बहुजनांनी मतदान करण्यापूर्वी आपल्या हक्कांची कामे शासनाकडून करून घ्यावी
दि. 1-5-2022
बहुजनांनी मतदान करण्यापूर्वी आपल्या हक्कांची कामे शासनाकडून करून घ्यावी
1) स्वातंत्र्य आणि विषमता - आज रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत. देशाच्या शासनकर्त्या वर्गांनी देशातील विषमता दूर करण्याच्या शपथेवर प्रतिज्ञा केली होती. स्वातंत्र्यानंतर गरीब-श्रीमंतातील, शहर-खेड्यातील, श्रीमंत वस्ती व झोपडपट्टीतील, वाड्या, तांडे, पाल, डोंगर-दर्यातील, माळमाथ्यावर, डोंगर - पर्वतावरील, आदिवासी पाड्यातील जाती-जाती व धर्म पंथातील, शेतकरी, जवान, मजूर, स्त्री-पुरुषातील, शिक्षण, नोकर्या, उद्योग, व्यापार, रोजगार, आरोग्य रस्ते, विजपुरवठा, निवास, अन्न-वस्त्र, पाणी या व इतर अनेक क्षेत्रातील विषमता दूर होऊन देश एक समृद्ध, बलवान, सुखी, शांतीप्रिय व जातधर्मदेव दैवविरहित बनून जगात सर्वश्रेष्ठ बनेल. विश्व गुरुस्थानी राहील अशी अपेक्षा होती.
2) भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या, महामानवांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे वरील स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा होती.
2) देशाच्या घटनेच्या सर्व विरुद्ध घडत आहे - आज देशाच्या घटनेची शपथ घेऊन शासनकर्ता झालेला वर्गच घटना विसरुन गेल्याचे दिसून येत आहे. शासनकर्ता झालेला वर्गच घटना विसरुन गेल्याचे दिसून येत आहे. शासनकर्ताच देशाला व गरिबांना लुटत असल्याचे दिसून येत आहे. शासनकर्ता देशाला व गरिबांना लुटत असल्याचे दिसून येत आहे. शासनकर्ता वर्गच दिवसेंदिवस गब्बर होत असल्याचे व उद्योगपतीच्या हातचे खेळणे झालेले दिसत आहे. शासनकर्ते, उद्योगपती, वरिष्ठ नोकर वर्ग, वार्तापत्रे, निवडणूक आयोग, नियोजन आयोग, शिक्षण आयोग, न्यायालय, विदेशी संस्था, संघटना, व्यापार या सर्वांची युती झाल्याचे ठळकपणे जाणवत आहे. शासनकर्ते केवळ स्वकीय व हितचिंतकाचे हित करण्यात गुंतले असून शेतकरी, कष्टकरी, जवान व सामान्य, वंचित, बहुजन वर्गात हातातले खेळणे बनवून त्यांचा मन मानेल तसा वापर करीत आहे. देशाची सर्वश्रेष्ठ मौल्यवान घटना गुंडाळून देशाला मनुवादाच्या फंद्यात गुंतवुन विनाकष्टाचे विलासी, भोगवादी, स्वैराचारी, भ्रष्टाचारी, व्याभिचारी जीवन जगत आहे. संत सेवालाल बापुच्या वचनाप्रमाणे धनवानाचा पैसा गल्ली-गल्लीत लोळत आहे. महागाई आभाळाला पोहचली आहे. माणुसकी नावापुरती उरली असून देशात गरिबांचे जीव घेण्याचे प्रकार चालू आहे. स्वातंत्र्य गायब झाले असून देशात हुकुमशाही व आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदानाचे मोल नष्ट झाले आहे. भारतातील लोकशाही हा एक व्यापार झाला आहे. बुद्धिहीन, जातीवादी, धर्मवादी, विषमतावादी, व्याभिचारी, भ्रष्टाचारी हेच लोक शासनकर्ते बनून देश विकायला व बरबाद करायला निघालेले आहे. वार्तापत्रे, निवडणूक आयोग, न्यायालय, संरक्षण यंत्रणा हे सर्व काही हाताता घेऊन जंगली हिंस्त्र पशुप्रमाणे वर्तणूक करून सर्वसामान्यांचे सर्व अधिकार हिसकावून हुकुमशाह बनलेले आहेत. देशात जातशाही, घराणेशाही व धर्मशाहीचा, धनाढ्यशाहीचा अमर्याद जोर वाढलेला आहे. सामान्य माणुस लाचार, हताश झालेला दिसून येत आहे. आरएसएस, हिंदू परिषद, बजरंग दल यांना इव्हीएम नवाचा सुपर अणुबाँब हाती लागल्यापासून मस्ताळलेल्या सांडाप्रमाणे प्रधानमंत्री, गृहमंत्री व त्यांचे प्यादे आता हिंदूराष्ट्र निर्मितीची घोषणा करीत आहे. एकूणच देशात भयंकर भयाण आणि स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.
3) स्फोटक परिस्थिती व हुकुमशाही विषमता कशी दूर करता येईल- सर्वप्रथम निवडणूक पद्धत पारदर्शक व प्रतिनिधिक बनवावी लागेल. प्रतिनिधिक म्हणजे प्रत्येक जात व वर्ग समुहाचे प्रतिनिधी हे संख्येच्या प्रमाणात विधीमंडळ, संसद व स्थानिक स्वराज्य संस्था व सेवा क्षेतात पाठविले गेले पाहिजे. यासाठी शिक्षण-प्रशिक्षण व्यवस्था सर्वत्र अद्यावत निर्माण करावी लागेल. शहरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील फरक दूर करावा लागेल. जाती, धर्मवादी, सर्व संघटनेवर बंदी लादून त्याचा साधन संपत्ती सार्वजनिक घोषित करावी लागेल. सर्व धार्मिक क्षेत्रांवरील भोंगे, घंटानाद बंद करून त्याची संपत्ती ही सार्वजनिक करावी. इव्हीएम मशीनवर पुर्णत: व कायम बंदी घालावी. सेवाक्षेत्रातील खाजगीकरण हटवून सवेा व प्रतिष्ठाणे सार्वजनिक घोषित करावी. बँकेतील सोय वाढवून बँका व रिझर्व्ह बँकेची सुरक्षितता वाढवावी. जाती व धर्मवाद नष्ट करून संविधानानुसार धर्मनिरपेक्षता वाढवावी व संविधानालाच देश धर्म मानावा. कमकुवत गटाच्या विकासासाठी शक्य तितक्या लवकर योग्य त्या योजना राबवाव्या. भांडवलदारांवर बंधने लादून त्यांना लोक कल्याणकारी कामे करण्यास प्रोत्साहीत करावे. वरीलप्रमाणे शासकीय धोरणे राबविली गेली तर देशातील हुकुमशाही, विषमता, स्फोटक परिस्थिती आटोक्यात आणता येईल. देशातील महागाई व बेरोजगारी नष्ट करण्यासाठी राष्ट्रीयकरण व नव नवे उद्योग सुरू करण्याची गरज आहे. याचबरोबर शेतकरी, कष्टकरी व जवानांना, कुटुंबियांना, आधार देण्याची मोठी गरज आहे.
4) देशातील षडयंत्र हाणुन पाडावे लागेल - भारत स्वतंत्र झाल्यापासून घटनेच्या कलम क्र. 340 प्रमाणे आज देखील आजपर्यंतचे कोणतेच सरकार इतर मागास वर्गीयांची जनगणना करून त्यांना कलम 341 व 342 नुसार सवलती देण्यास तयार नाही. याचा अर्थ आजपर्यंतचे सर्व सरकार हे जातीवादी, धर्मवादी व इतर मागास, भटके यांच्याविरुद्ध व शत्रु असल्याचे सुस्पष्टपणे कळून आलेले आहे. निवडणूका जवळ येताच सर्व शासनकर्ते गोड बोलतात. आश्वासने देतात, थोडेफार अमिष देऊन, झुलवून व कुत्र्याला तुकडा फेकल्याप्रमाणे एखादे छोटे काम करून निवडणूक जिंकतात व पगार, ठेगेदारी, सवलती वगैरेच्या माध्यमाने सार्वजनिक निधीचा उपयोग करून ठेवायला जागा नसेल इतका पैसा कमवतात. हाच पैसा पुढच्या निवडणूकीत वापरतात व पुन्हा फावड्याने पैसा जमा करून जनतेला मूर्ख बनवितात. अटलबिहारी वाजपेयीपासूनचे सरकार तर कट्टर बहुजनविरोधी असून त्यांनी देशात ब्राह्मणशाही, गुजरातीशाही, भांडवलशाही यांचे घर भरले असून इतरांना लुटले आहे. पुरुषार्थहीन, बहुजनविरोधी देशविरोधी, हा लुटारू समुह असून देशाची तिजोरी, उद्योगधंदे, बँका, भूभाग विकून हा समुह दुसर्या देशात स्थाईक होऊ लागलेला आहे. आजपर्यंत हा जातीवादी, धर्मवादी समुह 35 लाखांपेक़ा जास्त विदेशात पळून गेलेला आहे. नोटबंदी, जीएसटी, विविध कर, महागाई, देशाचे विकलेले सर्व भूभाग, उद्योग, खनीज व स्फोटक पदार्थ, बँका लुटीचे धाडीची, सापडलेली सर्व संपत्ती भाजप सरकार गुप्त बँका आणि विदेशात लपवित असावा अशी शंका येते. विदेशी बरोबर भाजप सरकारची सोडगाठ, घरोबा, भागीदारी, करार, देवाण-घेवाण, सुरक्षितताची हमी व साथ घेऊन ही सरकार बहुजनांचा घात करण्याच्या प्रयत्नात असल्याची शंका येत आहे. कारण या सरकारने देश विकासासाठी मागील 8-10 वर्षांपासून देश विकासाच्या रस्ते व्यतिरिक्त कोणत्याच योजना समाजकल्याणाच्या राबविलेल्या नाही. रस्ते विकासामागे त्यांचा गुप्त व दुष्ट हेतु असू शकतो.
आज महागाई कमी करण्याची, सर्वांना दर्जेदार शिक्षण, नोकर्या, रोजगार, स्वास्थ्य सेवा, संरक्षण देण्याची मोठी गरज असतांना मागील सरकारचे सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून देशात बेकारीचा महापूर निर्माण केलेला आहे. लोकशाही तत्त्वाची पायमल्ली करून देशात हुकुमशाही मनुशाही स्थापन करून बहुजनांना गुलाम बनवून वापरण्याच्या किंवा विदेशात नेऊन विकण्याच्या अथवा संपविण्याच्या प्रयत्नात आहे. या त्यांच्या नीतीचा उद्देश बहुजनांच्या या देशाचा ताबा घेऊन आयत्या बिळातील नागोबा बनून बीळ मालकाला दंश करण्याचा किंवा गिळून टाकण्याचा त्यांचा हेतू दिसून येत आहे.
या सर्व प्रकारच्या संकटावर आता काही उपाय खालीलप्रमाणे आहेत असे मला वाटते.
प्रथम सर्व बहुजनांचे एक मोठे संघटन बनवावे. इव्हीएम मशीन, संघपरिवार, भांडवलदार या सर्वांवर बंधन लादावे किंवा या सर्वांवर बहिष्कार टाकावा. जातीवादी धर्मवादींना दूर करून कोणत्याही परिस्थितीत बहुजनांनी सत्ता हाती घ्यावी. तसेच देशाची साधन संपत्ती, किंमती धातु, शस्त्रे, वगैरे यांची सुरक्षितता वाढवावी. शत्रु या साधनाचा दुरोपयोग करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. इति.
जय भारत- जय संविधन - जय बहुजन
प्रा. ग.ह. राठोड