जन्म- 1 जुलै 1913 मृत्यू - 18 ऑगस्ट 1979
1) माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. धर्माच्या व जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे ही माणुसकी
नाही, हा धर्म नाही.
2) देशाचे बळ देशात राहणार्या लोकांच्या ज्ञानावर, त्यांच्या चारित्र्यावर व कर्तुत्वावर आणि देशासाठी सर्वस्व ओवाळून टाकण्याच्या वृत्तीवर अवलंबून असते.
3) देशात लोकशाही मजबूत करावयाची असेल तर समाजाच्या सर्व स्तरातील नेतृत्व मजबूत केले
पाहिजे.
4) माणसा माणसांत आपण भेद केल्यास भारत संघटित व एकसंघ होऊ शकणार नाही.
5) माणसाची श्रमशक्ति फुकट न जाता ती देशाच्या विकासासाठी लागली पाहिजे.
6) शेती ही उद्योगाची जननी आहे, म्हणून या देशाची गरीबी दूर करण्याची शक्ती शेतीच्या उद्योगात आहे.
7) देहात जीव आहे तोपर्यंत जनतेची सेवा करीन, हाच मी माझा धर्म मानलेला आहे.
8) शेती विकास झाल्याशिवाय देशाला अन्नधान्याची स्वयंपूर्णता लाभणार नाही, व तसे घडले नाही
तर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे अशक्य होईल.
9) पाणी हे शेतीसाठी अमृता सारखे आहे.
10) देशाला बलवान बनविण्याची शक्ति शेतकर्यांतच आहे.
11) आपल्या देशातील दारिद्रय आणि धान्याची टंचाई या विरुध्द लढा देण्याची गुरुकिल्ली शेती आहे.
12) शेतीचे उत्पन्न ज्या पध्दतीने वाढविता येईल, तेवढे वाढविण्याचा प्रयत्न म्हणजे देशभक्ति.
13) प्रगतीचा मुळ पाया या देशातील शेतीमध्ये आहे. या देशाची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे
शेतीची प्रगती.
14) आपण सर्व जबाबदार लोक आहोत, ही गोष्ट लक्ष्यात ठेवून प्रगतीच्या प्रत्येक कामात आपण स्वत:
पुढाकार घेतला पाहिजे.
15) माझ्याजवळ असलेली बुध्दी, शक्ति, अधिकार या नात्याने मी कशा तर्हेने वापरुन जनतेची सेवा
करु शकतो, याचा प्रत्येकांनी विचार केला पाहिजे.
16) माणूस हा आम्ही विकासांचा केंद्रबिंदु मानतो.
17) आम्ही जर आपसांत भांडू लागलो, एकमेकांना मारु लागलो तर आपली शक्ति त्यातच खर्ची पडेल
यासाठी जातीय सलोखा कायम राखणे फार आवश्यक आहे.
18) देश आणि भारतीय समाज बलवान करावयाचा असेल तर धर्म, वंश, पंथ, जात, भाषा यावर
आधारलेले भेद नष्ट झाले पाहिजे.
19) हा देश आपला आहे आणि या देशाचा आणि राज्याचा विकास बाहेरुन येऊन कोणी करणार नसून,
तो आपल्यालाच करावयाचा आहे.
20) प्रत्येकाने आपापले काम, आपली शक्ति, बुध्दी आणि चातुर्य पणास लावून केले पाहिजे.
संकलक. प्रा. ग.ह. राठोड