संभाजीनगर/औरंगाबादला खडकी नाव कोणी व का दिले होते?

संभाजीनगर/औरंगाबादला खडकी नाव कोणी व का दिले होते?

दि. 26/05/2023 संभाजीनगर/औरंगाबादला खडकी नाव कोणी व का दिले होते? आजच्या संभाजीनगर/औरंगाबादला पूर्व काळात खडकी नाव का दिले गेले असावे, याबाबत मी येथे पूर्वजांकडून ऐकलेल्या एका कथेचा संदर्भ नमूद करू इच्छितो. कथा अशी आहे की, आजचे संभाजीनगर व पूर्वीचे खडकी नगर हे वस्तुत: गोर बंजारा समाजाचे तांड्याचे स्थळ होते असे माझे चुलत आजोबा आदरणीय वेणू नायक, हाबू नायक, हेमा नायक, बदू नायक, शाहु नायक त्यांच्या बैठकांमध्ये सांगत होते हे मी अनेकदा ऐेकलेले आहे. या खडकी (खडकाळ) नगरस्थानी अनेक नायकांचे (भावकीचे) सोयर्‍यांचे तांडे होते, असे ते सांगत असे. तांडा प्रमुखाचे म्हणजे नायकाचे नाव घेतांना ते अनेकांचे नावे सांगत असे. माझ्या स्मरणात असलेली नावे पदमसिंग नायक, भावसिंग नायक, करणसिंग नायक, हरसिंग नायक, किसनसिंग नायक अशी काही नावे आहेत. आजचा संभाजीनगर हे फार मोठे खडकाळ क्षेत्र होते म्हणून गोर बंजारा समाज या स्थळाला खडकी किंवा खडखडी संबोधत होते. खडकाळ स्थळ, ठिकाण मानत होते. या खडकाळ (खडकी) स्थळावर राहण्याचे कारण ते माणसांना व त्यांच्याकडे असलेल्या हजारो पाळीव गुरे ढोरांना चिखलाचा त्रास होऊ नये यासाठी हे स्थळ तांड्यासाठी निवडल्याचे सांगत असे. चिखलामुळे व चिखलयुक्त क्षेत्रात जनसमुह व जनावरेसुद्धा पावसाळ्यात सुव्यवस्थित राहू शकत नव्हते. म्हणून पावसाळ्यात कोणत्याच जीवाला चिखलाचा त्रास होऊ नये म्हणून गोर बंजारा समाजाने हा खडकाळ (खडकी) क्षेत्र निवासस्थानासाठी पसंत केलेला होता. या पसंतीचे दुसर्‍या महत्त्वाच्या कारणाचा उल्लेख करताना खडकीच्या तिन्ही बाजुला सातारा, दौलताबाद, जटवाडा हा डोंगराळ भाग असल्यामुळे येथे त्यांच्या जनावरांच्या चरायची (चार्‍याची) अतिउत्तम व्यवस्था होती, म्हणून त्यांनी त्यांच्या तांडा निवासासाठी स्थाईक होण्यासाठी या खडकी स्थळाची निवड केल्याचे सांगत असे. येथून कोर्ट कचेरीसाठी त्यांना खुलताबाद हे जवळच होते, असेही त्यांचे म्हणणे होते. आजच्या संभाजीनगरचे नाव खडकी (खिडकी) पूर्व या नगरचे प्रथम शासक मलिक अंबर यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेखा वरुन फत्तेपूर असे ठेवले होते. नंतर खिडकी (खडकी) ठेवण्यात आले होते. कारण येथील मुळ तांडा निवासी गोर बंजारा समुहाने औरंगाबादचे नाव खडकी (खडकाळ क्षेत्रामुळे) खिडकी नव्हे, ठेवलेले होते. या खडकी (खडकाळ क्षेत्राचेच नाव नंतर खिडकी झाले असावे.) खडकीचा अर्थ मलिक अंबरला न समजल्यामुळे किंवा उच्चारणाच्या फरकामुळे नंतरच्या काळात खिडकी म्हटले जाऊ लागले असावे, असा माझा तर्क आहे. खडकी (खिडकीनंतर औरंगजेबच्या काळात खडकी खिडकी ऐवजी औरंगाबाद असे बदलण्यात आले व आता भाजप शासनाकडून औरंगाबाद ऐवजी नाव बदलून 2024 मध्ये संभाजीनगर करण्यात आले आहे. आजच्या संभाजीनगरचे निर्माते वस्तुत: गोर बंजारा समाजाचे तांडाप्रमुख, तांडा नायक विशेषत: पदमसिंह नायक, करणसिंह नायक, भावसिंग नायक, हरसिंग नायक व किसनसिंह हे आहेत. आजच्या संभाजीनगरच्या पाच स्थळांवर हे लोक राहत होते. हे पाच स्थळ आजचे पदमपुरा, भावसिंगपुरा, कर्णपुरा, हर्सुल गाव व किराडपुरा आहेत. वरील पाच तांडा नायकांच्या नावानुसार पाच स्थळांची नावे आहेत. पदमपुरा हे पदमसिंह नायकाचे, कर्णपुरा हे करणसिंह नायकाचे, भावसिंगपुरा हे भावसिंग नायकाचे, हर्सुल हे हरसिंग नायकाचे व किराडपुरा हे किसन नायक यांचे तांडा (गाव) निवासस्थळ आहेत व हे सत्य असून नाकारणे म्हणजे ऐतिहासिकतेची हत्या मानावी लागेल. वरील सर्व ऐतिहासिक सत्यघटनेनुसार असे कळून येते की, इ.स. 1500-1600 मध्ये आजच्या संभाजीनगरमध्ये गोर बंजारा समाजाची खूप मोठी संख्या असावी व मलिक अंबरच्या शासन प्रशासन व सेनेमध्ये सुद्धा गोर बंजारा समाजाचा खूप मोठा भरणा असावा. मलिक अंबरशी त्यांचे चांगले संबंध असावे. म्हणून गोर बंजारांना खूष ठेवण्यासाठी किंवा समाजात तेढ निर्माण होऊन संबंध बिघडू नये, सामाजिक संबंधात वैर निर्माण होऊ नये, म्हणून आजच्या संभाजीनगरला त्यांच्या मुलाचे नाव फत्तेेपुर न ठेवता खडकी हेच नाव कायम राहू दिले असावे, यात शंका नाही. मलिक अंबर हा एक गुलाम होता. मुळ मालकाकडून तो अनेकवेळा विकला गेला. तो मुळचा इथोपियाचा (अबेसिनियाचा) ओराम जनजातीचा गुलाम होता. तो सुरुवातीला चापु, नंतर हपसी, त्यानंतर मलिक व त्याच्यानंतर अंबर नावाने व नंतर मलिक अंबर नावाने प्रसिद्ध झाला. चंगेजखानने त्याची गुणवत्ता व शरीरयष्टी, बहादुरी पाहून त्याला शिक्षित करून सेनेचा सरदार बनविला. पुढे चंगेजखानच्या मृत्युनंतर तो राजा झाला व राज्यविस्तार केला. गोर बंजारा प्रमाणेच त्यांचे मराठा राज्यकर्त्यांशी सुद्धा चांगले संबंध होते. त्यांनी मराठा राज्यकर्त्यांना सुद्धा मदत केली असा इतिहास आहे. पण मनुवाद्यांनी खरा इतिहास नष्ट केलेला आहे व आता सूडबुद्धीचे राजकारण करीत आहेत. मलिक अंबर एक गुलाम असतानाही एक उत्तम राज्यकर्ता होऊन गेला. तो नगररचना तज्ञ व जलपुरवठा तज्ञ होता. संभाजीनगरचा सर्वांगीण विकास त्यानेच केला होता. जय भारत - जय संविधान प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments