बहुजन शत्रुचा सामना कसा करणार?

निरक्षर, अज्ञानी, गरीब, दुर्बळ राहणे हा अपराध आहे. पण हा अपराध, सहन करणे हा त्याहीपेक्षा सर्वात मोठा गुन्हा आहे, असे क्रांतीकाराचे म्हणने आहे.

निरक्षर, अज्ञानी, गरीब, दुर्बळ राहणे हा अपराध आहे. पण हा अपराध, सहन करणे हा त्याहीपेक्षा सर्वात मोठा गुन्हा आहे, असे क्रांतीकाराचे म्हणने आहे. आजचा बहुजन, अप्रस्थापित, अब्राह्मणी, अनार्य, असुर, श्रमिक, भारताचा प्रथम निवासी (मुळनिवासी) या देशाचा मालक, राजा, शासक, हा गेल्या पाच हजार वर्षापासून अनेक विदेशी आक्रमकाची गुलामी सहन करीत आहे. या दिर्घकालीन गुलामीत तो असहनीय, दु:ख, वेदना, यातना, अन्याय, अत्याचार, संकटे, उपासमार, कुपोषण, अपमान सहन करीत आहे. त्यांच्यावर अन्याय करणारे आजपर्यंतचे सर्व विदेशी होते व आजही आहे. हे विदेशी एकूण भारतीय बहुजन संख्येच्या प्रमाणात फक्त 15 टक्के पेक्षा कमी आहेत. पण ते षडयंत्रकारी पध्दतीने 85 टक्के बहुजनांना पाच हजार वर्षापासून गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य करीत आहे. बहुजन समाज (मुळनिवासी) अब्राह्मण वर्ग हा वस्तुत: अत्यंत मेहनती, बहादुर, हुशार, समतावादी, मानवतावादी आहे. भारत देशाला या वर्गांनी कष्टाच्या माध्यमानी शुन्यातून समृध्दीच्या शिखरावर पोहचविले आहे. देशातील लहान्यापासून अति मोठ्या वस्तुपर्यंतची निर्मिती ही 85 टक्के बहुजनांच्याच कष्टाची आहेत. आजही सर्व उपभोग्य वस्तुंचा निर्माता तोच आहे. 85 टक्के बहुजन म्हणजे अप्रस्थापित वर्ग वगळून बाकीचा अश्रमी, श्रम न करणारा, परोपजीवी, आळशी, आयतखाऊ 15 टक्के वर्ग वांझ व देशाला भार व कष्टकरी बहुजनांचा शोषणकर्ता आहे. तो आयत्या बिळाचा नाग होऊन बसलेला आहे. तो बाहेरुन नंतर आलेला आणि शिरजोर झालेला वर्ग आहे. वस्तुत: 85 टक्के वर्ग हा पुरुषार्थी आणि 15 टक्के प्रस्थापित ब्राह्मण बनिया वर्ग हा पुरुषार्थहीन वर्ग आहे. परंतु सत्ताशक्ति, संपत्ती, शिक्षण व साधने काळाच्या प्रवाहात त्यांच्या हाती जमा झाल्यामुळे पुरुषार्थी बहुजन समाज हतबल, लाचार, मजबूर होऊन कष्ट करुन गुलामी पत्करुन, असहनीय पशुमय व पुरुषार्थहीन जीवन जगत आहे. त्यांचे हे पुरुषार्थहीन जीवन वस्तुत: फार मोठा अपराध, गुन्हा, चुक व नेंभळटपणा आहे. यांचे कारण त्याला त्याचा स्वावलंबी, पराक्रमी, मालक, राजा असलेला आदर्श समतावादी इतिहास माहित नाही. त्यांच्यासाठी त्याग केलेल्या खर्‍या हितचिंतक महापुरुषांची, संताची त्यांना विस्मृती झालेली असून तो आजपर्यंत शोषक ब्राह्मणी देवी-देवतांच्या काल्पनिक व भ्रामक शत्रूला तारक, उध्दारक समजून त्यांची भक्ती, सेवा करण्यात आपला मौल्यवान वेळ, पैसा व शक्ती वाया घालवित असून त्यांच्या कर्मकांडाच्या माध्यमांनी दान दक्षिणा देऊन शत्रू ब्राह्मणांचे पालन व संरक्षण करीत आहे, व याच अज्ञानामुळे तो आजपर्यंत पिढीन पिढी दु:ख भोगत आहे. गुलामी करीत आहे. या दु:खातून मुक्त होण्यासाठी तथागत बुध्दांनी धर्माचा त्याग करुन धम्म मार्गाने चालण्याचा उपदेश व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेबांनी बहुजनांना 22 प्रतिज्ञांचे कठोरपणे पालन करण्याचा सल्ला, मार्ग, दिलेला आहे. पण बहुजनांच्या डोक्याचा, मेंदुचा ताबा ब्राह्मणवाद्यांनी घेतल्यामुळे किंवा बहुजनांचा मेंदुच सडल्यामुळे तो ब्राह्मणी सभ्यता, संस्कृती आणि कर्मकांडाचा जयजयकार, उदो-उदो, उदारीकरण, समर्थन आंधळेपणाने करुन गुलामीची दुष्फळे भोगत आहे. प्राचीन काळचा व आजचा मुळ भारतवासी या देशाचा मालक, शेतकरी, बहादुर राजा, आदर्श मानवता व समतावादी 85 टक्के जनसमुह असूनही 15 टक्के विषमतावादी ब्राह्मणांसमोर हतबल होऊन, असंघटीत बनून पुरुषार्थहीन गुलामीचे जीवन जगत आहे. यापेक्षा हा समाज स्वहत्या करुन मरुन जायला हवा होता. कारण तो बहादुर व आदर्शवादी असूनही तो जनावरांप्रमाणे अविचारी व परावलंबी जीवन जगत आहे. संतांनी परावलंबी, भिकारी, लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करणे श्रेष्ठ असल्याचा उपदेश दिलेला आहे. पण संतांच्या या उपदेशांचा मनावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या बुध्दीचा, कष्टाच्या, कलेच्या, माध्यमानी सर्व मानवाचे पोषण, पालन, कल्याण करणारा बहुजन समाज आज केवळ विचार, चिंतन, मंथन, संघटन, संघर्ष करीत नसल्यामुळे व शत्रूसमोर हतबल होऊन नांगी टाकल्यामुळे तो पुरुषार्थहीन झालेला दिसून येत आहे. तो केवळ तथागत बुध्द, छ. शिवाजी, डॉ. बाबासाहेबांच्या पोक़ळ, निरर्थक घोषणा देत असून कृतिशुन्य व विभक्त झालेला आहे. हे सर्व ब्राह्मणांचे ब्राम्हण्य त्यांच्या मेंदूत घुसल्यामुळे झालेले आहे. तेव्हा बहुजनांनी सर्वप्रथम संपूर्ण ब्राह्मणवाद, मनुवादाचा त्याग करुन बुध्दयान आणि भीमयानच्या मार्गाने चालण्याची व शत्रूचा संपूर्णपणे नाश करण्याची भीम प्रतिज्ञा केल्याशिवाय गुलामीतून मुक्त होता येणे शक्य नाही. सद्य परिस्थितीचे अवलोकन करुन कोणी तरी विद्वानाने सांगितले आहे की, गांडू भडवे रण चदे, मर्दोके बेहाल । (रणचढे) पतिव्रता भुकसे मरे, और पेढे खाय छिनाल ॥ किंवा घोडेको नहीं मिल रही हरी घास। और गधे खा रहे हैं, आज सर्वत्र च्यवनप्राश ॥ अर्थ असा की, आज पुरुषार्थहीन, भाडखाऊ, दलाल, परोपजीवी जनसमुह युध्दाच्या संघर्षाच्या,पराक्रमाच्या राज्याच्या बाता करीत आहे व जो खरा प्राचीन बहुजन समुह आहे. देशाचा निर्माता, पालनकर्ता, कष्ट करणारा, त्याचे मात्र हालहाल होत आहे. हा प्रकार म्हणजे शीलविहीन स्त्रीने मौजमजा करावी व चारित्र्यवान स्त्रीने भुकेने तडफडून मरावे अशातला प्रकार असल्याचे सांगितले आहे. तसेच गुणवान, वेगवान घोड्याला चणे, हरभरे, हिरवे गवतही न मिळावे व उकीरड्यावर लोळणार्‍या, लाथा मारणार्‍या व जोरजोराने ओरडून शांतता भंग करणार्‍या गाढवाला मात्र शक्तिवर्धक च्यवनप्राश खाद्य मिळावे, अशा प्रकारची विसंगती आज देशात दिसून येत आहे. ज्यांनी शारिरीक कष्टाच्या माध्यमाने पूर्ण देश सर्वोपयोगी व सर्वांग सुंदर बनविलेला जनसमुह आहे, तो मात्र उपाशी राहत असून दु:ख भोगत आहे. परंतु कष्टाच्या व अस्वच्छ, कमी उत्पन्नाच्या साधनांना, व्यवसायाला हात लावत नाही तो समुह तुपाशिवाय व सुक्यामेव्याशिवाय काहीही खात नाही. कष्टकरी बहुजनांना मात्र स्वनिर्मित साधनांचा सुध्दा उपभोग घेता येत नाही, अशी समाज व शासन व्यवस्था, परोपजीवी ब्राह्मण,बनिया वर्गाने निर्माण केलेली आहे. भारतात ज्यांनी शिक्षण आणि संपत्तीवर ताबा करुन घेतलेला आहे, असा भांडवलदार वर्ग गोचीड बनून बहुजनांच्या रक्ताचे, कष्टाचे शोषण करीत आहे. यास्तव सर्व भारतीयांना सर्व प्रकारचे समान शिक्षण आणि राष्ट्रीय साधन संपत्तीचे राष्ट्रीयकरण केले जात नाही, तोपर्यंत बहुजनांचे शोषण अटळ राहणार आहे, यात कोणीही शंका घेऊ नये. प्रस्थापित वर्ग शोषण व्यवस्था कायम टिकून राहावी व त्यांचे वर्चस्व, श्रेष्ठत्व, भोगवादी जीवन, सत्ता, संपत्ती, शिक्षण, साधने सर्व काही त्यांच्याच ताब्यात राहावे व बहुजनांनी कष्ट करुन त्यांना सुखसोयी पुरवित राहावे अशी समाज व शासन व्यवस्था निर्माण करीत आहे. त्यांचे हे प्रयत्न स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालूच होते. या प्रयत्नाला 1991 पासून म्हणजे ब्राह्मणी काँग्रेसी प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहरावनी थोडी गती दिली व या गतीला 2014 पासून गुजराती प्रधानमंत्री नरेद्र मोदीने वायु वेगाची गती दिलेली आहे. मोदीनी संविधान, आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायदे नष्ट करुन व नोटबंदी, विचारस्वातंत्र्यबंदी, गोहत्याबंदी, नोकरभरती बंदी, रोजगार बंदी, बाबरी मशीद विध्वंस, वंचित वर्गावरील अत्याचारात वाढ, निरपराधांना जेल व आतंकवादी, दहशतवादी ठरवून सामाजिक, शासकिय व्यवस्थेचे महावादळ निर्माण केले आहे. या वादळात मागासवर्गाचे अस्तित्व मिटणार असून संपूर्ण प्रस्थापित वर्ग जगाच्या विविध देशात जाऊन स्थायीक होणार आहे. आजपर्यंत खुप मोठा वर्ग विदेशात जाऊन स्थायीक होऊन भारताबरोबरच दुसर्‍या देशाचा सुध्दा सुरक्षित नागरिक बनलेला आहे. या लोकांनी भारतातील बहुजनांचा भारतीय बँकातील पैसा शेकडो करोडोंनी कर्जरुपात उचलून परतफेड न करता विदेशात नेऊन लपविले आहे. यासाठी त्यांनी विदेशात स्वतंत्र खास प्रकारची व्यवस्था करुन ठेवल्यामुळे या पैशाचा शोध घेणे देखील बहुजनांना अवघड झालेले आहे. भारताचा पैसा लुटून विदेशात लपविणार्‍यामंध्ये बहुसंख्य ब्राह्मण, बनिया म्हणजे गुजराती, राजस्थानी, जैनसमुह, मारवाडी समुह, सिंधी, बहुरी, पारसी वगैरेंची खुप मोठी संख्या आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकारण ,शिक्षण, अर्थकारण, व्यापार, लहानमोठे उद्योग, तेल, खनीज धातु, मौल्यवान धातु, खदानी, परिवहन, विजनिर्मिती, दुरभाष, संगणक, वित्तसंस्था (बँका) या सर्वांवर वरील समुहाची पक्की पकड होती व आजही आहे. बहुजन समाज मात्र मरणाचे कष्ट व उष्ट्यावर जगून देशसेवेचे काम निष्ठेने व लाचारीने करीत आहे. या कष्टकरी, भोळ्या, समाजाला सर्व क्षेत्रात फसवून व देश गहाण ठेवून, विकून दुसर्‍या देशात पैसा लपविणारे, पळून जाणारे, देश बुडविणारे, विदेशींच्या संगनमताने भारतीय बहुजनांना लुटणारे हे सर्वच सर्व वस्तुत: देशाचे दुश्मन व राष्ट्रद्रोही आहेत. परंतु बहुजन अद्यापही या देशद्रोहींना न ओळखता त्याचे समर्थन करीत आहे. या देशद्रोह्यांना, देश लुटणार्‍यांना, संविधान पायदळी तुडविणार्‍यांना समर्थन देणारा प्रत्येक भारतीय सुध्दा देशद्रोही, समाजद्रोही व महामुर्ख आहे असे मला वाटते. कारण अशा लोकांमध्ये शत्रु कोण आणि आपले मित्र कोण आहेत हे ओळखण्याइतकी सुध्दा बुध्दी नसते. म्हणून असे महामूर्ख शत्रुची पाठराखन करुन आपल्याच हाताने आपल्या पायावर कुर्‍हाड मारुन घेतात. अशातलाच आजचा बहुजन समाज आहे. बहुजनांची संस्कृती ही निसर्ग संस्कृती आहे. त्यांची विकृत असलेली मनुवादीची सनातन संस्कृती नाहीच परंतु आपला खरा इतिहास विसरुन आजचा बहुजन समाज हा विकृत मनुवादी सनातनी विषमतावदी विकृतीचा उदो-उदो करीत आहे. प्राचीन निसर्ग संस्कृती व मध्यकालीन बुध्द संस्कृती व वर्तमानकालीन विकृत सनातन संस्कृतीमध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे. प्राचीन व मध्यकालीन निसर्ग संस्कृती व बुध्द संस्कृती ही ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ या तत्वाचा आधार होती तर वर्तमानकालीन सनातन संस्कृती (विकृती) ही केवळ प्रस्थापित वर्गाची पोषक व बहुजनांची शोषक आहे. म्हणून या विकृतीचा जोपर्यंत त्याग केला जात नाही, तोपर्यंत बहुजनांची गुलामी नष्ट होणार नाही. प्रथम बुध्दांनी, त्यानंतर म. फुलेंनी व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेबांनी या विकृत संस्कृतीचा त्याग करुन बहुजनांना खरा मार्ग दर्शविलेला आहे. परंतु बहुजनांचे अद्यापही डोळे उघडत नाही व शहाणपण ही येत नाही ही एक शोकांतिका मानावी लागेल. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधानानुसार भारताची प्रगतीच्या दिशेने घोडदौड चालु होती. मध्यंतरी रेलदौड सुरु झाली होती व आता विमान वेगाने देशाची व बहुजनांची सुध्दा प्रगती होणार होती. परंतु विदेशी व प्रस्थापितांना देशाची व बहुजनांची ही प्रगती नको होती. ही प्रगती वायु अथवा प्रकाश वेगाने सुरु झाल्यास कष्टकरी बहुजन समाज आपल्यापुढे जाईल व आपण परोपजीवी ना कष्टकरी समाज मागे राहु या भीतीने प्रस्थापितांनी देशाच्या व बहुजनाच्या प्रगतीत अडथळे आणायला सुरुवात केली. ही प्रगती रोखण्यासाठी प्रस्थापितांनी देशाच्या सर्व पक्षात घुसखोरी केली. प्रगतीचे सर्व रहस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरविले व कटकारस्थान रचून सत्ता भाजपच्या हाती सोपविली. अन्य पक्षात असणार्‍या मंत्र्यांना हे षड्यंत्र कळू दिले नाही व सर्व प्रस्थापितांनी एकत्र येऊन बहुजन उपयोगी सत्ता नष्ट केली व सत्तेवर येताच बहुजन विरोधी कारवाया सुरु केल्या. आर.एस.एस. प्रशिक्षित अटलबिहारी वाजपेयी प्रथम प्रधानमंत्री बनताच त्यांनी घटना अवलोकनाची व त्याच बरोबर खाजगीकरणाची घोषणा केली व खाजगीकरणाचे मंत्रालय निर्माण करुन मंत्री अरुण शौरी यांना खाजगीकरणाचे आदेश देऊन टाकले व तेव्हापासून खाजगीकरणाला वेग आले. देशात खाजगी, सार्वजनिक व खाजगी-सार्वजनिक मिळून तीन प्रकारचे उद्योग चालतात. खाजगी उद्योगांना अपयश आल्यामुळे मधल्या काळात त्यांचे सुध्दा सार्वजनीककरण झाले होते. सार्वजनिक उद्योग हे जनतेचे व शासनाचे भाग भांडवल मिळून चालविले जाते. काही अपवाद वगळता सार्वजनिक सर्व उद्योग प्रचंड नफ्यात चालत होते. त्यांचा पसारा व साधन संपत्ती सुध्दा प्रचंड स्वरुपात वाढली होती. देशाला या उद्योगाचा खुप मोठा आधार होता. या सार्वजनिक उद्योगाच्या फायद्यातून देशाच्या अनेक योजना राबविल्या जात होत्या. बहुजनांच्या कल्याणासाठी या निधीचा खुप मोठा हिस्सा खर्च केला जात होता. बहुजनांची प्रगती होत होती, हीच प्रगती प्रस्थापितांच्या डोळ्यांना टोचू लागली. बहुजनांची ही प्रगती रोखली जावी, त्यांचा रोेजगार नष्ट केला जावा. सार्वजनिक क्षेत्राची बहुजन कष्टाची प्रचंड साधन-संपत्ती ताब्यात घेऊन बहुजनांना बेकार बनवावे व आपल्या स्वजातीय लोकांना रोजगारांच्या संध्या उपलब्ध करुन देवून प्रस्थापितांना भोगवादी जीवन जगता यावे म्हणून खाजगीकरणाला सुरुवात झाली. आज 75-80 टक्के सार्वजनिक उद्योगांच खाजगीकरण करण्यात आले असून प्रचंड लुट व विदेशात पैसे जमविणे चालू आहे. अटलबिहारी वाजपेयी नंतर मनमोहनसिंह दहा वर्षे पंतप्रधान राहिले. अटल व मनमोहनसिंह दोघे मित्र व आर.एस.एस. चे विद्यार्थी होते. यामुळे मनमोहनसिंह काँग्रेस पक्षाचे असूनही त्यांनी अटलजीचे धोरण राबविले. आता मोहनसिंहजी नंतर नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री पदावर 2014 पासून विराजमान आहेत. मोदीजी प्रधानमंत्री झाल्यापासून राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या धोरणानुसार व आदेशानुसार तंतोतंत बहुजन विरोधी धोरण राबवित आहे. उद्योगधंद्याचे खाजगीकरण म्हणजे वैयक्तिक मालकी दिल्यामुळे मालक मनमानी करुन बहुजन, मजूर, शेतकरी, कामगार या सर्वांना वेठीस धरीत आहे. कमी पगारात जास्त वेळ राबवून व कामगारांना कोणत्याही सवलती व अधिकार न देता व कच्चा माल मातीमोल घेऊन तो पक्का करुन प्रचंड फायदा व सामान्यजनाचे शोषण करीत आहे. उदारीकरणाच्या नावाने उद्योगपतींना करोडोचे बिनव्याजी, बुडतीचे, दिवाळखोरीचे, कर्ज, मोफत जमीन, वीज, पाणी, कोणत्याही प्रकारचे कर न लादता कर्ज वसूली न करता पुन्हा पुन्हा कर्ज देवून त्यांना संस्थानिक बनविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. जागतिकीकरण म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने सरकारने आता आंतरराष्ट्रीय नाणे निधी विश्‍व बँक, व विश्‍व व्यापार संघटना यांना डोक्यावर बसून घेतले असून त्यांच्या संगनमताने भारत देशाची लुट चालु आहे. निर्यातीचे धोरण बंद करुन आयातीचे धोरण स्वीकारल्यामुळे भारतीय शेतकर्‍यांचा दिवाळा निघालेला आहे. उद्योगपतीकडून सक्तीने कर्ज वसूली, व्याज वसूली, कर वसूली न करता त्यांना पुन्हा पुन्हा व्याजमुक्त कर्जाचा पुरवठा करीत आहे. हजारो करोड रुपये कर्ज बुडवून प्रस्थापित वर्ग पैसा घेऊन विदेशात पळत आहे. 12 ते 20 टक्क्यांवे शेतकर्‍यांचे कर्ज वसूल न झाले तर त्यांच्या जमीनी, घर व साधनांची हरासी करीत आहे. देशात चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम चालु आहे. त्यागी जीवन जगणार्‍या साधू-संतांना मंत्रीपदे देवून बहुजनावर धर्माच्या, जातीच्या नावाने अन्याय, अत्याचार, हिंसा, जाळपोेळ करायला लावत आहे. सध्या देश जागतिक संघटनाच्या इशार्‍यावर व संगनमताने चालत असून देशाला विदेशी शासकाच्या ताब्यात देवून, विदेशात पसार होण्याच्या हालचाली चालु आहे. कारण त्यांना भारतातील बहुजनांना सुखाने जगू द्यायचे नाही. प्रस्थापितांच्या गुन्हेगारांना लुट करायला लावून त्यांना संरक्षणाखाली विदेशात पाठविण्याचे कपट कार्य हे सरकार करीत आहे. लहान अपराधी, किंवा निरपराध, त्यांच्या प्रगतीच्या आड येण्यासारखे भुजबळ, लालु यादव, गोपीनाथ मुंडे, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश गौरी यांचे खून व जेल हा सर्व विकृतपणा, अन्याय, अत्याचार आहे. वस्तुत: प्रस्थापितांना भारतभूमी ही विदेशीभूमी बनवायची आहे. कारण हे विदेशातून भारतात आलेले आहे. त्यांची भारतावर निष्ठा नाही. ते जगात कुठेही राहून सुखाने जगू इच्छितात. ते कष्ट करायला तयार नाही. म्हणून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण नंतर त्यांनी सेझचे धोरण स्वीकारुन विदेशातील 5000 कंपन्यांना एक लाख एकरपर्यंत भूभाग देवून अर्धा भारत देश (शेतकर्‍यांच्या शेती) विदेशी कंपन्यांच्या घशात घातला आहे. हे कंपनीचे भूक्षेत्र विदेशी भूभाग जाहिर करण्यात आलेले असून या कंपनीशी संबंधीत सर्व वाद त्यांच्या कंपनीच्या देशाच्या न्यायालयात सोडविले जाणार आहे. एवढेच नव्हे तर या एका कंपनीत त्यांच्याच देशाचे शंभरच्यावर एके-47 बंदुकधारी संरक्षक राहणार आहे. परवानगी शिवाय सदर कंपनीत भारतीयांना प्रवेश दिला जाणार नाही. एका ब्रिटीश कंपनीने भारतावर 150-200 वर्षे राज्य केले होते. विदेशी 5000 कंपन्या भारतात किती वर्षे राज्य करतील, याचा विचार बहुजन शासनकर्त्यांनी अद्यापही केलेला दिसून येत नाही. प्रस्थापितांना तर विचार करण्याची गरजच नाही. कारण त्यांना भारत देशाशी काही घेणे-देणे नसून केवळ लुट करुन देश गहाण ठेवून, विकून, बहुजनांना आंतरराष्ट्रीय वेठबिगार बनविण्याचा अंतरिक हेतू आहे. आपल्या निर्बुध्द बहुजन प्रतिनिधींना मात्र या गांभीर्याची तीळमात्र कल्पना नसून ते प्रस्थापितांपुढे स्वार्थासाठी गोंडा घोळत आहे. मॉल्स निर्मिती ही सुध्दा बहुजनांना बेकार व रोजगारहीन बनवून, उपासमार, कुपोषण, बिमारी यांच्या माध्यमांनी बहुजनांची संख्या कमी करण्याचा ठरलेला कार्यक्रम अथवा योजना आहे. दंगली घडविणे, बाँबस्फोट घडविणे, नक्षली ठरविणे, निरपराधांना अपराधी ठरवून जेल पाठविणे, शुध्द पिण्याचे पाणी व आरोग्य सोय न पुरवणे, उपासमार आणि कुपोषणा वाढविणे, महागाई वाढविणे, निरक्षरता पसरविणे, कोर्टाचे निर्णय लवकन न देणे, रोजगार न देणे व नोकरभरती न करणे, जाती-जातीत भांडणे लावणे, संख्येच्या प्रमाणात नोकर्‍या व आर्थिक मदत न देणे,खोटे आरोप लावून परेशान करणे या सर्व कृती बहुजनांना संपविण्याचाच आहे. याशिवाय सैन्य दलास पुरेसे संरक्षण न देता व चुकीचे आदेश देवून संपविणे, आरक्षण, संविधान, अ‍ॅट्रॉसिटी विरोधात परस्परांना भडकाविणे ह्या सर्व घटना बहुजनांना लक्ष्य करुनच केल्या जात आहे. प्रस्थापित गुन्हेगारांच्या गुन्हयाकडे दुर्लक्ष करणे, त्यांना संरक्षण देणे, त्यांना कोणतीही शिक्षा न देणे, त्यांना वाचविण्याचा सर्व स्तरावर प्रयत्न करणे आणि बहुजनाकडे गुन्हा नसतांनाही त्यांच्यावर जबरदस्तीने खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा संसार उध्ववस्त करणे, त्यांना सळोकी पळो करणे, त्यांना जगनेही कठिण करणे, त्यांना लाचार बनवून त्यांचा वापर करणे हे सर्व बहुजनांचे अस्तित्व संपविण्यासाठीच केले जात आहे. आज देशातील भ्रष्टाचार, बाँबस्फोट, धार्मिक दंगली, निरक्षरता, अज्ञान, बेकारी, अनारोग्य, महागाई, उपासमार, कुपोषण, विदेशीचा हस्तक्षेप, अस्वच्छता वगैरे सर्व बाबींना प्रस्थापित वर्गच कारणीभूत आहे. देशाच्या अधिकारीच्या महत्वाची पदेे, मंत्रीपदे, सचिव पदे, उद्योगधंदे, व्यापार, कारखाने, खदानी, तेल, खनीज मुल्यवान वस्तु, विज, कोळसा, परिवहन, वितरण, आरोग्य, स्वच्छता, संरक्षण, रोजगार, अधिकार सर्व महत्वाच्या देश चालविण्याच्या किल्ल्या त्यांच्या हातात आहे. तेव्हा या सर्व साधनांचा पक्षपात रहीत होऊन सदुपयोग करुन देशाला सुख, समृध्दी, समता, शांततेच्या मार्गाने नेणे हे प्रस्थापितांचे आद्य कर्तव्य व मानवतावादाचे लक्षण आहे. पण भारताचा प्रस्थापित वर्ग देश खड्यात गेला तरी चालेल, पण बहुजन मात्र सतत कानाखाली व गुलाम बनून राहिला पाहिजे असे धोरण राबवित आहे. नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे, याच विचाराने आजचा प्रस्थापित वर्ग बहुजनांना वागणूक देत आहे. देशाच्या समृध्दीची संपूर्ण मलाई प्रस्थापितांनाच मिळावी व बहुजनांना पाणी मिश्रीत ताक सुध्दा मिळू नये, या धोरणाने प्रस्थापित वर्ग सत्तेचा दुरोपयोग करुन देशद्रोह आणि बहुजन द्रोहाचे राजकारण करीत आहे. सार्वजनिक उद्योगांमुळे सरकारी तिजोरीत सार्वजनिक उद्योगाला मिळणार्‍या फायद्यामुळे भरपूर भर पडत होती. या फायद्याच्या रक्कमेतून मागास व वंचित वर्गाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात होत्या. या योजनांचा मागास वर्गाला खुप मोठा आधार होता. पण जातीवादी भांडवलदार उद्योगपतींना मागास वर्गाला दिल्या जाणार्‍या सवलती व त्यांची प्रगती सहन झाली नाही. त्यांनी सार्वजनिक व सरकारच्या सहकाराने चाललेले हे सार्वजनिक उद्योग तोट्यात चालत आहे, असा अपप्रचार केला व सरकारवर दबाव आणून व काही मंत्र्यांना लाच देवून त्यांच्याकडे वळविले व उद्योगपती, मंत्री, अधिकारी सर्वांनी मिळून संगनमताने सामान्य लोकांच्या भाग भांडवलातून व सरकारी भाग भांडवलातून आजपर्यंत शेकडो उद्योग उभे केलेले होते. या उद्योगाचे मूल्य लाखो कोटीचे होते व आजही आहे. अशा या बहुमोल व फायद्यात चालणार्‍या हजारो उद्योगांना संगनमताने मुद्दाम तोट्यात दाखवून हे उद्योग कवडी व मातीमोल भावाने खाजगी उद्योगपती व श्रीमंत लोकांना विक्री करण्यात आलेले आहेत. भारतीय सामान्य लोकांनी आपल्या पैशांनी उभे केलेले, सामान्य लोकांचे व सरकारचे हे मालकीचे उद्योग आता विक्री केल्यामुळे मोठमोठ्या उद्योगपतींचे व धनवानाच्या मालकीचे झालेले असून या उद्योगाच्या उत्पन्नातून होणारा संपूर्ण फायदा सुध्दा त्यांचाच केवळ वैयक्तिक मानला जात आहे. दिवसाढवळ्या हा सामान्य लोकांच्या मालकीच्या उद्योगावर मारलेला डाका नव्हे तर आणखी काय आहे. हे डाकेखोर लोक आता या उद्योग अथवा कारखान्यात सर्वसामान्य लोकांना संविधानाप्रमाणे आरक्षण द्यायला सुध्दा तयार नाहीत. तेव्हा ही देशाशी आणि देशाच्या सामान्य लोकांशी केलेली गद्दारी आणि देशद्रोह नाही का? आज या देशद्रोह्यांनी सर्व भारतीय उद्योगाची खरेदी केल्यामुळे या सार्वजनिक क्षेत्रात नोकरीस असलेल्या नोकरांची सुध्दा हकालपट्टी केल्यामुळे लाखो कुटुंबे बेकारी, भूकमरी, उपासमार, कुपोषण, आजार यांना बळी पडून बरबाद व नष्ट होत आहे. या उद्योगपतींनी व धनवानांनी सामान्य लोकांचा बँकेत असलेला पैसा हजारो कोटीने कर्जरुपात उचलून घेतलेला असून त्याची परतफेड सुध्दा केलेली नाही. उद्योगांतून मिळालेला पैसा त्यांना काळापैसा रुपात लपविलेला असून न लपविण्यासारखा पैसा विदेशी बँकात ठेवलेला आहे. कर्ज बुडवून विदेशात पळणारे विजय माल्या, ललित मोदी, निरव मोदी, चौकसी, हे दुसरे अनेक या बुडव्या कर्जदार व देशद्रोही पैकींच आहेत. या देश बुडव्या व देशद्रोही हजारो धनवान व उद्योगपतींमुळे आज सामान्य वर्ग, निरक्षर, बेकार, बिमार, उपाशी राहून कसे तरी जीवन जगत आहेेत. कर्ज बुडवे, काळा पैसा ठेवणारे, विदेशात लपविणारे, उद्योगपती, धनपती मात्र देशात व परदेशात स्थायीक होऊन भोगवादी व विलासी निश्िंचत, निर्लज्ज, बेफिकीर जीवन जगत आहेत. आणखी विशेष म्हणजे हे सर्व लोक सवर्ण वर्गाचे असून असवर्ण वर्गास कमीत कमी पगारात राबवून घेऊन त्यात ते आनंद मानत आहे व मागासवर्गाला पुढे न जाऊ देण्याचे अथवा श्रीमंत न होऊ देण्याचे सर्वच सवर्ण लोक कपटकारस्थान रचून सत्ता राबवित आहे. असवर्णांनी सवर्णांशी रक्तसंबंध ठेवल्यास असवर्णांचे मुडदे पाडले जात आहे. यावरुन सवर्णांच्या डोक्यात असवर्णांबाबत किती द्वेष आणि विष भरलेले आहे, हे दिसून येत आहे. संपूर्ण भारतीय बहुजन मागास, अस्पृश्य, शुद्र, वंचित, बहिष्कृत, समाज कानाखालीच राहायला पाहिजे असे शासकिय नियोजन आणि व्युहरचना, भारतीय जातीवादी सवर्ण समाजानी केलेली असल्यामुळे काही अपवाद वगळता शिक्षण, सत्ता, संपत्ती,उत्पादक व फायद्याची साधने, सन्मानाची व अधिकाराची पदे या जातीवादी सवर्ण समुहांकडे एकवटल्यामुळे आज रोजी सत्तेवर आलेली भाजप सरकार मुजोर, हुकुमशाह,गुंडागिरी, दादागिरी करणारी झाली असून देशात जातीय, धार्मिक दहशतवाद निर्माण केलेला आहे. वरील सर्व अधिकारांपासून वंचितांकडे कोणतेही अपराध नसतांना अपराधी ठरवून त्यांना जेलमध्ये पाठवित असून खरे गुन्हेगार, जातीवादी, धर्मवादी, दहशतवादी, भ्रष्टाचारी, चोर, लुटारु, देशाशी गद्दारी करुन विदेशात जाऊन लपणार्‍या, लफंगेखोरांना संरक्षण देत आहे. हा सर्व प्रकार वंचितांचे प्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी पाहत असून वंचितांचे संरक्षण करण्याऐवजी शत्रूंचे समर्थन व सहकार्य करुन बहुजन महापुरुषांचे स्वप्न स्वार्थासाठी भंग करीत आहे. वंचित समाजांनी आता वंचितांच्या अशा नपुंसक लोकप्रतिनिधींवर बहिष्कार घालण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुजनांच्या भाग भांडवल व कष्टाच्या माध्यमाने देशात स्थापन केेलेले हजारो सार्वजनिक उद्योग, जे फायद्यात चालत होते, त्यांना षडयंत्रपूर्वक तोट्यात दाखवून देशातील, टाटा, बिरला, बाटा, अदानी, अंबानी, एस्सार व इतर अनेक खाजगी उद्योगपतींनी मंत्री, अधिकार्‍यांशी संगनमत करुन त्याच्या घशात कोंबून घेतल्या आहेत. अब्जो रुपयांचे उद्योग काही कोटीत व शेकडो कोटींचे उद्योग काही लाखात विकत घेतले गेले आहेत. हे उद्योगपतींनी देखील बँकेतून हजारो कोटीचे कर्ज उचलून घेतले असून कर्ज, व्याज, त्याच्यावरील विविध प्रकारचे कर हे सर्व या उद्योगपतीने बुडविले असून काहींनी मुद्दाम दिवाळा काढून घेऊन पैसा घेऊन विदेशी पळून गेल्याचे सर्वांनाच माहित आहे. आता या खाजगी उद्योगपतींना उदारीकरणाच्या नावाखाली हजारो कोटीचे अनुदान देत असून देशाची तिजोरी रिकामी केली आहे. देशातील बहुजन व सामान्य लोकांच्या कल्याणकारी योजना, रोजगार, नोकर्‍या, स्वास्थ्य, पाणी, विज, शिक्षण, या सर्वांवरील खर्चात कपात करुन सामान्य लोकांना, कर्ज, बेकारी, बिमारी, कुपोषण, उपासमार च्या खाईत लोटले आहे. शेतकरी, मजूर, जवान यांचे सुध्दा बेहाल करण्यात आलेले आहे. धर्म, जात, मांसाहार, गोवंश हत्याबंदी, तीन तलाक, जिहाद, नोटबंदी, खातेबंदी, धर्मांतर बंदी, अयोध्या मंदीर निर्माण वगैरे मुद्यांवर दहशत निर्माण करुन अस्पृश्य, आदिवासी, मुस्लिम, इसाई वगैरे समुहांवर अत्याचार वाढविलेले आहे. मॉल्स जी.एस.टी एफ डी आय द्वारे सर्व लहानमोठ्या दुकान, उद्योगबंद, शाळा बंदमुळे बेकारी कमी होण्याऐवजी वाढत आहे. श्रीमंत श्रीमंत होत आहे व गरीब गरीब होऊन मरत आहे. देशाच्या तिजोरीवर, देशाच्या सार्वजनिक उद्योगाच्या मालकीवर, मंदिरातील अमाप संपत्तीवर, काळ्या पैशाच्या जोरावर, सत्ता व अधिकाराच्या बळावर हे धर्म व जातीवादी भांडवलदार येणार्‍या काळात बहुजनाचे अस्तित्व मिटवून वैज्ञानिक साधनांचा उपयोग करुन भोगवादी जीवन जगण्याचे गोड स्वप्न पाहत आहेत. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, विश्‍व व्यापार संघ, विदेशी प्रमुख यांच्याशी या जातीवाद्यांचे घरेलु संबंध असल्याचे दिसून येत आहे. याच घरेलु संबंधामुळे त्यांनी विदेशी पाच हजार कंपन्यांना भारतात विशेष आर्थिक क्षेत्राचे गाजर बहुजनांना दाखवून एकेका कंपनीला शेतकर्‍यांच्या लाखो एकर जमीनी मातीमोल विकल्या असून हे विदेशी क्षेत्र ठरविण्यात आले आहे. म्हणजे भारतीय कायद्याशी व बहुजनाशी या कंपन्यांचे कोणतेही संबंध ठेवण्यात आलेले नाही. दुसर्‍या शब्दात या कंपन्या भारतातील स्वतंत्र देश अथवा संस्थानिक राहणार आहे. थोडक्यात आजपर्यंतच्या सर्वच मनुवादी सरकारने देश विकलेला असून देशावर प्रचंड कर्ज लादल्यामुळे कर्जदाता देश देशाचे लचके तोडणार आहे. जाती धर्मवाद्यांनी त्याची व्यवस्था भारतातील सर्व पैसा विदेशात लपवून विदेशात करुन ठेवलेली आहे. उद्या भारतात मोठा उठाव झाल्यास हे जातीवादी विदेशात स्थायीक होणार असून भारतीय बहुजन मात्र भारतीय विदेशी कंपन्यांचे वेठबिगार बनून जीवन जगतील किंवा कुपोषणाने ते देखील नष्ट होतील. भारत नावाचा देश अस्तित्वात राहणार नाही. हिंदुस्तान बनून राहिल. कारण येथील विदेशी पाच हजार कंपन्या या विदेशी नसून जातीवादी, मनुवादींनी विदेशात विदेशींच्या सहभागाने चालविलेल्या जातीवादी मनुच्याच कंपन्या असून त्या फक्त विदेशी नाम धारण करुन भारतात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. भारतीय बहुजन शेतकर्‍यांच्या शेतजमीनी हडप करण्यासाठी जातीवाद्यांनी रचलेला हा सर्वात मोठा जुगार असून या जुगारात ते जिंकले असून बहुजनाची हार झालेली आहे व त्याच बरोबर बहुजनांची गुलामी देखील पक्की झालेली आहे. बहुजन केवळ बहुजन महापुरुषांच्या घोषणा देण्यापलीकडे आणि भाषणे देण्यापलीकडे तसेच मनुवाद्यांची चमचेगीरी करण्यापलीकडे काहीही करु शकेलेले नाही. जातीवाद्यांनी 70 वर्षांनंतर पुन: प्रतिक्रांती केलेली आहे. आता सर्वजन आनंदाने त्याची फळे भोगत राहा. जयभारत जयसंविधान प्रा.ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments