दि. 1/1/2023
बहुजन बंधू भगिनींनो, सावधान, सावधान, सावधान.
* काळ डोक्यावर घोंगावत आहे.
* बळी तो कान पिळी समाज व्यवस्थेचे बळ वाढत आहे.
* देशाचा कायदा, आरक्षण, न्याय व्यवस्था धोक्यात आहे.
* अन्यायित समाजात विविध क्षेत्रात फुट पाडली जात आहे.
* जागतिक स्तरावरचे राजकारणसुद्धा गढूळ बनत चालले आहे.
* अन्यायित समाज संघटित होऊ लागलेला नाही.
* मनुवाद्यांची गुलामी अंगणात येऊन उभी आहे.
* अन्यायित समाजाचा शिक्षित सधन वर्ग कर्तव्याविमुख झालेला आहे.
* एकूणच मागासाचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे.
* कष्टकरी वर्गाला लोकशाहीची जाणीवच झालेली नाही.
* म्हणूनच सर्व मागास बंधू भगिनींनो, झोपेतून जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा.
* सवर्ण वर्ग शोषक, निर्दय, शक्तीवान व हुकुमशहा शासक बनला आहे.
* धर्मवाद, जातीवादाचा अभिमान कमी होण्याऐवजी वाढत आहे.
* मनुवाद्यांनी भारताला हिंदुराष्ट्र बनविण्याची प्रतिज्ञा केलेली आहे.
* हिंदुराष्ट्राची घटनासुद्धा तयार करण्यात आलेली आहे.
* हिंदुंची कमी झालेली संख्या वाढविण्यासाठी हिंदुंचे हिंदुकरण करण्याचे कार्य कुंभमेळ्याद्वारे युद्ध पातळीवर चालु आहे. * गैर हिंदुंचे हिंदुकरण करण्यामागे गैरहिंदुंचे अधिकार संपविण्याचा हेतु आहे.
* संविधानाने गैर हिंदूंना (आदिवासींना) विशेष अधिकार दिलेले आहे.
* आदिवासींचे संविधानिक अधिकार संपवून या अधिकारांचा उपभोग मुळ सवर्ण हिंदू घेणार आहे.
* आदिवासींच्या हिंदुकरणामुळे आदिवासी संविधानिक अधिकारहीत होणार आहे. आदिवासींचे हिंदुकरण होताच त्यांची जल, जंगल, जमिनीवरुन हकालपट्टी किंवा अल्प मोबदल्यावर स्थलांतरीत केले जाणार आहे.
* आदिवासींचे हिंदुकरण झाल्यावर त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक, साहित्यिक, भाषिक, वस्त्र, अलंकार, विशेष प्रतिके, विशेष आदर्श, इतिहास, इतिहास पुरुष नष्ट केले जाणार आहे.
* म्हणून सर्व वंचित आदिवासींनी हिंदू, हिंदुत्व, सवर्ण, सामंतवादी, भांडवलदार, मनुवादीच्या वरील षडयंत्रात भागीदार न होता योग्य तो दुरावा ठेवून सर्व वंचित, आदिवासींनी संघटीत होऊन आपल्या संस्कृती, सभ्यता, अधिकारासाठी, संघर्ष करण्यासाठी दूधपाण्याप्रमाणे एकत्र येण्याची भीम प्रतिज्ञा करावी, असे जाहीर आवाहन आहे.
जय भारत - जय संविधान
गहरा विचार