मानव समुहाच्या अस्तित्वाचा आणि क्रांती, प्रतिक्रांतीचा संक्षिप्त इतिहास
1) भारतीय समाजात प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक प्रकारच्या सभ्यता, संस्कृती, जाती, धर्म आणि वर्ण व्यवस्थेचा विकास आणि विनाश सुध्दा घडून आलेला आहे. वस्तुत: मानव समुहाचा इतिहास विशेष करुन इसवीसनपूर्व 7000 वर्षा अलिकडचाच उपलब्ध आहे . हा इतिहास देखील अलिकडच्या काळात अपभ्रंषित, विकृत व परिवर्तित करण्यात आला आहे. स्वार्थी, कुट नीतीज्ञ, परोपजीवी, आळशी, आयतखाऊ, अश्रमी, जाती, धर्मवादी, शोषक, विषमतावादी, अमानवी, क्रुर, निर्दय, असभ्य अशा विशेष जनसमुहानी व शासक वर्गानी कष्ट न करता बसून भोगवादी जीवन जगण्यासाठी आणि सर्व जनसमुहामध्ये श्रेष्ठ ठरविण्यासाठी सत्य इतिहास, सभ्यता, संस्कृती, जीवनशैलीची मोडतोड व प्रक्षिप्त करुन वास्तवतेचा खून, हत्या, विध्वंस केला आहे. यामुळे वास्तव मानवी इतिहास पडद्याआड गेला असून अवास्तव इतिहास, सभ्यता संस्कृतीचा आज चौफेर बोलबाला होत असून या अवास्तव इतिहासाचेच आजचे शासक वर्ग उदारीकरण करीत असून देशात सामा्रज्यशाही, भांडवलशाही, हुकुमशाही, गुंडशाही,घराणेशाहीला खतपाणी मिळत असून देशातील पंच्यांशी टक्के बहुजन समाजाचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
2) आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी 3500 वर्षे इसवीसनपूर्व भारतात प्रथम चीनमधील बलुचिस्तान राज्यात क्वेटा, कलात आणि सिबील जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या काही मैदानावर एक मानवी सभ्यता विकसित झाली होती. या सभ्य या नावाने संबोधतात. मेहरगड या शब्दाचा ढोबळमानाने अर्थ मातृ- पितृगड, माहेरगड, मुळगड, सभ्य, समजदारगड, विचारी समुहाचा गड असा ध्वनीत होतो. गड म्हणजे, स्थळ, ठिकाण, किल्ला, निवासस्थान, गावं असा होतो. सुरुवातीला हे स्थळ, गांव, छोटे पशुपालक, शेती करणारे, घरगुती शिल्पकारी करणारे होते. मेहरगड संस्कृती ही जवळजवळ इसवीसनपूर्व 6000 ते इ.स.पूर्व 4500 नंतर या संस्कृती, समुहाचे लोक हळूहळू सिंधु नदी आणि तिच्या सहायक नदीच्या काठी अथवा परिसरात म्हणजे मोहेंजादारो आणि हरप्पा वगैरे नगरांच्या परिसरात पसरली. सिंधू नदीच्या काठी व परिसरात सदर संस्कृती विकसित होऊन एक आदर्श संस्कृती बनल्यामुळे या संस्कृतीस विशेष करुन सिंधु संस्कृती नावाने संबोधले जाऊ लागले. सिंधु संस्कृती ही इ.स. पूर्व 4500 ते इ.स. पूर्व 1750 पर्यंत अस्तित्वात होती. इ.स. पूर्व 2000 मध्ये ही संस्कृती सुख, समृध्दी, शांतता आणि मानवतावादी समाज आणि शासन व्यवस्थेच्या दृष्टने विकासाच्या व आदर्श सभ्यता, संस्कृतीच्या सर्वोच्च शिखरावर होती. कारण आजच्या विज्ञान युगात ज्या सुख सोयी व व्यवस्था भारतात आणि अन्य शहरात उपलब्ध आहेत, या सर्व सुख सोय इ.स.पू. 2000 च्या काळात सिंधु संस्कृतीच्या गाव व नगरात उपलब्ध होत्या. यावरुन सिंधु संस्कृती ही अतिशय सुधारलेली, विकसित, समृध्द आणि आदर्श संस्कृती होती हे दिसून येते. आर्य भारतात येऊन येथे कायमचे स्थायिक व सत्ताधारी होण्यापूर्वीपर्यंत या सिंधु संस्कृतीमध्ये, वर्ण, जाती, धर्म, देव, दैव, मंदिर, तीर्थक्षेत्र व निरर्थक कर्मकांड, भट, पुरोहितवाद, यज्ञयाग,मंत्र-तंत्र, अवतारवाद, पूर्व, पुन:जन्म या काल्पनिक व थोतांड कल्पना या संस्कृतीत अजिबात नव्हत्या. वर्गव्यवस्था होती. पण सर्व वर्गामध्ये रोटीबेटी व्यवहार होत होते. सर्वांच्या सामुहिक वसाहती होत्या. लोक पशुपालन, शेती,व्यापार, घरेलु उद्योग, शिल्पकारी वगैरे करुन सुखी, समाधानी, समता आणि लोक तंत्रवादी होते. सर्व लोक सुसंस्कृत, नियम व अनुशासनाचे पालनकर्ते होते . विशेष म्हणजे गणसंघ व मातृसत्ताक कुटुंब पध्दती सर्वत्र नांदत होती. स्त्रियांचा खुपच सन्मान केला जात होता.
3) अशा या सिंधु संस्कृतीच्या काळात विदेशी आर्य ब्राह्मण अचानक भारतात आले. हे आर्य ब्राह्मण, भटके, असंस्कृत, असभ्य, कंदमुळ, फळे, मांसाहारी, स्वैराचारी, जंगली होते. शेती करणे व अन्नाहार त्यांना माहित नव्हते. इतिहासकारांचे म्हणने आहे की,हे आर्य ब्राह्मण इ.स.पूर्व 3250 ते इ.स.पूर्व 1500 च्या काळात टोळ्यामागे टोळ्या भारतात आल्या व येथील मुळनिवासी (बहुजन) यांच्याबरोबर ते अन्न, स्त्रिया व मांसाहारासाठी पशु पळविणे वगैरसाठी लढाया, संघर्ष, लुट, डाकेमारी, जाळपोळ करु लागले. आर्य जनसमुह हा अत्यंत क्रुर, निर्दय, लढाऊ,घोड्याची स्वारी करणारा व शस्त्रधारी होता. भारताचा बहुजन (मुळनिवासी) अनार्य मात्र घोडा व शस्त्रविहीन, शांतताप्रिय, व युध्दाचे डावपेच न जाणनारा समाज होता. शिवाय विदेशी आर्य व भारतीय मुळनिवासी यांच्या संस्कृती व जीवनशैलीमध्ये जमीन आस्मानचा अथवा पूर्व पश्चिमचे अंतर होते. यामुळे या दोन्ही आर्य- अनार्य समुहामध्ये अखंड संघर्ष चालू होता. नुकसान दोन्ही बाजूचे होत होते. आर्याच्या टोळ्या मागे टोळ्या भारतात येऊन त्याची संख्या काढत होते. संघर्ष, जाळपोळ, लुट, जनावरे व स्त्रिया पळविणे, पुरुष वर्गाचा संहार थांबत नव्हता. शेवटी नाईलाजामुळे दोन्ही गटात समझौता झाला. या समझौत्यात विदेशी आर्यांनी, सत्ता, संपत्ती, शस्त्रे व इतर साधनावर हक्क दर्शवू नये. अनार्याकडून भिक्षा मागून गायन, वादन, पठण करुन जीवन जगावे असे ठरले व त्याप्रमाणे दोन्ही समुह जीवन जगत होते. पण नंतरच्या टोळ्या बरोबर आलेल्या आर्यांच्या सुंदर स्त्रिया व मुली अनार्य जबरदस्तीने पळवून अथवा संमतीने लग्ने करुन आर्याचे व्याही, दामाद झाले. या विषकन्यांच्या प्रयोगामुळे अनार्य, भारतीय मुळनिवासींमध्ये फुट पडली. आर्यानी सुध्दा फुट पाडण्याचा प्रयत्न केला व अनार्य राजा व राजपुत्र आर्यांच्या विषकन्या अथवा सुंदर अप्सराबरोबर भोगविलासात मस्त व गुंग असतांना आर्यानी अनार्य राजा- महाराजांना युध्दात हरवून सिंधु क्षेत्राचा व राजकारभाराचा ताबा घेतला. हा संघर्ष इ.स.पूर्व.2500 च्या जवळपास वाढला असावा. पुढे कित्येक दिवस, वर्षे हा संघर्ष चालू राहिला व शेवटी इ.स.पूर्व.17500 मध्ये आर्यांनी अनार्यांना हरवून देशाच्या पूर्ण भागावर ताबा मिळवून ते राज्यकर्ते व बहुजन (अनार्य) आर्याचे गुलाम झाले. जे अनार्य आर्यांना शरण गेले,त्यांचे गुलाम झाले. परंतु जे अनार्य आर्यांना शरण गेले नाही, ते मात्र जीव वाचविण्यासाठी व आई, बहिणी,लेकी, सुनाची इज्जत रक्षणासाठी काही देशाच्या दक्षिणेकडे व काही देशाच्या उत्तर भागाकडे, जेथे सहजा सहजी आर्य पोहचू शकणार नाही, अशा स्थळी जाऊन स्थाईक झाले. हेच लोक आजचे आदिवासी, भटके, विमुक्त, गुन्हेगार जनसमुह आहेत. जे लोक त्यांना शरण गेले ते लोक गांव आणि शहराच्या आसपास किंवा परिसरात स्थिरावले व ते अस्पृश्य मानले जाऊ लागले. ओबीसी समुह हा देखील अस्पृश्याप्रमाणेच सवर्णाची सेवा करु लागला. आर्यांचे/ ब्राह्मणाचे/ सनातन्यांचे/ वैदिकांचे वर्चस्व अनार्यावर स्थापन झाल्यापासून म्हणजे इ.स.पूर्व 1750 पासून तर इ.स.पूर्व 530-35 पर्यंत म्हणजे एकूण अंदाजे 1200-1225 वर्षे आर्याचे विषमतावादी अन्यायी, अत्याचारी व सर्व अनार्य म्हणजे बहुजनाच्या गुलामीचे राज्य राहिले. या दिर्घकाळास सर्व अनार्य (बहुजन) हे निव्वळ पशुपेक्षाही वाईट जीवन जगले. याच संस्कृतीला वैदिक, आर्य, ब्राह्मणी संस्कृती संबोधले जाते.
4) बौध्द संस्कृतीची स्थापना - इ.स.पूर्व 533 च्या जवळपास तथागत बुध्दांनी क्रांती करुन आर्य, वैदिक, ब्राह्मणी संस्कृती नष्ट करुन बौध्द संस्कृती म्हणजे धम्म संस्कृतीचा पाया घातला. आर्य, वैदिक, ब्राह्मणी ही संस्कृती वर्ण, जाती-धर्म, देव, दैव, अवतार, मूर्तीपूजावादी होती. या उलट बौध्द म्हणजे धम्म संस्कृती ही वर्ण, जात, धर्म, देव, दैव, अवतार, मुर्तीपूजा, यज्ञयाग, कर्मकांडविहीन संस्कृती होती. आर्य/ वैदिक ब्राह्मणांनी सुध्दा या संस्कृतीचा स्वीकार केला व जगभर या संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यात आला. आज जवळजवळ शंभरच्या जवळपास देश या धम्म म्हणजे बौध्द (बुध्द) संस्कृतीचे समर्थक आहेत. या दोन्ही संस्कृतीमध्ये आज जमीन आसमानचा फरक असून भारतात आज या दोन्ही संस्कृतीमध्येच संघर्ष चालू आहे. सुरुवातीला बहुसंख्य ब्राह्मणांनी या मानवतावादी संस्कृतीचा स्वीकार केला. परंतु बुध्द अनुयायी राजा अशोकाचे नातू बृहद्रथ यांची इ.स.पूर्व 184 मध्ये ब्राह्मण सेनाप्रमुख पुष्यमित्र शुंग याने कपट नीतीने हत्या केली व स्वत: राजा झाला. ही आर्य/ वैदिक/ ब्राह्मणांनी बुध्द धम्मा विरुध्द केलेली प्रतिक्रांती होती. या प्रतिक्रांतीनंतर सन 1947 पर्यंत आर्य ब्राह्मणाचे अनार्य समुहावर वर्चस्व होते. इसवीसनानंतर अनेक विदेशी आक्रमक सुध्दा भारतात आले. या आक्रमकांनी आर्य ब्राह्मण व अनार्य (बहुजनांना) आजच्या हिंदुंना गुलाम बनवून भारतावर राज्य केले. परंतु आर्य ब्राह्मणांनी मात्र प्रत्येक विदेशी आक्रमक राजा बरोबर साठेलोटे करुन म्हणजे काही हिस्सेदारी घेऊन विदेशी बरोबर सुखाचे दिवस जगले. अनार्य बहुजन मात्र विदेशी राजा व आर्य ब्राह्मणांचे गुलामच बनून राहिले. त्यांना विदेशी शासकांनी हीनतेची वागणूक देऊन हिंदू नावाने संबोधून त्यांचा गुलाम, नोकर म्हणून वापर केला. आर्य विदेशी ब्राह्मण मात्र स्वत: ब्राह्मण म्हणवित राहिले व अनार्यांना गुलामीची वागणूक देत राहिले. पण 1900 व्या शतकात प्रौढ मतदानाचे व निवडून येण्याचे महत्व वाढल्यामुळे त्यांनी हिंदुच्या मतदानाचा फायदा घेण्यासाठी हिंदुंना संरक्षणात्मक कवच बनवून स्वत: हिंदू असल्याचे म्हणू लागले. पण ब्राह्मणत्वाचा मात्र त्यांनी कधीच त्याग केला नाही .आजपर्यंत ते स्वत:ला ब्राह्मणच म्हणवून घेतात. पण राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांनी वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, देव, दैव व्यवस्था, मंदिर, क्षेत्र व्यवस्था, व्यवसाय व्यवस्था, धार्मिक कर्मकांड व्यवस्था वगैरे निर्माण करुन आणि अनार्य बहुजनामध्ये फुट पाडून स्वातंत्र्यानंतरही आजपर्यंत बहुजनावर वर्चस्व अद्यापही कायम ठेवून आहेत.
5) वरीलप्रमाणे आर्य/उत्तरवैदिक ब्राह्मणांनी/ सनातन्यांनी प्रथम प्रतिक्रांती सिंधु संस्कृतीकालीन मुळ भारतीय निवासी/ बहुजन/ अनार्य/ असुर यांच्या विरुध्द केली. यानंतर दुसरी प्रतिक्रांती तथागत बुध्दाविरुध्द केली. तिसरी प्रतिक्रांती राजा बृहदथाविरुध्द पुष्यमित्र शुंगाने केली. चौथी प्रतिक्रांती छ. शिवाजी,रा.शाहु महाराज विरुध्द करुन पेशवाईची स्थापना केली. पाचवी प्रतिक्रांती इसवीसन 1947 मध्ये इंग्रजाविरुध्द केली तर सहावी प्रतिक्रांती सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधाना विरुधद चालू असून जवळजवज़ पूर्ण भारताच्या क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्व स्थापन करुन ते यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. मनुवाद्याची/ ब्राह्मणवाद्याची/ सनातन्यांची/ विषमतावाद्याची प्रतिक्रांती आणि बहुजनानी केलेली क्रांती ही काही पुरोगामीना परिवर्तनवादीना, समतावादीना, मानवतावादीना वगळून बहुसंख्य बहुजनांना अद्यापही समजत नसल्यामुळे व ते जाती जातीत, गटागटांत, पक्षा, पक्षात विभागले गेले असल्यामुळे व शत्रूचे समर्थक असल्यामुळे या विज्ञान युगात ब्राह्मणांनी केलेली सहावी प्रतिक्रांती यशस्वी झाली तर भविष्यात लाखो वर्षे बहुजनाची गुलामी निश्चित आणि अटळ आहे. तेव्हा बहुजन केव्हा जागे होतील हा एक गंभीर चिंतेचा व चिंतनाचा व जीवन मरणाचा प्रश्न आज बहुजनासमोर आहे, असे मला प्रखरपणे वाटते.
6) इ.स.पूर्व. 6000 पासून म्हणजे मेहरगड (बलुचिस्तानातील काही मैदान) संस्कृती पासून तर आज 2018 पर्यंत वेगवेगळ्या शासनकर्त्याच्या काळात भारतीय मुळनिवासी म्हणजे बहुजन समाजाला, यातही आर्यब्राह्मणाचे कट्टर विरोधी व शत्रू मानला गेलेला पणी जनसमुह वर्तमानकालीन (वंजारा, बंजारा, लभानी,लमानी) जनसमुह व तद्सम इतर अनेक समुहाना वेगवेगळ्या शासन काळात अनेक वेगवेगळ्या नावान आर्यानी व इतर शासनकर्त्यानी संबोधले आहे. काळानुसार ही बहुजनांची संबोधनात्मक नावे जवळजवळ दिडशेपेक्षाही जास्त आहेत. थोडक्यात प्रत्येक शासनकर्त्यांच्या काळात हे जनसमुह कोणकोणत्या नावाने संबोधले गेलेत व आजही संबोधले जात आहेत, ती नावे अथवा संबोधने क्रमश: मी शेवटी देणार आहे.
आर्य ब्राह्मणांचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी भारतात राहणारा मुळनिवासी, भारताचा मालक राजा हा पणी, द्रविड, मेलुवा, मेलुव्हा, फनिक, फोनिक या नावाने ओळखला जात होता. हा काळ इ.स.पूर्व 4500 ते 1750 पर्यंतचा मानला जात. इ.स. पूर्व 6000 ते 4500 पर्यंत हे समुह कोणत्या नावान संबोधले जात होते, याचा तपशील उपलब्ध नाही. इ.स.पूर्व 6000 ते 4500 पर्यंतचा काळ हा मेहरगड संस्कृतीचा व इ.स. पूर्व 4500 ते 1750 पर्यंतचा काळ हा सिंधु संस्कृतीचा म्हणजे पणी, द्रविड, मेलुव्हा, फोनिक या जनसमुहाचा शासन काळ होता. यानंतर इ.स.पूर्व 1750 ते इ.स.पूर्व 530-35 पर्यंतचा काळ हा आर्य ब्राह्मणी शासन व संस्कृतीचा काळ होता. हा काळ म्हणजे मुळनिवासी बहुजनावरील अन्याय, अत्याचार,अमानवियता आणि विषमता, स्वैराचाराचा काळ होता.
इ.स.पूर्व 530-35 नंतर तथागत बुध्द आणि तीर्थकर महावीरजी वरील सभ्यता संस्कृती व शासकाचा विरोध करुन क्रांती घडवून आणली. इ.स.पूर्व 1750 ते इ.स.पूर्व 530-35 पर्यंत आर्यब्राह्मणाच्या शासन काळात व 530-35 ते इ.स. 325 पर्यंत बुध्द अनुयायी च्या शासन काळात बहुजन कोणत्या नावाने अथवा संबोधनाने ओळखले जात होते. याचा गोषवारा मी शेवटच्या पानावर देणार आहे. पण बहुसंख्य ब्राह्मण बहुजन हे सर्व बुध्दानुयायी झाल्यामुळे बौध्द म्हणूनच ओळखले जात होते, व या काळात बुध्द तत्वज्ञानाचा व बुध्दाच्या विहार व प्रतिमाचा खुप प्रचार प्रसार भारतातच नव्हे तर जगभर झाल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मात्र बुध्दानुयायीचा काळातच बुध्दानुयायी राजा बृहद्रथची हत्या करुन ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंगानी इ.स.पूर्व 13 मध्ये प्रतिक्रांती घडवून आणली, व आर्य ब्राह्मणाचे वर्चस्व स्थापन केले. इ.स. 325 नंतर मात्र आर्य ब्राह्मणाच्या शासनकाळात विदेशी मोगल मुस्लिम, पोर्तुगीज, फ्रान्सीस, इंग्रज वगैरे शासकांनी व भारतीय मराठा, शीख, राजपूत वगैरे शासकांनी सन 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या सर्व राजाच्या काळात आर्यब्राह्मण मात्र भागीदार राहून सुखाचे जीवन जगत राहिले व आजही स्वातंत्र्यानंतर जगत आहेत. इ.स.पूर्व 184 ते छ. शिवाजी महाराज व शाहु महाराजांनी क्रांती करुन ब्राह्मणांचे वर्चस्व संपवून रयतेचे म्हणजे बहुजनाचे कल्याणकारी राज्य निर्माण केले होते. परंतु आर्यब्राह्मणांनी पुन्हा अठराव्या शतकाच्या दुसर्या दशकात मराठा शासकाच्या विरुध्द बंडखोरी, हत्या करुन प्रतिक्रांती घडवून आणली व पेशव्यांचे शासन निर्माण केले. हे पेशवाई राज्य 1713- 1817 पर्यंत टिकले. पुन्हा ब्रिटीशांनी महार बहुजन सैन्याच्या मदतीने 1 जानेवरी 1818 ला नष्ट करुन क्रांती घडवून आणली. ब्रिटीश राज्य हे आपले गुलाम बहुजन यांना आपल्या स्पर्धेत उभे करीत असल्याचे हेरुन पुन्हा या ब्राह्मणवाद्यांनी सन 1947 ला ब्रिटीश विरुध्द बंड पुकारुन 15 ऑगस्ट 1947 ला सत्ता त्यांच्या ताब्यात घेतली. नाईलाजाने त्यांनी डॉ. आंबेडकर निर्मित संविधान स्वीकारले. परंतु या संविधानानुसार त्यांनी शासन व्यवस्था राबविली नसून 2018 पासून त्यांनी संविधानाच्या विरुध्द प्रतिक्रांती करुन मनुस्मृतीची शासन व्यवस्था निर्माण करण्याची तयारी पूर्ण केली असून संविधानावर क्रमश: हल्ले सुरु केले असून 2019ची लोकसभा येनकेन प्रकारे जिंकून संपूर्ण संविधान नष्ट करुन मनुस्मृती कायद्याचे राज्य निर्माण करण्याचा दृढ निश्चय केल्याची लक्षणे त्यांच्या सहा कृती कार्यक्रमानसार दिसून येत आहे. राज्याच्या 90 खात्यावर नीती, धोरण ठरविणारे दहा अधिकारी परीक्षा न देता नेमणूक करण्याचे सरकारचे धोरण वरील विचाराला जबरदस्तीने पुष्टी व समर्थन देत आहे.
ब्रिटिशाकडून प्रतिक्रांतीनंतर सत्ता हस्तगत झाल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेबाद्वारे लिखित घटना आर्य ब्राह्मणांना मान्य नव्हहती. त्यांना मनुवादी संविधान हवे होते. परंतु सत्तासिन होण्यासाठी उतावळे झालेल्या आर्य ब्राह्मणांनी वरच्या मनानी घटना मान्य करुन सत्ताधिश झाले व त्याच दिवसापासून घटनाविरोधी हालचाली सुरु केल्या. पूर्ण प्रतिक्रांतीला त्यांना 2018 च्या निवडणूकीपूर्वी संधी मिळाली नव्हती. पण 2018 च्या लोकसभेच्या निवडणूकीत मनुवादी आर्य ब्राह्मणांना पुर्ण बहुमत मिळताच त्यांनी घटना विरोधी पावले गतीने टाकायला सुरुवात केली असून आता मनुवादी शासन व्यवस्था स्थापण होईपर्यंत ते चैन बसणार नाही, हे काळ्या दगडावरील रेषा बहुजनानी समजावी. घटना विरोधी राजकारण तसे तर 1991 पासून आर्यब्राह्मणांच्या दबावामुळे काँग्रेस पक्षाच्या काळातच सुरु झाले होते. आता अपूर्ण राहिलेले घटना विरोधी कार्य राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, विश्व हिंदु परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शासन पूर्णत्वास नेणार आहे. प्रतिक्रांती घडवून आणण्यासाठी आर्यब्राह्मणांनी खालील अनेक कपटकारस्थानाचा आधार घेतलेला आहे.
1) प्रथम संघ विचारवाद्याची मारवाडी मोदीला ओबीसी ठरवून ओबीसीची दिशाभूल करुन, खोटी आश्वासने देऊन, इव्हीएम यंत्राचा उपयोग करुन आणि बहुजन लोक प्रतिनिधीची खरेदी करुन मोदीला प्रधानमंत्री बनविण्यात आले.
2) प्रतिक्रांती घडवून आणण्यासाठी आर्य ब्राह्मणांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेरगीरी स्वरुपात सर्व पक्षात व संघटनामध्ये आर्य ब्राह्मण घुसविले होते. हे सर्व पक्षातील ब्राह्मण संघ आणि विश्व हिंदु परिषद, अभिनव भारत संघटना यांना बहुजनाच्या हालचाली, फुट, कमकुवत व मजबूत दुवे व त्यांना राजकारणापासून, सत्तेपासून कसे दूर ठेवता येईल अथवा वंचित करता येईल, त्यांना भ्रष्टाचारात कसे गुंतवता येईल आणि शेवटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना जेलमध्ये पाठविता येईल याच्या बातम्या देत होते.
3) या व्यतिरिक्त स्वातंत्र्य मिळाल्यापासून मनुवादी संघटना निर्माण करुन त्यांना मनुष्यबळ, साधने, आर्थिक मदत करुन मजबुत व स्वावलंबी बनविल्या. या शिवाय बहुजनामध्ये अनेक जाती, निरक्षरता, बेरोजगारी, अंधश्रध्दा, कर्मकांड, भ्रम पसरवून दिशाभूल केली व त्यांचा मोलाचा वेळ, पैसा, मनुष्यबळ वाया घालविला व दानदक्षिणा कर्मकांडाच्या माध्यमांनी लूट करुन त्यांना दुबळे बनविले.
4) बहुजनाचा इतिहास खोटा लिहिला, विकृत, प्रक्षिप्त करुन नष्ट सुध्दा केला.
5) देशाच्या व शासनाच्या सर्व क्षेत्रात व खात्यात म्हणजे प्रमुख कार्यालय, उद्योग-धंदा, कारखाने, कंपन्या, विमा, बँका, पक्ष, मंत्रीमंडळ, हेरखाते, विदेशखाते, व्यापार, संरक्षण, नीती अथवा धोरण निश्चिती, अंमलबजावणी वाटप, परिवहन, संरक्षण न्यायविभाग, कार्यकारी विभाग वगैरे सर्वत्र प्रमुख म्हणून ब्राह्मणांची नेमणूक केली.
6) संगीत, क्रिडा, सिनेमा, कला, साहित्य, प्रकाशन,वार्ता, जाहिरात, ठेकेदारी सर्वत्र ब्राह्मणांना घुसवून शासनाच्या तिजोरीतून त्याला भरपूर सवलती, सन्मान, पगार वगैरे मिळवून देऊन त्याची आर्थिक बाजू भक्कम करुन दिली.
7) ब्राह्मण-बनिया वर्गाला बँक कर्ज, सबसिडी, अनुदान, विज, करमाफी, फुकट जागा, एजन्सी, पेट्रोल, गॅसपंप, बोनस वगैरे अनेक प्रकारच्या सवलती देवून हजारो पिढ्या बसून खातील याची व्यवस्था करुन दिलेली आहे. नोकरभरती बंद असतांनाही ब्राह्मण- बनियांना त्यांचे अधिकारी नकळत आणि कोणत्याही मार्गाने मधल्या मार्गाने गुपचूप नोकरीला नावून देतात. बहुसंख्य खाजगी संस्था, प्रतिष्ठाने, कंपन्या, बँका, विमा विभाग वगैरे त्यांच्या अधिन असल्यामुळे त्यांचे बेकार तरुण तरुणींना ते रोजगार देतात. ठेकेदारी पध्दत सुध्दा कमी पगारावर बहुजनाचे शोषण करण्यासाठी व त्यांचे पोषण होण्यासाठी हेतुपुरस्सर सुरु करण्यात आलेली असून यामुळे बहुजनामध्ये प्रचंड बेकारी निर्माण झालेली आहे.
8) भारतात आलेल्या सर्व विदेशी कंपन्या विदेशात दिर्घ काळापासून स्थाईक झालेल्या ब्राह्मण बनियाच्या व काही विदेशी मालकाशी संगनमत करुन भारतात आलेल्या असून यांना भारतीय शेतकर्याच्या एक एका कंपन्यांना लाखो एकर जमीन कमी भावात गरज नसतांनाही देण्यात आलेल्या आहेत. बहुजनाच्या शेती हडप करण्याचे व त्यांना भूमीहीन बनवून गुलाम बनविण्याचे हे फार मोठे षडयंत्र ब्राह्मण बनियांचे दिसून येत आहे. सेझ, मॉल्स, इतर कंपन्या व उद्योगधंदे हे बहुजन शेतकर्याच्या जमीनी लाटून त्यांना देशोधडीला लावण्याचे, बेकार, दरिद्र व गुलाम बनविण्याचे कपट कारस्थान दिसून येत आहे. या विदेशी कंपन्यात विदेशी नोकर आणि विवादित प्रकरणे कंपनीच्या मातृदेशी निकाली निघणार असल्यामुळे भारतीय या कंपन्याच्या विरोधात कोणत्याही क्षेत्रात अडवणूक अथवा संघर्ष करु शकणार नाही. उलट लाचारीने त्यांची गुलामी करुन लाचारीचे जीवन जगावे लागणार आहे.
9)सध्या ब्राह्मण बनिया कंपन्या, उद्योग, व्यापार वगैरे करीता भारतीय बँकातून करोडोने कर्ज काढून जाणून-बुजून दिवाळे काढून घेत आहे . काही लोक कर्ज बुडवित आहेत. तर काही लोक पहिली कंपनी दिवाळखोरीत दर्शवून दुसर्या नावाने दुसरी कंपनी सुरु करीत आहेत . काही लोक कर्ज घेऊन बाहेर देशात पळून जात आहे. कमविलेला काळा पैसा दुसर्या देशात लपवित आहेत.एवढेच नव्हे तर दुसर्या देशात गुंतवणूक करुन त्या देशाचे नागरीकत्व स्वीकारीत आहेत. हा देशद्रोह नव्हे का? सरकार अशा देशद्रोहींना सोडून देत असून, बहुजन हित चिंतकांना बदनाम करुन त्याची रवानगी जेलमध्ये करीत आहे. ही सुध्दा देशद्रोही आणि बहुजन विरोधी कृती आहे. आज भारतात कष्ट करणारा म्हणजे शेती, पशुपालन, मातीचे, विटाचे, दगडाचे, खदानीचे, तळ्याचे, हमालीचे, वाहतूकीचे, स्वच्छतेचे, लोखंडी, लाकडी, बांधकाम, खोदकाम, आगीचे, संरक्षणाचे, देशात शांतता ठेवण्याचे सर्व अवघड, घाम गाळण्याचे, धोक्याचे, कमी उत्पन्नाची कामे बहुजन समाज करीत आहे, आणि ब्राह्मण, बनिया व तदसम समाज मात्र बहुजनाच्या लाचारीचा फायदा घेऊन, त्यांचे शोषण करुन निर्लज्जपणे भोगवादी जीवन जगत आहे. एवढेच नव्हे तर बहुजनांना समतेची वागणूक न देता गुलामी आणि तुच्छतेची वागणूक देत आहे. 15 टक्के कष्ट न करणारा जाती, धर्मवादी समाज देशाच्या तिजोरीतील 85 टक्केे रक्कमेचा दुरुपयोग करीत असून बाकी 85 टक्के बहुजन समाज मात्र फक्त 15 टक्के रक्कमेवर आणि साधनावर हलाखीचे जीवन जगत आहे. आजपर्यंत इतिहास म्हणजे कष्ट करायला आणि मरायला त्याग करायला सर्व बहुजन समाज आहे व चरायला आणि भोगवादी जीवन जगायला ब्राह्मण, बनिया सर्वात पुढे आहेत.
10) मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बहुजनाच्या सर्व कल्याणकारी योजना बंद करण्यात येत आहे. बहुजन नोकर वर्गही कमी करीत आहेत. मोठ्या पदावरुन छोट्या पदावर नेमणूका देत आहे. बढती बंद करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षेचे सर्व नियम बदलून गुणवत्ताधारक उमेदवारावरही अन्याय करीत आहेत. प्रगत गटाच्या सवलती बंद करीत आहे. वेगवेगळे प्रमाणपत्राची मागणी करुन शिक्षण, नोकरी, बढती, वर्ग एक व दोनच्या अधिकारींना वंचित करीत आहे. सेवापुस्तिकावर बदनामीचे शेरे देवून बढती पासून रोखण्याचे, निवृत्ती वेतन मिळू न देण्याचे, भ्रष्टाचारामध्ये गुंतवून नोकरीवरुन कमी करण्याचे व जेलमध्ये पाठविण्याचे अमानवी काम करीत आहे. संपूर्ण जगात मागासासाठी आरक्षण असतांना भारतात मागास वर्गाचे आरक्षण घटनेत बदल करुन अथवा मनमानी करुन हटविले जात आहे. घटनेची तंतोतंत अंमलबजावणी न करता भारतीय घटने ऐवजी मनुस्मृतीची घटना अंमलात आणत आहेत. बहुजनासाठी रोजगार निर्माण करण्याऐवजी सर्व क्षेत्रातले रोजगार बंद करीत आहेत. शिक्षण महाग करुन व लाखो शिक्षण संस्था बंद करुन बहुजनांना शिक्षण आणि रोजगार (नोकरीपासून) वंचित करीत आहे. रोजगार निर्मितीच्या व देण्याच्या खोट्या घोषणा देऊन तसेच अन्यायी इव्हीएम यंत्राचा उपयोग करुन निवडून येत आहे. काळा पैसा जमा करण्याऐवजी श्रीमंताना काळे धन पांढरे करण्याची संधी देत आहे. दुसरीकडे बहुजनाकडील पैसा नोटबंदीच्या माध्यमांनी जमा करुन, श्रीमंताना कर्ज देऊन त्यांना परदेशात पळून जाऊन राहण्याची संधी देत आहे. लाखो श्रीमंत लोक सुध्दा भारतात राहून देशसेवा करण्याऐवजी देश लुटून परदेशात जाऊन आनंदाने जीवन जगत आहेत.
11) भारतात बहुजनामध्ये निरक्षरता, बेकारी, अज्ञान, अंधश्रध्दा, कुपोषण, आजार, व्यसनाधिनता, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, खुनखराबी, जातीवाद, धर्मवाद दंगली,अनेक प्रकारचे आजार, शेतकरी स्वयंहत्या, दुष्काळ, पशुसंरक्षण दुष्काळ, चीन पाकिस्तानचा दहशतवाद, शिष्यवृत्ती, बेरोजगारी, महागाई, संप, आंदोलने, उपोषण, आरक्षण समस्या असे अनेकानेक संकटे असतांना प्रधानमंत्री मोदी करोडो अब्जो रुपये खर्च करुन महिन्यातून 5/6 दौरे विदेशाचे करीत आहे. देशातील बहुजनाच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. सरकार उलट बहुजनावरच अन्याय अत्याचार करुन हुकुमशाह बनून बहुजनामध्ये दहशत निर्माण करुन आपल्या खुर्च्या कशा सुरक्षित राहतील एवढाच विचार करुन शासन यंत्रणा राबवित आहे. सामान्य बहुजन जनता मात्र ढोरासारखे जीवन जगत आहे.
बहुजन सैनिक विनाकारण चीन पाकिस्तान सीमेवर पाठवून त्यांचा संहार घडवून आणत आहे कुपोषण, उपासमार, बेरोजगारीने आदिवासींना संपविण्याबरोबरच त्यांना नक्षलवादी ठरवून गोळ्या घालून संख्या कमी करण्याचे प्रयत्न चालू आहे. 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावची दंगल घडवून व आंबेडकरी जनतेला दहशतवादी ठरवून त्यांची संख्या कमी करण्याचे व गप्प बसविण्याचे कपट कारस्थान चालू आहे. आदिवासी, आंबेडकरी नंतर भटके- विमुक्म व नंतर इतर मागासांना नक्षलवादी ठरवून सर्व बहुजनाची संख्या कमी करण्याचे प्रयत्न चालु आहे. गोहत्या, धर्मांतर, गोमांस, नमाज, आंतरजातीय व धर्मीय विवाह, व्यवसायबंदी वगैरे अनेकानेक बंदी लादून मनुवाद सर्वांवर लादण्याचा व गुलाम बनविण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे. आजच्या सरकारला बहुजनाला काहीही न देता बहुजनाकडून सर्व हिसकावून घेण्याचे धोरण स्वातंत्र्याच्या काळापासून दिसत आहे. बहुनावर अत्यंत अत्याचार होत असतांना सरकार कोणत्याच गुन्हेगारावर व गुंडांवर कार्यवाही न करता उलट अत्याचारीत व्यक्तिलाच शिक्षा करीत आहे. दिवसाढवळ्या बहुजन महिलांची अबु्र लुटली जात आहे. बलात्कार, विनयभंग, नग्न धिंड, बहिष्कार, महिलांना पोलीस ठाण्यावर बसून घेणे, गरीबीमुळे वेश्या व्यवसाय करणे, दासी प्रथा, अनैतिक संबंध, भु्रणहत्या, लहान मुलामुलींची चोरी, शस्त्रक्रियेद्वारे किडनी व इतर महत्वाचे अवयव काढून विक्री, प्रसुतीच्या गैरसोय, हुंडाप्रथा, महिलांबरोबर कामिक नेते व साधु- संताचे चाळे, गरीब रोजगार महिलांचे शोषण, कामगार महिलाच्या गैरसोयी, रात्रपाळीच्या महिलांची सुरक्षा व्यवस्था अशा हजारो समस्या बहुजन महिला समोर आहे. पण कोणतेही सरकार महिला समस्यांकडे लक्ष देत नाही.
12) एकूणच सर्व बहुजनाचा संव्हार व्हावा, ते शिक्षण, सत्ता, संपत्ती, सुखसाधने, हक्क अधिकार, संरक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय, प्रगती पासून वंचित राहावे. फक्त त्यांच्याकडे जगण्यापुरती अपूर्ण साधने असावीत व ते सतत कानाखाली राहून जातीवाद्यांची, श्रीमंताची, ब्राह्मण- बनियांची गुलामी करीत राहो अशा प्रकारची सरकार धोरणे राबवित आहे.
बहुजनाच्या शिक्षणावर घाव घालण्याचा मुख्य हेतु म्हणजे बहुजन समाजात कोणीही उच्च व व्यावसायिक शिक्षण घेऊ नये, या समाजात कोणीही राजकारणी व मार्गदर्शक, डॉक्टर, वकील, अभियंता, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, वर्ग एक व दोनचे अधिकारी तयार होऊ नये व यांची बेकार पिढी फक्त आपल्या घरी स्वच्छतेची, कपडे धुण्याची, भांडे धुण्याची व आवश्यक वस्तु उत्पादनाची कामे करुन फक्त श्रीमंताच्या सुखासाठी जगत राहावा असा यांचा अमानवी, विषमतावादी हेतु व नीती आहे. संगणक व विज्ञान युगात मनुष्यबळाची गरज राहणार नाही, रोबो व इतर मशीनद्वारे अनेक कामे करुन घेता येणार आहे. खाद्यपेय पदार्थ वस्तु अन्य देशातून आयात करता येईल, कारण देशाची प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे असल्यामुळे ते विदेशी महागड्या वस्तु सहज मिळवू शकतील. प्रचंड पैसा साठवून ठेवल्यामुळे बहुजन नोकर कमी करुन विदेशी नोकर ठेवण्याची नीती सरकारची दिसून येत आहे. कारण येणार्या काळात सर्व बहुजन एकत्र आल्यास शिक्षण, सत्ता, संपत्ती, संरक्षण वगैरे बाकी त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. म्हणून जातीवादी व मनुवादी सरकार बहुजनांना आजच सर्व क्षेत्रात दुर्बल व निराधार बनवून येणार्या काही दिवसात क्रमश: संपविण्याच्या प्रयत्नात आहे, असे त्यांच्या सर्व प्रकारच्या हालचालीवरुन दिसून येत आहे.
13) मोदीचे परदेश दौरे हे देशाच्या अथवा बहुजनाच्या कल्याणासाठी होत नसून बहुजनांना संपविण्यासाठी व त्यासाठी विदेशातून सर्वप्रकारचे व सर्व क्षेत्रातले त्यांना सहकार्य मिळावे व त्यांची बहुजनाविरोधाची प्रतिक्रांती यशस्वी न झाली तर त्यांच्याकडील संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षित स्थळ अथवा देशासाठी होत आहे, असे मला खात्रीने वाटले. कारण सरकारमध्ये करोडोंनी ब्राह्मण, बनिया भ्रष्टाचारी, गुन्हेगार, देशद्रोही आहेत. पण सदर सरकार या सर्व देशद्रोहींना संरक्षण देत असून देशनिष्ठ, देशभक्त आणि बहुजन हितचिंतकांना धमक्या देत आहे, व जेलमध्ये पाठवित आहे. तेव्हा भारतीय संविधानाच्या विरोध प्रतिक्रांती करण्याची त्यांची पुर्ण तयारी झाल्याचे दिसून येत असून येणारी 2019 ची लोकसभा निवडणूक येनकेन प्रकारे जिंकून प्रतिक्रांतीला मूर्त स्वरुप देण्याचे त्यांनी ठरविलेले असल्याचे सूर्यप्रकाशाइतके सुस्पष्ट मला दिसत आहे.
तेव्हा बहुजनांनी आपसातील सर्व मतभेद जाती-धर्म भेद, पक्षभेेद विसरुन एकत्र येऊन येणारी लोकसभा जिंकणे आवश्यक आहे. नसता सर्वजन आपल्या मरणाची आणि सरणाची (अग्निसंस्काराची) व वाचल्यास गुलामी करण्याची मनाची तयारी करुन ठेवा.
जयभारत- जयसंविधान
प्रा. ग.ह. राठोड औरंगाबाद