क्रांतीवीर सेवालाल बापुचे दूरदर्शी बोल (वचन)

क्रांतीवीर सेवालाल बापुचे दूरदर्शी बोल (वचन)

कलीयुग (यंत्रयुग) आयेवाळो छ = कलीयुग (यंत्रयुग) येणार आहे. कलीयुगेम महंगाई बढेवाळ छ. = कलीयुगात महागाई वाढणार आहे. रपिया कटोरी पाणी वकीय. = रुपया कटोरा (तांब्या) पाणी विकेल रपियाम फक्त तेरा चना मळीय. = रुपयात केवळ तेरा चने मिळतील. सोनेर सिंग बणन गवा वकीय. = सोन्याचे शिंग बनून गाई विकतील गवावूंंन चारो कोणी मळ. = गाईंना पुरेसा चारा मिळणार नाही गवावूर हाडकार ढेर पड जाय. = गाईच्या हाडांचे ढीग पडतील बेटारो याडीबापंती बण कोणी. = मुलाचं आईवडीलांबरोबर जमणार नाही सासु बोडीये पट कोणी. = सासु सुनाचे जमणार नाही धणी गोण्णी एके ठामेम जेवण करीय = पती पत्नी एका ताटात जेवण करतील धणी गोण्णीरो पट कोणी = नवरा बायकोचे जमणार नाही धणी गोण्णी एक पलेम एक दूसरेन छोड दिये = एका क्षणात नवरा बायको वेगळे होतील पाणीरे घर रपिया रिप = पाणी लोकांकडे पैसे राहतील रपिया गली गलीम रडे हिंंडीय = गल्ली गल्ली पैसे पडलेले सापडतील गरीबेवून अन्न कोणी मळ = गरीब लोकांना अन्न मिळणार नाही काही लोग भुकेती मरते रिय = काही लोक अन्ना अभावी मरतील वानावानार दु:ख आय = वेगवेगळे रोग पसरतील घरोघर वैद्य आय = घराघरात डॉक्टर येतील वैद्येन दु:खेर पारख कोणी व = डॉक्टरांना दु:खाची पारख होणार नाही लोक देखत देखते मर जाय. = पाहता पाहता लोक मरतील जंगलेरी झाडी कुटती रिय. = जंगलातील झाडे तोडले जातील जंगलेर जीव गाम तांडेम आय. = जंगलातील जीव गांव तांड्यात येतील लोकून पीयन पाणी कोणी मळ. = लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही लोकून रेहेन जागा कोणी पुर. = लोकांना राहायला जागा पुरणार नाही. लोक समुद्रेम घर बांधीय. = लोक समुद्रात घरे बांधतील लोक समुद्रेम खेती करीय. = लोक समुद्रात शेती करतील. भाई भाईम पट कोनी. = भावा भावात पटणार नाही. बना वियार छोरी एक जाग रिय. = बिन लग्नाची मुले मुली एकत्र राहतील. बना बळदेरी गाडी चालीय. = बिन बैलाच्या गाड्या चालतील. मलकेर खबर पलकेम कळीय. = मुलखाच्या बातम्या क्षणात कळतील. मनख्यान पंख फुटीय. = माणसांना पंख फुटतील. लोक घर बेठे बेठे जग देखिए. = लोक घर बसल्या जग पाहतील. कलीयुग (यंत्रयुग) म कल्लोळ चालीय = कलीयुगात गोंधळ माजेल. घरे घरेम भगत भोपा, महाराज रिय = घरे घरेम कल्लोळ (काळ) धरस जाय. = घराघरात दुश्मनी वाढतील आळी आळीम नगारा घोरीय. = गल्ली गल्लीत नगारे वाजतील. जगेम माणुसकी घटती रिय. = जगात माणुसकी घटेल. जात, धरम, देवेकूर नामेती कल्लोळ माजीय = जात, देव, धर्माच्या नावाने गोंधळ वाढेल. पापी लोक रपिया जपाडिय. = पापी लोक पैसे लपवतील. अन्नाजेर गोदाम भरे रिख, पण लोक मरते रिय = अन्नाचे गोदाम असूनही लोक मरतील. खेती करेर ढंग बदल जाय = शेती पध्दतीत बदल होईल. गोर लांबी झाडीरे मलकेन जाय. = गोर समाज जंगल क्षेत्रात जातील. अच्छे अच्छे लोक मायाम फंस जाय = चांगले लोक मोह मायात फसतील. गोर बंद प्रकारे प्रकारेर छंद करीय = गोर समाज वेगवेगळे छंद करतील. पापीरी वस्ती डुब जाय. = पापी लोकांची वस्ती नष्ट होईल. सेवारे विचारेती गोर तर जाय. = सेवाच्या विचारांनी गोर तरतील. जीवते धनेरी बाई दुसरेरे घरेम घुसीय = जिवंत नवर्‍याची बायको दुसर्‍याच्या घरात घुसेल. लबाडी-वेरीरो धन घरेम भरोरीय = लबाडी चोरीचे धन घरात राहिल. खटीकेन ढोर वक्ते रिेये. = कसायाला गुरे विकले जातील. निंदा चुगली बढती जाय. = निंदा चुगली वाढतील. गोर कोरु लार घासते रिये. = गोर समाज गोरेतरांचे अनुकरण करतील. पाच पास गोर भूल जाय. = पाचवारा (वचन) गोर विसरतील. गोर धाटी गोर भूल जाय. = गोरधाटी गोर समाज विसरत जाईल. गोर कोरवूम भळते जाय. = गोर समुह गोरेतरांमध्ये मिसळत राहिल. गोरुन गोर धाटी बगैर न्याय कोणी मळ = गोर धाटी शिवाय न्याय मिळणार नाही. कथनी करणीम मेळ कोणी र. = कथनी करणीम फरक पड जाय. रोयती राज (न्याय) मळेवाळो छेनी. = रडत बसल्याने न्याय मिळणार नाही. कल्लोळ करे बगैर इलाज छेनी. = आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. गोर मुई मट्टी सरजीत करीय = गोर समुह मृत माती जिवंत करतील गोर केशुला नहीं मोरते रिये: = गोर समाज पळस फुलाप्रमाणे फुलत राहिल. संकलन - राजपालसिंह राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments