बंजारा समाजाची आदर्श संस्कृती व आदर्श इतिहास

बंजारा समाजाची आदर्श संस्कृती व आदर्श इतिहास

1) बंजारा समाजाची ऐतिहासिक ओळख - वर्तमान काळात बंजारा इतर कोणत्याही समाजापेक्षा सर्वाधिक नावाने संबोधला अथवा ओळखला जातो. वंजारा, वंजारी, वंजारे, लभाना, लभानी, लमाने, लंबाडा, लंबाडी, लंबाडे, लमाना, लमानी, लमाने, लुबाना, लुबानी, लुबाने लुभाना, लुभानी, लुभाने, लदेणीया, गरासा, बळदिया, बाळदिया, गवार, गवारीया, ढाडी, बंजारा, ढालीया, भाट, चारण जांगड, नावी सोनार, कंजड, मथुरा, नट, बाजीगर, सिंगाडा, कांगसिया, मारु, सुगाळी, ओसरी, मुकेरी, मुलतानी, कापडी, धानकुटे, फनाडा, सिरकी, घुगरिया, काछी, तुरी, गमळीया, बागोरा, डिगोरा, ब्रींजारी बंजारा, शिख बंजारा, मुसलीम बंजारा, ख्रिश्‍चन बंजारा, राजपुत बंजारा, रविदास बंजारा, बौध्द बंजारा, बामणीया बंजारा, हिंदू बंजारा, रोमा बंजारा, जिप्सी बंजारा, नायक अथवा नाईक बंजारा, तक्षक, ववंजही, वंजही, औध्यय, औंढ्र, पौंढ्र, वैदेहिक, वहिका, बहिका, सार्थवाह, खासी, औडुंबरा, डोम, डुमरा, कनेत, कंटकार, कंटक, कतेरा, टाक, टकारी, कुनैत, केरी, किरात, क्रिकट, कुनिंद, कसाईट, कर्कोटक़, कोल्टा, कतुरीया, डोगरा, पैशाची, कटियार, दर्द, दर्दी, हलीया, वगैरे. वरील सर्व नावे ही मोगल-मुसलीम काळातील व त्यानंतरची आहेत. वरील सर्व नावे ही मोगल-मुसलीरम शासनकर्त्याच्या पूर्वीच्या काळात आणि कोणत्याही ग्रंथात सापडत नाही. अर्थात सहाव्या शतकानंतरची ही एकूण शंभरपेक्षा जास्त नावांनी ओळखला जाणारा समाज आहे. वरीलपैकी काही नावे तथागत (बुध्द) सिध्दार्थच्या धम्म काळातील असावीत असे माझे मत आहे. 2) वेद काळातील बंजारांची नावे अथवा संबोधणे - वेद काळ हा वस्तुत: दोन भागात विभागला गेलेला आहे. एक प्राचीन अथवा पूर्व वेद काळ व दुसरा अर्वाचीन अथवा उत्तर वेद काळ. प्राचीन अथवा पूर्व वेद काळा हा मुळनिवासी म्हणजे बहुजन शासन काळ होता व दुसरा अर्वाचीन अथवा उत्तर वेद काळ हा विदेशी आर्य यांचा शासन काळ होता. या काळाला अर्वाचीन अथवा उत्तर वेद काळ संबोधण्याऐवजी पौराणिक काळ संबोधणे संयुक्तीक वाटते. कारण या काळात पूर्व वेदाचे प्रक्षिप्तीकरण करुन ब्राह्मणांनी त्यांच्या हितासाठी पौराणिक ब्राह्मणी ग्रंथ लिहिले होते. या काळाला ब्राह्मण, वैदिक, आर्य, सनातन ब्राह्मणी व नंतर हिंदु काळा म्हणू लागले. प्राचीन वेद ग्रंथ हे मुळनिवासीनेच लिहिले होते व ते मानवतावादी होते असे प्रसिध्द इतिहासकार डॉ. एस.एल.देव यांचे म्हणणे आहे. वरील मुळ वेद ग्रंथात बदल करुन जे ग्रंथ ब्राह्मणांकडून लिहिले गेले या ग्रंथांना ब्राह्मणांनी वैदिक, पौराणिक, ब्राह्मणी, सनातनी म्हणू लागले. प्राचीन अथवा पूर्व वेद ग्रंथात येथील सर्व मुळनिवासी (बहुजन) मात्र पणी, द्रविड, नाग, अर्य, अहि, अरि, श्रमण, असुर, अनार्य, अव्रती, अपव्रती अन्यव्रती, अनिंद्र, अदेववू, अदेवस्य, अयज्जवन, अश्रध्दान, अब्रम्हण मनुष्य, विश, वैश्य, किनास, कुर्मी, कुडूंबी, कुटुंबी, कृषक, अवर्ण, व्रतहन, अनास, मृध्रवाच वगैरे नावाने संबोधले जात होते. हे सर्व संबोधन मुलनिवासी संस्कृती, सभ्यता, जीवनशैलीतील होते व ही संबोधणे आर्य ब्राह्मणी संस्कृती विरोधी होते. अर्वाचीन अथवा पौराणिक, आर्य, ब्राह्मणी काळात मात्र आर्य ब्राह्मणांनी वैदिक ब्राह्मणांनी, सनातनी, हिंदु ब्राह्मणांनी मुळनिवासींना (बहुजनांना) दैत्य, दानव, राक्षस, सैतान, निशाचर, नरमांस भक्षक, अगडबंब, विचित्र, लोभी, पाखंडी, कंजुस, दुष्टात्मा, मायावी, जादू परायण, वगैरे नावांनी संबोधून वास्तव अर्थाचा अर्थ बिघडवून मुळनिवासी बहुजनांना बदनाम करण्याचे षडयंत्र आर्य ब्राह्मणांनी केले आहे. वास्तवात दैत्य, दानवचा मुळ अर्थ दाता, देणारा, राक्षसचा, रक्षक, सैतानचा स्वाभिमानी, स्वावलंबी असे अर्थ ध्वनीत होतात. इतर नावे सुध्दा हेतुपुरस्कर बदनाम कारक अर्थाने बहुजनांसाठी वापरलेले आहे. अशा प्रकारे प्राचीनकालीन, पौराणिक कालीन व स्वातंत्र्योत्तर कालीन मिळून मुळनिवासी बहुजनांना जवळ-जवळ 150 नावाने संबोधण्यात आलेले आहे. प्राचीन काळातील सर्व नावे पणी, द्रविड, अर्य, अरि, अहि, नाग, श्रमण, असुर वगैरे सर्वांनाच वरील नावाने आर्य ब्राह्मणांनी संबोधले आहे. वरील सर्व समुहात पणी जनसमुह हा प्रमुख जनसमुह होता व वेदात याच समुहाशी आर्य प्रमुख इंद्राने गाई चोरण्याचा आरोप करुन लढाया केल्या व या लढाईत या पणी समुहाची हार झाल्याचे दर्शविण्यात आलेले आहे. प्राचीन कालीन हा पणी समुह विश्‍वव्यापी व्यापारी होता व त्यांनीच सिंधू नदीकाठची मोहेंजोदडो व हरप्पा नगरची आदर्श नागरी संस्कृती निर्माण केली होती असे बहुसंख्य इतिहासकारांचे कथन आहे. प्राचीन सिंधु संस्कृतीकालीन पणी, द्रविड, नागवंशी जनसमुह हाच आजचा बंजारा समाज आहे असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे. या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने डॉ. पु.श्री. सदार, डॉ. श्रीराम शर्मा, प्र.रा. देशमुख, डॉ. नवल वियोगी, डॉ. प्रताप चाटसे, डॉ. राजेंद्र एस. फुलझेले, डॉ. नीरज साळुंके, डॉ. भगवानसिंह, डॉ. स्वपन कुमार बिसवास, डॉ. एस.एल.देव या सर्व इतिहासकारांनी त्यांच्या इतिहास ग्रंथात नमुद केलेले आहे. पणी (लमानी, लभानी, लंबाडी) समाजाचे राष्ट्रीय योगदान - आर्य भारतात येण्यापूर्वीचा पणी समाज ज्यांनी आर्य प्रमुख इंद्रदेवाशी आपल्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी लढा दिला हा पणी समुह मुगल, मुसलीम शासन काळापासून अनेक प्रमुख व उपनावाने संबोधला जात आहे. इसवीसनपूर्व व आर्य आगमनापूर्वी तो या नावाने संबोधला जात नव्हता. काळ प्रवाहानुसार जो कोण कोणत्या नावाने ओळखला जात होता त्याची सविस्तर माहिती मी मागील पृष्ठावर दिलेली आहे. मुगल ते ब्रिटिश काळापर्यंत हा पणी समुह विशेषत: वंजारा, बंजारा, लमाना, लभाना, लंबाडा, या नोंदणीकृत नावाने सर्वत्र ओहखला जातो. जो विदेशात स्थायीक झालेला आहे तो मात्र रोमा, जिप्सी या नावाने ओळखला जातो. रोमा-जिप्सी या नावाने ओळखला जाणारा हा पणी अथवा वंजार, बंजारा, लमाना, लभाना, लंबाडा समाज विश्‍व व्यापार व भ्रमणानिमित्ताने अल्पसंख्येने आर्य भारतात स्थायीक होण्यापूर्वीच गेलेला आहे, व काही लोक आर्य, मुसलीम, मोगल, ब्रिटिश शा शासकाच्या अन्याय-अत्याचारामुळे नंतरच्या काळात गेलेला आहे. पणी लोकसमुहाबरोबर सिंधु संस्कृतीच्या काळात दुसरे सुध्दा अनेक व्यावसायिक लोक समुह राहत होते. हे सर्व लोक समुह त्या काळात वर्ण, जात, धर्म, ईश्‍वर, कर्मकांड, ब्राह्मणमुक्त म्हणजे धर्मनिरपेक्ष होते, या सर्वांमध्ये रोटी-बेटी व्यवहार होता. सप्त सिंधु नदी काठची म्हणजे मोहेंजोदडो, हडप्पा, कालीबंगा चिन्होदडो वगैरे नगराची व संस्कृतीची निर्मिती याच सर्व समुहांनी मिळून केलेली होती. म्हणून ते या नगरीचे व संस्कृतीचे आदर्श निर्माते मानले जातात. आर्य भारतात येण्यापूर्वी इ.स.पूर्व ही संस्कृती समृध्दीच्या शिखरावर होती. अशी ही आदर्श नागरी व मनवी संस्कृती आपसी संघर्षाद्वारे अमानवी आर्याने इ.स.पूर्व 17500-1700 च्या दरम्यान नष्ट केल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. शेती, पशुपालन, शिल्पकारी, लघु उद्योग, नगर विकास या बरोबर हा समुह अनेक विदेशासी किंमती वस्तुंचा व्यापार करीत होता. या वस्तुमध्ये सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक, लाल, शंख, शिशे, रेशमी वस्त्रे, हाथीदात, चमडे, शंख, वगैरेंचा समावेश होता. हा त्याचा व्यापार मेसोपोटामिया, सुमेर, ग्रीक, युरोपीय देश, अफ्रिका, मध्य अशिया, फिनिशिया, लेबनान, बेबीलोनीया, इजिप्त, इराण, इराक वगैरे अनेक देशाशी होत होता. या व्यापारामुळे इकडच्या वसत्तु तिकडे व तिकडच्या वस्तु इकडे येत होत्या व यामुळे नागरीकाच्या गरजा भागविल्या जात होत्या. विश्‍व हे एक कुटुंब बनले होते व सर्व सुखी होते. परंतु क्रुर, असभ्य, लुटारु, केवळ मांसाहारी आर्याच्या आक्रमणामुळे व सलोखा, समझोता करुन विश्‍वासघात केल्यामुळे मुळनिवासी पणी समुहाला पराभव पत्करावा लागला, व पराभवानंतर आर्यांच्या अन्याय, अत्याचारापासून संरक्षण मिळविण्यासाठी देशाच्या गुप्त, अज्ञात, अवघड स्थळी पणींना स्थलांतर करावे लागले. जागतिक स्तरावरचा सर्वाधिक सधन श्रीमंत समुह साधनहीन झाल्यामुळे त्यांना भटकंती व अस्थिर जीवनाला सामोरे जावे लागले. जंगल व पर्वत माळ माथ्यावर साधनहीन झाल्यामुळे हा समुह वन्य संपत्तीवर आधारीत व्यवस्था करुन जगु लागला. मधला बुध्दाचा शासनकाळ वगळता हा समुह इ.स. पूर्व 1700 ते 1947 पर्यंत गांव-शहरापासून दूर जंगलात तांडा नावाच्या लहान मोठ्या अस्थिर वस्ती करुन जगत होता. या दीर्घकाळात हा समुह कोळसा, गेरु, माती, मीठ, सुकामेवा, मसाला, शिकार, पशुविक्री, मातीकाम, रस्ते काम, बांधकाम, हमाली, वाहतुक, लदेणीद्वारा म्हणजे पशुच्या पाठीवर देशभर अन्न धान्य, शस्त्र पुरवठा, पशुपालन, किरकोळ शेती, शेत सोंगनीची कामे, वन्य वस्तु, गवत, डिंग, पत्रावळीची पाने, मोळी, गवत, रोजंदारी, सालगडी, पशु चारणे, दारु गाळणे व विकणे अशी अनेकानेक कष्टाची कामे करुन हा समाज आजही स्वावलंबी, स्वाभिमानी, बहादुीरीचे व भीक न मागता एखादा (अपवाद वगळून) जीवन जगत आहे. अवघडातले अवघड, कठीण कामे हा समाज करीत आहे. पण दुसर्‍या काही परोपजीवी, शोषक, अश्रमिक लोकांसारखे आयतखाऊ जीवन हा समाज जगत नाही. शासक वर्गासारखा शासकिय तिजोरीवर भ्रष्टाचारी जीवन जगत नाही. भेसळ, दलाली, फसवणूक, सावकारी करीत नाही. प्राचीन कालीन दानी, आदर्श व लोकहितवादी राजा संबर, बबु्र, हरिचंद, गोपीचंद, बळी, हे सर्व त्यांच्या नावावरून ते बंजारा, लमानीच असावेत असे वाटते. इसवीसना नंतर भिल्ल नेता गोविंद गोर, देमा गुरु, शिख अनुयायी बहादूर लाखा बंजारा, संत सेवालाल, महाराष्ट्राचे शिल्पकार कालवश आदरणीय वसंतरावजी नाईक या सर्वांनी समाजाला मानवतावादी विचार दिलेले आहे. समाजातील महिला पोशाख व अलंकारांनी सुंदर दिसत होत्या, तरी त्या पायापर्यंत लहंगा, कमरावर पूर्ण अंग झाकणारी काछळी (पोलके) पाठ झाकणारी पामडी (ओढणी) वापरुन, शरीर प्रदर्शन करीत नव्हती. विधवा पुनर्विवाहास समाजात इतर समाजाप्रमाणे बंदी नव्हती व यामुळे विधवा विवाह बंदी विरोधात हा पणी जनसमुह प्राचीन काळी आर्य जनसमुहाच्या, जीवनशैलीच्या विरोधात लढला होता. तो अत्यंत बहादुर, शूर व लढवया, स्वाभिमानी, स्वावलंबी, मेहनती होता. अनेक मजबुत व सुरक्षित किल्ले त्यांनी बांधलेले होते. परंतु आर्यपक्षी इंद्रदेवाने कपट व विश्‍वासघात म्हणजे त्यांच्या अप्सरा स्वरुप गोर्‍या कन्या राजा-महाराजांना देवून, विश्‍वास संपादन करुन, त्यांना अंधारात ठेवून त्यांचा पराभव केला व आर्य ब्राह्मणी वर्चस्व स्थापन केले. या आर्य ब्राह्मणांनी सिध्दार्थ गौतमचा (बुध्दाचा) देखील अशाच रीतीने पराभव केला. ब्रिटिशांना व बहुजनांना सुध्दा या आर्य ब्राह्मणांनी अंधारात ठेवून आजपर्यंत सत्तेत कायम आहे. कपट-कारस्थान, षडयंत्र, धोकेबाजी, फसवणूक, विश्‍वासघात, खोटे बोलणे, अपप्रचार करणे, शोषण, लूट, भ्रष्टाचार, व्याभिचार, अन्याय अत्याचार, निरक्षर, बेघर, बेरोजगार, उपासमार, अनारोग्य, स्वैराचार, द्वेष, बदनाम करणे, फुट पाडणे, खरेदी करणे, दहशत जमविणे, साम-दाम-दंड नीतीचा वापर करुन बहुजनांवर राज्य करणे, गुलाम, वेठबिगार बनवून ठेवणे, विना कष्ट भोगविलासी जीवन जगणे, विदेशींशी संगनमत करुन, हिस्सेदारी घेऊन राज्यकारभारात टिकून राहणे व सामान्यांना वार्‍यावर सोडणे हा एकमात्र कार्यक्रम या अमानवी, क्रुर, निर्दय, असभ्य समाजाचा आहे. या समाजाने सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर पौराणिक काळात अनेक विकृत ग्रंथांची व इतिहासाची मोडतोड करुन केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला भ्रमित केले, व दिशाभूल करुन मानवी वास्तव इतिहास नष्ट केलेला आहे. पौराणिक काळात (सिंधू, पणी समुह सभ्यताच्या विनाशानंतरच्या काळात यज्ञाच्या माध्यमांनी सर्वच पशुचे मांसभक्षण, स्त्रीयांशी स्वैराचार, बलात्कार, विनयभंग, नियोग, घटकचुकीचा खेळ, पशुंशी संबंध, जुगारात स्त्रिया लावणे, विश्‍वासघात, खुनखराबी करणार्‍या, परोपजीवी, अमानवी, दुष्ट लोक समुहावर चिखलफेक न करता आदर्श सिंधु संस्कृती निर्माता पणी (लमान, बंजारा) या समुहावर चिखलफेक करण्याचे काम अविचारी, जातीद्वेषी, समाज व देशद्रोही घाणचंद्र, दुर्गंधचंद्र नेमाडेच करु शकतात हे नाकारता येणार नाही. दुसर्‍याच्या कष्टावर बसून खाणार्‍यांनी कष्ट करुन जगणार्‍या समुहाची बदनामी करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. इतर बंदी घातलेल्या समाजाप्रमाणे वाढण्याची शक्यता फारच कमी होती. नवरदेवाला लग्नाआधी सहा महिने पौष्टिक आहार सासरवाडीकडून खाऊ घालुन पहेलवान बनवून लग्न लावण्याची परंपरा समाजात प्राचीन काळापासून आहे. समाज मांसाहारी व कष्टकरी असल्यामुळे बनिष्ठ असतो. प्राचीन काळापासून म्हणजे पराभवानंतर जंगलात स्थलांतरीत झाल्यापासून सन 1970 पर्यंत त्यांचा गाव व शहराशी संबंध आलेला नव्हता. त्यामुळे हा समाज संकरीत सुध्दा नाही. गांव शहरात राहणार्‍या लोकांमध्ये संकराची गती अधिक आहे. पण जो समाज एकटा गांव शहरापासून दूर संयुक्त कुटुंबात राहतो तेथे सहजा सहजी संकरण होत नाही. या पणी (बंजारा, लभानी, लमानी) समाजाच्या आदर्श व उद्देशपूर्ण, सुंदर, स्वच्छ, आकर्षक, जीवनशैलीबद्दल वेगवेगळ्या जनसमुहांनी व संतांनी, कविंनी, गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहे. यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत- पणी (लमाने, बंजारे) समाजाच्या जीवनशैली व कर्तृत्वाबद्दल नजीर अकबराबादींनी एक मोठा काव्य संग्रहच लिहिलेला आहे. त्यापैकी एक श्‍लोक किंवा पद ‘सब ठाठ पडा रह जायेगा, जब लाद चलेगा बंजारा’ हे श्‍लोक खुपच अर्थपूर्ण व सारभूत आहे. याचप्रमाणे औरंगजेबच्या सेनाप्रमुखांनी लभाने, बंजारे समाजाच्या महान कार्याची नोंद घेऊन ‘रंजन का पाणी, छप्परका घास और दिनके तीन खुन माफ’ जहां असफरवाके घोडे खडे, वहा जंगी भंगीके बैल खडे करनेका आदेश जनताको दे रखा था। या बरोबरचे चित्रपट सृष्टी ने सुध्दा या समाजाची तोंड भरुन स्तुती केलेली आहे. ही स्तुती चिंतन करण्यासारखी व बोध घेण्यासारखी आहे. ‘एक बंजारा गाये, जीवन के गीत सुनाये, हम सब जीनेवालोको जीनेकी राह बताये’ बंजारा, लमाना स्वत: म्हणतो की, ‘हम बंजारोंकी क्या हस्ती, आज यहा, कल वहां चले। मस्तीका आलम साथ लिये, हम सारे जहां में चले। विचार करण्यासारखी बाब आहे की एका साधनहीन, भटक्या पण स्वावलंबी, स्वाभिमानी, बहादुर, श्रमजीवी समाजाबद्दल विचारवंतांचे किती सुुंदर आणि सहज विचार आहे. याशिवाय संत कबीरजी, संत रविदासजी, संत नानकजी आदी महामानवांनी सुध्दा गोर बंजारा, गोर लमानाच्या सुंदर, आदर्श, मोहक जीवन पध्दतीवर अनेक दोहे, पदे, श्‍लोक लिहिलेले आहेत. अशा महान चिंतकाकडून मिळालेला सन्मान दुसर्‍या कोणत्याही जनसमुहाला थोड्या फार प्रमाणात क्वचितच मिळाला असावा. अशा गुन्हेगारांनी हजारवेळा माफी मागितली तरी गुन्हा क्षम्य होऊ शकत नाही. निष्पाप, लाचार, निराधार, निरक्षर, भटक्या, हेतुपुरस्सर गुन्हेगार ठरविलेल्या लोकांची बदनामी शारीरिक, कष्ट न करणार्‍यांनी करावी ही लांच्छनास्पद व अक्षम्य बाब आहे. दुर्गंध चंद्रच्या लक्षात हा अक्षम्य गुन्हा यावा व त्यांनी जाहिर माफी मागावी अशी अपेक्षा आहे. आदर्श सिंधु संस्कृती काळापासून पणी समुह अनैतिक संबंध करत आहे हे नेमाडेचे विधान तर त्यांच्या बौध्दिक दिवाळखोरीचे अस्सल उदाहरण आहे. प्राचीनकालीन सप्तसिंधू नदीकाठची आदर्श मानवी संस्कृती व सभ्यता निर्माता, आर्यांचा शत्रु, विरोधी असलेल्या पणी समुहाला आर्यांनी त्यांच्या सर्व पौराणिक ग्रंथामध्ये, अव्रती, अपव्रती व अन्य वृती म्हणजे न केले जाणारे, चूकीचे किंवा ब्राह्मणी सोडून इतर व्रत करणारे लोक, अनिंद्र म्हणजे आर्यप्रमुख अथवा सेनापतीला न मानणारे, अश्रध्द म्हणजे श्रध्दा न ठेवणारे, अदेवस्य म्हणजे देवांना, ब्राह्मणाला न मानणारे, अयाज्ञिक म्हणजे यज्ञयाग न करणारे, अर्य म्हणजे शेती करणारे, अरि म्हणजे शत्रु, अहि म्हणजे नागवंशी, अवर्ण म्हणजे वर्णरहीत, व्रतहनं म्हणजे मनुव्रत मोडणारे, मृधवाच म्हणजे अस्पष्ट बोलणारे, दैत्य, दानव, दसु, राक्षस, सैतान, निशाचर वगैरे नावाने बदनाम करण्याच्या प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आर्य हे पणीचे शत्रु होते व आजही आहेत. याच कारणामुळे आर्यांनी त्यांना वर्णबाह्य ठरवून गुलाम बनविले होते. याच कारणामुळे ब्रिटिशाच्या काळात सुध्दा ब्रिटिशाच्या मनात द्वेष पसरवून पणी व समकक्ष समुहाला गुन्हेगारन घोषित करण्यात आले होते, व आजही गुन्हेगारच मानतात. याचे कारण पणी विषयी त्याचा असलेला प्राचीनकालीन द्वेषच आहे. याचेच वारसदार, मनुसमर्थक द्वेषचंद्र नेमाडे आहेत असे मला वाटते. पणी (लमान, बंजारा समुहाने सर्व विदेशी शक्तीचा विरोध, सामना करुन देशनिष्ठ, देशभक्त असल्याचे सिध्द केले आहे. प्रथम मुगल, मुसलीमाच्या नंतर डच, फ्रान्सीस, ब्रिटिश या सर्वांचा या समुहांनी विरोध व सामना केला आहे. 1857 चा उठाव हे त्यांचे ज्वलंत व जीवंत उदाहरण आहे. एवढेच नव्हे तर राजपुत व सिख योद्ध्याबरोबर सुध्दा या समुहाने सेनेत राहुन सर्व शत्रु विरुध्द वीरगती प्राप्त होईपर्यंत लढे दिलेले आहे. एकूणच हा समाज देशनिष्ठ, लढवय्या, बहादुर, मेहनती, स्वाभिमानी, स्वावलंबी असतांना या समुहाच्या माता भगीनींना वेश्याची उपमा देणे यासारखा महामूर्खपणा दूसरा नाही. तथागत बुध्दाच्या काळात प्रमुख तीन गणसमुह होते. प्रथम तथागताचा शाक्य गण, जो कृषक मानला जात होता. दुसरा कोळीगण, जो बुनकर मानला जात होता व तिसरा वज्जी गण, जो व्यापारी, पर्यटक, माल वाहक कृषक, पशुपालक मानला जात होता, या वज्जीगणामध्ये सार्थवाह वैदेही, वैदेहिक, तथक, औंढ्र, औदुंबर, करकोटक वगैरे अनेक उपगणाचा समावेश होता. काश्मीर, पंजाब, उत्तर हिमालयाच्या क्षेत्रात या लोकांची वस्ती होती व शासक सुध्दा होते. काश्मीरमध्ये राज्य करणार्‍यांपैकी, लोहरागण, गोकुंदागण, कर्कोटा गण, नागपाल गण वगैरे प्रमुख गण मानले जात होते. महाकवि कलहनच्या राजतरंगीणी या ग्रंथात अशा अनेक गणाचा उल्लेख आहे. तसेच डॉ. नवलवियोगी यांच्या ’बादके हडप्पाईओंका इतिहास’ यात या पणी, बंजारा, लभाना, लबाना या समुहाबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे. हे पुस्तक वाचल्यावर संपूर्ण बहुजन समुह हा पणी समुहाचाच शाखा, प्रशाखांचा भाग असल्याचे वाटल्याशिवाय राहणार नाही. या पुस्तकात खासी व कनेत जनसमुहाची माहिती असून खासी जनसमुहाचे अनेक उपसमूह असल्याचे संबंधीत लेखकांनी दर्शविले आहे. विशेष म्हणजे पणी (लमान) समाजात माता भगीनीची नावे विशेषत: खालीलप्रमाणे सापडतात. उदा- सोनी, चांदी, रुपली, रजनी, हिरी, मोती, मानी, शशीकला, तारा, रमणी, धानी, खीरी, पोहनी, पणी, धम्मी, गोपी, यशोदा, कमळी, ढवळी, जमणी, अवळी, छमकी, अमरी, राही, राणी, रंभीर, गेणी, बुधी, भिकी, पिपळी, मोहीनी, हेमली, सोमली, मंगली, गोमली, जेसली, शेषी, संगीता, संघी, वाली, माली, नंदा, छबी, नभी, देवली, गोधी, हरणी, मोरणी, भुरी, गभी, खिमनी, वगैरे वगैरे नावे असतात. पण झेंडी हे नाव लमान समाजाच्या इतिहासात अद्याप पर्यंत कुठेच आलेले अथवा सापडलेले नाही. द्वेषचंद्र नेमाडेनी हे काल्पनिक, मनघडंत, किंवा दुसर्‍या कोणत्या तरी समाजाचे काल्पनिक, ‘हिंदु जगण्याची समृध्द अडगळ’ या कादंबरीत घेतले असुन हे त्यांनी लमान समाजाच्या द्वेषातुन समाजाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम घेतले आहे हे सिध्द होते. शिवाय विशेष समाजाच्या माता-भगीनींना लक्ष्य करुन त्या भगीनींना व समाजाला बदनाम करणे हा मोठा अपराध, गुन्हा, व अविचारीपणा आहे. अनैतिक संबंधाची प्रवृत्ती थोड्या फार प्रमाणात गरीब, श्रीमंत सर्वच समाजात दिसून येते. पण पुढारलेल्या समाजात हे अनैतिक संबंध झाकुन ठेवले जातात. पण मागास समाजाचे मात्र उघड्यावर काही विकृत बुध्दीवाद्याकडून होतात, हे निषेधार्य आहे. कारण माता भगीनी या कोणाच्याही असल्या, तरी कोणत्याही समाजाच्या असल्यातरी त्यांची मानहानी तोंडी, लेखी स्वरुपात करणे, ही नीचपणाची सर्वात खालची पायरी आहे म्हणून माझा व माझ्या समाजाचा या कादंबरीला व लेखकाचा जाहिर निषेध असून शासनाने या लेखकावर योग्य ती कार्यवाही करावी, दंड द्यावा व कादंबरीवर बंधन घालावे. प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments