ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद

ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद

भारत देश वस्तुत: प्राचीन काळापासून शेतीप्रधान देश आहे. शेतीचा शोध प्रथम भारतातच राजा प्रथुने लावला आणि प्रथु राजाच्या नांवामुळेच धरतीमातेला पृथ्वी या नांवाने संबोधले जाते. प्राचीन काळात शेतकर्‍यांना विश नांवाने संबोधले जात होते. या विशने शेतीचा प्रचार प्रसार संपूर्ण जगात केला म्हणून या जगाला विश्‍व नावाने सुध्दा संबोधले जाते. परंतु आर्यांच्या भारतात स्थायीकरनानंतर भारत देश हा शेतीप्रधान न राहता जाती, धर्म आणि देव, प्रधान झाला. अशा या जाती, धर्म आणि देव प्रधान देशातील जनतेची विभागणी आर्य ब्राह्मणांच्या काळापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, अतिशुद्र अशी आर्य ब्राह्मणांकडून प्रक्षिप्त वेद व गीता ग्रंथा आधारे करण्यात आली. या वरील पाच ही वर्गाला (वर्णाला) जातीसमुहाला कामे सुध्दा वाटप करण्यात आली. या मुख्य पाच जाती समुहामध्ये अनेक उपजाती सुध्दा तयार करण्यात आल्या अथवा व्यवसायानुसार अनेक उपजाती तयार झाल्या व त्यांच्यासमोर व्यावसायिक, राहणीमान, रक्तसंबंध, शिक्षण, भ्रमण, अन्न, वस्त्र, निवारा, सेवा वगैरेंची बंधने लादून जातीची चौकट मजबुत करण्यात आली. ही चौकट आजपर्यंत कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. 1947 नंतर संविधान लागूनही जातीरोग अद्यापही नष्ट झालेला नाही. वरील पांचही जनसमुहांपैकी ब्राह्मण समुहानी सर्वश्रेष्ठत्व त्यांच्याकडे घेतले. शिक्षण घेण्याचे व देण्याचे अधिकार त्यांच्याकडे घेतले. परिश्रम न करता, दानदक्षिणेवर आणि राजाच्या विशेषदानावर गुरुत्व त्यांच्याकडे ठेवून कोणत्याही अपराध अवस्थेत त्यांना दंडीत न करण्याचे ठरले. थोडक्यात ते स्वैराचारी बनले. स्वत:ला ईश्‍वर मानू लागले. क्षत्रियांकडे शासन व संरक्षण कार्य, वैश्यांकडे शेती व व्यापार आणि शुद्र व अतिशुद्राकडे वरील तिन्ही समुहाची देतील त्या मोबदल्यावर सेवा करण्याचे काम सोपविण्यात आले. वरील नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंड व शिक्षेची व्यवस्था करुन सनातन समाज व्यवस्थेचा मजबूत पाया आर्य ब्राह्मणवाद्यांनी घालून दिला. सर्वात खाली असलेल्या शुद्र- अतिशुद्रांनी, वैश्य, क्षत्रियांनी ब्राह्मणाला सर्व क्षेत्रात सर्वश्रेष्ठ मानून दानदक्षिणेच्या आधारावर त्यांचे पोषण व संरक्षण करावे यालाच ब्राह्मण्य मानले जाते. वस्तुत: ब्राह्मण हा एक विदेशी जनसमुह आहे. ती एक अपरिश्रमी जात आहे. या अपरिश्रमी अथवा परोपजीवी संपूर्ण जात समुहवृत्तीलाच ब्राह्मण्य संबोधले जाते. ब्राह्मण हा श्रेष्ठ समजला जाणारा जात समुह आहे तर ब्राह्मण्य ही एक वृत्ती आहे. ही वृृत्ती ज्या जात समुहामध्ये आहे तो ब्राह्मण्यवादी जनसमुहच आहे. ब्राह्मण वगळता इतर सर्व समुह कष्ट करुन जगतात व ब्राह्मण कष्ट न करता दुसर्‍याच्या कष्टावर जगतो व सर्वश्रेष्ठ देखील समजतो. म्हणून जे जे समुह, मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अथवा शुद्र, अतिशुद्रांपैकी का असेना, जो स्वत: दुसर्‍या समुहापेक्षा श्रेष्ठ समजतो, व परोपजीवी जीवन जगतो तो ब्राह्मण्यवादीच आहे. ब्राह्मण जर शारिरीक कष्ट करुन जगत असेल, तो कमी पगारावर व अस्वच्छ काम करीत असेल, देश संरक्षणार्थ व विकासार्थ त्याग करीत असेेल. जात, धर्म व धार्मिक कर्मकांड मानीत नसेल तर तो ब्राह्मण्यवादी नाही. पण जो समुह, स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, कष्टाला, अस्वच्छ कामाला, कमी मोबदला व देश हितार्थ त्यागाला तुच्छ मानतो, तो कोणत्याही समुहाचा असो तो ब्राह्मण्यवादीच आहे. ही ब्राह्मण्यवादी वृत्ती, प्रवृत्ती देशहित, देशभक्ती, देशसमृध्दी, देश शांततेला, समतेला, न्यायाला, बंधुत्वाला, स्वातंत्र्याला, संविधानाला घातक आहे. म्हणून ब्राह्मण्यप्रवृत्तींचा समुळ नाश झाल्याशिवाय देशाचे स्वातंत्र्य कधीही अबाधित राहणार नाही. ही ब्राह्मण्यप्रवृत्ती आर्य भारतात येण्यापूर्वी भारतात अस्तित्वात नव्हती. आर्य पूर्व काळापासून येथील मुळनिवासी, पशुपालन, शेती, व्यापार, कलाकुसरीची कामे करुन जगत होता. ब्राह्मण्य प्रवृत्तीची उत्पत्ती ही आर्य आगमनानंतर सर्वप्रथम आर्य ब्राह्मणातच दिसून आली. कारण ते दानदक्षिणेशिवाय इतर सर्व कामे शेती, पशुपालन, कलाकुसरीची कामे, संरक्षण, सेवा यांना पाप कर्म मानत होते व आजही मानतात. अर्थात ब्राह्मण्य कृतीचे जन्मदाते हे मुळात ब्राह्मणच असल्यामुळे या प्रवृत्तीचा संबंध त्यांच्याशी दर्शविणे अयोग्य नाही. ब्राह्मणांना जर ब्राह्मण्यवादी म्हणटल्याचे वाईट वाटत असेल तर त्यांनी स्वनिर्मित ब्राह्मण्यवाद मिटविण्याचे स्वत:हुन प्रयत्न करावे. जर ही ब्राह्मण्यप्रवृत्ती देशातून मिटविण्यात आली तर या प्रवृत्तीबद्दल कोणत्याही समुहाला दोष देता येणार अथवा बदनाम केले जाणार नाही. देशात बंधुभाव, शांतता, समता निर्माण होऊन देश विकसित राष्ट्राच्या पंगतीला सहज बसविता येईल किंवा विश्‍व मार्गदर्शकही बनविता येईल. फक्त ब्राह्मण्यवादी वृत्तीचे समुळ उच्चाटन करण्याची आज खरी गरज व अनिवार्यता आहे. प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments