कालानुक्रमे मानविय संस्कृती व जनसमुहाला संबोधली गेलेली विविध नावे.
भारतभूमीवर मानव समुह अस्तित्वात आल्यानंतर मानविय संस्कृतीला आणि जनसमुहाला अनेक नावाली संबोधण्यात आलेले आहे. या संस्कृतीचा आणि नावाचा कालक्रम खालीलप्रमाणे आहे.
भारतभूमीवर सर्वप्रथम मेहरगड संस्कृती अस्तित्वात आली. ही संस्कृती आजच्या स्वतंत्र पाकिस्तानच्या तुर्कीस्तान प्रांतातील क्वेटा, किलात व सिबील या तीन जिल्ह्याच्या मध्यभागी अस्तित्वात आहे. या संस्कृतीचा काळ हा इ.स.पूर्व 6000 ते 4500 चा एकूण 1500 वर्षाचा काळ आहे. या काळात या संस्कृतीच्या जनसमुहाला कोणत्या नावाने संबोधले जात होते हे अज्ञात आहे. यानंतरच्या इ.स.पूर्व 4500 ते इ.स.पूर्व 1750 चा काळ हा सिंधु संस्कृतीचा काळ मानला जातो. ही संस्कृती पंजाब प्रांतातील प्रमुख सिंधु संस्कृती आणि त्याच्या इतर सहा सहाय्यक नदीच्या क्षेत्रात पसरलेली आहे. ही दुसरी मानविय अतिसमृध्द, विकसित आणि मानव इतिहासातील आदर्श संस्कृती मानली जाते. यानंतरची तिसरी संस्कृती ही इ.स.पूर्व 1750 ते इ.स.पूर्व 530-35 पर्यंतची मानली जाते. या संस्कृतीला आर्य/ वैदिक/ ब्राह्मणी/ सनातनी व हिंदु संस्कृती नावाने संबोधले जाते. या नंतरची चौथ्या क्रमांकाची संस्कृती इ.स.पूर्वची म्हणजे इ.स. पूर्व 530-35 ते इ.स. पूर्व 184 पर्यंतची तथागत बुध्द आणि जैन संस्कृती मानली जाते. वरील काळात आर्य/ वैदिक/ ब्राह्मणी/ सनातनी व हिंदु संस्कृती बुध्दाकडून पूर्णत: नष्ट करण्यात आली होती. इ.स. पूर्व 1750 ते इ.स. पूर्व 530-35 पर्यंंतच्या आर्य/ ब्राह्मणी/ सनातनी व हिंदु संस्कृती बरोबर वैदिक संस्कृती ऐवजी उत्तर वैदिक संस्कृती या नावानेही संबोधले जाते. याचे कारण म्हणजे आर्यपूर्व अनार्याच्या, मुळनिवासी, बहुजनाच्या काळातच वेद, ग्रंथ, लिहिले गेले होते. असे इतिहासकार डॉ. एस.एल. सिंहदेवचे म्हणने आहे. त्यांचे म्हणने असे आहे की, आर्य हे भटके, पशुपालक, पशुमांस, कंदमुळ, फळे भक्षक, असभ्य, अनार्याचे शरणार्थी, भिक्ष्ाुक, स्वैराचारी, जंगली, संस्कृतीहीन, निरक्षर लोक होते. वेद आर्यांनी नव्हे तर आर्य आगमनापूर्वीच अनार्यांनी लिहीले होते. आर्याच्या वर्चस्वाच्या काळात आर्यानी या वेद ग्रंथात त्यांच्या हिताच्या दृष्टीने फेरबदल करुन लिहले गेल्यामुळे वस्तुत: ते उत्तरकालीन म्हणजे आधीच्या,अनार्याच्या काळातील मुळ वेद ग्रंथ नव्हे तर आर्याच्या/ ब्राह्मणाच्या काळातील उत्तरकालीन वेद ग्रंथ म्हणले गेले पाहिजे. कारण आर्यांनी, अनार्यांनी लिहलेल्या मुळ वेद ग्रंथात बदल, फेरफार, प्रक्षिप्त, विकृत करुन त्यांच्या सोईच्या दृष्टीने लिहले गेले होते. म्हणून ते मूळ वास्तव वेद ग्रंथ नसून प्रक्षिप्त, अपभ्राहीत उत्तरकालीन वेद ग्रंथ आहेत. हे उत्तरकालीन आर्याचे वेद ग्रंथ मात्र अनार्य, मुळनिवासी भारतीय, बहुजनाचे हिताचे नसून ते बहुजनाच्या गुलामगिरीचे उत्तरकालीन वेद अथवा पौरााणिक, ब्राह्मणी, सनातनी ग्रंथ आहेत. आर्य/ उत्तरवैदिक काळ/ सनातन/ ब्राह्मणी, सनातनी / ब्राह्मणी/ हिंदु काळापूर्वी, आर्य भारतात येण्यापूर्वी म्हणजे सिंधु संस्कृतीच्या इ.स. पूर्व 4500 ते इ.स. पूर्व 530 च्या काळात अनार्य जनसमुह हा पणी, द्रविड आणि मेलुआ नावाने ओळखला जात होता. मेहरगड संस्कृतीच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व 6000 ते 4500 या काळात मानव समुह बहुआ गोर नावाने ओळखला जात असावा, असा माझा तर्क आहे. आदिमानव गोरीला नावाने ओळखला जात होता. गोरीला शब्दाचा संक्षिप्तरुप नंतरच्या काळात गोर झाला असावा. मेहरगड संस्कृतीच्या काळापर्यंत मानवसमुह व संस्कृती बरीच विकसित झाली होती. या काळातला जनसमुह पशुपालन व अल्प प्रमाणात शेती करु लागला होता. आर्यपूर्वचा सिंधु संस्कृतीचा पणी, द्रविड, मेलुवा, मेलुव्हा नावाने ओळखला जाणारा समुह मात्र आर्य/ उत्तरवेदकाळ/ ब्राह्मण काळात/ सनातन काळात अनार्य, असूर,अर्य, अरि,अहि, दैत्य, दानव, दास, दस्यु, राक्षस, भूत, पिशाच, नाग श्रमण, गंधर्व, किन्नर, यक्ष, शैतान, निशाचर, भयंकर, आगडबंब, आक्राळविक्राळ,दुष्टात्मा, कंजुस, असभ्य, अधम, नीच, नरमांसभक्षक, अनास, बेकनाटा, भेडीया, लोभी, सुदखोर, अवर्ण, व्रतहनं, मृत्य, निषाद, माथावी, जादुविद्यापरायण, मृध्दवाच, बुदु, बुध्दिहीन, शरणार्थी, वृषशिप्र, असुन्नवत, कृष्णयोनी, यातुधान,
भलानस, मरुत, अज व किकट या नावाने ओळखला अथवा संबोधला जात होता. आर्य भारतात येण्यापूर्वी भारतीय मुळ निवासी, बहुजन ,अनार्य, असुर या जनसमुहाला जे मुळ वेद ग्रंथ लिहिले होते, या वेद ग्रंथात मात्र मुळनिवासी, बहुजन, अनार्य, असुर यांना मनिष, मनुष्य, मनुष, विश, वैश्य, क्षत्रिय, कष्टक कुर्मी, किनाश: कृषाण, किसान, पूर्वदेव, पंच, जन, कष्टी, शिश्न, अलीन, व्रात्य, अव्रत, अणव्रत, अन्यव्रत, अदेव, अदेववु, अदेवस्य, अनिंद्र, अयज्वन, अयाझिक, अश्रध्द, अकर्मण, अब्रम्हण, विशनी व कृषक या नावाने संबोधण्यात आले आहे. तथागत बुध्द व महाविरांच्या काळात जनसमुह कोणकोणत्या नावाने ओळखला जात होता या विषयी मला माहिती नाही. पण ज्या समुहांनी हिंदुत्वाचा त्याग करुन बुध्द धम्माचा, तत्वज्ञान अथवा सिध्दांताच्या स्वीकार केला होता तो समुह बौध्द म्हणवून घेत होता तर महावीरजीचे अनुयायी जैन म्हणवून घेत होते. जैन विचारधारा ही भारतातच मर्यादीत राहिली. परंतु बुध्दाचा धम्म नीतीमार्ग, मानवतावाद, समतावाद मात्र संपुर्ण जगात पसरला व अजूनही पसरत आहे. विशेष म्हणजे इतर विचारधाराच्या समुहाची संख्या बुध्दतत्वज्ञानामुळे घटत चालली आहे. एक काळ असा येईल की, पूर्ण विश्व हे बुध्दमय होण्याची शक्यता दिसून येत आहे. परंतु बुध्द तत्वज्ञानाला भारतातील मनुवाद्याचाच सर्वाधिक विरोध असून, मनुवाद संपूर्ण जगालाच घातक ठरत आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही. मनुवाद मधील वर्ण, जात आणि धर्म श्रेष्ठता ही विचारधारा अमानविय, विनाशक व अतिशय विषमतावादी, गुलामी समर्थक आहे. आज ही शक्ती संविधानाच्या विरोधात प्रतिक्रांती करुन सर्व बहुजनावर मनुवाद थांबविण्याच्या प्रयत्नात आहे. बहुजन मात्र घोर निद्रेत असून संघटित होण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. आता मात्र संघटित होऊन सत्ता हातात घेण्याची अनिवार्यता आहे. नसता अखंड गुलामी अटळ आहे.
काळप्रवाहासोबत भारतीय मुळनिवासी ज्याप्रमाणे अनेकानेक नावाने संबोधले गेले, याचप्रमाणे विदेशी आर्य सुध्दा खालील अनेक नावाने संबोधले जात आहे. उदा. आर्य, वैदिक, सनातनी, ब्राह्मण, ब्रम्ह संतती, सुर, द्विज, देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, प्रभु, पुरोहित, भट, पुजारी, भूदेव, भूपती, भुसुर, पृथ्वीपती, विप्र, आराध्य पूज्य वंदनीय, श्रेष्ठ, अमर, अविनाशी, अजन्मा, भिक्ष्ाुक, जगतगुरु,ऋत्विक, याज्ञिक,मांत्रिक, अजिंक्य, अवध्य, अदंड्य, सर्वमान्य, पंडित, विद्वान, उपास्य, अराध्य, जपी, तपी, ऋषि, मुनी, संकटमोचक, दयाळू, संहारक, स्वर्गरथ, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापक, अवतारी, ब्रम्हा, विष्णु, इंद्र, महादेव , राम, कृष्ण, गणेश, दत्त, हनुमान वगैरे वगैरे.
वरील प्रमाणे मानवी इतिहास आणि विकृत, अविकृत साहित्यामध्ये दोन मानवी समुहाचे म्हणजे आर्य- अनार्य, सुर- असुर, देवासुर- देव- दानव, देव- दैत्य, देव- राक्षस, बहुजन- ब्राह्मण, स्वर्गीय- नरकीय, कृषक- अकृषक, श्रमिक- अश्रमिक, आर्य- अर्य, जंगली- सभ्य, आदिवासी- विदेशी, भूलोकी- स्वर्गलोकी, द्विज- अद्विज, सवर्ण- असवर्ण, ब्राह्मण- अब्राह्मण, अभिजन- बहुजन,अमागास- मागास, स्पृश्य- अस्पृश्य, श्रेष्ठ- शुद्र, हिंदु- अहिंदु असे दोनच समुह असून आजपर्यंत या दोन्ही समुहामध्ये हक्क अधिकारासाठी संघर्ष चालू आहे. हा एक प्रकारचा वर्ण, वर्ग, जाती, धर्म, दैवी, कर्मकांड व मानवोपयोगी साधने, संरक्षण यामधला अखंडीतपणे चाललेला संघर्ष आहे. आज हा संघर्ष पुरोगामी आणि प्रतिगामी, साक्षर- निरक्षर, सर्वसंपन्न- सर्वहारा, श्रीमंत- गरीब, श्रमिक- अश्रमिक, शासक- सर्वसामान्य, ग्रामीण- शहरी, अमागास- मागास मधला दिसून येत आहे. आतापर्यंत मी प्राचीनकाळापासून इसवीसन आरंभपर्यंतच्या जनसमुहाची संक्षिप्त माहिती दिली आहे. वरील सर्व समुहामध्ये प्राचीनकाळातील पणी जनसमुह व नंतर भारतात आलेल्या आर्य जनसमुहामध्ये परस्पराच्या जीवनशैलीचा विरोधामुुळे संघर्ष झाल्याचे दिसून आले आहे. प्राचीन काळच्या अनेक जनसमुहापैकी पणी जनसमुह हा प्रमुख होता, व हाच जनसमुह आर्याचा प्रमुख व प्रखर शत्रु होता. याच प्रमुख जनसमुहाला आजच्या काही इतिहासकारांनी वर्तमानकाळच्या बंजारा, वंजारा, लभाना, लभानी समाजाला पणी समुहाचे वारसदार ठरविले आहे. या इतिहासकारामध्ये प्रमुखपणे डॉ. पु. श्री. सदार, डॉ. नवल वियोगी, वकील प. रा. देशमुख, डॉ. प्रताप चाटसे, डॉ. नीरज साळुंखे वगैरे प्रमुख आहेत. हे सत्य तपासण्यासाठी वाचकांना उपरोक्त इतिहासकारांचे सर्व साहित्य वाचून काढण्याची व निर्णय घेण्याची अथवा समिक्षण करण्याची गरज आहे. गोर बंजारा समाजाला इसवीसन सुरु झाल्यापासून इसवीसनाच्या दहाव्या शतकापर्यंत व दहाव्या शतकानंतर साहित्यक्षेत्रात कोणकोणत्या नावाने ओळखण्यात अथवा संबोधण्यात आले आहे, याची यादी कालक्रमानुसार खालीलप्रमाणे आहे. इसवीसन आरंभापासून 10 व्या शतकापर्यंत साहित्यात संबोधलेली संबोधने खालिलप्रमाणे आहे.
संबोधन - वणीज, नीज, वंजारा, बंजारा, तक्षक, वहिका, बहिका, कारवां, टाक, ब्रब्रु, वैदेही, वंजही, ववंजही, सार्थवाह, डोम, डुम, डुमरा, औदुंबरा, पौंड, ओेंडू, योध्यय,खस,कन्वेत, कुणैल, फटकार, कंटक,ककेटिक, कटियार, केरी, किकर, कनिंद, काकू, ख्मारी, कसाई, कतुरिया, कोल्टा, लोहारा, गोकुंदा, नागपाल, वगैरे वगैरे 9 व्या शतकानंतर आजपर्यंत संबोधली जाणारी नांवे खालील प्रमाणे.
उदा: वंजारा, बंजारा, लभाना, लमानी, लबाडा, लुबाना, सुगळी, रुदेणीया, गराशिया, बळदिया, गंवार, गंवारिया, गोर, नट, तुरी, चारण, बाजीगर, सिरकी, बांड, मथुरा, धाडी, ढालीया, भाट, सोनार, नाव्ही, धानकुटा, --गसीया, बामणीया, गमाळीया, रोहिदास, ब्रिजारी, ब्रजवासी, काही, औसरिया, बगीरा, डिगोरा, मुसलीम, शिख, ईसाई, बौद्ध वगैरे वगैरे.
प्राचीन काळी सिंधु संस्कृतीमध्ये अनेक जनसमुह होते हे सर्व जनसमुह जात धर्म, देव,दैव, वर्ण, व्रत, कर्मकांड मुक्त होते व परस्परात बेटी व्यवहार करी होते. अनेक जनसमुहांपैकी पणी हा एक प्रमुख जनसमुह होता व हा समुह आर्य समुहाचा सर्वात मोठा शत्रु होता द्रविड, मेलुआ हे दोन्ही समुह देखील त्या काळात होते. आर्य जनसमुह हा विदेशी म्हणजे मध्य आशियातील युरोपातील जनसमुह असून या समुहानीच भारतात प्रवेश करुन पणी द्रविड, मेलुआ जनसमुहासी संघर्ष करुन विजयी झाला व येथील शासनकर्ता झाला, वरती काळानुसार जी जनसमुहाची विविध जवळजवळ100-- अथवा संबोधने दिलेली आहेत. हा सर्व संबोधने ज्या त्या काळातील शासक वर्गांनी दिलेली नांवे असून या जनसमुहातूनच आज भारतात हजारो जाती, उपजाती, गोत्र, कुळवंश वगैरे तयार झालेले आहेत. प्राचीन काळापासून आजपर्यंत संकरण प्रक्रिया चालुच आहे. या संकरण प्रक्रियेमुळे कोणी कोणाला श्रेष्ठ कनिष्ठ मानले हा पूर्णत: अविचारीपणा असून अमानवियता आहे. जीवन जगण्याची साधने ज्यांना उपलब्ध झाली तो सामर्थ्य बनला व तो दुर्बलांचे दमन करुन शोशण करुन गुलाम बपवून शासन करीत आहे. दुर्बलाला अधिक दुर्बल, कमकुवत बनवून व त्याच्या श्रमाचे शोषण करुन श्रम न करता बिनाश्रम भोगवादी जीवन जगने व दुर्बलावर अन्याय अत्याचार करणे ही मानव समुहाची क्रुर,विक्रत, घातक, विध्वंसक मनोवृत्ती असून ही प्रवृत्ती नष्ट झाल्याशिवाय कोणत्याही देशात अथवा जगात, सुखशांती, समृद्धता, समता, बंधुभाव, न्यायाची स्थापना होणे अशक्यप्राय बाब आहे. सर्वांना समान जीवन उपजनाचे साधन उपलब्ध करुन देणे हेच खरे सह अस्तित्वाचे व सहजीवनाचे अमोध व अचुन जीवनसुत्र आहे. जी पर्यंत वर्ण,जाती,धर्म, धार्मिकवाद यांचा अंत होत नाही, तोपर्यंत सह अस्तित्व व सहजीवन है एक दिवास्वप्न आहे, सहअस्तित्व व सहजीवनासाठी सर्वांनी राष्ट्रीय भावनिक वृद्धी आणि लोकतांत्रिक संविधानाचे काटेकोरपणे पालन केल्याशिवाय शक्य नाही.
जय भारत जय जगत, जय संविधान, जयभीम
प्रा.ग.ह.राठोड