कुर्‍हाडीचा दांडा गोतावळीचा काळ

कुर्‍हाडीचा दांडा गोतावळीचा काळ

जेव्हा आपल्याच रक्त संबंधातील आपल्याच गटातील आपल्याच विचाराची, आपलेच हितचिंतक आपलेच मित्र आपलेच संबंधी, आपलेच समदु:खी, आपलेच जीवनसाथी, आपलेच विश्‍वासी, आपल्याच गटांचे, आपल्याच वर्गाची, समुहाची माणसे संगनमत करुन शत्रुसी अथवा शत्रु पक्षाशी हात मिळवणी करतात, त्याला आपल्याकडील गुपीते देतात, मतद करतात, तेव्हा ज्या गटातुन हा माणुस वेगळा होतो, शत्रु बनतो, भेद अथवा गुपीते देतो, त्या मुळ गटाचा सर्वनाश होतो अथवा त्याच्या समोर अनेकानेक अडचणी निर्माण होऊन जगने कठिण होते. याच प्रकाराला‘कुर्‍हाडीचा दांडा गोतावळीस काळ’ अथवा घरका भेदी लंका ढाये’ घराचा नाश, घरभेदी, शकुनी वगैरे नावाने संबोधतात. आपल्या देशात समतावादी व विषमतावादीचे मागील पाच हजार वर्षापासूनचे शत्रुत्व आहे. समतावादी जनसमुह हा श्रमजीवी आहे व तो अनेक प्रकारचे श्रम, कष्ट करुन बंधु भावनेने वागतो,नांदतो, या उलट अश्रमी, श्रम, कष्ट न करणारा, जनसमुह असून तो श्रमजीवी आणि कष्टकरीचे कष्टाचे शोषण करुन विलासी आणि भोगवादी जीवन जगतो. समतावादी, कष्टकरी समुहामध्ये भारताचा मूळनिवासी, बहुजन फुले,शाहू आंबेडकरी विचारांचा समुह येतो, तर दुसर्‍या विषमतावादी गटामध्ये संपूर्ण मनुवादाचा समर्थन करणारा ब्राह्मण,बनिया, राजपुत, ठाकूर, पुजारी, पुरोहित, भट, भांडवलदार, जमिनदार, उद्योगपती, कारखानदार, साधुसंत, मुल्ला, मौलवी, भिक्खू पाद्री, पाळक, मंदिर, तिर्थक्षेत्र, धर्मक्षेत्र, धर्मगुरु, धर्मग्रंथ काही अंशी मराठा व मराठातील इतर मागासवर्ग संपूर्ण मनू(ब्राह्मणी साहित्य) रणवीर सेना, विश्‍वहिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंगदल, स्वाध्याय, ध्यान, योग, विपश्यना, शिवशक्ती, शिव प्रतिष्ठान, गीता, रामायण, महाभारत वगैरेच्या धर्म कथा, पारायण, सप्ताह, नामस्मरण, यज्ञयाग करणारे सर्व जनसमुह हा मनुवादाच्या अंतर्गत येतो, वस्तुत: मनुवाद हा ब्राह्मण वर्गाचा कष्ट न करता बसून खाण्याचा फार मोठे षडयंत्र असून यात बहुजन समाज भरडला जातो आहे. मराठा व इतर मागास म्हणजे आलुतेदार, बलुतेदार हा बहुजन समुहाचाच भाग आहे. परंतू हे दोन्ही समुह गावा शहरात शेजारी शेजारी राहणारे असल्यामुळे ब्राह्मणांनी या समुहावर प्राचीन काळापासून मनुवाद लादलेला असल्यामुळे हे दोन्ही समुह आज रोजी मनुवादाचे पक्के गुलाम झालेले असून ते मनुवादी समुहाला विचार न करता आजही समर्थन देत असून मनुवादी समुहाची गुलामी करीत आहेत. इतर बहुजन समाज म्हणजे अनुसुचित जाती, जमाती भटका, विमुक्त, गुन्हेगार आदिवासी, अल्पसंख्यांक वर्ग हा गांव शहराच्या बाहेर व दूर जंगलात राहत होता. म्हणून हा समुह काही अंशी मनुवादापासून मुक्त अर्थात दूर होता. पण हा समुह जस जसा गांव शहराच्या व मराठा व ओबीसी वर्गाच्या संपर्कात आला, त्याचेसुद्धा मराठा ओबीसीच्या संस्कार प्रभावामुळे मनुकरण म्हणजे ब्राह्मणीकरण झाले. कारण सर्व बहुजनांचा मराठा,ओबीसी समुह क्रमश: मोठे भाऊ आहेत. यामुळे मराठा ओबीसी या मोठ्या भावाचे संस्कार इतर लहान बहुजन समुहावर होत गेले, व भारतातील संपूर्ण बहुजन वर्ग सुद्धा पुर्णपणे मनुमय अर्थात ब्राह्मणमय होऊन गेलेला आहे. या ब्राह्मणवादातून मनुवादातून फक्त जे फुले, शाहु, आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी आहेत तेच फक्त मुनवाद मुक्त आहेत. नसता संपुर्ण भारत हा मनुकरणाच्या रोगाने ग्रस्त असून या असाध्य मनु रोगातून ते फक्त फुले-शाहु-आंबेडकरी विचारांचे औषधी नियमित घेत राहील्यास वाचू शकतात. अन्यथा संपूर्ण बहुजनाचा मृत्यू अथवा विनाश अटळ आहे. कारण मनुवाद हा रोग बहुजनांना गेल्या पाच हजार वर्षापासून जडलेला असून तो आता विश्‍वस्तरावर पसरत असल्यामुळे व या मनुवादाची मुळे देशाच्या सर्व क्षेत्रात व साधन संपत्ती आणि सत्तेमध्ये मजबुतीने रोवली गेल्यामुळे ती बहुजनांना उपटून काढणे सहज शक्य नाही. कारण दिवसेदिवस हा मनुवाद बहुजनांना शिक्षण, सत्ता, संपत्ती, साधनहीन, संरक्षणहीन बनवून त्याचा वापर करण्यास मजबुत व भीतीरहित झाल्यामुळे व विदेशाशी संगनमत केल्यामुळे त्याचा पराजय करणे अवघड झालेला आहे. संपूर्ण बहुजन समाजाने सेंद्रिय व भावनिक ऐक्यातून इ.व्ही.एम. मशीनचा व जातीवादी मनुवादी सर्व पक्षांचा विरोध करुन बहुजनांची सत्ता 2019 मध्ये स्थापन केली तरच मनुवादाला आवर बसण्याची शक्यता आहे. नसता 2019 नंतर कोणत्याही निवडणूका होणार नसून लोकशाही नष्ट होऊन भारतात मनुची हुकुमशाही राहिल. व हळुहळु सर्व बहुजन संपून जाणार यात शंका नाही. कारण देशाच्या विकासाची,समृद्धीची,शांततेची, समता , विषमता निर्माण करण्याची सर्व जन समुहाची सर्वांगीन उन्नती घडवून आणण्याची सर्व साधने मुठभर ब्राह्मण-बनिया व त्याच्या सारख्या समविचारी, अमानवी, भ्रष्ट जाती, धर्म, पंथवादी, निरर्थक, धार्मिक, कर्मकांडवादी, विषमतावादी, संवेंदनाहिन,क्रुर, जनसमुहाच्या हाती आहेत. हा समुह फक्त बहुजनांचे शोषणच करीत नाही. तर त्यांच्या अंशीक प्रगतीत सुद्धा अडथळे आणतात, त्यांना शक्य तितक्या प्रमाणात,निरक्षर, आडाणी, बेकारी, अज्ञानी, साधनहीन, ठेवून , त्यांच्या आवश्यक गरजांची सुद्धा पुर्तता करीत नाही. त्यांच्यात आपसात व जाती जातीत भांडणे लावून, फुट पाडून आरोग्याच्या सोई न पूरवून, त्यांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागृती न करता त्यांना सर्व हक्क अधिकारांपासून वंचित ठेवतात. त्यांना बैलाप्रमाणे राबवून घटनेच्या सर्व अधिकारापासून दूर ठेवून व घटना विरोध करुन केवळ स्वसमाजगट आणि स्वत:,सुखात, आनंदात, जगतात, बहुजनांचे हाल पाहुन दु:खाऐवजी आनंद व्यक्त करतात. अशा कष्ट न करणार्‍या, आयतखाऊ, परोपजीवी, समाज व देशद्रोही, चारित्र्यहीन अशा भ्रष्ट, समाजगटाच्या, संघटना, पक्षाच्या डोक्यात व नसानसात जातीयता, स्वतंत्र्य धर्म, धर्मग्रंथ, धर्मगुरु, धर्मक्षेत्र, मंदिर पुतळे देव-देवता व निरर्थक धार्मिक कर्मकांड ठासून भरलेले असतात. कारण ही त्यांची उत्पन्नाची व बसून पोट भरण्याची साधने असतात. देशाचे व देशातील सर्वसामान्य कष्टकरी जे देशाला समृद्धीच्या शिखरावर नेणार्‍या राबणार्‍या जनतेबाबत वरील लोकांच्या मनाच्या एका कोपर्‍यात सुद्धा कृतज्ञता, सहानुभूती, प्रेम, आपलेपणा व भावनिक बंधुता व संवेदनाशीलता नसते. असे लोक हिस्त्र पशुसारखे असतात. कारण त्यांची धारणा ‘बळी तो कान पिळी’ या तत्वाचे अनुयायी असतात. ते निर्दयपणे म्हणतात मी मोठ्या झाडाखाली लहान झाड उगत नाही. मोठा मासा लहान माशाला खातो, हिंस्त्र पशु गरीब पशुला मारुन खातातत, याचप्रमाणे सबळ मानवसमुह दुर्बल मानव समुहाचा वापर करतो, पण माणुस हा विचारी प्राणी आहे. याबाबत तो कधीही बोलत अथवा विचार करीत नाही, कारण असे जनसमुह स्वार्थी, आळसी, व पुरषार्थहीन, भेकड असतात अतिशय कुटनीतीज्ञ असतात म्हणून ते दुर्बलांना कानाखाली ठेवून त्यांचा वापर करुन स्वत:ला श्रेष्ठ समजतात हा तर पशुत्वाचा व निर्लज्जपणाचा कळसच मानावा लागेल, हेच समाजगट, संघटना, पक्ष आज पर्यंत भारतीय सत्तेवर असल्यामुळे याच गटाकडे देशाच्या समृद्धीची व सुखाची साधने म्हणजे संपत्ती, शिक्षण, उद्योग व्यापार, कारखाने, एजन्स्या, ठेकेदारी व नौकर्‍या, खदानी, मंत्रीपदे, सत्तापदे, अधिकार आहेत, खनीज व रासायनिक, संरक्षण साधने, संस्था, संघटना, प्रतिष्ठाने, बँका सर्वकाही एकवटल्यामुळे परोपजीवी, आळसी, आयतखावू, निर्दय, शोषक, गुलामीचे शोषक व समर्थक लोक बहुजन कष्टकरी समाजाची हजारो वर्षापासून सर्वच क्षेत्रात कोंडी करुन त्यांना गुलाम बवून वापर करीत आहेत. ही गुलामी बहुजनांच्या लक्षात आजपर्यंत येऊ नये ही एक शोकांतिका व आश्‍चर्य पण आहे. बहुजनांनी शत्रु व मित्राची ओळख न करुन घेता व शत्रुला धडा शिकवण्या ऐवजी बहुजन समाज या अमानवी समाज समुहाला सहकार्य व त्याच्या वृत्तीचे, व्यवहाराचे समर्थन करीत आहे, यापेक्षा खेदाची बाब बहुजनासाठी दुसरी नाही. आज रोजी या मनुवादी समाजानी, संघटना, उद्योगपती, नोकरदार पक्षांनी जे केवळ देशाच्या एकूण संख्येच्या 10-15% आहेत ते देशाच्या 85% बहुजन समाजाला वेठीस धरुन त्यांना गुलाम बनवून पशुसमान वापरत आहेत. वर वर औपचारिकपणे हा समाजगट संघटना, पक्ष सर्व देश निष्ठेच्या देश सेवेच्य, देशभक्ताच्या, लोकशाही व समाजवादाच्या घोषणा देऊन व जय जयकार करुन, खोटी आश्‍वासने देऊन संपूर्ण देशावर कब्जा करुन ठेवलेला आहे. खाऊजा, मॉल्स, सेझ वगैरेच्या माध्यमांनी वरील मनुवादी समाज व देशद्रोही लोकांनी बहुजनांना भिकेला लावून पूर्ण देशावर स्वत:ची मालकी स्थापन करुन स्वत: उपरे असूनही मूळनिवासी बहुजनांनाच उपरे ठरविण्याचा, इतिहास बदलण्याचा, एवढेच नव्हे तर बहुजनांना नक्षली व देशद्रोही, भ्रष्टाचारी ठरवून त्यांचा संव्हांर करण्याचे छुपे प्रयत्न चालू केलेले आहेत. स्वजातीचे गुन्हेगार, नालायक, भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड लोकांचे संरक्षण करुन व निरपराध बहुजनांची चोहोंकडून कोंडी करुन काहींना जेलमध्ये पाठवून काहींना खोट्या गुन्हेगारी, भ्रष्टाचारात अडकवून यातना देवून विकृत आनंद व्यक्त करीत आहेत. या सर्व व्यवहाराला एक मात्र मनुवाद कारणीभूत आहे. विशेष म्हणजे या मनुवादास आपला बहुसंख्य बहुजन कार्यरत असून तो अविचारीपणाने या मनुवादाचा व मनुवादीचे समर्थन करीत आहे, यामुळे मनुवाद दिवसेदिवस वाढत आहे व मजबुतही होत आहे, जगातल्या सर्व रोगापैकी मनुवाद हा बहुजनाला लागलेला महाभयंकर असा रोग असून हा रोग बहुजनांचे शोषण व ब्राह्मणाचे पोषण करणारा रोग आहे. हा रोग इतर देशातही आहे, पण या रोगाने भारतात सर्वाधिक बहुजन रोगग्रस्त झालेले आहेत. वस्तुत: मनुवाद हा ब्राह्मण वर्गाचा धंदा, व्यापार, दुकानदारी आणि रोजगार हमी योजना असून बहुजन वर्ग हा सर्व क्षेत्राचा ग्राहक आहे, तथागत बुद्ध, म.फुले, रा. शाहू व डॉ.बाबासाहेब यांच्या वैचारिक प्रभावामुळे या अंध ग्राहकांची संख्या कमी झालेली असली तरी मनुवादाच्या अनेक संस्था संघटना, पक्ष या मनुवादाची पेरणी सत्ता,संपत्ती, साधने, यांच्या आधारावर बहुजनवादी वर्गात सतत करीत असल्यामुळे व दुरदर्शन प्रचारमाध्यमे यांच्या मार्फतही प्रसार होत असल्यामुळे बहुजनसमाज या मनुवादाच्या जाळात फसून ब्राह्मणाचा भक्ष्य ठरत आहे. मनुवादाच्या रोगाच्या व शोषण आणि गुलामीच्या मुळ्या उतर कालीन वेदग्रंथात, त्याच्या शाखा स्मृती, श्रुती, गीता, भागवत वगैरे अनेक ब्राह्मणी साहित्यात खोलवर रुजलेल्या आहेत. तेव्हा भारतीय बहुजन समाज जो पर्यंत या ब्राह्मणी साहित्यात खोलवर रुजलेल्या ओह. तेव्हा भारतीयय बहुजन समाज जो पर्यंत या ब्राह्मणी साहित्यातील समाज,धर्म व्यवस्था आणि शोषक कर्मकांडाचा त्याग करीत नाही, तोपर्यंत मनुवादाला खतपाणी व संरक्षण मिळतच राहणार आहे व बहुजनाच्या शोषणाचा व गुलामीचा पाया भक्कम व मजबुत होत राहणार आहे. या मनुवादाच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी तथागत बुद्धांनी सर्व बहुजनांना धर्म मार्ग म्हणजे नीती(ज्ञानमार्ग) दिलेला आहे. विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेबांनी सुद्धा बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. पंरतू गेल्या पाच हजार वर्षापासून बहुजनांचा मेंदू मनुवादाच्या चिखलात खोल फसलेला असल्यामुळे या चिखलातून त्यांना बाहेर ओढण्यासाठी बसवेश्‍वर, रविदास, कबीर, पेरियार, नारायणगुरु, गुरुनानक, नामदेव, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी सारख्या लाखो समाजसुधारकांची परिवर्तनवाद्याची फौज तयार करण्याची व मनुवादावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची तसेच मनुवाद फोफावणार्‍या सर्व मार्गाची आणि साधनाची सुद्धा नाकेबंदी करावी लागतते. बहुजन समाज जो पर्यंत मनुवाद्याच्या म्हणजे ब्राह्मणांच्या दुकानावर जात राहिल, तोपर्यंत ब्राह्मणवाद वाढतच राहणार यात शंका नाही. बहुजनच्या ब्राह्मणी कर्मकांड आणि विचारांना म्हणजे मुहुर्त, शुभअशुभ, ग्रह कुंडली वर्ग,गण,पुजा, आरती, अभिषेक, व्रत उपवास, मंत्रतंत्र, यज्ञयाग, गंगसस्नान, अस्थीविसर्जन,दहावा, तेरावा, रथयात्रा, वार्‍या, दिंडया, ग्रंथ पारायणे, नामसप्ताह, मुर्ती मंदिर, क्षेत्र निर्माण, मंगळ आष्टके, दान दक्षिणा, भोंदू, साधु-संत, गणपतीमेळा, दत्त हनुमान, राम कृष्ण, समर्थ, जयंती, दासीप्रथा, वास्तु शांती, सत्यनारायणपुजा, ब्राह्मणीदेवाचे नामस्मरण, भजन, किर्तन, प्रवचन, भंडारा याला समर्थन राहील तो पयर्र्ंत मनुवाद कमजोर होणार नाही, व ब्राह्मण धर्म सुद्धा बहुजनांचे शोषण आणि गुलाम बनविण्याशिवाय राहणार नाही. वरील मनुवादाचा समर्थन आणि बळ देणारा वाढविणारा बहुजन समाजच आहे. यात मराठा आणि इतर मागासवर्ग म्हणजे मराठा शेजारी राहणारा आलुतेदार बलुतेदार वर्ग अग्रस्थानी आहे. कारण गांव शहरात मनुवादी ब्राह्मणांचा या समुहासीच प्रथम संबंध होता, इतर समुह हा गावाबाहेर भटका आणि जंगलात राहणारा होता. या समुहाची दोस्ती मित्रता जेव्हा हळुहळु मराठा आणि इतर मागासांशी झाली तेव्हा ते देखील मनुवाद या रोगाने ग्रस्त झाले असून ते सुद्धा मनुवादी गुलाम झालेले आहेत. म्हणून माझे प्रामाणिक मत आहे की, बहुजनांच्या सर्वप्रकारच्या दु:खाला, शोषणाला, गुलामीला, मागासलेपणाला, बेकारी, निरक्षणपणा, अन्याय, अत्याचाराला स्वत: बहुजनच जबाबदार आहेत, म्हणून कुर्‍हाडीचा दांडा गोतावळीला काळ ही म्हण रुढ झाली असून याचप्रमाणे बहुजन वर्ग हा ब्राह्मणाचा, मनुवादाचा भागीदार समर्थक, मददगार होऊन आपल्याच बहुजनवर्गाचा कर्दनकाळ ठरलेला आहे. 2019 ला भाजप पक्ष सत्तेवर आल्यास बहुजनांच्या गुलामीला अनेक पट्टीने गती येणार असून गुलामी अखंडपणे टिकून राहणार आहे, कारण 2019 नंतर लोकशाही व संविधान नष्ट होणार असून भारतात मनुवाद्यांची हुकुमशाही आणि साम्राज्यशाही राहणार आहे, बहुजनांचे गुलामीतून बाहेर पडण्याचे आता केवळ खालील काही मार्ग शिल्लक आहेत. हे मार्ग म्हणजे सर्व बहुजनांनी आपसी मतभेद, जातीधर्मभेद विसरुन संघटीतपणे मनुवादाचा सामना करणे म्हणजे मनुवादावर बहिष्कार टाकणे, दुसरा मार्ग म्हणजे इव्हीएम मशीनवर सुद्धा बहिष्कार टाकणे आणि तिसरा मार्ग आहे, जातीवादी पक्षाला मतदान न करता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या लायक उमेदवारालाच मतदान करुन बहुजनांची सत्ता आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करावे, कोणत्याही अमिषाला जातीवादी पक्षाला बळी न पडता मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. कुर्‍हाडीचा दांड बनून गोतावळीचा बहुजनांचा घात करु नका, एवढीच शेवटी हात जोडून सर्वांना नम्र विंनती व आवाहन आहे. जयभारत जय संविधान प्रा. ग. ह. राठोड, औरंगाबाद

G H Rathod

162 Blog posts

Comments