राजा हा काळाचा निर्माता आहे

राजा हा काळाचा निर्माता आहे

राजा म्हणजे प्रजेचा देशाचा,संघटनेचा, पक्षाचा प्रमुख, कारण या प्रमुखाला प्रजेने सर्व अधिकार दिलेले असते. या अधिकारानुसार तो सर्वशक्तीमान असतो. प्रजेने जे अधिकार राजाला दिलेले असतात त्या अधिकाराचे प्रजेला पालन करावेच लागते. अधिकाराचे उल्लंघन करणार्‍याला राजा दंड अथवा शिक्षा देतो व गुन्हेहगाराला म्हणजे अधिकाराचे भंग करणार्‍याला दंड अथवा शिक्षा भोगावीच लागते अन्यथा सर्व दु:ख अडचणी सहन करुन मुक्काटपणे आज्ञेनुसार वर्तन, व्यवहार करावे लागते, कारण राजाला प्रजेने अधिकार दिल्यामुळे तो सर्वशक्तीमान बनलेला असतो. त्याच्या आदेशाचे पालन न केल्यास आदेश मोडणार्‍याचे सर्व बाजुंनी दमन केले जाते. म्हणून राजा हा काळाचा निर्माता, काळाला युगाला प्रजेला दिशा देणारा म्हणला जातो. काळाची, युगाची, प्रजेची दिशा व दशाही राजाच्या स्वभावानुसार बदलते, म्हणूनच म्हणले जाते की जसा राजा तशी प्रजा, राजा बोले आणि दल हाले, म्हणजे राजाच्या इच्छेप्रमाणे, विचाराप्रमाणे, आदेशाप्रमाणे देशाची संपूर्ण मानवीय शक्तीला राबावे अथवा काम करावे लागतेे. कारण राजाच्या हाती, सत्ता, संपत्ती, शस्त्रे, शिक्षण व इतर सर्व सामाजिक साधने एकवटलेली असतात व या एकवटलेल्या साधनांच्या सदुपयोग/दुरुपयोग करणे हे कवेळ राजाच्या बुद्धिमत्तेवर अथवा लहरीपणावर अवलंबून असते, व त्याचे बरे वाईट परिणाम समाजाला भोगावेच लागते, राजा समतावादी न्यायवादी असला तर सर्वांला न्याय दिला जातो सर्व सुखी बनतात, पण राजा जर जातीवादी, धर्मवादी, देव-दैववादी, कर्मंकांडावादी असला तर त्याच्या सर्व प्रकारच्या कृत्याचे फळ ज्या त्या समुहाला भोगावे लागते, कारण राजा बोले दल हाले आणि गरीब दुर्बल बोले दाढी न हाले असी म्हण आहे, याच म्हणीप्रमाणे ज्या समुहाचा राजा, विचारांचा राजा, त्यांची मजा असते, व ज्यांचा राजा नसतो, त्याला मात्र सजा मिळत राहते व ती भोगावीच लागते, हा बळी तो कान पिळी या नियमानुसार निसर्ग नियम आहे. प्राचीन काळी म्हणजे आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी भारतात गणसंघ व्यवस्था होती, ही गणसंघ व्यवस्था जात,धर्म, देव,धर्म, देव,दैव व कर्मकांडमुक्त होती, म्हणून त्या काळातील जनतेला जात,धर्म, देव-दैवाचे दुष्परिणामाला सोमारे जावे लागले नाही. तद्पूर्वीचा काळ हा जंगली व स्वैराचारी संस्कृतीचा काळ होता, त्याची फळेदेखील जनतेला भोगावी लागली. या प्रारंभीच्या काळात तो नग्न व स्वैराचारी अवस्थेत तो कंदमुळे, फळे, मांसाहार करुन गुहेत,झाडावर, झाडाच्या ढोलीत असुरक्षित जीवन जगला. हा काळ इ.स. पूर्व 7000 ते 6000 वर्षापूर्वीचा मानला जातो. इ.स.पूर्व 6000 ते इ.स.पूर्व 4500 व 4500 ते 1700 पर्यंतचा काळ हा मेहरगड ते सिंधुसंस्कृतीचा काळ व यानंतरचा म्हणजे इ.स.पूर्व 1700 ते इ.स.पूर्व 4000 पर्यंतचा काळ हा आर्य ब्राह्मणा वर्चस्वाचा म्हणजे बहुजन गुलामीचा काळ मानला जातो. आर्य ब्राह्मणांचा वर्चस्वाचा काळ हा अमानवी व अशांततेचा, विषमतेचा काळ होता, या नंतरचा म्हणजे इ.स.पूर्व 400 ते सम्राट अशोकांच्या अनुयायांच्या काळापर्यंतचा काळ हा तथागत बुध्द अनुयायी सम्राट अशोकाचा शांती, समृद्धी, सुख, आदर्श मानवी संस्कृती व समता, मानवतेचा काळ मानला जातो. यानंतरचा काळ मात्र विदेशी शासकांचा (मराठा,राजपुत,शिख) काळ वगळून 1947 पर्यंतचा मानला जातो. या सर्व काळात ज्या त्या राजाच्या धर्माप्रमाणे व देव, देवी कर्मकांडाप्रमाणे, तसेच त्यांच्या लहरीपणामुळे राजाच्या जनसमुहाला व राजेत्तर जनसमुहाला सुख दु:खे भोगावी लागली आहेत. 1947 नंतर मात्र देशात लोकशाही पध्दतीने राज्य व समाज व्यवस्था चालू असली तरी या व्यवस्थेमध्ये जात,देवी, देवता, दैव, धर्म, धर्मक्षेत्र, धर्मगुरु, धर्मग्रंथ, यज्ञयाग, मंत्र-तंत्र, भट, पुरोहित, व या परोपजीवी साधुसंताच्या समुहाचा गोंधळ आणि मनमानी चालू असल्यामुळे राजाचा जनसमुह तुपासी व इतर जनसमुह मात्र उपासी, बेकार व गुलामीचे जीवन जगत आहे. 1947 नंतर देशाची घटना जात, देव, धर्म, संप्रदाय, पंथ, कर्मकांड निरपेक्ष अथवा मुक्त असतांना देशात 1947 पासूनच जातीवादी, धर्मवादी, दैववादी व तीर्थक्षेत्र, धर्मग्रंथवाद्यांचा नंगानाच चालु आहे सांगण्याचा अथवा लिहीण्याचा उद्देश असा की, जाती, धर्म, देव, विचारधारानुसार ज्या त्या देश अथवा समाज प्रमुख, राजाचा, नेत्याचा, पक्षाचा अथवा संघटनेचा परिणाम ज्या त्या समाजावर होतो अथवा केला जातो व त्यापासून नफा नुकसान ज्याच्या त्याच्या वाट्याला येते. हिंदु, मुस्लिम, इसाई, पारसी, शिख, जैन, बौध्द, मराठा, राजपुत वगैरे प्रमुख आपापल्या जनसमुहाला जवळ घेण्याचा किंवा विचाराचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात व त्याप्रमाणे फायदे मिळवून देतात अथवा नुकसान सुध्दा करतात. अशा प्रमुखामध्ये राजा, पक्ष, संघटना, गांव, शहर, कुटुंबप्रमुखाबरोबरच समाजातील, देशातील, साहित्यीक, विचारवंत, श्रीमंत, अतिधनवान, उद्योगपती, ठेकेदार, व्यापारी, अधिकारी, जागृतीकार, प्रबोधनकार, महापुरुष, क्रांतीकार, साधु संत, धार्मिक, सामाजिक कर्मकांड या सर्व घटकाचा परिणाम होतो आणि त्याप्रमाणे संपूर्ण समाजाची वाटचाल होत राहते. वरील सर्व जनप्रतिनिधी जर विचारी, दृष्टा, बुध्दीजीवी, जनहितचिंतक, समतावादी असेल तर त्यांनी घेतलेले निर्णय, केलेले कार्य, दाखविलेले मार्ग, निघालेले परिणाम हे सर्व हिताचे, सर्वांच्या सुखाचे, एकीचे, विधायक, सर्जनशील, कल्याणकारी व निर्विवादित ठरतात. नसता समाजाला घातक ठरतात. गोर बंजारा समाज व लिंगायत समाजातील काही धनवान लोक सध्या राजकीय क्षेत्रातील स्वार्थसिध्दीसाठी वरील दोन्ही जात, धर्मनिरपेक्ष समाजाची दिशाभूल करुन स्वतंत्र धर्माची मागणी करीत आहे. विशेष म्हणजे गोर बंजारा समाजाचे हजारो वर्षापासूनचे न्याय व समतावादी जीवनशैलीकडे दुर्लक्ष करुन जाती व विषमतावादी धर्म जीवन पध्दतीचा स्वीकार करणे हा निर्णय अमानवी व चूकीचा आहे. धर्म, जाती व विविध देव व कर्मकांडामुळे भारतीय समाजात दुफळी निर्माण होऊन देशाचे खुप मोठे नुकसान झालेले आहे व अद्यापही होत आहे. तेव्हा या घातकी आजारांचा त्याग करण्याऐवजी त्यांचा स्वीकार करणे हे फार मोठे धोक्याचे व अविचारीपणाचे काम आहे. पण समाजातील काही मान्यवर, धनवान, प्रभावी परंतु अविचारी लोक पूर्वजांचाही अपमान करुन धर्म, धर्मपीठ, धर्मक्षेत्र स्थापण करुन समाजाला ब्राह्मणवादाकडे नेण्याचा किंवा समाजाचे ब्राह्मणीकरण करण्याचे कसोशीने व जिद्दीने प्रयत्न करीत आहे. त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होईल, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. परंतु समाजाच्या अस्तित्वापासून समता व न्यायवादी असलेला, मानवतावादी, श्रमप्रधान, स्वावलंबी, मातृवत्सल असलेल्या समाजाला विषमतावादी व अन्यायी, कर्मकांडवादी मार्गाला लावून त्यांची आदर्श मानवी संस्कृती, सभ्यता, इतिहास आणि साहित्य नष्ट करण्याचे अमानवी, घातकी कार्य धनिक समाज प्रतिनिधीकडून आज रोजी जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे. म्हणून समता व न्यायवादी समाज घटकांनी एकत्र येऊन या समाज घातकी निर्णय व प्रयत्नाविरुध्द आवाज उठविण्याची गरज आहे. समाजातील विचारवंतांनी व परिवर्तनवाद्यांनी या घटनेकडे सतत जागृत राहून समाज प्रबोधन करण्याची आजची खरी गरज आहे. वस्तुत: काल्पनिक अथवा मानव निर्मित देवाला, सर्वज्ञ, सर्व व्याप्त सर्व शक्तितमान मानणे हा मानव बुध्दीचा कमकुवतपणा, अज्ञान किंवा स्वार्थ आहे. देशाचा जो राजा अथवा प्रमुख असतो, तोच खरा सर्वशक्तिमान म्हणजे सर्व अधिकार संपन्न असतो. सर्व व्याप्त म्हणजे संपूर्ण देशावर त्याची सत्ता चालते व सर्वज्ञ म्हणजे संपुणृ देशाची माहिती सुध्दा त्याला असते. म्हणून जगात कोणताही कृत्रिम देव, ईश्‍वर, सर्वशक्तिमान , सर्वज्ञ, सर्व व्याप्त नसून प्रत्येक देशाचा राजाचा सर्व शक्तिमान असतो. राजाच्या इच्छेवरच सर्व कृत्रिम देवाचे अस्तित्व असते. नसता सर्व देवी, देवता, त्यांचे पुतळे, प्रतिमा, मंदिर, तीर्थक्षेत्र वगैरे सर्व राजाकडून नष्ट केले जातात. म्हणून राजा हाच खरा देव म्हणजे दाता व सर्वशक्तिमान असतो. मृत, निर्जीव देवांना सर्वशक्तिमान मानणे यासारखे दूसरे अज्ञान नाही. जयभारत-जयसंविधान प्रा. ग.ह. राठोड औरंगाबाद

G H Rathod

162 Blog posts

Comments