कधी कधी वाईटातूनही खुप चांगले बाहेर येते

कधी कधी वाईटातूनही खुप चांगले बाहेर येते

दि. 22-3-2021 कधी कधी वाईटातूनही खुप चांगले बाहेर येते देशात वाईट, अन्यायकारक घटना घडत असतांनाच देशातील सवृच जाणकार, विचारवंत या घटनेबाबत चर्चा करतात व आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रीया देतात. घडलेल्या घटनेला कधी न्या मिळतो तर बहुसंख्य अन्यायी घटनेवर न्याय मिळतच नसतो. ज्या देशात अन्यायी व जातीवादी लोक शासक असतात, तेच दुर्बलांवर सर्वांधिक अन्याय करतात व न्या देण्याचे टाळून अपराध्यांनाच संरक्षण देतात. कारण अन्या करणारे सत्ताधारी जातीवादीच असतात. तेव्हा गुन्हा, अपराध कितीही गंभीर असला तरी सत्ता, संपत्तीच्या बळावीरल आपल्यावरील समुहातील अपराधींचे संरक्षण करणे हेच त्यांना महत्वाचे नव्हे तर परम कर्तव्य वाटते. बहंजनांवर, दुर्बलांवर, वंचितांवर, बहिष्कृतांवर, बहुसंख्य अन्याय हे जातीवादी व सत्ताधार्‍याकडूनच झालेले असतात, हे अपराध या लोकांना एखाद्या खेळातील खेळणी, बाहुलीलसारखे वाटते व खेळातील खेळणी, बाहुली मोडली तरी त्यांना वाईट वाटत नाही. त्याचप्रमाणे बहुजनांवरील अन्याय त्यांना खेळणीच्या खेळासारखे वाटतात व याबाबत त्यांना कोणतेही दु:ख होत नाही व धाक अथवा वाईटसुद्धा वाटत नाही. कारण गुन्हेगारांना, सत्ता संपत्ती अधिकार, श्रेष्ठत्व या सर्व बाबींचा आज, मस्ती,गर्व चढलेला असतो. याच कारणामुळे हजारो वर्षापासून वरील समुह दुर्बळ, वंचित घटकांवर अन्याय,अत्याचार करीत आहेत. करीत राहणार आहे, पण सध्याची परिस्थिती बदललेली ओ. आजपर्यंतच्या अन्यायी घटना असंघटीतपणा व समाज संघटीत झाला असून हजारो वर्षापासूनचा आपला खरा शत्रू कोण आहे हे त्यांनी पुजा चव्हाणच्या हत्या प्रकरणावरून चांगल्या प्रकारे ओळखले आहे. पूजा चव्हाणच्या स्वहत्या प्रकरणी देशातील भाजप सोडून एकही पक्ष ओरड करु लागलेला नाही. कारण मागील काळात असे लाखो अपराध घडलेले ओहत. बहुजनांवर संविधानिक अन्यायसुद्धा झालेले आहेत. अशा अपराध आणि अधिकारांबाबत भाजप व त्यांच्या मित्रपंक्ष संघटना यांनी कधीच ओरड केलेली नाही, न्यायासाठी रस्त्यावर उतरलेली नाही, पंरतु पुजा स्वहत्या नंतर राजकीय हित संबंध साध्य करण्याची सुवर्णसंधी पाहुन हे लबाड कोल्हे, लांडगे, कावळे त्यांचे ध्येय साध्य करुन घेण्यासाठी रात्रं-दिवस सत्ताधारी शासनावर दबाव आणत आहेत हे जवळ जवळ सर्व बहुजनांना समजले असून मागील हजारो वर्षापासून असलेले बहुजनांचे खरे शत्रु आर.एस.एस. भाजप पक्ष यांची त्यांना आत ओळख पटली आहे. तसेच कोण कोणत्या पक्षात हे शत्रु घुसले असून बहुजनांचा विनाश करण्याच्या मागे लागलेले आहेत. हे बहुसंख्य बहुजन हितचिंतकांना उघउपणे कळून आलेले आहे. तेव्हा यापुढे बहुजन समाजातील खरा स्वातंत्र्यवारी यापुढे आर.एस.एस.चे, भाजप, मनसेमध्ये राहण्याची किंवा समर्थन करण्याची गोष्ट तर दूरच, त्याचं नांव सुद्धा काढणार नाही व त्यांच्या सावलीत सुद्धा उभज्ञ राहणार नाही असे मला वाटते. एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या वस्तीत गांव,तांडा,वाडीमध्येसुद्धा प्रवेश करु देणार नाही, कारण आजपर्यंतचे सर्वच सर्व संविधानिक हक्क व अधिकार बहुजनांनी याच लोकांनी मिळून दिले नसून आता बहुजन व शेतकरी विरोधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ते उदो उदो करीत आहे. हे ही समजून चुकले आहे. तेव्हा सर्व बहुजनांना, गोरबंजारा समाजाला, भटक्यांना, माझे जाहिर आवाहन आहे ी, यापुढे आर.एस.एस. भाजप व मनसे व त्यांच्या समर्थकांना शपथ घेवून आपल्या वस्तीत प्रवेश देवू नका व मतदान, समर्थन, मदत करु नका, कारण हे सर्व लोक मानवता विरोधी असून देशात मनुशाही, हिंदूशासन आणून सर्व बहुजनांना कायमचे निरक्षर,बेकार,बेघर, गुलाम, वेठबिगार, बनवून पशूप्रमाणे वापर करण्याचे ह्यानी ठरवलेले आहे. यासाठीच त्यांनी नोकर भरती बंद करुन, शिक्षण महाग करुन व खाजगीकरण करुन बहुजनांचे अस्तीत्वालाच नष्ट करण्याचे ठरविले असल्याचे दिसून येते आहे. बहुजनांना आपल्या महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर वरील घटकांना हद्दपार केल्याशिवाय दूसरा पर्याय नसल्याचे सर्वांनी जाणून घ्यावे हीच हात जोडून सवार्र्ंना जाहिर विनंती व आवाहन आहे. जयभारत- जय संविधान प्राचार्य ग.ह.राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments