नेता, समाजसुधारक, जागृतीकार, प्रबोधनकार संत कसा असावा?

नेता, समाजसुधारक, जागृतीकार, प्रबोधनकार संत कसा असावा?

नैसर्गिक पावसामुळे अनेक खोंगळ्या, नाले, नद्या, ओढे तयार होऊन ते वाहत राहतात. या सर्व जलप्रवाहामुळे शेतकर्‍यांचे, गावांचे, शहरांचे, रस्त्यांचे, वस्तींचे नुकसान होत असेल, अडथळा निर्माण होत असेल तर जागृत, प्रशासन, गावकरी, शेतकरी हा जल अथवा पाणी प्रवाह कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून हा प्रवाह योग्य दिशेने बाहेरच्या वाटेनं वळवून देतो व होणारे नुकसान, वित्तहानी, जीवहानी टाळण्याची कामे जागरुकपणे करतो व सर्वांचा फायदा मिळवून देतो. या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाप्रमाणेच समाजात अनेक सण, उत्सव, देवी-देवतांचे वार्षिक वाढदिवस, स्मृती दिवस, महापुरुषांचे, संतांचे, सुधारकांच्या सुद्धा जयंत्या, मयंत्या साजर्‍या करून आनंदोत्सव किंवा करमणुकीचा, मनोरजंनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. अशा कार्यक्रमांसाठी हजारो, लाखो रुपये खर्च करून, प्रवास करून, वेळ आणि मनुष्यबळ खर्च करून, अनेकवेळा लोकांना, वाहतुकीला अडचणी आणून, शांतता भंग करून काही वेळा वाद निर्माण करून सदर कार्यक्रम घेतले जातात. काही कार्यक्रम तर अनेक दिवस घेतले जातात. पण अशा कार्यक्रमाच्या नफा नुफा-नुकसानीचा कोणीच विचार करीत नाही. केवळ परंपरा, रीत, करमणूक, मनोरंजन म्हणून घेतले जातात व कष्टाचा पैसा, वेळ, मनुष्यबळ वाया घालतात व तात्पुरते समाधान व करमणूक यात खोटा, निरर्थक आनंद मानतात. डोंगर पोखरून सोने, चांदी, हिरे, मोती, जलसाठा न प्राप्त होता या डोंगर पोखरणीत केवळ उंदीर सापडत असेल तर हे काम शहाणपणाचे व फायद्याचे विचारी कधीच मानणार नाही व असले मूर्खपणाची कामे करणार नाहीत. विचारी माणूस समाज किंवा सरकार अशा निरर्थक, निरोपयोगी कामांऐवजी समाजोपयोगी कामे म्हणजे पर्यावरण पोषक, वृक्षारोपन, स्वच्छता, जलसंधारण, स्वास्थ्य सुधार, वाचनालय, व्यायामालय, शिक्षणसंस्था, अनाथाश्रम, धर्मशाळा, विश्रामगृह, किसान भवन, मजूर भवन, जवान सहयोग निधी, आखाडे व चौक्या भरविणे, गुणवंतांचा सत्कार, गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण व विवाहनिधी, सभागृह, मंगल कार्यालय अशी अनेक समाजपयोगी कामे करता येतात. पण गणपती मेळा, होळी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, तीज, डीजे, वैवाहिक कार्यक्रम, मिरवणूका, पशुबळी व इतर अनेक क्षेत्रदर्शन, प्रवचन, ग्रंथ सप्ताह, नविन मंदिर निर्माण, भोजनावळी अशा धार्मिक कर्मकांडामध्ये अमाप पैसा, वेळ व मनुष्यबळ वाया घालणे समाजघातक समजून लोक कल्याणकारी, समाजपयोगी, विधायक कामाकडे समाज कसा वळेल किंवा कामे करील अशा प्रकारचे मार्गदर्शन, जागृती, प्रबोधनकारांची, दिशानिर्देशांची कामे नेते, साधू संत, समाजसुधारक, प्रबोधनकार, जागृतीकार यांच्याकडून आजच्या काळात होण्याची गरज आहे. याशिवाय घातक रुढी परंपरा, हुंडा, व्यसनाधिनता, जाती धर्मवाद, भांडवलशाही, घराणेशाही, कौटुंबिक ऐक्य, आई-वडिलांची सेवा या बाबत जनजागृती प्राधान्य क्रमाने करण्याची गरज आहे. निरक्षर, अंधश्रद्ध, अविचारी, स्वार्थी समाज, लोक जे काही घातक कार्य करीत आहेत, अशा कार्यक्रमाला कथित सुधारकांनी जाण्याचे टाळावे व गेले तरी त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याचे किंवा असे घातक व कालबाह्य कार्यक्रम बंद करण्याबाबत समज देणे, मार्गदर्शन करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याची व सर्जनशील दिशा समाजाला देण्याची मोठी जबाबदारी वरील वर्गावर आहे. ही जबाबदारी पार पाडण्याची कामे त्यांच्याकडून आग्र क्रमाने व्हावीत एवढीच अपेक्षा, श्रीमंत लोकांनी असे निरर्थक, धार्मिक, करमणुकीचे कार्यक्रम केले तर त्यांचे विशेष नुकसान होत नाही. पण गरीब मागासवर्गीयांनी विशेषत: भटक्या समुहांनी असे शोषक, खर्चिक धार्मिक कर्मकांडे, कार्य केले तर त्यांचा कष्टाचा पैसा खर्च होऊन कर्जबाजार होऊन उपासमारीची पाळी येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून गरीब लोकांनी विचार करून करमणुकीखातीर व परंपरा म्हणून अशा खर्चिक सण, उत्सव, रुढी परंपरा म्हणून असले कार्यक्रम करू नये, असे माझे विचार आहे. टाळता येणे शक्य नसल्यास अधिक खर्च, वेळ व मनुष्यबळ वाया घालू नये. जय भारत - जय संविधान. प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments