन अथवा मेळावा घेणार्‍यावर समाज, संस्था संघटनेकडून बहिष्कार टाकून शिक्षा द्यावी अशी जनतेतर्फे मागणी आहे. एवढेच नव्हे तर समाजाची दिशाभूल करून हिंदुत्वाकडे नेण्याच्या अपराधाबद्दल यांना न्यायालयात ओढावे अशीही चर्चा चालू आहे. प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments